Cheapest 5G Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-lava-blaze-5g-launched-in-india-with-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-lava-blaze-5g-launched-in-india-with-6gb-ram/#respond Fri, 10 Feb 2023 11:15:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17706 भारतीय मोबाइल ब्रँड लावानं गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) सादर करत Lava Blaze 5G लाँच केला होता. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच हा फोन आणखी अ‍ॅडव्हान्स करत कंपनीनं 6GB RAM Lava Blaze 5G मॉडेल देखील […]

The post स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Blaze 5G 6GB RAM सह लाँच झाला आहे.
  • लावा ब्लेज 5जी फोन भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे.
  • वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह हा फोन 9GB RAM वर परफॉर्म करू शकतो.

भारतीय मोबाइल ब्रँड लावानं गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) सादर करत Lava Blaze 5G लाँच केला होता. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच हा फोन आणखी अ‍ॅडव्हान्स करत कंपनीनं 6GB RAM Lava Blaze 5G मॉडेल देखील भारतीय बाजारात आणला आहे. फोन प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Lava Blaze 5G Price

लावा ब्लेज 5जी फोनचा नवीन मेमरी व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह लाँच झाला आहे. या फोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे परंतु प्रारंभिक सेलमध्ये हा लावा मोबाइल फक्त 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 6GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो. तर Lava Blaze 5G बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Glass Green आणि Glass Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हे देखील वाचा: लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

Lava Blaze 5G Specifications

  • 6.5″ HD+ 90Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Triple Rear Camera
  • 5,000mAh Battery

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G च्या डिस्प्लेला Widevine L1 ला सपोर्ट मिळाला आहे ज्यामुळे ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट मिळतो.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा लावा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं यात 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. फोन 5G च्या 8 बँड्सना सपोर्ट करतो, ज्यात n77 आणि n78 बँड पण शामिल आहेत.

Lava Blaze 5G india launch price 9999 know full specifications sale offers

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे याला 7जीबी रॅमची पावर मिळते. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी 1टीबी पर्यंत वाढवता येते. लावाचा हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू अशा दोन कलर्समध्ये लाँच करण्यात आहे.

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला आणखी दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर

सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय, 3.5mm ऑडिओ जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-lava-blaze-5g-launched-in-india-with-6gb-ram/feed/ 0
15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-under-15000/ https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-under-15000/#respond Sun, 13 Nov 2022 11:38:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14294 5G Mobile Phones गेले कित्येक दिवस सादर होत आहेत, देसाहत 5G नेटवर्क लाइव्ह होण्याआधीपासूनच हा सिलसिला सुरु आहे. परंतु खूप कमी लोकांना यांचं महत्व समजलं की आगामी काळ 5जी फोन्सचा आहे. सध्या भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलचं 5G नेटवर्क लाइव्ह झालं आहे. 5जी नेटवर्क सुरु झाल्यानंतर स्मार्टफोन ब्रँड्स देखील नवनवीन मोबाइल फोन्स घेऊन येत आहेत. […]

The post 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Mobile Phones गेले कित्येक दिवस सादर होत आहेत, देसाहत 5G नेटवर्क लाइव्ह होण्याआधीपासूनच हा सिलसिला सुरु आहे. परंतु खूप कमी लोकांना यांचं महत्व समजलं की आगामी काळ 5जी फोन्सचा आहे. सध्या भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलचं 5G नेटवर्क लाइव्ह झालं आहे. 5जी नेटवर्क सुरु झाल्यानंतर स्मार्टफोन ब्रँड्स देखील नवनवीन मोबाइल फोन्स घेऊन येत आहेत. सध्या मार्केटमध्ये खूप स्वस्तात 5जी स्मार्टफोन विकत घेता येतात. पुढे आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5जी फोन्सची लिस्ट शेयर केली आहे ज्यांची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे स्मार्टफोन 50MP Camera आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतात आणि यांची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होते.

सर्वात स्वस्त 5जी फोन

Lava Blaze 5G

Price: Rs 9,999

Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ IPS (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन Android 12 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतो. Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या लावा फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि USB-C OTG सपोर्ट मिळतो. लावाच्या या फोनमध्ये 5G साठी n77 आणि n78 बँडचा सपोर्ट आहे.

