Online Shopping - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा https://www.91mobiles.com/marathi/10-iphone-stolen-by-delivery-boy-and-replaced-with-fake-dummy-in-gurugram/ https://www.91mobiles.com/marathi/10-iphone-stolen-by-delivery-boy-and-replaced-with-fake-dummy-in-gurugram/#respond Sat, 29 Apr 2023 03:35:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20575 ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड संबंधित अशा घटना सतत कानावर पडत असतात की Amazon किंवा Flipkart वरून काही सामान मागवलं जातं आणि त्याबदल्यात साबण, दगड किंवा दुसरंच चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. असंच काहीसं गुरूग्राममध्ये देखील घडलं आहे जिथे डिलिव्हरी बॉयनं 1 किंवा 2 नव्हे तर संपूर्ण 10 iPhone चोरून त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच वस्तू पार्सलमध्ये ठेवल्या आणि […]

The post 10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयफोन्सच्या बदल्यात डमी फोन पार्सलमध्ये ठेवले.
  • पार्सलमध्ये आयफोन्ससह एयरपॉड देखील होते.
  • सर्व आयफोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून आले होते.

ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड संबंधित अशा घटना सतत कानावर पडत असतात की Amazon किंवा Flipkart वरून काही सामान मागवलं जातं आणि त्याबदल्यात साबण, दगड किंवा दुसरंच चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. असंच काहीसं गुरूग्राममध्ये देखील घडलं आहे जिथे डिलिव्हरी बॉयनं 1 किंवा 2 नव्हे तर संपूर्ण 10 iPhone चोरून त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच वस्तू पार्सलमध्ये ठेवल्या आणि लाखोंचा घोटाळा केला.

डिलिव्हरी बॉयनं चोरले 10 आयफोन

समोर आलेल्या रिपोर्टनुसार गुरूग्राममध्ये एका ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं 10 आयफोन्स चोरून त्यांच्या जागी डमी फोन म्हणजे नकली मोबाइल पार्सलमध्ये ठेवले. हे सर्व आयफोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनचे असल्याचं सांगण्यात आलं आहे जे कस्टमरला डिलिव्हर होणार होते. रिपोर्टनुसार आरोपी तरुण अ‍ॅमेझॉनचे पार्सल डिलिव्हर करणाऱ्या कंपनी Matrix Finance Solution साठी काम करता होता. हे देखील वाचा: स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री!

आरोपी तरुणाचे नाव ललित असल्याचं सांगण्यात आलं आहे. बातमीनुसार, ललितला एक पार्सल डिलिव्हर करण्याचं काम मिळालं होतं ज्यात 10 अ‍ॅप्पल आयफोन आणि एयरपॉड होता. जेव्हा हा तरुण पार्सल डिलिव्हर करण्यासाठी निघाला तेव्हा रस्त्यातच त्याने डब्ब्यांमधील iPhone आणि AirPods काढले होते आणि त्याऐवजी डमी मोबाइल ठेवले.

वस्तू रिप्लेस केल्यानंतर ललितनं ते पार्सल आपल्या भावाला दिले होते आणि ते पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. ललितनं खोटं सांगितलं की ज्या ग्राहकाला पार्सल द्यायचं होतं त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, म्हणून डिलिव्हरी उद्या करेल. जेव्हा पार्सल पुन्हा कंपनीत आलं तेव्हा पॅकेजिंगशी छेडछाड केल्याचा संशय आला. पॅकिंग काढल्यावर त्यातून नकली आयफोन निघाले. हे देखील वाचा: Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक

ग्राहकाला त्रास आणि कंपनीला फटका

साधारणतः आयटम डिलिव्हर करण्याच्या बाबतीत लोक ई-कॉमर्स वेबसाइट्सना दोष देतात. परंतु अनेकदा सामान डिलिव्हर करणाऱ्यांची चूक असते तसेच त्यांनी केलेला फ्रॉड कंपनी पर्यंत पोहचत देखील नाही. यामुळे तुम्ही ग्राहकांना त्रास होतो तर दुसरीकडे शॉपिंग साइट्स व डिलिव्हरी पार्टनर्सचे देखील नुकसान होते.

The post 10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-iphone-stolen-by-delivery-boy-and-replaced-with-fake-dummy-in-gurugram/feed/ 0
ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा https://www.91mobiles.com/marathi/how-to-grab-best-deals-on-online-sale-amazon-great-indian-festival-sale-flipkart-big-billion-days/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-grab-best-deals-on-online-sale-amazon-great-indian-festival-sale-flipkart-big-billion-days/#respond Sun, 19 Feb 2023 12:26:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13359 Best Deals During Online Sale: सोमवार पासून नवरात्री सुरु होतील, त्यानंतर पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळी येत आहे. या निमित्याने जवळपास सर्व ई-कॉमर्स साइट्सवर वार्षिक सेल सुरु होणार आहेत. ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart की सेल (Amazon Great Indian Festival and Flipkart Big Billion Days sale) देखील सुरु होणार आहे, ज्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित […]

The post ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Best Deals During Online Sale: सोमवार पासून नवरात्री सुरु होतील, त्यानंतर पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळी येत आहे. या निमित्याने जवळपास सर्व ई-कॉमर्स साइट्सवर वार्षिक सेल सुरु होणार आहेत. ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart की सेल (Amazon Great Indian Festival and Flipkart Big Billion Days sale) देखील सुरु होणार आहे, ज्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार डिस्काउंटसह प्रोडक्ट्सची विक्री केली जाईल. या फेस्टिव सीजन सेलमध्ये बेस्ट डील (Best Deal) मिळवणं देखील एवढं सोपं काम नाही. यासाठी ट्रिक्स माहित असणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल. पुढे आम्ही अशाच टिप्स आणि ट्रिक्सची माहिती दिली आहे ज्या फॉलो करून तुम्ही हजारोंची बचत करू शकता.

