Ola - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:48:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर https://www.91mobiles.com/marathi/ola-launch-new-variant-of-s1-s1-air-range-price-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/ola-launch-new-variant-of-s1-s1-air-range-price-and-more/#respond Fri, 10 Feb 2023 07:47:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17699 Ola Electric नं आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स जोडल्या आहेत. कंपनीनं electric scooters S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. OLA S1 Air तीन नवीन व्हेरिएंटमध्ये आणि OLA S1 एका नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या Ola S1 Air scooter च्या नवीन लो बॅटरी व्हेरिएंटची […]

The post Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ola S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.
  • ओला एस1 एयर 2 kWh व्हेरिएंटसाठी रिजर्वेशन विंडो खुली करण्यात आली आहे.
  • भाविश अग्रवाल यांनी कंपनीची आगामी इलेक्ट्रिक बाइक टीज केली आहे.

Ola Electric नं आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स जोडल्या आहेत. कंपनीनं electric scooters S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. OLA S1 Air तीन नवीन व्हेरिएंटमध्ये आणि OLA S1 एका नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या Ola S1 Air scooter च्या नवीन लो बॅटरी व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत 84,999 रुपये आणि S1 scooter च्या नवीन व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये (एक्स शोरूम) आहे. पुढे आम्ही तुम्हाला दोन्ही स्कूटर lच्या नवीन व्हेरिएंटची संपूर्ण माहिती दिली आहे.

कधी सुरु होईल बुकिंग

बुकिंग पाहता ओला इलेक्ट्रिकनं काल आपल्या ओला एस1 एयर 2 kWh व्हेरिएंटसाठी रिजर्वेशन विंडो खुली केली आहे. स्कूटरची डिलिव्हरी यावर्षी जुलैपासून सुरु केली जाणार आहे. तसेच कंपनीनं आपल्या S1 2kWh स्कूटर्ससाठी परचेज विंडो देखील खुली केली आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे की रिवाइज्ड बॅटरी पॅकमुळे डिलिव्हरी तीन महीने उशिरा झाली आहे. हे देखील वाचा: आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत

OLA Electric Scooter Price

सर्वप्रथम OLA S1 Air च्या तिन्ही नवीन व्हेरिएंटची किंमत पाहूया. OLA S1 Air च्या 2kWh battery pack variant ची किंमत 84,999 रुपये, 3kWh व्हेरिएंटची प्राइस 99,999 रुपये आणि 4kWh व्हेरिएंटची प्राइस 1,09,999 रुपये आहे. S1 Air आधी ऑक्टोबर 2022 मध्ये 2.5kWh च्या बॅटरीसह लाँच करण्यात आली होती जी आता डिस्कंटिन्यू करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कंपनीनं OLA S1 चा नवीन 2 kWh बॅटरी कपॅसिटी व्हेरिएंट 99,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच OLA S1 चा 3 kWh व्हेरिएंट 1,09,999 रुपये व OLA S1 Pro 4 kWh व्हेरिएंट 1,29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
नोट: सर्व प्राइस एक्स शोरूम आहेत.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर की रेंज आणि फीचर्स

ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कटूरची बॅटरी रेंज पाहता OLA S1 Airt Scooter च्या 2kWh, 3kWh आणि 4kWh battery pack variant मध्ये अनुक्रमे 85km, 125km व 165km IDC (Indian Driving Cycle) ranges मिळेल. तसेच जर तुम्ही आधी 2.5kWh व्हेरिएंट बुक केला असेल तर काळजी नसावी कारण तुम्हाला 3kWh व्हेरिएंट एक रुपया जास्त न देता अपग्रेड म्हणुन मिळेल. तिन्ही व्हेरिएंटमध्ये 85 KM चा टॉप स्पीड व 4kw ची मोटर देण्यात आली आहे.