Redmi Note 10T 5G

Price – ₹11,999

5g-phone-under-15000

शाओमी रेडमी नोट 10टी 5जी सध्या भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन आहे. हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल ज्यात 4 जीबी रॅमसह परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेट मिळतो. हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 48 एमपी + 2 एमपी + 2 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फीसाठी फोनमध्ये 8 चा एमपी फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10T 5G फोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती

POCO M4 5G

Price – ₹12,999

5g-phone-under-15000

पोको एम4 5जी फोन 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे तसेच फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन देखील 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

iQOO Z6 5G

Price – ₹13,999

5g-phone-under-15000

आयक्यू झेड6 5जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो तसेच हा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अन्य फीचर्स पाहता, हा मोबाइल फोन 6.58 इंचाच्य मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP + 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा तर 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आहे.

Vivo T1 5G

Price – ₹14,499

5g-phone-under-15000

हा विवो मोबाइल देखील क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो. या फोनच्या 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोेरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. फोनमधील 44वॉट फास्ट चार्जिंग याची प्रमुख यूएसपी आहे, जी 5,000एमएएच बॅटरी मिनिटांत चार्ज करते. अन्स स्पेसिफिकेशन्स पाहता. विवो टी1 5जी फोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या मोबाइल फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 9 5G

Price – ₹14,990

5g-phone-under-15000

मार्च मध्ये लाँच झालेल्या रियलमी 9 5जी फोनचा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या 14,990 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेटवर चालतो तसेच यात डायनॅमिक रॅम एक्सपँशन टेक्नॉलॉजीसह 5जीबी वचुर्अल रॅम देखील मिळतो. फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोटोग्राफीसाठी हा फोन 48 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स असलेल्या ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी रियलमी मोबाइल फोनमध्ये 16एमपीचा फ्रंट सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: WhatsApp Down: ट्विटरवर लोकांनी उडवली खिल्ली; तुम्हाला देखील येतेय का समस्या?

OPPO A74 5G

Price – 14990 रुपये

5g-phone-under-15000

OPPO A74 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सलचा आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 5G ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे. या फोन दोन व्हेरिएंट – 128GB स्टोरेज, 6GB रॅम, आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅमसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 8 MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स आणि 2MP ची इन-डेप्थ लेन्स देण्यात आली आहे.

MOTO G51 5G

Price: Rs 12,249

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 480+ ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या बजेट 5G स्मार्टफोनमध्ये 50MP+8MP+2MP रियर कॅमेरा आहे आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा आहे. मोटो जी51 5जी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy F23 5G

Price: Rs 13499

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2408 पिक्सल आहे. सॅमसंगचा हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागे 50MP+8MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-under-15000/feed/ 0
अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-in-india-lava-blaze-5g-price-revealed-on-november-7-amazon-india-sale/ https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-in-india-lava-blaze-5g-price-revealed-on-november-7-amazon-india-sale/#respond Fri, 04 Nov 2022 06:15:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14595 Cheapest 5G Phone in India च्या टॅगसह काही दिवसांपूर्वी Lava Blaze 5G समोर आला होता. लावा ब्लेज 5जी फोन IMC 2022 (India Mobile Congress) च्या मंचावरून संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सादर केला होता जो India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असेल […]

The post अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Cheapest 5G Phone in India च्या टॅगसह काही दिवसांपूर्वी Lava Blaze 5G समोर आला होता. लावा ब्लेज 5जी फोन IMC 2022 (India Mobile Congress) च्या मंचावरून संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सादर केला होता जो India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असेल असं सांगण्यात आलं होतं. आज लावा ब्लेज 5जी भारतात ऑफिशियली लाँच झाला आहे. पुढे Lava Blaze 5G Price, Specifications आणि Sale ची माहिती देण्यात आली आहे.

