लाॅन्चच्या आधी दिसले Redmi K40 आणि Redmi K40 Pro चे फोटो, या महिन्यात होईल बाजारात एंट्री

Mi 11

कालच मोठी बातमी समोर आली होती कि येत्या 25 फेब्रुवारीला Redmi K40 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन लाॅन्च होतील जे Redmi K40 आणि Redmi K40 Pro नावाने एंट्री घेतील. रेडमी के40 बद्दल कंपनीचे जनरल मॅनेजर लू वेइबिंग यांनी दावा केला आहे या फोन मध्ये जगातील सर्वात छोटा पंच-होल दिला जाईल. आता लाॅन्चच्या आधी रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो चे फोटो पण इंटरनेटवर समोर आले आहेत.

Redmi K40 आणि Redmi K40 Pro दरअसल चीनी सर्टिफिकेशन साइट टेनावर लिस्ट केले गेले आहेत. या लिस्टिंग मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सचे फोटो पण दिसले आहेत त्यामुळे फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. कंपनीच्या जीएमने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करून सांगितले होते कि रेडमी के40 सीरीज मध्ये जगातील सर्वात छोटा पंच-होल कॅमेरा मिळेल आणि हि 25 फेब्रुवारीला टेक मंचावर लाॅन्च केला जाईल.

ऐसी होगी लुक

टेनावर समोर आलेल्या फोटोनुसार Redmi K40 आणि Redmi K40 Pro बेजल लेस डिस्प्लेवर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या कडांमध्ये पंचहोल देण्यात आला आहे, ज्यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बऱ्याचअंशी बाजारातील मी 11 स्मार्टफोन सारखा आहे. या सेटअप मध्ये दोन लेंस मोठ्या आकाराच्या आहेत तर डावीकडे छोट्या आकाराचा सेंसर आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

कंपनीने अजूनतरी रेडमी के40 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या लीक्स आणि लिस्टिंगनुसार हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल जो फुलएचडी रेजल्यूशनला सपोर्ट करेल. लीकनुसार हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर लाॅन्च केला जाऊ शकतो सोबत साथ क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट मिळू शकतो.

सीरीज बद्दल बोलले जात आहे कि यातील सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तर दुसऱ्या फोन मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर असल्याचे पण लीक मध्ये सांगण्यात आले आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि रेडमी के40 4,000एमएएच बॅटरीसह लाॅन्च केला जाईल जो 33वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here