स्वस्त 5G फोन झाला आणखी स्वस्त; 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची सूट

Motorola सध्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली आहे. कंपनी फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करत आहेच परंतु बजेट आणि मिडरेंज सेगमेंटकडे देखील लक्ष देत आहे. यंदा आपल्या भारतीय चाहत्यांना खुश करत कंपनीनं Moto G71 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. असा हा फोन बजेट फ्रेंडली किंमतीत सादर करण्यात आला होता. परंतु आता या हँडसेटची किंमत आणखी कमी झाली आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर हा फोन 4,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

4,000 रुपयांची सूट

हा फोन भारतात 18,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु आता फ्लिपकार्टवर याची विक्री 15,999 रुपयांमध्ये केली जात आहे. तसेच तुम्ही SBI Credit Card चार वापरून करून 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकता. त्यामुळे हा फोन तुम्हाला फक्त 14,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल. हा ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. हे देखील वाचा: लाईट गेल्यावर देखील घरात होणार नाही अंधार, हे LED बल्ब इन्व्हर्टरविना देखील तासनतास देतील प्रकाश

Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाचा हा मोबाईल फोन 6.4 इंचाचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनमध्ये पंच-होल डिजाईन असलेला एक मॅक्स विजन अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 409पीपीआयसह 700निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. पाणी आणि धुळीपासून सुरक्षा मिळावी म्हणून मोटोरोलानं आपला फोन आयपी52 रेटिंगसह सादर केला आहे.

Moto G71 5G अँड्रॉइड 11 बेस्ड माययुआय वर चालतो. तसेच कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला आहे. हा फोन 6 जीबी रॅमसह लाँच झाला आहे सोबतीला 2 जीबी वचुर्अल रॅम देण्यात आला आहे. म्हणजे गरज पडल्यास मोटोरोलाच्या या फोनला 8जीबी रॅमची ताकद मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी Moto G71 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: Vivo चा स्वस्त स्मार्टफोन लवकरच येतोय भारतात; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर

Moto G71 5G एक ड्युअल सिम फोन आहे जो 5जी सह 4जी एलटीईला देखील सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच फेस अनलॉक फीचर देखील आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते, जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here