5 कॅमेरे असलेला नोकिया 9 प्योरव्यू होऊ शकतो जानेवारीच्या शेवटी लॉन्च

नोकिया चे चाहते खूप दिवसांपासून कंपनीच्या नवीन डिवाइस नोकिया 9 प्यूोरव्यू ची वाट बघत आहेत. खूप दिवसांपासून या डिवाइस बद्दल माहिती समोर आली आहे. नुकताच डिवाइसचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला होता. पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप सह येणाऱ्या डिवाइसच्या लॉन्चची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार डिवाइस साल 2019 जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला सादर केला जाईल.

रशिया मध्ये एक्टिव नोकिया कम्यूनिटी ने ट्विटर वर नोकिया एन्यू नावाने एक ट्विट करून याची माहिती दिली आहे. ट्विटनुसार एचएमडी ग्लोबल पुढच्यावर्षी जानेवारीच्या शेवटी नोकिया 9प्योरव्यू लॉन्च करू शकते. ट्विट मध्ये डिवाइसचा फोटो पण दाखवण्यात आला आहे.

ट्विटर वर शेयर करण्यात आलेला फोटो नुकत्याच लीक फोटो प्रमाणे वाटत आहे. लीक झालेल्या फोटो बद्दल बोलायचे तर नोकियाच्या या डिवाइसच्या टॉपला बेजल असतील, ज्यात उजवीकडे फ्रंट कॅमेरा आणि त्याच्या मधोमध नोकियाची ब्रांडिंग असेल. तसेच खालच्या बाजूला मोठे बेजल असतील.

डिस्प्ले डिजाइन पाहता वाटत आहे कि नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेश्यो स्क्रीन असेल. अशाप्रकरची स्क्रीन आपण नोकिया 8 सिराको मध्ये बघितली आहे. तसेच हॅन्डसेट मध्ये क्वाड एचडी+ रिजॉल्यूशन सपोर्ट असलेला डिस्प्ले असू शकतो. याआधी आलेल्या अनेक अफवांनुसार नोकिया 9 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

तसेच डिवाइसच्या बॅक मध्ये पाच रियर कॅमेरा असल्याची चर्चा पण खूप दिवसांपासून समोर येत आहे. रियर कॅमेरा बड्डकल बोलायचे तर फोन मधील पेंटा कॅमेरा म्हणजे 5 सेंसर वाल्या कॅमेरा सेटअप मध्ये दोन प्राइमरी कॅमेरा सेंसर्स सह एक टेलीफोटो लेंस असू शकते. तसेच एक वाइड-एंगल लेंस, एक डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसर असू शकतो. नोकियाच्या अन्य स्मार्टफोन्स प्रमाणे नोकिया 9 मध्ये पण कार्ल जेसिस कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता आहे. तसेच या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here