मोठ्या बॅटरी सह येईल Samsung Galaxy M20s, समोर आली माहिती

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने काही दिवसांपूर्वी आपल्या एम सीरीज मध्ये Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 सादर केले होते. आता अशी माहिती समोर येत आहे कि कंपनी या फोन्सचे अपग्रेडेड वेरिएंट सादर करू शकते. यातील Galaxy M30 च्या अपग्रेडेड वेरिएंट Galaxy M30s बद्दल आधीच माहिती समोर आली आहे. तर आता Galaxy M20s बद्दल माहिती मिळाली आहे.

डच टेक ब्लॉग मधून एक माहिती समोर आली आहे, ज्यात Galaxy M20s च्या लॉन्चची माहिती लीक झाली आहे. बोलले जात आहे कि अपकमिंग फोन मध्ये 5,830mAh ची बॅटरी असेल. यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Galaxy M20 मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी होती. आशा आहे कि Galaxy M20s मॉडेल नंबर SM-M207 सह सादर केला जाईल. सध्या बॅटरी व्यतिरिक्त फोनच्या दुसऱ्या कुठल्याही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पण येत्या काळात फोन संबंधित अजून लीक समोर येऊ शकतात.

हे देखील वाचा: ट्रिपल डिस्प्ले सह येऊ शकतो सॅमसंगचा अपकमिंग फोन, सर्वात यूनिक असेल डिजाइन

सॅमसंग Galaxy M20

Galaxy M20 ‘यू’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला केला गेला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. Galaxy M20 आशाहीच्या ड्रॅगनटेल ग्लासने प्रोटेक्टेड आहे जी डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचवते. फोनचे तिन्ही किनारे नॅरो बेजल्स सह येतात तसेच साखालच्या बाजूला थोडे बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे.

सॅमसंग ने Galaxy M20 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनोस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

हे देखील वाचा: Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M20 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Galaxy M20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. 4जी एलटीई तसेच डुअल सिम सह हा फोन सर्व बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Galaxy M20 मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here