रियलमी 2 प्रो लॉन्च, हा सर्वात स्वस्त 8जीबी आणि स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर असलेला फोन

मी महिन्यात ओपो ने आपल्या एक्सक्लूसिव आॅनलाइन ब्रँड रियलमी ची सुरवात केली होती आणि या अंतर्गत कंपनीने सर्वात आधी रियलमी 1 आणला होता आणि ऑगस्ट मध्ये दुसरा मॉडेल रियलमी 2 लॉन्च केला होता आणि त्याचबरोबर कंपनीने रियलमी 2 प्रो बद्दल पण माहिती दिली होती आणि आज हा फोन समोर आला आहे. रियलमीच्या इतर फोन्स प्रमाणे हा फोन पण चांगल्या स्पेसिफिकेशन सह खूप कमी किंमतीती लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारात रियलमी 2 प्रो चे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत ज्यांची किंमत क्रमश: 13,990 रुपये, 15,990 रुपये आणि 17,990 रुपये आहे आणि हा 11 ऑक्टोबर पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाइन
रियलमी2 प्रो ची बॉडी मेटलफ्रेम वर बनलेली आहे पण पॅनल ग्लास फिनिश मध्ये आहे. जरी फोनचा मागील पॅनल पॉलिकार्बोनटचा असला तरी कंपनी ने 13-15 ट्रान्सपरंट लेयर चा वापर केला आहे त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळतो. खास बाब म्हणजे मागच्या पॅनल वर पण एक खास कोटिंग आहे जिच्यामुळे बोटांचे ठसे उमटत नाहीत.

डिस्प्ले
फोन मध्ये 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जिचे स्क्रीन रेजल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. यात वॉटर ड्रॉप नॉच स्क्रीन चा वापर करण्यात आला आहे ज्याला कंपनी ने डिव ड्रॉप चे नाव दिले आहे. रियलमी 2 प्रो नवी 19.5:9 स्क्रीन रेशियो सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने कोटेड आहे. पण कंपनी ने गोरिल्ला ग्लास च्या वर्जनची माहिती दिली नाही.

प्रोसेसर
रियलमी 2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. मिड रेंज चा हा ​चिपसेट आपल्या चांगल्या प्रोसेसिंग पावर साठी ओळखला जातो. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत एड्रीनो 512 जीपीयू आहे जो चांगला ग्राफिक्स अनुभव देतो. तसेच क्वालकॉम चा हा प्रोसेसर आपल्या एआई कॅपेबिलिटीज साठी खास आहे.

मेमरी
भारतीय बाजारात रियलमी 2 प्रो तीन रॅम वेरियंट मध्ये आला आहे पण मेमरी वेरियंट दोनच आहेत. 4जीबी आणि 6जीबी सह तुम्हाला 64जीबी ची मेमरी मिळेल तर 8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी च्या माइक्रोएसडी कार्ड चा वापर करता येईल. रियलमी 2 प्रो सध्या बाजारत उपलब्ध असलेला सर्वात कमी किंमतीचा 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट असलेला फोन आहे.

कॅमेरा
रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल​ रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एआई अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे. कंपनी ने हा एफ/1.7 अपर्चर सह सादर केला आहे जो मोठे फोटो घेऊ शकतो. कॅमेरा सोबत पोर्टेट मोड, पॅनारोमा आणि काही प्रीलोडेड स्टिकर मिळतील. तसेच सेल्फी साठी 16—मेगापिक्सलचा सिंगल सेंसर आहे जो नॉच मध्ये उपलब्ध आहे. फ्रंट कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे.

आॅपरेटिंग सिस्टम
हा फोन ओपो च्या कलर ओएस 5.2 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 आधारित आहे. फोन मध्ये तुम्हला गेम मोड, डुअल ऍप्स आणि स्प्लिट स्क्रीन सारखे काही चान्गले फीचर्स मिळतील

कनेक्टिविटी
रियलमी मी 2 प्रो मध्ये तीन स्लॉट आहेत ज्यात तुम्ही दोन सिम कार्ड सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. तसेच फोन मध्ये 4जी सपोर्ट देण्यात आला आहे आणि तुम्ही वोएलटीई कॉल पण करू शकता. या सोबत वाईफाई, जीपीएस आणि ब्लूटूथ पण मिळेल.

बॅटरी
रियलमी 2 प्रो मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात अली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here