4जीबी रॅम आणि 10.5-इंचाच्या स्क्रीन सह समोर आला सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4

सॅमसंग या महिन्यात भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. या ईवेंट मधून कपंनी इनफिनिटी डिस्प्ले वाला स्मार्टफोन्स भारतीय बाजारात आणणार आहे. सॅमसंग ने भारतात लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे सांगितली नाहीत पण अंदाज लावला जात आहे की 21 मे ला कंपनी गॅलेक्सी ए सीरीज तसेच गॅलेक्सी जे सीरीज चे स्मार्टफोन्स सादर करेल. पण आज सॅमसंग च्या अजून एका डिवाईस ची माहिती समोर आली आहे.

सॅमसंग चा आगामी गॅलेक्सी टॅब चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे. गीकबेंच वर सॅमसंग चा डिवाईस एसएम-टी835 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. बेंचमार्किंग साइट वर लिस्ट झालेला सॅमसंग चा डिवाईस गॅलेक्सी टॅब एस4 आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे जो येणार्‍या दिवसांमध्ये टेक बाजारात येईल. गीकबेंच च्या या लिस्टिंग मधून फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये 4जीबी रॅम मेमरी असेल तसेच 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालेल. त्याचबरोबर ग्राफिक्स साठी या डिवाईस मध्ये ऐड्रेनो 540 जीपीयू दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल आलेल्या लीक्स बद्दल बोलायचे तर या टॅब मध्ये 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लीक नुसार यात 64जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. फोटोग्राफी साठी सॅमसंग आपल्या या डिवाईस मध्ये 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देऊ शकते. पण गॅलेक्सी टॅब एस4 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here