WhatsApp Feature - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत? https://www.91mobiles.com/marathi/these-47-smartphones-will-not-support-whatsapp-after-31-december-2022-check-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/these-47-smartphones-will-not-support-whatsapp-after-31-december-2022-check-full-list/#respond Tue, 27 Dec 2022 09:28:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16395 WhatsApp भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वप्रथम इंस्टाल केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश असतोच. देशातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप युजर चॅटिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि डॉक्यूमेंट शेयरिंगसाठी याचा वापर करतात. परंतु आता अनेक whatsapp users साठी वाईट बातमी आली आहे. 40 पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सवर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद होणार आहे […]

The post मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वप्रथम इंस्टाल केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश असतोच. देशातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप युजर चॅटिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि डॉक्यूमेंट शेयरिंगसाठी याचा वापर करतात. परंतु आता अनेक whatsapp users साठी वाईट बातमी आली आहे. 40 पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सवर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद होणार आहे आणि यात Apple, Samsung, Lenovo, Sony आणि LG सारख्या ब्रँड्सच्या फोन्सचा समावेश आहे.

Meta च्या मालकीचं WhatsApp हे वर्ष संपताच म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून अनेक स्मार्टफोन्सवर वापरता येणार नाही. कंपनीनं व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट गमावणाऱ्या मोबाइल फोन्सची यादी प्रसिद्ध केली आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सचे एकूण 47 असे स्मार्टफोन आहेत जे 31 डिसेंबर 2022 नंतर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्सेस करू शकणार नाहीत. या लिस्टमध्ये अनेक मोबाइल असे आहेत जे भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत परंतु काही असे स्मार्टफोन देखील आहेत जे भारतात खूप प्रसिद्ध झाले आहेत.

या मोबाइल फोन्सवर आता चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप :

  • Apple iPhone 5
  • Apple iPhone 5c
  • Samsung Galaxy Ace 2
  • Samsung Galaxy Core
  • Samsung Galaxy S2
  • Samsung Galaxy S3 mini
  • Samsung Galaxy Trend II
  • Samsung Galaxy Trend Lite
  • Samsung Galaxy Xcover 2
  • LG Enact
  • LG Lucid 2
  • LG Optimus 4X HD
  • LG Optimus F3
  • LG Optimus F3Q
  • LG Optimus F5
  • LG Optimus F6
  • LG Optimus F7
  • LG Optimus L2 II
  • LG Optimus L3 II
  • LG Optimus L3 II Dual
  • LG Optimus L4 II
  • LG Optimus L4 II Dual
  • LG Optimus L5
  • LG Optimus L5 Dual
  • LG Optimus L5 II
  • LG Optimus L7
  • LG Optimus L7 II
  • LG Optimus L7 II Dual
  • LG Optimus Nitro HD
  • Huawei Ascend D
  • Huawei Ascend D1
  • Huawei Ascend D2
  • Huawei Ascend G740
  • Huawei Ascend Mate
  • Huawei Ascend P1
  • HTC Desire 500
  • Sony Xperia Arc S
  • Sony Xperia miro
  • Sony Xperia Neo L
  • Quad XL
  • Lenovo A820
  • Memo ZTE V956
  • Archos 53 Platinum
  • ZTE Grand S Flex
  • ZTE Grand X Quad V987
  • Wiko Cink Five
  • Wiko Darknight ZT

वरील लिस्टमध्ये ते सर्व मोबाइल फोन्स आहेत ज्यांच्यावर नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. तुम्हाला समजलं असेल की यात एलजी आणि सॅमसंग स्मार्टफोन्सची नावे जास्त आहे. ही ग्लोबल लिस्ट आहे त्यामुळे काही अशी नावे देखील आहेत जे फोन भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत. परंतु जर या यादीतील एखादा असा डिवायस जो तुम्ही किंवा तुमच्या आजुबाजुंचा कोणी वापरत असेल तर त्यात व्हॉट्सअ‍ॅप संपणार आहे.

The post मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/these-47-smartphones-will-not-support-whatsapp-after-31-december-2022-check-full-list/feed/ 0
व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/what-is-community-in-whatsapp-and-how-to-use/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-community-in-whatsapp-and-how-to-use/#respond Sun, 04 Dec 2022 12:03:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14965 लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नं काही दिवसांपूर्वीच नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी (WhatsApp Community) सादर केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर ऑफिस किंवा कॅज्युअल ग्रुप सांभाळणे सोपं जाईल. तसेच फीचर ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपच्या मेंबर्सशी चांगल्या पद्धतीनं कोऑर्डनेट करण्यास मदत करेल. WhatsApp Communities फीचर सर्व युजर्ससाठी रोल आउट झालं आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर दिसू लागलं […]

The post व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नं काही दिवसांपूर्वीच नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी (WhatsApp Community) सादर केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर ऑफिस किंवा कॅज्युअल ग्रुप सांभाळणे सोपं जाईल. तसेच फीचर ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपच्या मेंबर्सशी चांगल्या पद्धतीनं कोऑर्डनेट करण्यास मदत करेल. WhatsApp Communities फीचर सर्व युजर्ससाठी रोल आउट झालं आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर दिसू लागलं आहे. याआधी जिथे कॅमेरा आयकॉन यायचा तिथे आता कम्युनिटी टॅब आली आहे आणि कॅमेरा आयकॉन तुम्हाला टॉप बारमध्ये सर्च बटनच्या डावीकडे ठेवण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला WhatsApp Community फीचरची सविस्तर माहिती देणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी म्हणजे काय?

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेलं नवीन कम्यूनिटी फिचर एक टूल आहे ज्याच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या ग्रुपचे अ‍ॅडमिन एकाच जागी हे ग्रुप मॅनेजर करू शकतील. म्हणजे अ‍ॅडमिन आपले वेगवेगळे ग्रुप्स इथे अ‍ॅड करू शकतात. हा एकप्रकारचा सेंट्रल अनाउंसमेंट ग्रुप आहे. या फिचरच्या मदतीनं ग्रुप अ‍ॅडमिन एकत्र 50 ग्रुप जोडू शकतात, ज्यात 5000 मेंबर्स असू शकतात. तसेच कॉल लिंक पाठवून 32 मेंबर्ससह ग्रुप कॉल करू शकतात. इतकंच नव्हे तर कम्यूनिटीच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडमिन 2GB पर्यंतच्या फाईल सेंड करू शकतो.

