सॅमसंग गॅलेक्सी एम10 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच समोर आले स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग बद्दल गेल्याच आठवड्यात एक बातमी आली होती ज्यात कंपनीच्या गॅलेक्सी एम सीरीजच्या आगामी डिवाईस गॅलेक्सी एम2 चा उल्लेख करण्यात आला होता. या लीक मध्ये गॅलेक्सी एम2 च्या फोटो सोबत या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख करण्यात आला होता. तर आता सॅमसंगच्या याच सीरीज संबंधित अजून एक लीक समोर आला आहे. या लीक मध्ये चीनच्या बेंचमार्किंग साइट वर सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे ज्याचे नाव गॅलेक्सी एम10 स्मार्टफोन असे सांगण्यात आले आहे.

सॅमसंग संबंधित या लीक मधून पहिल्यांदाच गॅलेक्सी एम10 स्मार्टफोनचा उल्लेख टेक विश्वा समोर आला आहे. लीकनुसार गॅलेक्सी एम10 स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे तिथे या फोनचे काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स पण आहेत. गीकबेंच वर सॅमसंगचा नवीन फोन एसएम-एम105एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आधी पण सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचे दोन अजून फोन एसएम-एम205एफ आणि एसएम-एम305एफ मॉडेल नंबर सह समोर आले आहेत.

गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलले जात आहे की सॅमसंग आगामी दिवसांत या सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. हे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एम10, गॅलेक्सी एम20 आणि गॅलेक्सी एम30 नावाने बाजारात येतील. या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये गॅलेक्सी एम10 सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार गॅलेक्सी एम10 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो आणि हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 724 स्कोर देण्यात आला आहे तसेच मल्टी कोर मध्ये फोनला 3637 स्कोर ​मिळाला आहे. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज येताच कंपनी सध्याच्या गॅलेक्सी आॅन सीरीज आणि गॅलेक्सी जे सीरीज बंद करेल. गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत लो बजेट फोन तसेच मीड रेंज वाले स्मार्टफोन लॉन्च केले जातील. सॅमसंग आपली गॅलेक्सी एम सीरीज 2019 च्या सुरवातीलाच सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here