फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 3जीबी रॅम, 3500एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा असलेला Lava Z93

Lava ने आज भारतीय बाजारात आपली ‘Z Series’ वाढवत नवीन स्मार्टफोन Lava Z93 लॉन्च केला आहे. कंपनीने याआधी जून महिन्यात Lava Z62 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला गेला होता जो 6,060 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता. आता Lava Z93 कंपनीने 7,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध असेल, Lava Z93 चारकोल ब्लू आणि रॉयल ब्लू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

Lava Z93 डिजाईन

Lava Z93 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. Lava Z93 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. Lava Z93 के बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच खालच्या बाजूला स्पीकर देण्यात आला आहे. Lava Z93 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तर फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी स्लॉट आणि 3.5एमएम जॅक आहे.

Lava Z93 स्पेसिफिकेशन्स

Lava Z93 कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला आहे जो 6.22-इंचाच्या ड्यू ड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. Lava Z93 एंडरॉयड 9 पाई ओएस वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 3जीबी रॅम सह लॉन्च् केला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lava Z93 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Lava Z93 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी हा फोन फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉकला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी Lava Z93 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Lava Z93 च्या लॉन्चच्या वेळी Lava International चे Head Product Tejinder Singh म्हणाले कि, ‘Lava Z93 कंपनीने मोबाईल मध्ये गेम खेळणाऱ्या ग्राहकांना लक्षत घेऊन बनवला आहे. या फोन मध्ये कोणत्याही अडचणी व लॅग विना यूजर आपला आवडीचा गेम खेळू शकतील. यासाठी लावा ने Lava Z93 साठी गेमलॉफ्ट सोबत हात मिळवणी केली आहे जेणेकरून यूजर मॉर्डन काम्बेट व अस्फाल्ट सारखे गेम खेळू शकतील.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here