Lava चा स्वस्त स्मार्टफोन Z93 Plus भारतात लिस्ट, यात आहे 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा

Lava ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपल्या ‘Z Series’ अंतर्गत लावा झेड93 स्मार्टफोन लॉन्च केला ज्याने 7,999 रुपयांमध्ये बाजारात प्रवेश केला होता. आता बातमी येत आहे कि कंपनी या स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन आणण्याची तयारी करत आहे जो Lava Z93 Plus नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन लावाच्या अधिकृत इंडियन वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे जिथे लॉन्चच्या आधी फोनच्या लुक व डिजाईन सोबत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Lava Z93 Plus

लावा झेड93 प्लस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनवण्यात आला ज्यात फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. वेबसाइटनुसार हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पण स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

Lava Z93 Plus एंडरॉयड 9 पाई सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट असल्याचे बोलले जात आहे. वेबसाइट वर हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला आहे ज्यात बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lava Z93 Plus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.4 अपर्चर असलेले दोन 2 मेगापिक्सलचे इतर सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Lava Z93 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 163.2mm x 77.8mm x 8.9mm आणि वजन 186 ग्राम सांगण्यात आले आहे.

लावा च्या वेबसाइट वर हा फोन ब्लॅक आणि गोल्ड कलर मध्ये लिस्ट झाला आहे. कंपनीने अजूनतरी फोनच्या किंमतीची माहिती दिली नाही पण आशा कि येत्या काही दिवसांत Lava Z93 Plus भारतात अधिकृतपणे लॉन्च होईल. या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. पण तरीही किंमतीची कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here