इथे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट फीचर व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी (WhatsApp Community) ची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी कशी बनवायची? अ‍ॅडमिन नवीन कम्यूनिटी फिचरच्या मदतीनं आपलं काम कसं लवकर संपवू शकतो? आणि कम्यूनिटी युजर्सना याचा काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे पुढे देण्यात आली आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी कशी बनवायची?

WhatsApp community बनवण्यासाठी युजर्सना सर्वप्रथम Community टॅबवर टॅप करा आणि स्टार्ट युअर कम्यूनिटी (Start your community) बटनवर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमच्या कम्युनिटी चा नाव आणि डिस्क्रिप्शनसह प्रोफाईल फोटो देऊन कम्यूनिटी क्रिएट करा.

हे केल्यानंतर कम्यूनिटी विंडोवर या. आता तुम्ही इथे नवीन ग्रुप बनवता येईल किंवा जुना ग्रुप कम्यूनिटीमध्ये जोडता येईल. दोन्हीसाठी एक डेडिकेटेड बटन असेल. जर तुम्ही जुना ग्रुप कम्यूनिटीमध्ये जोडायचा असेल तर तुम्ही त्या ग्रुपचे अ‍ॅडमिन असणं आवश्यक आहे. कम्यूनिटी विंडोमध्ये तुम्हाला ग्रुपची लिस्ट दिसेल, इथे एक एक डिफॉल्ट ग्रुप देखील असेल, जो अनाउंसमेंट ग्रुप आहे. खाली टिक मार्कवर टॅप केल्यावर तुमची कम्यूनिटी तयार होईल.

तुमच्या कम्यूनिटीमध्ये नवीन ग्रुप जोडतात त्या ग्रुपचे सर्व मेम्बर कम्यूनिटीच्या अनाउंसमेंट ग्रुपमध्ये जोडले जातील.

आता जर तुम्हाला एखादा मेसेज अनेक ग्रुपमध्ये पाठवायचा असेल तर अनाउंसमेंट ग्रुपमध्ये मेसेज टाकू शकता म्हणजे हा मेसेज तुमच्या सर्व ग्रुप मेंबर्सना मिळेल.

अ‍ॅडमिन कम्यूनिटीचा वापर कशाप्रकारे करू शकतो?

अनाउंसमेंट: एखाद्या ग्रुपचा अ‍ॅडमिन म्हणून, कम्यूनिटीच्या मदतीनं एकत्र सर्व ग्रुपमध्ये मेसेज पाठवता येईल. म्हणजे एकच मेसेज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवण्याऐवजी एकाच कम्यूनिटी अनाउंसमेंट ग्रुपमध्ये पाठवून सर्वांपर्यंत मेसेज पोहोचवता येईल. टेक्स्ट मेसेजसह तुम्ही मीडिया फाईल, डॉक्यूमेंट किंवा व्हॉइस नोट्स देखील पाठवू शकता.

मेंबर इन्वाइट: अ‍ॅडमिन कम्यूनिटीमध्ये दुसऱ्या युजर्सना जोडण्यासाठी शेयर लिंक देखील क्रिएट करता येईल. या लिंकच्या माध्यमातून युजर्स फक्त कम्युनिटीमध्ये जोडले जातील. परंतु ते कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. परंतु तुम्ही स्वतःहून त्यांना एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकता.

रिमूविंग मेंबर्स: एखाद्या युजरला ग्रुपमधून काढायचं असेल तर हे काम कम्यूनिटीद्वारे देखील करता येईल. यासाठी तुम्हाला कम्यूनिटीच्या होम पेजवर जावं लागेल. इथे तुम्हाला वर डावीकडे 3 डॉट मेन्यू दिसेल. यावर टॅप करून व्यू मेंबर (View Members) वर क्लिक करावं लागेल. तुम्हाला सर्व ग्रुपचे सर्व मेंबर दिसतील. इथून तुम्ही ज्या युजरला बाहेरचा रस्ता दाखवू इच्छित असाल तर त्यावर टॅप करून आणि कम्यूनिटीसह ग्रुपमधून काढू शकता.

नवीन अ‍ॅडमिन बनवणे: कम्यूनिटी अ‍ॅडमिन असल्यामुळे तुम्ही अनाउंसमेंट ग्रुपसाठी अन्य युजर्सना देखील अ‍ॅडमिन बनवू शकता. यासाठी तुम्हाला कम्यूनिटीच्या मेन पेजवर 3 डॉट मेन्यूवर क्लिक करावं लागेल. इथे तुम्हाला व्यू मेंबरवर टॅप करावं लागेल, ज्या युजरला अ‍ॅडमिन बनवायचं आहे त्यावर क्लिक करा आणि ऑप्शनमधून ‘Make Admin’ (अ‍ॅडमिन बनवा) ची निवड करा.

व्हॉट्सअ‍ॅप युजर कम्यूनिटीचा वापर कशाप्रकारे करू शकतील? | How to use Communities (Other members)

कम्यूनिटीचे सर्व मेम्बर्सकडे अनाउंसमेंट ग्रुपमध्ये अ‍ॅडमिननं पाठवलेले मेसेज, मीडिया फाईल्सचा अ‍ॅक्सेस असेल. तसेच कम्यूनिटी मेंबर अन्य पद्धतीनं अनाउंसमेंट ग्रुपचा वापर करू शकतील.

जॉइनिंग ग्रुप: जर तुम्ही एखाद्या कम्यूनिटीमध्ये असाल परंतु कोणत्याही ग्रुपमध्ये नसाल तर तुम्ही कम्यूनिटीचे वेगवेगळे ग्रुप बघू शकता आणि तो ग्रुप जॉईन करण्याची रिक्वेस्ट अ‍ॅडमिनला पाठवू शकता.

कम्यूनिटी विंडोमध्ये आल्यानंतर युजर्सना ग्रुपची लिस्ट दिसेल आणि ते सहज ग्रुप जॉइन करण्यासाठी रिक्वेक्ट करू शकतील. एखादा मेंबर कम्यूनिटीच्या एका ग्रुपचा मेंबर असेल आणि त्याला दुसरा ग्रुप जॉइन करायचा असेल तर तो कम्यूनिटीमध्ये अ‍ॅडमिनला त्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याची रिक्वेस्ट करू शकतो.

ग्रुप किंवा कम्यूनिटी सोडणे: कम्यूनिटी मॅनेजर कधीही ग्रुप किंवा कम्यूनिटी सोडू शकतो. एखाद्या कम्यूनिटीमध्ये एक किंवा अधिक ग्रुप सोडण्यासाठी ग्रुप डिटेल विंडोमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल.