त्याचबरोबर S1 सीरीजचे मिड-स्पेक मॉडेल पाहता यात देखील एक नवीन व्हेरिएंट आला आहे. ओला एस1 आता 2kWh बॅटरी पॅक व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिएंटमध्ये 91 किमी (आयडीसी) रेंज आणि ताशी 90 किमीचा टॉप स्पीड मिळेल.हे देखील वाचा: लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

येतेय ओला इलेक्ट्रिक बाइक

इलेक्ट्रिक स्कूटर व्यतिरिक्त भाविश अग्रवाल यांनी कंपनीची आगामी इलेक्ट्रिक बाइक टीज करण्यासाठी पठाण स्टाइल वापरली आहे. अग्रवाल म्हणाले, “कुर्सी पेटी बांध लो क्यूंकी, मौसम बिगडने असलेला आहे.” इव्हेंटमध्ये कंपनीनं आपली ओला इलेक्ट्रिक बाइक टीज केली. दरम्यान बाइकच्या डिजाइन व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-launch-new-variant-of-s1-s1-air-range-price-and-more/feed/ 0
फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/ola-three-electric-bikes-launch-soon-in-india-know-range-price/ https://www.91mobiles.com/marathi/ola-three-electric-bikes-launch-soon-in-india-know-range-price/#respond Mon, 06 Feb 2023 06:36:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17510 ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केल्यानंतर भाविश अग्रवाल यांची कंपनी आता आपली इलेक्ट्रिक बाइक सादर करण्यासाठी तयार आहे. भारतीय टिपस्टर योगेश बराडनं 91mobiles ला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फीचर्स आणि रेंजसह तीन ओला इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या जातील. कंपनी ई-बाइक्स ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’, ओला परफॉर्मॅक्स आणि ओला रेंजर नावानं सादर करणार आहे. ‘आउट […]

The post फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ola electric bikes लवकरच भारतात सादर केल्या जातील.
  • Ola ‘Out of the World’, Ola Peformax, आणि Ola Ranger सादर करेल.
  • Ola ‘Out of the World’ ची किंमत Rs 1,50,000 च्या आसपास असेल.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केल्यानंतर भाविश अग्रवाल यांची कंपनी आता आपली इलेक्ट्रिक बाइक सादर करण्यासाठी तयार आहे. भारतीय टिपस्टर योगेश बराडनं 91mobiles ला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फीचर्स आणि रेंजसह तीन ओला इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या जातील. कंपनी ई-बाइक्स ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’, ओला परफॉर्मॅक्स आणि ओला रेंजर नावानं सादर करणार आहे. ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ ही ओला इलेक्ट्रिक बाइक तिन्ही मॉडेल्स पेडी सर्वात प्रीमियम असेल, ज्यात सर्वात जास्त रेंज आणि 100 किमी ताशीपेक्षा जास्तीचा टॉप स्पीड असेल.

OLA Electric Bike

इलेक्ट्रिक बाइकची किंमत 85,000 रुपये इतकी कमी असू शकते, परंतु बराडनं दावा केला आहे की ही बातमी लीक म्हणता येईल त्यामुळे वास्तविक किंमत वेगळी असू शकते. चला जाणून घेऊया आगामी इलेक्ट्रिक बाइक्सची रेंज, टॉप स्पीड आणि अंदाजे किंमत. हे देखील वाचा: काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी

Ola Electric Bikes Specifications and Price

Ola Out of the World: ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ पाहता एकदा चार्ज केल्यावर 174 किलोमीटर अंतर धावेल. या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 110 किमी असण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा फक्त एकच व्हेरिएंट बाजारात येईल. याची किंमत जवळपास 1,50,000 रुपये असू शकते. या ई-बाइकमध्ये ADAS असेल.

Ola Peformax: ओला परफॉर्मॅक्सचे तीन व्हेरिएंट्स मिड-रेंजमध्ये येतील. यातील एंट्री-लेव्हल व्हेरिएंट मध्ये 91 किमी रेंज आणि ताशी 93 किमीचा टॉप स्पीड मिळेल. तसेच या व्हेरिएंटची किंमत 1,05,000 रुपये असू शकते. या मॉडेलचा दुसरा व्हेरिएंट 133 किमी रेंज आणि ताशी 95 किमीचा टॉप स्पीड मिळेल. याची किंमत 1,15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. टॉप/प्रीमियम ओला परफॉर्मॅक्स व्हेरिएंटमध्ये 174 किमी रेंज आणि ताशी 95 किमी टॉप स्पीड मिळेल. तसेच प्राइस 1,25,000 रुपये असू शकते.

