8GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo Y73s, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स

वीवोने आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन 5G कनेक्टिविटी सह लॉन्च केला आहे. हा नवीन फोन कंपनीने अपनी Y-सीरीज मध्ये सादर केला आहे, ज्याचे नाव Vivo Y73s आहे. हा फोन कंपनीने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये उपलब्ध केला आहे. हा डिवाइस दुसऱ्या मार्केट मध्ये सादर करण्याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. पण डिजाइनच्या बाबतीत हा फोन सध्या लॉन्च झालेल्या इतर वीवो फोन्स प्रमाणेच आहे.

डिस्प्ले आणि डिजाइन

या फोन मध्ये ड्यूड्रॉप नॉच देण्यात आली आहे. सोबतच खालच्या बाजूला जाड बेजल आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप डावीकडे आहे. Vivo Y73s मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.1 टक्के आहे.

स्पेसिफिकेशन्स

वीवोच्या या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक हीलियो 720 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये 8 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

Vivo Y73s ला पावर देण्यासाठी 4100mAh बॅटरी देण्यात आली आहे ज्याबाबत कंपनीचा दावा आहे कि हि 511 तास स्टॅण्डबाय टाइम देईल. वीओएलटीई नेटवर्क वर बॅटरी 18.8 तास टॉक टाइम देण्याचा दावा केला गेला आहे.

फोटोग्राफीसाठी वीवो वाय 73एस मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आहे. तसेच मागे 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर पण देण्यात आला आहे. सेल्फीच्या चाहत्यांसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देण्यात आला आहे.

किंमत

वीवो वाय 73एस 5जी ची किंमत 1,998 चीनी युआन (जवळपास 21,700 रुपये) आहे. फोन सध्या चीनच्या बाहेर दुसऱ्या मार्केट मध्ये उपलब्ध करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच Vivo चा हा फोन सिल्वर मून आणि ब्लॅक मिरर कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

वीवो 13 ऑक्टोबरला भारतात आपली नवीन सीरीज Vivo 20 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या सीरीज मध्ये वीवो वी20 आणि वीवो वी20 प्रो व वीवो वी20 एसई स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here