कम्यूनिटी न सोडता ग्रुप सोडणे: जर तुम्हाला कोणत्याही ग्रुपविना कम्यूनिटीमध्ये अ‍ॅड व्हायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. तुम्ही ग्रुप लेफ्ट करून कम्यूनिटी अनाउंमेंट चॅनेलमध्ये राहू शकता. इथे तुम्हाला ग्रुप अ‍ॅडमिनचे मेसेज रिसीव करता येतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-community-in-whatsapp-and-how-to-use/feed/ 0
WhatsApp Call Links म्हणजे नेमकं काय? कधी सुरु होणार? जाणून घ्या सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/what-is-whatsapp-call-links-features-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-whatsapp-call-links-features-check-details/#respond Sun, 09 Oct 2022 04:26:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13793 WhatsApp Call Links: Meta प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झकबर्गनं अलीकडेच लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरला कंपनीनं कॉल लिंक (Call Links) असं नाव दिलं आहे. या फीचरच्या मदतीनं युजर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉल आणि ऑडियो कॉलसाठी डायरेक्ट लिंक बनवू शकतात. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ आणि ऑडियो कॉलमध्ये एकाच वेळी 32 युजर्स […]

The post WhatsApp Call Links म्हणजे नेमकं काय? कधी सुरु होणार? जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp Call Links: Meta प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झकबर्गनं अलीकडेच लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरला कंपनीनं कॉल लिंक (Call Links) असं नाव दिलं आहे. या फीचरच्या मदतीनं युजर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉल आणि ऑडियो कॉलसाठी डायरेक्ट लिंक बनवू शकतात. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ आणि ऑडियो कॉलमध्ये एकाच वेळी 32 युजर्स जोडले जाऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स एन्ड टू एन्ड इनक्रिप्टेड व्हिडीओ कॉल करू शकतील.

WhatsApp Call Links: म्हणजे काय आणि उपयोग काय?

पॉपुलर व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग प्लॅटफॉर्म जसे की – Google Meet, Zoom, आणि Microsoft Teams मध्ये एक युनिक कॉल लिंक जनरेट केली जाते. या लिंकवर क्लिक करून युजर्स थेट कॉलमध्ये जोडले जाऊ शकतात. हे फीचर आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील येणार आहे. कॉल लिंक्सच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅप युजर्स लिंक व्हिडीओ आणि ऑडियो कॉलसाठी लिंक शेयर करू शकतील. हे देखील वाचा: मोटोरोलानं लाँच केला 10499 रुपयांचा स्वस्त मोबाइल; 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

What Is Whatsapp Call Links Features Check Details

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फिचर लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मच्या युजर्ससाठी लाइव्ह होईल. हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिस्टच्या कॉल टॅबमध्ये दिसेल. इथे युजर्स व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी लिंक जनरेट करता येईल. तसेच कॉल शेड्यूल देखील करता येईल. ही लिंक दुसऱ्या युजर्सना किंवा ग्रुपमध्ये पाठवता येईल. लिंकवर क्लिक करून इतर युजर्स आपल्या सोयीनुसार कनेक्ट करू शकतील.

WhatsApp नं कॉल लिंक्स फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. कॉल लिंक जनरेट करण्याच्या काही मर्यादा आहेत. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जनरेट करण्यात आलेल्या कॉल लिंक 90 दिवसांनी एक्सपायर होतील. असे युजर्स जे व्हॉट्सअ‍ॅप वापरत नाहीत ते या लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड देखील करू शकतील.

What Is Whatsapp Call Links Features Check Details

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलमध्ये जोडता येतील 32 मेंबर्स

Whatsapp सध्या इंक्रिप्टेड व्हिडीओ कॉलमध्ये 32 लोकांना समाविष्ट करण्याचं फीचर्स टेस्ट करत आहे. कंपनी या फीचरवर एप्रिलपासून काम करत आहे. 32 लोकांच्या व्हिडीओ कॉलचं फीचर कधी पर्यंत रोलआउट केलं जाईल, याची माहिती मात्र मिळाली नाही. फिचर लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल, अशी शक्यता आहे. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या व्हिडीओ कॉलमध्ये 8 युजर्स सहभागी होऊ शकतील. टेलीग्राम सारख्या दुसऱ्या अ‍ॅप्समध्ये 1000 युजर्स एकाच वेळी व्हिडीओ कॉल करू शकतात. तसेच WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर कॉम्यूनिटी फीचर देखील टेस्ट करत आहे. हे फीचर मल्टीपल ग्रुपचे अ‍ॅडमिन कॉम्यूनिटी क्रिएट करू शकतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post WhatsApp Call Links म्हणजे नेमकं काय? कधी सुरु होणार? जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-whatsapp-call-links-features-check-details/feed/ 0
महागाईचा आणखी एक तडाखा! WhatsApp Calling राहणार नाही Free; ऑडियो व्हिडीओ कॉलसाठी द्यावे लागणार पैसे https://www.91mobiles.com/marathi/user-have-to-pay-for-whatsapp-call-according-to-new-telecommunications-bill/ https://www.91mobiles.com/marathi/user-have-to-pay-for-whatsapp-call-according-to-new-telecommunications-bill/#respond Mon, 26 Sep 2022 12:08:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13452 WhatsApp भारतातील पहिल्या क्रमांकाचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. याची लोकप्रियता इतकी आहे की ‘मेसेज कर’ असं म्हणण्या ऐवजी लोक ‘व्हॉट्सअ‍ॅप कर’ असं म्हणतात. भारतातील जवळपास सर्वच Smartphones मध्ये WhatsApp वापरलं जातं. घरातील प्रत्येक सदस्यांच्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आहे ज्याचा वापर चॅटिंग आणि मीडिया शेयरिंग सोबतच कॉलिंगसाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. WhatsApp Calling भारतात नवीन ट्रेंड बनला […]

The post महागाईचा आणखी एक तडाखा! WhatsApp Calling राहणार नाही Free; ऑडियो व्हिडीओ कॉलसाठी द्यावे लागणार पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp भारतातील पहिल्या क्रमांकाचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. याची लोकप्रियता इतकी आहे की ‘मेसेज कर’ असं म्हणण्या ऐवजी लोक ‘व्हॉट्सअ‍ॅप कर’ असं म्हणतात. भारतातील जवळपास सर्वच Smartphones मध्ये WhatsApp वापरलं जातं. घरातील प्रत्येक सदस्यांच्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आहे ज्याचा वापर चॅटिंग आणि मीडिया शेयरिंग सोबतच कॉलिंगसाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. WhatsApp Calling भारतात नवीन ट्रेंड बनला आहे आणि लोक व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलसह ऑडियो कॉल देखील खूप करतात. परंतु सरकारच्या नवीन Indian Telecommunication Bill 2022 मधून लवकरच Free WhatsApp Call Service बंद होऊ शकते.