Ola Ranger: ओला रेंजर लाइनअपमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक असेल. हिची किंमत 85,000 रुपयांपासून सुरु होईल आणि 1,05,000 रुपयांपर्यंत जाईल. ही बाइक देखील तीन व्हेरिएंटमध्ये येईल, ज्यात बेस व्हेरिएंटवर 80 किमी रेंज आणि ताशी 91 किमी टॉप स्पीड मिळेल. मिड व्हेरिएंट, 95,000 रुपयांमध्ये 117 किमी रेंज आणि ताशी 91 किमीचा टॉप स्पीड देईल. तर प्रीमियम व्हेरिएंटमध्ये 153 किमी रेंज आणि ताशी 91 किमी टॉप स्पीड मिळेल. हे देखील वाचा: Suzuki भारतात सादर करणार Electric Scooter; जाणून घ्या कधी येईल तुमच्या हातात

ओला इलेक्ट्रिक बाइक्सच्या लाँच डेट बाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु कंपनीनं 9 फेब्रुवारीला काहीतरी मोठं होण्याची माहिती दिली आहे. बराडनुसार कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची डिजाइन दाखवणार आहे.

The post फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-three-electric-bikes-launch-soon-in-india-know-range-price/feed/ 0
कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-front-suspension-breaks-lady-rider-admitted-in-icu/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-front-suspension-breaks-lady-rider-admitted-in-icu/#respond Tue, 24 Jan 2023 07:35:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17178 भारतात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक जुन्या नव्या ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये आपला हात अजमावत आहेत. परंतु राइड शेयरिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात करणारी OLA या सेगमेंटमध्ये भारतीय बाजारात आघाडीवर आहे. परंतु फक्त जास्त स्कूटर्स विकण्याच्या बाबतीत कंपनी पुढे नसून खराब इलेक्ट्रिक स्कूटर्समुळे होणाऱ्या अपघातांच्या बाबीतीत देखील ओलाचे नाव जास्त पुढे येत […]

The post कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इलेक्ट्रिक स्कूटरचं फ्रंट सस्पेंशन तुटल्यामुळे मोठा अपघात घडला.
  • Ola S1 Pro चालवणारी महिला ICU मध्ये दाखल.
  • पतीने ट्विटरवर दिली दुर्घटनेची माहिती

भारतात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक जुन्या नव्या ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये आपला हात अजमावत आहेत. परंतु राइड शेयरिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात करणारी OLA या सेगमेंटमध्ये भारतीय बाजारात आघाडीवर आहे. परंतु फक्त जास्त स्कूटर्स विकण्याच्या बाबतीत कंपनी पुढे नसून खराब इलेक्ट्रिक स्कूटर्समुळे होणाऱ्या अपघातांच्या बाबीतीत देखील ओलाचे नाव जास्त पुढे येत आहे.

OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या समस्या संपता संपत नाहीत. गेल्यावर्षी अनेक रिपोर्ट्समधून कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोष असल्यामुळे ग्राहकांना समस्या येत असल्याचे समोर आले होते. तर आता एका नवीन रिपोर्टमधून समोर आले आहे की Ola S1 Pro स्कूटरचे फ्रंट सस्पेंशन अचानक तुटून इतका मोठा अपघात झाला की महिला चालकाला गंभीर दुखापत झाली आणि तिला ICU मध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती महिलेच्या नवऱ्याने ट्विटरवर दिली आहे.

35 च्या स्पीडवर होती ई-स्कूटर

समकित परमार यांनी सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्टच्या माध्यमातून आपल्या पत्नीसोबत घडलेल्या अपघाताची माहिती दिली आहे. समकितच्या पोस्ट नुसार, रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यांची बायको 35 किमी/तास स्पिडनं ई-स्कूटर चालवत होती. परंतु अचानक पुढील चाक स्कूटरपासून वेगळं झालं. यामुळे महिलेची स्कूटी जोरात रस्त्यावर पडली ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्या ICU मध्ये आहेत.

