32 एमपी सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड 10 आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A51

Galaxy A50s

91मोबाईल्सने कालच Samsung च्या आगामी स्मार्टफोन Galaxy A51 चा फोटोज शेयर केली होती. हे फोटोज फोनच्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मधील होते, ज्यात फोनचा इंटरनल पॅनल दाखवण्यात आला होता. फोनच्या फोटोज सोबत आम्ही सांगितले होते कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे आणि लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येईल. तर आज Samsung Galaxy A51 महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स ड्रायडशाउटने शेयर केले आहेत. वेबसाइट वर पब्लिश झालेल्या रिपोर्ट मध्ये Galaxy A51 स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत ज्यात कॅमेरा डिटेल आणि डिस्प्ले साईजचा पण समावेश आहे. या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. एमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 मध्ये 4,000 एमएमएच ची पावरफुल बॅटरी मिळू शकते. रिपोर्ट नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सॅमसंगच्या वन यूआई 2.0 वर चालेल.

असा असेल लुक

Samsung Galaxy A51 ची डिजाइन पाहता यात तुम्हाला क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. यावेळी डिजाइन थोडी वेगळी असेल आणि कंपनी L शेप मध्ये कॅमेरा सादर करणार आहे. राहिला प्रश्न कॅमेरा स्पेसिफिकेशनचा तर अजूनतरी याची माहिती नाही. लीक पॅनल मध्ये तुम्ही बघू शकता कि फोनच्या खालच्या पॅनल मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3.5 एमएम ऑडियो जॅक आहे तर लाउडस्पीकर फोनच्या बॅक पॅनल मध्ये दिला जाऊ शकतो.

Samsung च्या इतर फोन प्रमाणे यात पण तुम्हाला तीन कार्ड स्लॉट मिळतील. अर्थात तुम्ही दोन सिम सह माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. या स्क्रीन पॅनलचा फोटो नाही पण आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार Samsung Galaxy A51 मध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच मिळेल. अलीकडेच लॉन्च झालेल्या सॅमसंगच्या मध्य रेंजच्या फोन मध्ये हीच स्क्रीन आहे. आशा आहे कि Samsung नवीन वर्षाच्या आधीच Galaxy A51 बाजारात आणेल.

Samsung Galaxy S10 Lite

जाता जाता सांगायचे म्हणजे Samsung द्वारे लवकरच लॉन्च करील जाणाऱ्या दुसऱ्या डिवाईस Galaxy S10 Lite बद्दल बोलायचे तर हा फोन SM-G770F/DS मॉडेल नंबर सह येईल. ताज्या सर्टिफिकेशन मध्ये Samsung Galaxy S10 Lite मध्ये 4370एमएएच ची बॅटरी असेल. मीडिया रिपोर्ट्स नुसार हि फोनची न्यूनतम पावर असेल तसेच बाजारात हा स्मार्टफोन 4500एमएएच च्या बॅटरी सह येईल. सर्टिफिकेशन्स नुसार Galaxy S10 Lite ची बॅटरी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. बॅटरी पाहता हा 3.85V पावर चार्जला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here