फक्त WhatsApp नव्हे तर आता Skype, Zoom, Telegram आणि Google Duo सारख्या अ‍ॅप्सवरून होणाऱ्या कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागू शकतात. केंद्र सरकार नवीन इंडियन टेलीकम्युनिकेशन बिल 2022 वर काम करत आहे, ज्याच्या ड्राफ्टमध्ये व्हिडीओ कम्युनिकेशन आणि कॉलिंग अ‍ॅप्स विरोधात सरकार कठोर पाऊले उचलणार असं दिसत आहे. जर Indian Telecommunication Bill 2022 पास झालं तर फ्री व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग बंद होईल तसेस सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी देखील पैसे द्यावे लागतील. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणी वाढल्या; विवोनं लाँच केला 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्त स्मार्टफोन

User Have To Pay For Whatsapp Call According To New Telecommunications Bill

Indian Telecommunication Bill 2022 मध्ये काय आहे

इंडियन टेलीकम्युनिकेशन बिल 2022 च्या ड्राफ्टमध्ये अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे ज्यानुसार भारतात सक्रिय सर्व कॉलिंग आणि मेसेजिंग अ‍ॅप्सना आता आपल्या कॉलिंग सर्व्हिससाठी Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे वेगळं लायसन्स घ्यावं लागेल. या लायसन्ससाठी सरकारकडे फी जमा करावी लागेल. परिणामी सरकारला शुल्क दिल्यानंतर हे अ‍ॅप्स आपल्या सेवा मोफत देतील असं वाटत नाही, त्याचा भार युजर्सच्या खिशावर पडेल. हे देखील वाचा: बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन

User Have To Pay For Whatsapp Call According To New Telecommunications Bill

अ‍ॅप कॉलिंगसाठी द्यावे लागणार पैसे

या बिलमध्ये फक्त मेसेजिंग अ‍ॅप्स नव्हे तर OTT Platforms चा देखील समावेश करण्यात आला आहे. हा ड्राफ्ट बिल 20 ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे आणि त्यानंतरच बिलवरील प्रतिक्रिया व सूचनांनुसार यात बदल केले जातील आणि हे पास केले जाईल. या बिलच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप, झूम आणि गुगल डुओला टेलीकॉम लायसन्सच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे झाल्यास ग्राहकांना या अ‍ॅप्सवरून कॉलिंग करण्यासाठी वेगळे रिचार्ज प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करावे लागू शकतात.

The post महागाईचा आणखी एक तडाखा! WhatsApp Calling राहणार नाही Free; ऑडियो व्हिडीओ कॉलसाठी द्यावे लागणार पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/user-have-to-pay-for-whatsapp-call-according-to-new-telecommunications-bill/feed/ 0
15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान https://www.91mobiles.com/marathi/what-happens-when-whatsapp-terms-and-privacy-policy-updates-take-effect-after-15-may/ https://www.91mobiles.com/marathi/what-happens-when-whatsapp-terms-and-privacy-policy-updates-take-effect-after-15-may/#respond Tue, 11 May 2021 14:32:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10896 WhatsApp Privacy Policy चा स्वीकार न करणाऱ्या युजर्सच्या अकांउटवर कंपनीद्वारे निर्बंध लादले जातील.

The post 15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp ने नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी सांगितले होते कि कंपनी भारतात आपली नवीन प्राइवेसी पॉलिसी घेऊन येणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या सर्व अधिकृत प्लॅटफॉर्म सोबतच अ‍ॅपच्या स्टेटस सेक्शनमध्ये पण नवीन ‘टर्म अँड कंडिशन’ ची नोटिफिकेशन प्रकाशित केली होती. या नवीन WhatsApp Terms and Privacy Policy येत्या सोमवारी म्हणजे 15 मे पासून लागू होईल. 15 मेपासून व्हाट्सअ‍ॅपचा वापर करण्यात मोठे बदल होणार आहेत. लोकनाच्या मनात अनेक प्रश्न आहेत कि 15 मे नंतर त्यांच्या WhatsApp मध्ये नेमके काय होईल. व्हाट्सअ‍ॅप सुरु राहील कि नाही आणि वापर करता आला तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील का. युजर्सच्या या प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढे दिली आहेत कि 15 मे 2021 नंतर किती बदलेले तुमचा WhatsApp. (What happens when Whatsapp terms and privacy policy updates take effect after 15 May)

15 मेला बंद होणार नाही WhatsApp अकाउंट

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि नवीन WhatsApp Privacy Policy आधी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार होती, पण पुन्हा या तारखेला पुढे ढकलण्यात आले होते. यावेळी कंपनी हि तारीख पुढे ढकलण्याचा कंपनीचा इरादा दिसत नाही. हि नवीन पॉलिसी 15 मेपासून लागू होईल. नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर कंपनी त्वरित त्या लोकांचे अकाउंट बंद करणार नाही ज्यांनी ‘टर्म अँड कंडिशन’ मान्य केल्या नाहीत. कंपनी अश्या युजर्सना अजून थोडा वेळ देईल.

WhatsApp Privacy Policy

वेळ मिळेल पण यातून कोणाचीच सुटका नाही

WhatsApp ने आपल्या नवीन प्राइवेसी पॉलिसीबाबत कडक भूमिका घेत सांगितले आहे कि हि पॉलिसी प्रत्येक युजरने मान्य करावी लागेल. 15 मेपर्यंत जे युजर हि स्वीकारणार नाहीत, त्यांना कंपनी काही आठवडे नोटिफिकेशन्स पाठवेल. जे लोक हि मान्य करतील त्यांना मुभा दिली जाईल. कंपनी त्यांना हळूहळू नोटिफिकेशन पाठवणे बंद करेल आणि एका वेळेनंतर अश्या युजर्सच्या अकाउंटवर कंपनीद्वारे WhatsApp च्या सेवा मर्यादित केल्या जातील.

