Honor 9X Lite फुल स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट, फोन मध्ये आहे 48 एमपी रियर कॅमेरा, 4जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 ओएस

काही दिवसांपूर्वी ऑनरचा एक नवीन स्मार्टफोन Honor 9X Lite नावासह समोर आला होता. या फोनचा पोस्टर इंटरनेट वर लीक झाला ज्यात फोनच्या डिजाईन सोबतच अशी माहिती मिळाली होती कि हा ऑनर फोन 48 मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कंपनीने अजूनतरी Honor 9X Lite च्या लॉन्च संबंधित कोणतीही बातमी दिली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि हा डिवाईस पाकिस्तानी शॉपिंग साइट वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. शॉपिंग साइट लिस्टिंग मध्ये फोनची किंमत पण समजली आहे.

Honor 9X Lite पाकिस्तानी शॉपिंग साइट ऍडव्हान्स स्टोर वर दिसला आहे. या लिस्टिंगची माहिती आम्हाला एमएसपी च्या मढत्यांतून मिळाली आहे. शॉपिंग साइट वर गेल्यावर समजले कि तिचे ऑनर 9एक्स लाइट किंमतीसह फुल स्पेसिफिकेशन्स सोबत लिस्टेड आहे. या शॉपिंग साइट वर Honor 9X Lite ची किंमत 31,999 पाकिस्तानी रूपया दाखवण्यात आली हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,900 रुपये आहे. पाकिस्तान मध्ये दिसल्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

Honor 9X Lite

ऑनर 9एक्स लाइट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.5 इंचाच्या फुलव्यू डिस्प्ले वर बनलेला आहे जो 91 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Honor 9X Lite एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह यतो जो ईएमयूआई 9.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये हुआवईचा किरीन 710 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल.

पाकिस्तानी साइट वर हा फोन 4 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच Honor 9X Lite मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X Lite डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यांच्या खाली फ्लॅश लाईट आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे 48MP AI Camera लिहिण्यात आले आहे. हा फोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसरला सपोर्ट करतो.

लिस्टिंग नुसार Honor 9X Lite चा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर एफ/1.8 अपर्चर सह येईल पीडीएएफ फीचरला सपोर्ट करेल. तसेच सेकेंडरी सेंसर एक डेफ्थ सेंसर असेल ज्याचा अपर्चर एफ/2.4 आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Honor 9X Lite च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी असल्याचे बोलले जात आहे.

Honor 9X Lite बद्दल कंपनीने अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. हा फोन भारतात कधी येईल हे निश्चित सांगता येणार नाही. तसेच समोर आलेल्या फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर पण विश्वास ठेवता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here