समकित परमार यांनी Ola आणि Ola Electric चे संस्थापक व सीईओ भाविश अग्रवाल यांना देखील आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. तसेच समकितनं एका ट्विटला उत्तर देताना सांगितलं आहे की ओला टीम अपघाताची पाहणी करण्यासाठी आली होती आणि बाइक घेऊन गेली. टीमने बाइक वापस देणार असल्याचं सांगितलं परंतु आम्हाला बाइक नको तिची किंमत द्या अशी मागणी परमार यांनी केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे दुर्घटना घटण्याची ही काही पहिली वेळ नाही. अशा दुर्घटनांच्या वेळी Ola वाहनाचा स्पीड आणि अन्य डेटा अपडेट करते.

इतर लोकांनी देखील केली ओलाची तक्रार

The post कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-front-suspension-breaks-lady-rider-admitted-in-icu/feed/ 0
OLA Scooter बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; 20 आरोपींना अटक https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-booking-fraud-delhi-police-arrested-20-criminals/ https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-booking-fraud-delhi-police-arrested-20-criminals/#respond Tue, 15 Nov 2022 07:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14945 देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स पैकी एक खरेदी करण्याआधी बुक करावी लागते. परंतु, जर तुम्ही या ई-स्कूटरची बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कदाचित तुम्ही ज्या वेबसाइटवरून OLA Scooter ची बुकिंग करत असाल ती फेक असू शकते त्यामुळे तुमची बुकिंग अमाउंट कंपनीकडे न जाता थेट सायबर गुन्हेगारांच्या अकाऊंटमध्ये पोहोचू शकते. […]

The post OLA Scooter बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; 20 आरोपींना अटक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स पैकी एक खरेदी करण्याआधी बुक करावी लागते. परंतु, जर तुम्ही या ई-स्कूटरची बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कदाचित तुम्ही ज्या वेबसाइटवरून OLA Scooter ची बुकिंग करत असाल ती फेक असू शकते त्यामुळे तुमची बुकिंग अमाउंट कंपनीकडे न जाता थेट सायबर गुन्हेगारांच्या अकाऊंटमध्ये पोहोचू शकते. ओला स्कूटर बुक करण्याच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे.

20 आरोपींना अटक

माहितीनुसार सर्व आरोपी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बसून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली फसवणूक करत होते. अशा घटना वाढत असल्यामुळे पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या 20 Cyber criminals ना अटक करण्यात आलं. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक

1000 लोकांना कोट्यवधींचा चुना लावला

दिल्ली पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की सायबर गुन्हेगारांच्या एका गँगनं कमीत कमी 1,000 लोकांना फसवलं आहे. माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहून दोन आरोपींनी ओलाची एक फेक वेबसाइट डिजाइन केली होती, जिच्या माध्यमातून वेबसाइटवर विजिट करणाऱ्या लोकांना फसवून आपल्या जाळ्यात ओढत होते. दिल्ली पोलिसांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर स्कॅम करण्याच्या आरोपाखाली 20 आरोपींना अटक केलं आहे.

अशी होते ओला स्कूटर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राहक ओला ई-स्कूटीची माहिती घेण्यासाठी गुगलवर सर्च करत होते, तेव्हा त्यांना ही नकली वेबसाइट दिसत होती. त्यानंतर या गँगचे आपणच कंपनी असून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करत होते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढली; चीनी ब्रँड्सना मिळणार स्वस्त Samsung Galaxy M04 कडून तगडे आव्हान