हे देखील वाचा : Redmi K40 Gaming Enhanced Edition ला भारतात मिळाले BIS सर्टिफिकेशन, Poco ब्रँडिंगसह लवकरच होऊ शकतो लॉन्च

पाठवता येणार नाहीत मेसेज

WhatsApp Privacy Policy चा स्वीकार न करणाऱ्या युजर्सच्या अकांउटवर कंपनीद्वारे निर्बंध लादले जातील. याअंतर्गत युजर्स आपल्या अ‍ॅपमध्ये चॅट लिस्ट वापरू शकणार नाहीत. याचा अर्थ असा कि चॅट लिस्ट उपलब्ध न झाल्यामुळे व्हाट्सअ‍ॅप युजर्स कोणालाही मेसेज पण पाठवू शकणार नाहीत. तसेच चॅट लिस्ट न मिळाल्यामुळे कोणताही कॉन्टेक्ट दिसणार नाही तसेच कोणालाही वॉयस कॉल किंवा व्हिडीओ कॉल करता येणार नाही. म्हणजे व्हाट्सअ‍ॅप आपल्या सेवांसाठी पैसे आकारणार नाही पण अटी न मानणाऱ्या युजरवर निर्बंध लादले जातील.

Whatsapp logo on qube

मेसेज रिसीव करण्याचा मिळेल ऑप्शन

व्हाट्सअ‍ॅप प्राइवेसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना चॅट लिस्ट अ‍ॅक्सेस तर मिळणार नाही पण अश्या युजर्सना कोणी मेसेज पाठवला तर त्यांच्या व्हाट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये तो मेसेज दिसेल. नोटिफिकेशनच्या माध्यमातून तो मेसेज वाचता येईल आणि त्याला रिप्लाई पण देता येईल. त्याचप्रमाणे वॉयस/वीडिया कॉल पण रिसीव करता येईल.

हे देखील वाचा : PUBG फॅन्ससाठी खुशखबर: Battlegrounds Mobile India डाउनलोडसाठी उपलब्ध, परंतु…

कालांतराने बंद होतील सर्व सेवा

मेसेज व कॉल रिसीव करण्याची सूट दिल्यानंतर काही दिवसांनी WhatsApp द्वारे मर्यादित सेवा पण पूर्णपणे बंद केली जाईल. व्हाट्सअ‍ॅप युजर फक्त कॉलच रिसीव करू शकणार नाहीत तर आलेले मेसेज वाचून त्याला उत्तर पण देऊ शकणार नाहीत. म्हणजे काही वेळाने व्हाट्सअ‍ॅप पूर्णपणे बंद होईल.

यावरून स्पष्ट झाले आहे कि जर WhatsApp वापरायचे असेल तर अ‍ॅपची नवीन Privacy Policy 2021 स्वीकारावी लागेल आणि सर्व टर्म अँड कंडिशन मान्य कराव्या लागतील.

The post 15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-happens-when-whatsapp-terms-and-privacy-policy-updates-take-effect-after-15-may/feed/ 0
WhatsApp ग्रुपमध्ये शेयर झालेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी अ‍ॅडमिन नाही जबाबदार – हायकोर्ट https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-group-admin-is-not-responsible-for-objectionable-porn-nude-posts-of-member-bombay-high-court/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-group-admin-is-not-responsible-for-objectionable-porn-nude-posts-of-member-bombay-high-court/#respond Tue, 04 May 2021 14:59:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10821 व्हाट्सअ‍ॅपवर जो व्यक्ती ग्रुपची निर्मिती करतो किंवा सांभाळतो त्याला ग्रुप अ‍ॅडमिन म्हणतात. ग्रुप अ‍ॅडमिनकडे लोकांना ग्रुपमध्ये जोडणे आणि काढण्याचे अधिकार असतात.

The post WhatsApp ग्रुपमध्ये शेयर झालेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी अ‍ॅडमिन नाही जबाबदार – हायकोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp सध्याच्या आयुष्यातील भारतीय मोबाईल युजर्सचा एक साथी बनला आहे. फक्त तरुण नाही तर वृद्ध, लहान मुले व गृहिणी पण मोठ्या आवडीने व्हाट्सअ‍ॅप वापरतात. व्हाट्सअ‍ॅपवर ग्रुप्स पण बनवतात ज्यात ऑफिस, कौटुंबिक व मित्रांच्या ग्रुप्सचा समावेश असतो. काही दिवसांपूर्वी असाच WhatsApp Group संबंधित प्रकरण समोर आले होते ज्यात ग्रुप मेंबरद्वारे टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर ग्रुप अ‍ॅडमिन विरोधात केस नोंदवण्यात आली होती. आता बॉम्बे हायकोर्टाने विधान केले आहे कि व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणत्याही मेंबरच्या चुकीच्या पोस्टला ग्रुप अ‍ॅडमिन म्हणजे ग्रुप बनवणारी व्यक्ती जबाबदार नसेल. (Whatsapp group admin is not responsible for objectionable porn nude posts of member Bombay High Court)

ग्रुप अ‍ॅडमिन नसेल चुकीच्या पोस्टला जबाबदार

व्हाट्सअ‍ॅपवर जो व्यक्ती ग्रुपची निर्मिती करतो किंवा सांभाळतो त्याला ग्रुप अ‍ॅडमिन म्हणतात. ग्रुप अ‍ॅडमिनकडे लोकांना ग्रुपमध्ये जोडणे आणि काढण्याचे अधिकार असतात. या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये मेंबर्सद्वारे जे काही पण पोस्ट केले जाते त्याला जबाबदार फक्त ती पोस्ट करणारी व्यक्तीच असेल. म्हणजे ग्रुपमध्ये कोणताही वाईट फोटो किंवा व्हिडीओ पण येतो तेव्हा त्या फोटो-व्हिडीओची जबाबदारी ग्रुपच्या अ‍ॅडमिनची नसून तो फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीची असेल. एक प्रकरणाची सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठाने असे विधान केले आहे.

WhatsApp वापरकर्ता

कोर्टाची शिफारस

व्हाट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन्सना दिलासा देणारी हि बातमी बॉम्बे हायकोर्टाकडून आली आहे. कोर्टाचे म्हणणे आहे कि जेव्हा कोणी व्‍हाट्सअ‍ॅपवर ग्रुप बनवतो तेव्हा पोस्ट टाकण्याचे अधिकार सर्व मेंबर्सकडे असतात. अ‍ॅडमिनकडे काही वेगळे अधिकार असतात, ज्यामुळे ते कोणत्याही कॉन्टेक्टला ग्रुपमध्ये अ‍ॅड किंवा रिमूव करू शकतात. पण WhatsApp Group अ‍ॅडमिनकडे मेंबर्सचा कंटेंट नियमित, मॉडरेट किंवा सेंसर करण्याची कोणतीही ताकद नसते.

