एयरटेल आणि वोडाफोन आइडियाला बसला धक्का, कमी झाले 90 लाख सब्सक्राइबर

भारतीय टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी (ट्राई) ने एक नवीन रिपोर्ट जाहीर केला आहे, ज्यात एयरटेल आणि वोडाफोन आइडियाला एक मोठा धक्का बसला आहे. या रिपोर्ट मध्ये टेलीकॉम कंपनी वोडाफोन आइडिया, भारती एयरटेल आणि टाटा टेलीसर्विसच्या ग्राहकांची संख्या 10 कोटीने कमी झाली आहे. इतकेच नव्हे तर रिपोर्टनुसार साल 2018 मध्ये वोडाफोन आइडिया आणि एयरटेलचे 90 लाख ग्राहक कमी झाले. दुसरीकडे रिलायंस जियो आणि सरकारी टेलीकॉम कंपन्यांनी मिळून 10 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त मोबाईल यूजर्सना आपले सब्सक्राइबर बनवले आहे.

ट्राई ने हा रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्ट नंतर कदाचित एयरटेल आणि वोडाफोन आइडियाला आपले सब्सक्राइबर्स कायम ठेवण्यासाठी काही तरी विचार करावा लागेल. तसेच बोलले जात आहे कि कंपन्यांनी ठेवलेल्या मिनिमम बॅलेंसच्या अटीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या रिपोर्ट मध्ये अजून यूजर्सची संख्या खाली जाईल. समोर आलेली माहिती फक्त ऑक्टोबर 2018 पर्यंतची आहे.

वोडाफोन आणि आइडियाचे मर्जर काही दिवसांपूर्वीच झाले आहे. पण दोन्ही कंपन्या एक होऊनही ऑक्टोबर 2018 मध्ये ग्राहकांची संख्या 70 लाखांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे जवळपास 11 लाख ग्राहकांनी एयरटेलची सेवा बंद केली आहे. इतकेच नव्हे तर टाटा टेलिसर्विसेजला 9 लाख आणि एमटीएनएल ला जवळपास 8 लाख सब्सक्राइबर्सचे नुकसान झाले आहे.

इतर कंपन्यांपेक्षा रिलायंस जियो टेलीकॉम सेक्टर मध्ये आपला दबदबा कायम करत आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये रिलायंस जियोच्या सब्सक्राइबर्सची संख्या जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त ने वाढली आहे. रिलायंस जियोच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 26 कोटी 30 लाखांच्या आस-पास पोचली आहे.

यामागील सर्वात मोठे कारण रिलायंस जियो चे दमदार प्लान्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 4जी सर्विस सोबतच कंपनीचे स्वस्त टॅरिफ प्लान इंडियन यूजर्सना आकर्षित करतात. आपल्या 4जी सर्विस मुळे अनेक रेकॉर्ड करणाऱ्या जियो ने नुकताच आपल्या इंटरनेट स्पीडमुळे नवीन रेकॉर्ड केला होता. जियो ने सर्वात वेगवान 4जी डाउनलोड स्पीड देऊन सर्व टेलीकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here