रियलमी घेऊन येत आहे अगदी नवीन ‘यू सीरीज’, यातच लॉन्च होईल भारताचा पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन

रियलमी ने ऑक्टोबर महिन्यात राजधानी मध्ये आयोजित आईएमसी 2018 ईवेंट च्या मंचावरून घोषणा केली होती कि कंपनी एक अशा नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी70 वर चालेल. रियलमी ने या नवीन स्मार्टफोनचे नाव आणि यासंबंधित कोणती माहिती दिली नव्हती पण 91मोबाईल्स ने आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून बातमी काढली आहे कि रियलमीचा हा नवीन फोन कंपनीच्या नवीन स्मार्टफोन सीरीज मध्ये येईल जी कंपनी ‘यू सीरीज’ नावाने बाजरात आणेल.

91मोबाईल्स ला समजले आहे कि रियलमी नवीन स्मार्टफोन सीरीज बनवत आहे जी ‘यू सीरीज’ च्या नावाने सादर केली जाईल आणि याच रियलमी यू सीरीज अंतर्गत कंपनी आपला पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट आधारित फोन लॉन्च करेल. विशेष म्हणजे हा फोन फक्त रियलमी कंपनीचा नाही तर भारताचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक च्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल.

रियलमी ने याआधी रियलमी 1 आणि रियलमी 2 व तत्यांच्या वेगवेगळ्या वर्जन व्यतिरिक्त फक्त ‘सी सीरीज’ देशात आणली आहे आणि कंपनीच्या सी सीरीज अंर्तगत आतापर्यंत एकच स्मार्टफोन रियलमी सी1 नावाने लॉन्च झाला आहे. तर आता रियलमी यू सीरीज सह कंपनी मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाल्या फोनची सुरवात करणार आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन 12नॅनोमी​टर टेक्नॉलॉजी वर बनेल. रियलमीचा हा नवीन फोन एक सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल जो कंपनी शाओमीच्या वाय2 स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी सादर करेल.

बोलले जात आहे कि रियलमी यू सीरीजचा हा फोन कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्येच लॉन्च करेल. रियलमी ने अजूनतरी आपल्या यू सीरीज संबंधती कोणताही खुलासा केला नाही. या फोनचे स्पेसिफिकेशन्स काय असतील तसेच हा फोन कधी इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल या संदर्भात इतर माहिती पण तुम्हाला लवकरच देण्यात येईल. लक्षात असू दे कंपनी द्वारा गेल्या महिन्यात लॉन्च केला गेलेला रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो तर रियलमी सी1 कंपनी ने क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here