हे देखील वाचा : iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले

असे आहे प्रकरण

ज्या प्रकरणाची सुनावणी करताना हायकोर्टाने हे विधान केले आहे ती जुलै 2016 ची केस आहे. याबाबत 33 वर्षीय व्‍हाट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, जी कोर्टाने फेटाळली आहे. या केसमध्ये एका ग्रुप मेंबरने त्या ग्रुपच्या एका महिला सदस्याविरोधात चुकीची पोस्ट टाकली होती. त्यानंतर ग्रुप मेंबरसह त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिन विरोधात पण केस दाखल करण्यात आली होती. पण आता कोर्टाने स्पष्ट केले आहे कि व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणत्याही मेंबरच्या चुकीच्या पोस्टला ग्रुप अ‍ॅडमिन जबाबदार नसेल आणि जर एखादा मेंबर चुकीची पोस्ट टाकत असेल तर त्यासाठी ग्रुप बनवणारा जबाबदार असणार नाही.

The post WhatsApp ग्रुपमध्ये शेयर झालेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी अ‍ॅडमिन नाही जबाबदार – हायकोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-group-admin-is-not-responsible-for-objectionable-porn-nude-posts-of-member-bombay-high-court/feed/ 0
व्हाट्सऍप वरील पॉर्न ग्रुपच्या ऍडमिनला अटक, मुबंई पोलीसांनी केली कारवाई https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-porn-group-admin-arrested-in-mumbai-for-adding-a-woman-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-porn-group-admin-arrested-in-mumbai-for-adding-a-woman-in-marathi/#respond Tue, 27 Nov 2018 14:15:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2998 आरोप सिद्ध झाल्यास व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिनला आईटी एक्स, 2000 अंतर्गत 5 वर्षांची कैद होऊ शकते.

The post व्हाट्सऍप वरील पॉर्न ग्रुपच्या ऍडमिनला अटक, मुबंई पोलीसांनी केली कारवाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हाट्सऍप आजकाल कोणताही मीडिया कंटेंट लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त लोकांना मेसेज मधून पाठवण्याचे सोप्पे साधन आहे. टेक्स्ट मेसेज सोबतच फोटो, वीडियो, आॅडियो, जीफ व पीडीएफ सारख्या फाइल्स व्हाट्सऍप वर अगदी सहज कोणत्याही अतिरिक्त चार्जविना पाठवल्या जातात. पसर्नल चॅट सोबत व्हाट्सऍप ग्रुप्स मुळे एकाच वेळी अनेकांना मेसेज पाठवता येतात. तसेच ग्रुप्स मध्ये पॉर्न कंटेंट म्हणजे अश्लील मीडिया पण पाठवले जातात हे सर्वांनाच माहित आहे. व्हाट्सऍप संबंधित अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात मुंबई मधील युवकाला पॉर्न ग्रुपचा ऍडमिन असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीसांनी व्हाट्सऍप वर अश्लील कंटेंट शेयर करण्याच्या आरोपाखाली एका 24 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हा तरुण मुंबईच्या धारावी मध्ये राहणार आहे ज्याचे नाव मुश्ताक अली शेख आहे. हा तरुण एका अशा व्हाट्सऍप ग्रुपचा ऍडमिन आहे ज्याचे नाव ‘Triple XXX’ आहे. या तरुणावर व्हाट्सऍप ग्रुप मधून पॉर्न कंटेंट/ अश्लील मीडिया शेयर करण्याचा आरोप आहे ज्यात नग्न फोटोज आणि अश्लील वीडियोज सामील आहेत.

porno

व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिनला मु​बंई पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून पकडले आहे. महिलेने पोलीसांमध्ये तक्रार केली होती कि त्यांना एका व्हाट्सऍप ग्रुप मध्ये अनिल करण्यात आले होते ज्याचे नाव ‘Triple XXX’होते. महिलेनुसार आधी त्यांना वाटले कि त्यांचा एखादा मित्र मस्करी करत आहे. पण जेव्हा त्या ग्रुप मध्ये न्यूड फोटो व पॉर्न वीडियो शेयर होऊ लागले तेव्हा धक्का बसला.

पॉर्न कंटेंट ग्रुप मध्ये आल्यानंतर त्यांनी बघितले कि त्या ग्रुप मध्ये यांच्याव्यतिरिक्त 12 लोक अजून होते. ग्रुप ऍडमिन सह या सर्व 12 लोकांचे नंबर त्या महिलेकडे सेव नव्हते आणि ती महिला त्यापैकी कुणालाही ओळखत नव्हती. त्यामुळे त्या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. गेल्या गुरुवारी पोलिसांनी ग्रुप ऍडमिन मुश्ताक अली शेखला अटक केली. तापसांतर्गत मुश्ताक ने सांगितले कि त्याने त्या महिलेला आपला नातेवाईक समजून ग्रुप मध्ये ऍड केले होते आणि त्याला माहिती नव्हते कि तो नंबर त्या महिलेचा आहे ते.

व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिन ने सांगितले कि त्या महिलेचा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये कसा आला हेदेखील त्याला माहित नाही. पोलीस त्यांचं काम करतीलच पण या घटेनमुळे पुन्हा एकदा भारतातील पॉर्नोग्राफी तसेच व्हाट्सऍपच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. मुश्ताकचा फोन डेटा काढून लॅब मध्ये पाठवण्यात आला आहे आणि आरोप सिद्ध झाल्यास व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिनला आईटी एक्स, 2000 अंतर्गत 5 वर्षांची कैद होऊ शकते. तसेच अशी चूक पुन्हा झाल्यास ग्रुप ऍडमिनला 7 वर्षांची कैद आणि 10,00,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

The post व्हाट्सऍप वरील पॉर्न ग्रुपच्या ऍडमिनला अटक, मुबंई पोलीसांनी केली कारवाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-porn-group-admin-arrested-in-mumbai-for-adding-a-woman-in-marathi/feed/ 0
जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-problem-in-jio-phone-tips-and-tricks-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-problem-in-jio-phone-tips-and-tricks-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 15:23:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2035 जियोफोन मध्ये व्हाट्सॅप तर आला आहे पण त्यात काही मर्यादा आहेत ज्यांचा सामना जियोफोन यूजर्सना करावा लागेल.