चार्जेसच्या नावाखाली एक्स्ट्रा पैसे

बातम्यांनुसार ग्राहक या गुन्हेगारांची नकली वेबसाइट ओपन करून आपले डिटेल सबमिट करत होते. त्यानंतर ग्राहकांना फोन करून त्यांच्याकडे 499 रुपये बुकिंग अमाउंटची मागणी केली जायची. एकदा का ही बुकिंग अमाऊंट म्हणून 499 रुपये ट्रांसफर झाले की त्यानंतर स्कूटरच्या इंश्योरेंस, टॅक्स आणि ट्रांसपोर्टेशन चार्जेसच्या नावाखाली एका ग्राहकाकडून 50,000 ते 70,000 रुपये घेतले जात होते. अशा जवळपास 1,000 ग्राहकांची फसवणूक करून या सायबर गुन्हेगारांनी कोट्यावधी रुपये कमवले होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OLA Scooter बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; 20 आरोपींना अटक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-booking-fraud-delhi-police-arrested-20-criminals/feed/ 0
Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/video-ola-electric-car-design-launch-date-price-range-expected/ https://www.91mobiles.com/marathi/video-ola-electric-car-design-launch-date-price-range-expected/#respond Thu, 27 Oct 2022 06:33:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14358 Ola Electric Car: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी OLA लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करणार आहे. आतापर्यंत OLA Electric Car Launch Date बद्दल ऑफिशियल खुलासा झाला नाही. परंतु आशा आहे की 2024 पर्यंत ही ईव्ही बाजारात येऊ शकते. आता Ola Electric नं पुन्हा एकदा Ola electric car चाका टीजर व्हिडीओ शेयर केला […]

The post Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola Electric Car: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी OLA लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करणार आहे. आतापर्यंत OLA Electric Car Launch Date बद्दल ऑफिशियल खुलासा झाला नाही. परंतु आशा आहे की 2024 पर्यंत ही ईव्ही बाजारात येऊ शकते. आता Ola Electric नं पुन्हा एकदा Ola electric car चाका टीजर व्हिडीओ शेयर केला आहे. या Video मध्ये बंगळुरूमधील राइड शेयरिंग आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअपच्या आगामी इलेक्ट्रिक कारची झलक दिसत आहे. कंपनीनं हिला एक फ्यूचरिस्टिक स्टाइलिंग थीम असलेली प्रीमियम सेडान कार म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये बघता येईल की या कारचा लुक कसा असेल.

Video मध्ये बघा OLA EV चा लुक

व्हिडीओमध्ये दिसत आहे की या कारमध्ये समोरच्या बाजूला एक पातळ एलईडी लाइट्सची पट्टी असेल. ही पट्टी एका हेडलॅम्पपासून दुसऱ्या हेडलॅम्प पर्यंत पोहोचते. ही एका एयरोडायनॅमिक शेपमध्ये तयार करण्यात आली जी जे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जास्त रेंज मिळण्यासाठी खूप आवश्यक आहे. हे देखील वाचा: Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

तसेच नवीन टीजर इंटीरियरचा देखील दाखवण्यात आला आहे. व्हिडीओवरून स्पष्ट झालं आहे की कारमध्ये कंपनीनं एक आयताकृती स्टीयरिंग व्हील डिजाइन देण्याचा निर्णय घेतला आहे, मोठ्या प्रमाणावर राउंड स्टीयरिंग कार्समध्ये मिळतात. ओला लोगो सेंटरमध्ये असेल आणि बॅकलिट स्टीयरिंग कंट्रोलनं भररलेली असेल.

साइड मिरर मिळणार नाहीत

या कारचे अन्य डिजाइन डिटेल्स पाहता यात रियर व्यूसाठी डोरवर मिळणारे मिरर दिसत नाहीत, कारण त्याजागी असे कॅमेरा दिले जातील ज्यामुळे ड्रायव्हरला स्क्रीनवरून मागून येणाऱ्या व्हेईकल्स आणि अन्य ऑबजेक्ट्सवर नजर ठेवता येईल. यात फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अँबियंट लाइटिंग सारखे प्रीमियम फीचर्स दिले जाऊ शकतात. तसेच यात एक फुल ग्लास रूफ देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: लो बजेटमध्ये रेडमी-रियलमीचा गेम फिनिश करण्याची तयारी; Samsung Galaxy F04s लवकरच येणार बाजारात

Ola EV car price (expected)

