सॅमसंगची शानदार भेट : गॅलेक्सी जे सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या किंमती झाल्या 3,000 रुपयांनी कमी

2018 चा शेवटचा महीना सुरु झाला आहे. टेक कंपन्या नवीन वर्षात नवीन टेक्नॉलॉजी व नवीन प्रोडक्ट आणण्याची तयारी करत आहेत. त्याचबरोबर कंपन्यांचे लक्ष वर्षाच्या शेवटी आपल्या स्मार्टफोन व प्रोडक्ट्सचा सेल वाढवणे तसेच स्टॉक संपवण्याकडे पण असते. नुकत्याच वीवो ने देशातील आपल्या वाय सीरीजच्या तीन स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती 1,000 रुपयांनी कमी केल्या आहेत तर दिग्गज कंपनी सॅमसंग ने पण आपल्या फॅन्सना प्राइस कटची भेट दिली आहे. सॅमसंग इंडिया ने आपल्या गॅलेक्सी जे सीरीजच्या हिट स्मार्टफोन्सच्या किंमती 3,000 रुपयांनी कमी केल्या आहेत.

सॅमसंगच्या या प्राइस कटची माहिती महेश टेलीकॉमच्या ट्वीटर हान्डेल वरून मिळाली आहे. या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग इंडिया ने आपल्या गॅलेक्सी जे सीरीजच्या दोन स्मार्टफोन गॅलेक्सी जे8 तसेच गॅलेक्सी जे6 प्लसच्या किंमती कमी केल्या आहेत. ट्वीटनुसार जून महिन्यात लॉन्च झालेल्या गॅलेक्सी जे8 ची किंमत थेट 3,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे तसेच कंपनी द्वारा सप्टेंबर मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या गॅलेक्सी जे6 प्लस चे मूल्य 1,500 रुपयांनी कमी करण्यात आले आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी जे8 स्मार्टफोन 18,990 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला होता. 3,000 रुपयांच्या कपाती नंतर हा स्मार्टफोन 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच गॅलेक्सी जे6 प्लस कंपनीने 15,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता, पण आता 1500 रुपयांनी किंमत कमी झाल्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 14,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

विशेष म्हणजे सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आले होते तसेच दोन्ही स्मार्टफोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. लवकरच सॅमसंग ‘गॅलेक्सी एम’ नावाने एक नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च करणार आहे. असे बोलले जात की हि गॅलेक्सी एम सीरीज सॅमसंगच्या गॅलेक्सी जे सीरीजला बंद करेल तसेच यानंतर गॅलेक्सी जे सीरीज मध्ये कोणताही नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी जे8 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)
सॅमसंग गॅलेक्सी जे6+ चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here