The post जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने गेल्याच महिन्यात आपला दुसरा 4जी फीचर फोन जियोफोन 2 भारतीय मोबाईल बाजारात सादर केला आहे. जियोफोन 2 सोबत रिलायंस कंपनी ने घोषणा केली होती की जियोफोन वर पण व्हाट्सॅप वापरता येईल. त्यानुसार जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सादर केला आहे. जियोफोन मध्ये पण आता व्हाट्सॅप इंस्टाल होऊ शकतो आणि जियोफोन यूजर्स आपल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी चॅटिंग करू शकतात. जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणून आपल्या यूजर्सना आनंद तर दिला आहे पण हा आनंद मर्यादित असेल. म्हणजे जियोफोन मध्ये व्हाट्सॅप तर आला आहे पण त्यात काही मर्यादा आहेत ज्यांचा सामना जियोफोन यूजर्सना करावा लागेल.

जियोफोन मध्ये व्हाट्सॅप म्हणजे आनंदाची बातमी पण जियोफोन यूजर्स साठी व्हाट्सॅप वापरण्याचा अनुभव इतर स्मार्टफोन्स इतका चांगला नसेल. विशेष म्हणजे जियोफोन काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यातील व्हाट्सॅप पण खासकरून काईओएस साठी बनवण्यात आला आहे. जियोफोन मध्ये व्हाट्सॅप कसे इंस्टाल करावे हे जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). जर तुम्ही पण जियोफोन वापरत असाल तर लक्षात घ्या की या 4जी फीचर फोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना तुम्ही निराश होऊ शकता.

1.
जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वर चॅटिंग होईल पण यूजर वॉयस कॉल किंवा वीडियो कॉल करू शकणारा नाहीत. म्हणजे यूजर्स टेक्स्ट लिहून किंवा वॉईस रेकॉर्ड करून मेसेज पाठवू शकतात पण वॉयस कॉल आणि वीडियो कॉल करू शकणार नाहीत.

2.
त्याचप्रमाणे दुसर्‍या स्मार्टफोन वाल्या व्हाट्सॅप यूजरने जियोफोन वाल्या व्हाट्सॅप नंबर वर वॉयस किंवा वीडियो कॉल केला तर तो कॉल पण कनेक्ट होणार नाही. दुसर्‍या यूजरला कॉल फेल दाखवण्यात येईल.

3.
व्हाट्सॅप चा स्टेट्स फीचर खुप प्रसिद्ध आहे, ज्यात 24 तासांसाठी फोटो किंवा वीडियो दिसतो. पण जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वर तुम्ही स्वतःचा स्टेटस ठेऊ शकणार नाही तसेच इतरांचे स्टेट्स बघू पण शकणार नाही. हे खुप निराशाजनक आहे.

4.
व्हाट्सॅप वर मीडिया फाइल्स पाठवल्या जातात. जियोेफोन मध्ये ईमेज आणि वीडियो सेंड करता येतील पण यूजर्स यात जीफ फाईल, पीडीएफ तसेच डाक्यूमेंट फाइल्स शेयर करू शकणार नाहीत. यातून फक्त फोटो आणि वीडियो सेंड आणि रिसीव केले जाऊ शकतात.

5.
व्हाट्सॅप ने वेब व्हाट्सॅप फीचर सुरू केला आहे. या फीचर मुळे लॅपटॉप किंवा कम्प्यूटर वर काम करताना यूजर कंम्प्यूटर वर व्हाट्सॅप यूज करू शकतात. त्यामुळे वारंवार फोन हातात घ्यावा लागत नाही. पण जियोफोन यूजर्सना इथे पण जास्त मेहनत करावी लागेल. जियोफोन च्या व्हाट्सॅप मध्ये वेब व्हाट्सॅप फीचर नाही म्हणजे जियोफोन यूजर्सना लॅपटॉप वर काम करताना प्रत्येक मेसेज ला उत्तर देण्यासाठी फोन उचलावा लागेल.

The post जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-problem-in-jio-phone-tips-and-tricks-in-marathi/feed/ 0
जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-whatsapp-support-rollout-in-india-how-to-install-use-whatsapp-on-jio-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-whatsapp-support-rollout-in-india-how-to-install-use-whatsapp-on-jio-phone-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 09:12:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2025 विशेष म्हणजे जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप अपडेट द्यायला सुरवात केली आहे पण संपूर्ण देशात हा अपडेट होण्यासाठी 10 दिवस लागतील.

The post जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियोफोन देशातील सर्वात जास्त विकला जाणारा 4जी फीचर फोन आहे. रिलायंस जियो ने जेव्हा आपला हा फीचर फोन बाजारात आणला होता तेव्हा हा घेण्यासाठी मोबाईलच्या दुकानात लांबलचक रांगा लागल्या होत्या. गेल्या महिन्यात​ रिलायंस जियो चा जियोफोन 2 पण विक्री साठी उपलब्ध झाला आहे. जियोफोन 2 सोबतच कंपनी ने घोषणा केली आहे लवकरच जियोफोन वर इतर स्मार्टफोन्स प्रमाणे व्हाट्सॅप वापरता येईल. त्यानुसार आज आपल्या यूजर्सना भेट देत जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सपोर्ट आणला आहे.

जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सपोर्ट आणला आहे. म्हणजे आता जियोफोन यूजर्स पण आपल्या फीचर फोन जियोफोन मध्ये व्हाट्सॅप इंस्टाल करू शकतील आणि आपल्या मित्रांशी व्हाट्सॅप वर चॅटिंग करू शकतील. जियोफोन यूजर चॅटिंग सोबतच व्हाट्सॅप वर ईमेज व वीडियो पण शेयर करू शकतील. व्हाट्सॅप ने आईओएस आणि एंडरॉयड नंतर आता काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर पण अॅपचा नवीन वर्जन आणला आहे आणि जियोफोन पण काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो.

जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरण्यासाठी…

जियोफोन मधील जियो अॅप स्टोर वर जा आणि तो ओपन करा

जियो स्टोर मध्ये सोशल कॅटेगरी मध्ये तुम्हाला व्हाट्सॅप दिसेल, तिथे इंस्टाल चे बटन क्लिक करा

व्हाट्सॅप डाउनलोड झाल्यानंतर यात तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल जो ओटीपी नंतर व्हाट्सॅप एक्टिव करेल.

