40MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह आले Honor V30 आणि V30 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Honor V30 आणि V30 Pro स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झाले आहेत. हे नवीन फोन्स कंपनीने Honor V20 सीरीजचे अपग्रेडेड वर्जन म्हणून लॉन्च केले आहेत जे गेल्यावर्षी कंपनीच्या Kirin 980 SoC सह आले होते. Honor ने यावेळी V30 सीरीज मध्ये काही अपडेट्स दिले आहेत, ज्यात प्रोसेसरचा पण समावेश आहे.

V30 सीरीज मध्ये Kirin 990 प्रोसेसर सह 5G कनेक्टिविटी देण्यात आली आहे. या सीरीजच्या दोन्ही फोन मध्ये 5G सपोर्ट सह SA (stand-alone mode) आणि NSA (non-stand alone mode) देण्यात आला आहे. Honor V30 डुओ मध्ये पंच होल डिस्प्ले आणि 40MP ट्रिपल कॅमेरा आणि ग्रेडिएंट डिजाइन आणि EMUI 10 ओएस आहे.

Honor V30 आणि V30 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Honor V30 च्या 6GB + 128GB वेरीएंटची किंमत RMB 3,299 (जवळपास 33,500 रुपये) आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत RMB 3,699 (जवळपास 37,600 रुपये) आहे. तर Honor V30 Pro च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत RMB 3,899 (जवळपास 39,600) आणि 8GB + 256GB वेरीएंटची किंमत RMB 4,199 (जवळपास 43,700 रुपये) आहे. दोन्ही फोन्स कंपनीने Icelandic Fantasy, Magic Night Star River, Charm Star Blue, आणि Twilight Orange कलर ऑप्शन मध्ये सादर केले आहेत. 26 नोव्हेंबर पासून Honor V30 प्री-बुकिंग साठी सादर केला जाईल.

Honor V30 आणि V30 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Honor V30 आणि V30 Pro मध्ये कंपनीने 6.57-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले सह IPS LCD पॅनल आणि 91.46 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. तसेच Honor V30 मध्ये Kirin 990 SoC सह balong5000 5G कनेक्टिविटी आणि V30 Pro मध्ये Kirin 990 5G SoC सह लिक्यूड कूलिंग टेक आहे. Honor V30 कंपनीने दोन वेरिएंट: 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह सादर केला आहे. तर V30 Pro पण कंपनीने दोन मॉडेल: 8GB + 128GB आणि 8GB + 256GB सह आणला आहे. दोन्ही हँडसेट एंडरॉयड 10 EMUI कस्टम स्किन सह येतात.

Honor V30 आणि V30 Pro मध्ये सिक्योरिटी साठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी Honor V30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 40MP प्राइमरी सोनी IMX600 सेंसर, 8MP टेलीफोटो लेंस आणि 8MP वाइड-अँगल लेंस आहे. तसेच Honor V30 Pro मध्ये पण मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 40MP प्राइमरी सेंसर, 8MP टेलीफोटो लेंस आणि 12MP वाइड-अँगल लेंस डुअल-OIS सह आहे. रियर कॅमेरा 4K HDR वीडियो रेकॉर्डिंग सपोर्ट, 5-axis इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन आणि अल्ट्रा लो विजन फीचर आहे.

सोबतच Honor V30 सीरीज मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 32MP प्राइमरी सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस आहे. Honor V30 आणि V30 Pro मध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 40W फास्ट-चार्जिंग सपोर्ट, 27वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here