Samsung चा सर्वात पावरफुल टॅबलेट डिवाईस Galaxy Tab S6 भारतात लॉन्च, फीचर्स पाहून व्हाल हैराण

Samsung ने गेल्या महिन्यात ग्लोबल मंचावर आपला पावरफुल टॅबलेट डिवाईस Galaxy Tab S6 लॉन्च केला होता जो खूप एडवांस आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह आला होता. आज भारतीय बाजारात पण Galaxy Tab S6 आला आहे. सॅमसंगने आपला लेटेस्ट टॅबलेट डिवाईस 59,000 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy Tab S6 उद्या म्हणजे 11 ऑक्टोबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल आणि हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबत ऑफलाईन स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab S6 16:10 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 2560 × 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 10.5-इंचाच्या WQXGA सुपर ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा टॅबलेट एंडरॉयड 9 पाई आधारित वनयूआई 1.5 सह येतो जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या डिवाईस मध्ये एड्रेनो 640 जीपीयू पण आहे.

भारतात Galaxy Tab S6 6 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. टॅबलेटची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy Tab S6 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी टॅब मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy Tab S6 1टीबी माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो. कनेक्टिविटी फीचर्स साठी यात वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस ऑप्शन आहेत. तसेच सॅमसं ने यात गेम बूस्टर दिला आहे जो गेमिंग परर्फोमेंस चांगली करतो. सिक्योरिटी साठी टॅब मध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा डिवाईस 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 7,040mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Tab S6 सह शानदार फीचर्स असेलला S-Pen पण येतो, ज्यात ब्लूटूथ कनेक्टिविटी द्वारे टॅबलेट मध्ये म्यूजिक व मीडिया सोबतच कॅमेरा पण ऍक्सेस करता येईल. या डिवाईस मध्ये AKG-tuned क्वॉड स्पीकर्स देण्यात आले आहेत जे डॉल्बी एटमॉसला सपोर्ट करतात. कंपनीने हा डिवाईस Samsung DeX फीचर सह सादर केला आहे तसेच Galaxy Tab S6 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. या टॅबलेट डिवाईसचे डायमेंशन 244.5 x 159.5 × 5.7एमएम आणि वजन 420 ग्राम आहे.

किंमत, सेल व ऑफर

Samsung Galaxy Tab S6 भारतीय बाजारात 59,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. कंपनी कडून एचडीएफसी कार्ड धारकांना नवीन टॅब विकत घेतल्यास 5,000 रुपयांचा डिस्काउंट पण दिला जाईल. Samsung गॅलेक्सी टॅब एस6 सह डिवाईस की-बोर्ड कवर वेगळा देत आहे. या कवरची किंमत 10,999 रुपये आहे पण लॉन्च ऑफर मध्ये हा की-बोर्ड कवर 5,499 रुपयांमध्ये घेता येईल सोबत 6 महिन्यांची यू-ट्यूब प्रीमियम मेंबरशिप पण मिळेल. Samsung Galaxy Tab S6 माउंटेन ग्रे आणि क्लाउड ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Samsung Galaxy Watch

Samsung ने आज गॅलेक्सी टॅब सह स्मार्टवॉच पण लॉन्च केला आहे. कंपनीने Galaxy Watch Active 2 आणला आहे ज्याच्या अल्युमिनियम वेरिएंटची किंमत 26,990 रुपये आणि स्टेनलेस स्टील वेरिएंटची किंमत 31,990 रुपये आहे. Samsung Galaxy Watch Active 2 ब्लॅक, रोज गोल्ड, क्लाउड सिल्वर, ब्लॅक आणि गोल्ड कलर मध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर Samsung Galaxy Watch Active LTE पण भारतीय बाजारात आला आहे. या स्मार्टवॉचच्या 46mm मॉडेलची किंमत 30,990 रुपये आणि 42mm मॉडेलची किंमत 28,490 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here