ओला या कारची किंमत 25 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवू शकते. परंतु सध्या भारतात 25 लाख रुपयांपेक्षा खालच्या ईव्ही सेगमेंटमध्ये सर्वात जास्त ग्राहक आहेत. ओलाचा उद्देश अशी कार बनवण्याचा आहे जी फक्त 5 सेकंदात 0 ते 100 किमी ताशी वेग गाठू शकेल, तसेच कारची रेंज 500 किमी ठेवण्याचा प्रयत्न देखील करू शकते. परंतु ही अधिकृत माहिती नाही, त्यामुळे जोपर्यंत ही कार बाजारात येत नाही तोपर्यंत काही स्पष्ट होणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/video-ola-electric-car-design-launch-date-price-range-expected/feed/ 0
499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज https://www.91mobiles.com/marathi/131km-range-ola-s1-electric-scooter-india-launch-price-booking-sale/ https://www.91mobiles.com/marathi/131km-range-ola-s1-electric-scooter-india-launch-price-booking-sale/#respond Tue, 16 Aug 2022 12:43:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12250 Ola Electric नं स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रि-लाँच केली आहे. कंपनीनं ही बॅटरी असलेली स्कूटी Mission Electric 2022 event अंतगर्त सादर केली आहे. तसेच Ola electric car देखील टीज केली आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की साल 2024 मध्ये कार लाँच केली जाईल. इतकंच नव्हे तर कंपनीनं Ola S1 […]

The post 499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola Electric नं स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रि-लाँच केली आहे. कंपनीनं ही बॅटरी असलेली स्कूटी Mission Electric 2022 event अंतगर्त सादर केली आहे. तसेच Ola electric car देखील टीज केली आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की साल 2024 मध्ये कार लाँच केली जाईल. इतकंच नव्हे तर कंपनीनं Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर limited edition Khaki shade मध्ये सादर केली आहे, जिचेज्याची फक्त 1,947 यूनिटच विकले जातील. चला जाणून घेऊया Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि सेलबद्दल संपूर्ण माहिती.

Ola S1 Electric Scooter Price, Sale आणि Booking

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर 99,000 रुपयांच्या आरंभिक एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुकिंगसाठी कंपनीच्या साइट आणि Ola Electric app वर उपलब्ध होईल. कंपनीनुसार नवीन Ola Electric S1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरु होईल. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितलं आहे की अर्ली अ‍ॅक्सेस परचेज विंडो 1 सप्टेंबरला उघडेल.

Ola S1 ची warranty

ओला कडे ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी फायनान्सचा ऑप्शन देखील आहे. त्याअंतर्गत ईएमआय 2,999 रुपयांपासून सुरु होईल आणि बँकिंग पार्टनरकडून फीमध्ये सूट मिळेल. तसेच ओला पाच वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी देखील देत आहे. वॉरंटी बॅटरी, मोटर आणि अन्य सर्व कव्हर करेल. जुने Ola S1 Pro युजर्स देखील ही वॉरंटी विकत घेऊन शकतील.

Ola S1 की रेंज, स्पेसिफिकेशन्स, कलर आणि डिजाइन

ओला एस1 ची डिजाइन ओला एस1 प्रो सारखी आणि त्याच प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ही रेड, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, नियो मिंट आणि लिक्विड सिल्व्हर अशा पाच रंगात आली आहे. तसेच यात ओला एस1 प्रो प्रमाणे मूवओएस सॉफ्टवेयर आहे आणि ज्याला भविष्यातील सर्व अपडेट्स मिळतील, ज्यात मूवओएस 3.0 चा देखील समावेश आहे, जो यंदा दिवाळीनंतर लाँच होईल.

Ola S1 Pro च्या 3.97kWh च्या तुलनेत Ola S1 ची बॅटरी क्षमता 3kWh आहे. ओला एस1 ची एआरएआय-प्रमाणित रेंज 131 किमी आहे. इको मोड मध्ये 128 किमी, सामान्य मोड मध्ये 101 किमी आणि स्पोर्ट्स मोड मध्ये 90 किमी ची रेंज ग्राहकांना मिळेल. कंपनीचा दावा आहे की Ola S1 मध्ये 95kmph चा टॉप स्पीड मिळतो. तसेच यात म्युजिक, नेव्हिगेशन, साथी अ‍ॅप आणि रिवर्स मोड सारखे फिचर देखील मिळतात.

