Exclusive: 32,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 64 MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A70s, मिळेल 5,000 mAh ची बॅटरी

Samsung Galaxy A70

काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि लवकरच Samsung Galaxy A70s भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. हा कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात 64 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. अलीकडेच आम्ही सॅमसंग रिटेल स्टोर मधील एक पोस्टर पण शेयर केला होता ज्यात फोनचे नाव स्पष्टपणे दिसत होते. कंपनीने अधिकृतपणे या फोनची माहिती अजूनतरी दिली नाही पण लवकरच Samsung Galaxy A70s भारतात येणार आहे याचा हा पोस्टर पुरावा आहे. आज 91मोबाईल्स कडे या फोन संबंधित अजून माहिती आली आहे. आम्हाला Samsung Galaxy A70s ची किंमत समजली आहे आणि सोबतच बॅटरीची माहिती पण मिळाली आहे. भारतीय बाजारात हा फोन 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल आणि यात 5,000 एमएएच ची बॅटरी असेल.

91मोबाईल्सला हि माहिती सॅमसंगच्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे ज्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर फोन बद्दल आम्हाला सांगितले आहे. त्यांनी अशी पण माहिती दिली कि Samsung Galaxy A70s या महिन्यात 20 सप्टेंबर नंतर कधीही लॉन्च केला जाऊ शकतो आणि 17 सप्टेंबर पासून दिल्ली एनसीआर मध्ये यासाठी प्रमोटर्सची ट्रेनिंग पण सुरु होईल. फोनच्या फुल स्पेसिफिकेशनची माहिती अजूनतरी देण्यात आलेली नाही पण असे सांगण्यात आले आहे कि हा फोन काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A70 चा अपग्रेड वर्जन आहे आणि स्क्रीन इत्यादी मध्ये जास्त बदल दिसणार नाही.

Samsung Galaxy A70s स्पेसिफिकेशन

जहां पर्यंत Samsung Galaxy A70s चे स्पेसिफिकेशन पाहता काही दिवसांपूर्वी हा फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता जिथे थोडी माहिती होती. आतापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार या फोन मध्ये तुम्हाला 64 एमपी चा कॅमेरा रियर कॅमेरा मिळेल. आता पर्यंत 64 एमपी कॅमेरा Realme XT आणि Redmi Note 8 Pro मध्ये दिसला आहे. या फोन मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. तर सेल्फी साठी 32 एमपी चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A70s क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

अलीकडेच सॅमसंगने Galaxy A30s आणि Galaxy A50s भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत आणि या दोन्ही फोन मध्ये कंपनीने सॅमसंग पे सर्विस सादर केली आहे. हि सर्विस Galaxy A70s मध्ये पण उपलब्ध होऊ शकते.

Samsung Galaxy A सीरीज

काही वर्षांपूर्वी सॅमसंग ने Galaxy A सीरीजची सुरवात केली होती. तेव्हा Galaxy A7, A7 आणि A8 सारखे फोन लॉन्च केले जात होते. परंतु यावर्षी कंपनीने या सीरीज मध्ये काही बदल केले आहेत आणि फेब्रुवारी मध्ये कंपनीने Galaxy A10, Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy A50 सहित चार मॉडेल सादर केले. तर काही महिन्यांनंतर या सीरीज मध्ये Galaxy A70 आणि A800 सारखे फोन पण लॉन्च केले गेले जे थोड्या महाग बजेट मध्ये होते. आता कंपनीने हि सीरीज थोडी अपग्रेड करून Galaxy A10s, Galaxy A30s आणि Galaxy A50s सादर केले आहेत. यात आता Galaxy A70s आणि Galaxy A20s सारखेच फोन पण लॉन्च केले जातील. अलीकडे या फोन्सचे नवीन लीक समोर आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here