Lava Blaze 5G Price

कंपनीनं Blaze 5G च्या किंमतीचा खुलासा केला नाही, परंतु या most affordable 5G phone ची किंमत Rs 10,000 आणि Rs 13,000 दरम्यान असू शकते, अशी चर्चा आहे. फोनचे ऑफिशियल फोटोज पाहून वाटत आहे की फोन blue आणि green कलर ऑप्शनमध्ये येईल. तसेच डिवाइस Amazon India वर सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी मोठ्या बॅटरीसह Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; पाहा किंमत

Lava Blaze 5G Specifications

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G डिस्प्ले Widevine L1 सपोर्ट देण्यात आला जो ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान पण एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट देईल.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 सह बाजारात येईल. तसेच फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आला आहे. हा लावा मोबाइल 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे गरज असेल तेव्हा तुम्ही एकूण 7जीबी रॅमची पावर मिळवू शकता. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-in-india-lava-blaze-5g-price-revealed-on-november-7-amazon-india-sale/feed/ 0
भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/#respond Mon, 08 Feb 2021 12:19:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9935 आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

The post भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G ची सुरवात तर गेल्या वर्षीच झाली होती पण साल 2021 5जीच्या क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. भारतात 5जी नेटवर्क सुरु नाही झाले पण मोबाईल ब्रँड्सनी या सर्विससाठी आधीपासूनच कंबर कसली असल्याचे दिसत आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपले 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. इंडियन युजरच्या गरजा जाणून या मोबाईल कंपन्या असा प्रयत्न करत आहेत कि कमीत कमी किंमतीत 5जी कनेक्टिविटी असलेले मोबाईल फोन घेऊन यावे. आज भारतीय बाजारात अनेक 5जी स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे मिडबजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

Realme X7 5G

रियलमी एक्स7 5जी भारतीय बाजारात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा फोन 21,999 रुपयांमध्ये 12 फेब्रुवारीपासून विकत घेता येईल.

Realme X7 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एमोलेड डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. रियलमी एक्स7 अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो. प्रोसेसिंगसाठी रियलमी एक्स7 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे त्याचबरोबर माली-जी57 जीपीयू आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme X7 मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजी सह येते.

Xiaomi Mi 10i 5G

शाओमीने साल 2021 ची सुरुवात मी 10आय सोबतच केली आहे. भारतात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजवर लॉन्च झाला ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Atlantic blue आणि Pacific Sunrise कलर मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येते. मी 10आय 5जी कंपनीने अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये र्कोटेक्स ए-77 सीपीयूवर काम करणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटीसह येतो.

हे देखील वाचा : Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत

xiaomi mi 10i

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा HM2 sensor देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा शाओमी फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G 5G

मोटोरोलाचा हा 5जी फोन भारतात 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. नोव्हेंबर 2020 मध्ये मार्केट मध्ये आलेल्या या फोनची किंमत फक्त 20,999 रुपये आहे. जो Volcanic Grey आणि Frosted Silver कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. मोटो जी 5जी आईपी52 रेटिंग सह बाजारात आला आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो.

Moto G 5G स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10ला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750 5जी चिपसेटवर चालतो. हा चिपसेट फोनला डुअल मोड 5G (SA/NSA) कनेक्टिविटी देतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Motorola पण घेऊन येत आहे स्वस्त 5G फोन, 6 जीबी रॅमसह झाला वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 20वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo V20 Pro 5G

वीवो वी20 प्रो 5जी डिसेंबर मध्ये भारतात लॉन्च झाला होता जो 8 जीबी रॅमसह मार्केट मध्ये आला होता. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी आहे तसेच या फोनची किंमत 29,990 रुपये आहे. मार्केट मध्ये हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रोची स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते.

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 4,000एमएएच बॅटरीवर लॉन्च केला गेला आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

वीवो वी20 प्रोच्या बॅक पॅनलवर तीन तर फ्रंट पॅनलवर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तर मागे एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे.

OnePlus Nord 5G

गेल्यावर्षी लॉन्च झालेला वनप्लस नॉर्ड आजपण देशातील सर्वात स्वस्त आणि बेस्ट 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे यातील सर्वात छोटा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये आणि सर्वात मोठा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 5G स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 6.44-इंचाच्या फ्लूयड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आक्सिजनओएसवर लॉन्च झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लाक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी वर चालतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 30टी वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,115एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर आणि दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सल Sony IMX586 सेंसर, एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.24 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 सेंसर आणि एफ/2.45 सह 8 मेगापिक्सलच्या सेंसरला सपोर्ट करतो.

The post भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/feed/ 0