5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला POCO M2 Reloaded फक्त 9,499 रुपयांमध्ये झाला लाॅन्च

Xiaomi सोबत हिट झाल्यानंतर जेव्हा POCO ने स्वतंत्र ब्रँडच्या स्वरूपात मार्केटमध्ये एंट्री घेतली तेव्हा पोकोने पण असा विचार केला नसेल कि ते Redmi आणि Realme ब्रँडच्या समोर मोठे आव्हान सिद्ध होतील. लो बजेटमध्ये शानदार डिवायस घेऊन येणाऱ्या या ब्रँडने आज पुन्हा भारतात नवीन मोबाईल फोन POCO M2 Reloaded लाॅन्च केला आहे. पोको एम2 रिलोडेड कंपनीने फक्त 9,499 रुपयांमध्ये मार्केटमध्ये सादर केला आहे जो आजपासूनच शाॅपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. (POCO M2 Reloaded launched in India at price RS 9,499 know specs sale offer)

लुक आणि डिजाईन

POCO M2 Reloaded कंपनीने वाॅटरड्राॅप नाॅच डिजाईनवर लाॅन्च केला आहे. डिस्प्ले तीन बाजूंनी बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्यभागी वर्टिकल शेपमध्ये आहे. पोको एम2 रिलोडेडच्या मागच्या पॅनलचा अर्धा भाग स्मूद आणि प्लेन देण्यात आला आहे तर खालचा भाग दोतेड रग्ड आहे.

रियर कॅमेरा सेंसर्सच्या रांगेत खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाल्यूम राॅकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर सिम स्लाॅट आहे. फोनच्या लोवर पॅनलवर 3.5एमएम जॅक आणि स्पीकर ग्रिलसह यूएसबी टाईप पोर्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 77×163.3×9.1एमएम आहे आणि वजन 198 ग्राम आहे. पोको एम2 रिलोडेड Mostly Blue आणि Greyish Black कलरमध्ये लाॅन्च केला गेला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

POCO M2 Reloaded कंपनीने 19.5ः9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा इनसेल आयपीएस डिस्प्ले आहे जो 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. पोकोने आपला फोन अँड्रॉइड 10 वर लाॅन्च केला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 12एनएम फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी80 वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. हा नवीन पोको फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Poco घेऊन येत आहे आपला पहिला 5G स्मार्टफोन Poco M3 Pro, कमी किंमतीत करेल धमाकेदार एंट्री

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पोको एम2 रिलोडेड क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या माइक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी POCO M2 Reloaded मध्ये एफ/2.05 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

POCO M2 Reloaded डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3,5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी पोको एम2 रिलोडेडमध्ये 5,000एमएएचची बॅटरी लोड केली गेली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हा नवीन पोको फोन आजपासूनच फ्लिपकार्टवर विकत घेता येईल.

शाआोमी पोको एम2 प्रो व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here