व्हाट्सॅप एक्टिवेट झाल्यावर तुम्ही तुमच्या जियोफोन मध्ये पण हा अॅप वापरू शकता आणि मित्रांशी चॅटिंग करू शकता.

विशेष म्हणजे जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप अपडेट द्यायला सुरवात केली आहे पण संपूर्ण देशात हा अपडेट होण्यासाठी 10 दिवस लागतील. त्यामुळे जर तुमच्या ​जियोफोन च्या अॅप स्टोर मध्ये आता व्हाट्सॅप उपलब्ध नसल्यास, 20 सप्टेंबर पर्यंत हा अॅप तुम्हाला नक्की मिळेल.

The post जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-whatsapp-support-rollout-in-india-how-to-install-use-whatsapp-on-jio-phone-in-marathi/feed/ 0
व्हाट्सॅप वरून पण करता येईल ग्रुप वीडियो कॉल, एक साथ बोलता येईल 4 जणांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-group-video-call-live-in-india-how-to-make-group-video-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-group-video-call-live-in-india-how-to-make-group-video-call-in-marathi/#respond Tue, 31 Jul 2018 08:59:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1465 विशेष म्हणजे व्हाट्सॅप ने हा फीचर आजच जगभरता रोलआउट केला आहे. त्यामूळे तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी अजून एक दोन दिवस जाऊ शकतात.

The post व्हाट्सॅप वरून पण करता येईल ग्रुप वीडियो कॉल, एक साथ बोलता येईल 4 जणांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज भारतातील जवळपास प्रत्येक स्मार्टफोन मध्ये व्हाट्सॅप वापरला जातो. घरातील सर्वच आपल्या नातेवाईकांशी व मित्रांशी व्हाट्सॅप वरून चॅटिंग करतात. हा अॅप फक्त मनोरंजनासाठीच वापरला जात नाही तर आॅफिशियल कामांमध्ये पण याचा वापर होतो. टेक्स्ट मेसेज आणि वॉयस मेसेज नंतर व्हाट्सॅप यूजर्स सध्या वी​डियो चॅट चा पण जोरदार वापर करत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दूर असलेल्या नातेवाईकांशी वीडियो कॉलिंग वरून बोलतात. स्मार्टफोन यूजर्स जेवढं प्रेम व्हाट्सॅप वर करतात, व्हाट्सॅप पण आपल्या यूजर्स ची तेवढीच काळजी घेतो. अनेक चांगले चांगले फीचर्स आणल्यानंतर आज व्हाट्सॅप ने देशात असा नवीन फीचर पण रोलआउट केला आहे ज्यामुळे एक साथ 4 लोकांशी वीडियो चॅट करता येईल.

व्हाट्सॅप ने आज भारतात ग्रुप वीडियो कॉलिंग फीचर रोल आउट केला आहे. आता पर्यंत एका वेळी एकाच व्यक्तिला वीडियो कॉल करता येत होता, पण आता नवीन फीचर आल्यामुळे एक साथ 4 लोकांशी वीडियो चॅट करता येईल. व्हाट्सॅप ने हा अपडेट आज पासून संपूर्ण देशात जाहीर केला आहे. कंपनी ने एंडरॉयड स्मार्टफोन तसेच अॅप्पल आयओएस दोन्ही वर ग्रुप वी​डियो कॉल चा फीचर सादर केला आहे जो आगामी काळात सर्व सर्कल्स मध्ये उपलब्ध होईल.

व्हाट्सॅप ने सादर केलेला हा नवीन फीचर वापरून ग्रुप वीडियो कॉल सोबतच ग्रुप वॉयस कॉल पण केला जाऊ शकतो. म्हणजे एक साथ 4 लोकांशी तुम्ही तुमच्या फोन वरून बोलू शकता. व्हाट्सऐप कडून या नवीन सर्विस साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही तसेच हा फीचर पूर्णपणे इंटरनेट डेटा वर चालेल.

कसा करता येईल ग्रुप वीडियो कॉल
1. व्हाट्सॅप च्या या लेटेस्ट फीचर चा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुमचा अॅप अपडेट करा.

2. अॅप अपडेट करण्यासाठी खाली पुढील लिंक वर क्लिक करा :
आयफोन / एंडरॉयड

3. व्हाट्सॅप अपडेट झाल्यानंतर ज्या 4 कॉन्टेक्ट्सना वीडियो कॉल करायचा आहे त्यापैकी एका वर क्लिक करा.

4. वीडियो कॉल सुरू झाल्यानंतर ज्या व्यक्ति ने कॉल केला आहे त्याच्या स्क्रीन वर उजव्या कोपर्‍यात ‘अॅड मोर’ चे चिन्ह येईल.

5. अॅड मोर वर क्लिक करताच तुमची व्हाट्सॅप कॉन्टेक्ट लिस्ट ओपन होईल.

6. ज्या दुसर्‍या व्यक्तिला वीडियो कॉल करायचा आहे त्याच्या कॉन्टेक्ट वर क्लिक करा, ती व्यक्ति पण वीडियो कॉल मध्ये जोडली जाईल.

7. चौथ्या व्यक्ति ला वीडियो कॉल मध्ये जोडण्यासाठी पुन्हा अॅड मोर वर क्लिक करून त्याचा कॉन्टेक्ट अॅड करावा लागेल.

लक्षात असू दे कोणीही नवीन व्यक्तीला अॅड करू शकतो. एक एक जण जोडला गेल्या नंतर फोनचा डिस्प्ले आपोआप 4 भागांमध्ये विभागाला जाईल. जर कोणी वीडियो कॉल रिसीव केला नाही तर अशा स्थितीत इतरांचा वीडियो कॉल बिना दिक्कत चालू राहील. पण जर तुम्ही आधी पासून वीडियो कॉल वर असाल तर तुम्ही नवीन वीडियो कॉल रिसीव करू शकणार नाही.

विशेष म्हणजे व्हाट्सॅप ने हा फीचर आजच जगभरता रोलआउट केला आहे. त्यामूळे तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी अजून एक दोन दिवस जाऊ शकतात.

The post व्हाट्सॅप वरून पण करता येईल ग्रुप वीडियो कॉल, एक साथ बोलता येईल 4 जणांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-group-video-call-live-in-india-how-to-make-group-video-call-in-marathi/feed/ 0