Jio ग्राहकांसाठी महत्वाची सुचना! अजूनही करू शकतात मोफत वॉयस कॉल, कंपनीने सांगितला उपाय

9 ऑक्टोबर इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री साठी महत्वपूर्ण होती. अगदी सुरवातीपासून मोफत वॉयस कॉल देणाऱ्या Reliance Jio ने हि घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला होता कि आता कंपनी वॉयस कॉल साठी पैसे घेईल. Reliance Jio कडून वॉयस कॉलसाठी पैसे घेण्याची बातमी फक्त Jio ग्राहकांसाठी नाही तर इतर कंपन्यांच्या ग्राहकांसाठी पण धक्कादायक होती. Jio आता ऑफनेटवर्क वॉयस कॉल केल्यास 6 पैसे प्रति मिनिट या हिशोबाने शुल्क घेईल. पण जर तुम्ही पण Jio ग्राहक असला तर तुम्हाला सांगू इच्छितो कि आताही Jio नेटवर्क वर एक पैसाही न देता मोफत वॉयस कॉल करता येईल.

Reliance Jio ने सार्वजनिक घोषणा करत सांगितले कि काही Jio ग्राहक आताही मोफत वॉयस कॉलिंगची सुविधा वापरू शकतील. Jio नुसार असे ग्राहक ज्यांनी 9 ऑक्टोबर किंवा त्याआधी आपला Jio नंबर रिचार्ज केला आहे ते त्या पॅकच्या वैधतेपर्यंत संपूर्ण देशात कोणताही वॉयस कॉल फ्री मध्ये करू शकतील. हे वॉयस कॉल ऑन नेटवर्क तसेच ऑफ नेटवर्क दोन्ही वर चालतील तसेच रोमिंगच्या वेळी पण इनकमिंग व आउटगोइंग पूर्णपणे मोफत असेल. चालू प्लान संपेपर्यंत Jio यूजर्सना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

जियो यूजर्सना द्यावे लागतील 6 पैसे प्रति मिनट

आज पासून जियो ग्राहकांकडून सर्व रीचार्ज वर आईयूसी टॉप-अप वाउचरच्या माध्यमातून 6 पैसे प्रति मिनिटांच्या आईयूसी दराने चार्ज घेतला जाईल. जोपर्यंत TRAI झिरो टर्मिनेशन चार्ज लागू करत नाही तोपर्यंत हा चार्ज घेतला जाईल. याचा अर्थ असा कि आता जियो यूजर्सना एयरटेल, वोडाफोन किंवा इतर नेटवर्क वर कॉल केल्यास 6 पैसे प्रति मिनट द्यावे लागतील.

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज म्हणजे काय

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (IUC) एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटर द्वारे दुसऱ्याला द्यावी लागणारी किंमत आहे. जेव्हा एका टेलीकॉम ऑपरेटरचा ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग मोबाईल कॉल करतो तेव्हा IUC कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क मध्ये होणार कॉल मोबाईल ऑफ-नेट कॉल असतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) IUC शुल्क निर्धारित करते आणि सध्यातरी हे 6 पैसे प्रति मिनट आहे.

मोबाईल कॉल वर 6 पैसे प्रति मिनट शुल्क तोपर्यंत असेल जोपर्यंत TRAI आपल्या रेगुलेशन मध्ये बदल करत नाही. कंपनीने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे प्लान सादर केले आहेत.

असे आहेत नवीन प्लान्स

इतर कंपन्यांच्या नेटवर्क वर कॉलिंग साठी जियोने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे टॉप अप वाउचर पण जारी केले आहेत. 10 रुपयांच्या प्लान मध्ये इतर नंबरवर 124 मिनिटे कॉलिंग करता येईल. तसेच 20 रुपयांच्या प्लान मध्ये 249 मिनिटे, 50 रुपयांच्या प्लान मध्ये 656 मिनिटे आणि 100 रुपयांच्या प्लान मध्ये 1,362 मिनिटे कॉलिंग मिळेल.

टॉप वाउचरच्या बदल्यात मिळेल मोफत डेटा

जियो आपल्या ग्राहकांना टॉप वाउचरच्या मोबदल्यात फ्री डेटा देणार आहे. 10 रुपयांच्या प्लानसह 1 जीबी डेटा, 20 रुपयांसह 2 जीबी डेटा, 50 रुपयांसह 5 जीबी डेटा आणि 100 रुपयांच्या प्लानसह 10 जीबी डेटा दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here