तुम्हाला माहित असेल की Ola S1 गेल्यावर्षी 15 ऑगस्ट, 2021 रोजी लाँच करण्यात आली होती. परंतु यंदा जानेवारीत काही कारणास्तव ही बंद करण्यात आली होती. आता रि-लाँचनंतर पुन्हा एकदा या स्कूटरची टक्कर बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी होईल.

The post 499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/131km-range-ola-s1-electric-scooter-india-launch-price-booking-sale/feed/ 0
Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-electric-scooter-runs-300km-on-single-charge/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-electric-scooter-runs-300km-on-single-charge/#respond Fri, 15 Jul 2022 06:29:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11428 Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनी सिंगल चार्जमध्ये 180km रेंज देण्याचा दावा करते.

The post Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होताच चर्चेचा विषय ठरली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीची सर्वात प्रीमिमय स्कूटर Ola S1 Pro हेडलाईनमध्ये आली आहे. स्कूटरच्या एका युजरनं दावा केला आहे की, त्याला सिंगल चार्जमध्ये 300KM पेक्षा जास्त रेंज मिळाली आहे. Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल अशाप्रकारचा दावा आतापर्यंत दोन युजर्सनी केला आहे. युजर्सचा दावा आहे की MoveOS 2.0 अपडेटनंतर त्यांची Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर तीनशे किलोमीटर रेंज देऊ लागली आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मिळालेल्या नवीन अपडेट MoveOS 2.0 मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरला इको मोड मिळाला आहे, त्यामुळे युजर्सनी दावा केला आहे की त्यांना सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज मिळाली आहे.

Ola S1 Pro सिंगल चार्जमध्ये 300km ची रेंज

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर दोन युजर्सनी पोस्ट केली आहे की ओलाच्या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro नं सिंगल चार्जमध्ये सुमारे 300 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज दिली आहे. सतेंद्र यादव नावाच्या एका युजरनं Ola S1 Pro च्या डॅशबोर्डचा फोटो शेयर करून हा दावा केला आहे. या प्रवासात युजरचा सरासरी स्पीड ताशी 20 किमी इतका होता आणि कमाल स्पीड ताशी 38 किलोमीटर होता. सतेंद्र यादवनी जो फोटो शेयर केला आहे, त्यानुसार त्याने 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे आणि त्यांच्या स्कूटरची 5 टक्के बॅटरी आणि 3 किलोमीटरची रेंज शिल्लक आहे. हे देखील वाचा: 6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज

अजून एका युजर जिगर भरदमनं देखील Ola S1 Pro च्या डॅशबोर्ड की फोटो शेयर करत असाच काहीसा दावा केला आहे. जिगरनं शेयर केलेल्या फोटोवरून समजते की त्याचा सरासरी स्पीड ताशी 23 किलोमीटर आणि मॅक्सिमम स्पीड ताशी 40 किलोमीटर होता. जिगरच्या डॅशबोर्डनुसार स्कूटरमध्ये, 4 टक्के बॅटरी आणि 1 किलोमीटरची रेंज शिल्लक आहे.

लाँचच्या वेळी Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनीनं दावा केला होता की ही सिंगल चार्जमध्ये 180km की रेंज ऑफर करते. याआधी अनेक युजर्सना सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरची रेंज मिळाली आहे. याआधी ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी काही टॉप रायडर्सना ओला एस1 प्रो गिफ्ट मध्ये दिली होती. इंडियन इलेक्ट्रिक टू व्हीलर सेग्मेंटमध्ये Ola S1 Pro एक मोठी दावेदार आहे आणि हीच टॉप टेनमध्ये समावेश आहे. ओला इलेक्ट्रिक गेल्या काही दिवसांपासून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रयत्न करत आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ

The post Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-electric-scooter-runs-300km-on-single-charge/feed/ 0