शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले

शाओमी ने आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना आपल्या मी सीरीज मध्ये तीन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. गेल्या काही दिवसांपासून बातमी येत आहे की शाओमी आपली मी 8 सीरीज वाढवणार आहे आणि यात मी 8 यूथ स्मार्टफोन पण सादर करेल. जरी शाओमी ने अजूनपर्यंत मी 8 यूथ बद्दल कोणतीही घोषणा केली नसली तरी एका लीक मधून शाओमी मी 8 यूथ चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

शाओमी मी 8 यूथ चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला आहे. वेईबो नुसार ​कथित मी 8 यूथ मी 8 चा छोटा वर्जन असेल जो दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात येईल. या लीक नुसार मी 8 यूथ मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या डिस्प्ले वर पण मी 8 च्या दुसर्‍या वर्जन प्रमाणे नॉच असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन मी 8 एसई प्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या ताज्या लीक नुसार शाओमी हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक मध्ये मी 8 यूथ मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कदाचित शाओमी मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 यूथ च्या बॅक पॅनल वर डुअल​ रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल.

त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. वर सांगितल्याप्रमाणे शाओमी ने आता पर्यंत मी 8 यूथ बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे समोर आलेले हे स्पेसिफिकेशन्स फक्त एक लीक आहे. जाता जाता सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शाओमी आपला आगामी फ्लॅगशिप फोन मी मिक्स 3 पण लॉन्च करणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here