कार्ड डिटेल आणि पत्ता सेव्ह करून ठेवा

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ऑनलाइन सेल सुरु होण्याआधी पेमेंट करण्यासाठी ई-कॉमर्स साइटवर तुमचं अकाऊंट असणं आवश्यक आहे. अकाऊंटमध्ये तुमचा पत्ता, क्रेडिट कार्ड (Credit Card) /डेबिट कार्ड (Debit Card) चे डिटेल्स सेव्ह करून ठेवा. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही सेल दरम्यान त्वरित कार्टमध्ये टाकलेलं प्रोडक्ट खरेदी करू शकाल. हे देखील वाचा: भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone; किंमत 7,499 पासून सुरु

रात्री करा लॉगइन

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

Amazon’s Great Indian Festival Sale 2022 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2022 दोन्ही 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत, ज्यात लाखों ग्राहक खरेदी करतील. परंतु प्राइम मेंबर्स आणि फ्लिपकार्ट प्लस युजर्स एक दिवस आधी म्हणजे 22 सप्टेंबरपासून याचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे लॉग इन करण्याची सर्वात चांगली वेळ रात्री असेल कारण तेव्हा ऑनलाइन असणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असते आणि तुम्ही तुमच्या आवडीचं प्रोडक्ट बेस्ट डीलमध्ये विकत घेऊ शकाल.

मेंबरशिपमुळे होईल फायदा

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

अ‍ॅमेझॉन प्राइम सदस्यांना प्राधान्य देतं आणि दुसरीकडे फ्लिपकार्ट प्लस मेम्बर्सना देखील वेगळे बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे फ्री शिपिंग, एक्स्ट्रा डिस्काउंट आणि अनेक फायदे मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स साइटची मेंबरशिप घेण्याचा सल्ला देत आहोत. 12 महिन्यांच्या Flipkart Plus मेंबरशिपसाठी युजर्सना 200 सुपर कॉइन गोळा करावे लागतात. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपच्या 30 दिवसांच्या प्लॅनची किंमत 179 रुपये आहे.

कार्टमध्ये ठेवा प्रोडक्ट

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ऑनलाइन खरेदी करताना डिस्काउंट मिळवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे ‘शॉपिंग कार्ट’ मध्ये ते प्रोडक्ट ठेवणे जे विकत घेण्याचं तुम्ही ठरवलं आहे. त्यानंतर पेमेंट न करता साइट सोडता येते. याला ‘शॉपिंग कार्ट अबँडनमेंट’ म्हटलं जातं. अनेक वेबसाइट तुम्हाला नोटिफिकेशन देतात की तुम्ही कार्टमध्ये जे प्रोडक्ट ठेवले आहेत त्यावर तुम्हाला आकर्षक सूट दिली जात आहे. हे देखील वाचा: 6,041 रुपयांच्या हप्त्यावर अ‍ॅमेझॉनवर मिळतेय इलेक्ट्रिक स्कूटी! फक्त 10 स्टेप्समध्ये मिळेल Free Home Delivery

कॅशबॅक अ‍ॅप आणि साइटचा वापर करा

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

खरेदी करताना जास्तीत जास्त बचत करण्यासाठी तुम्ही गोपॅसा, क्राउनिट, नियरबाय, टॅपजो आणि मॅजिकपिन सारखे कॅशबॅक अ‍ॅप्स डाउनलोड करू शकता. जिथे तुम्हाला डिस्काउंट कुपन सोबतच कॅशबॅक कुपन मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या साइट्सवर खरेदी करताना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवण्यासाठी करू शकता.

The post ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-grab-best-deals-on-online-sale-amazon-great-indian-festival-sale-flipkart-big-billion-days/feed/ 0
ऑनलाइन शॉपिंगमधील ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय? जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/open-box-delivery-flipkart-amazon-online-shopping/ https://www.91mobiles.com/marathi/open-box-delivery-flipkart-amazon-online-shopping/#respond Mon, 17 Oct 2022 06:45:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14041 सणासुदीचे दिवस आले आहेत त्यामुळे ई-कॉमर्स विश्वातील दिग्गज कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काउंट ऑफरची घोषणा करत आहेत. खास ऑनलाइन सेल आयोजित करत आहेत. परंतु ऑनलाइन सेल दरम्यान फसवणूक झाल्याचा अनेक बातम्या येतात, ज्यात मागवलेल्या वास्तूच्या ऐवजी भलतीच गोष्ट डिलिव्हर होते. अशा वेळी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहकांमध्ये वाद सुरु होतो. बऱ्याचदा ग्राहकांना […]

The post ऑनलाइन शॉपिंगमधील ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीचे दिवस आले आहेत त्यामुळे ई-कॉमर्स विश्वातील दिग्गज कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काउंट ऑफरची घोषणा करत आहेत. खास ऑनलाइन सेल आयोजित करत आहेत. परंतु ऑनलाइन सेल दरम्यान फसवणूक झाल्याचा अनेक बातम्या येतात, ज्यात मागवलेल्या वास्तूच्या ऐवजी भलतीच गोष्ट डिलिव्हर होते. अशा वेळी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहकांमध्ये वाद सुरु होतो. बऱ्याचदा ग्राहकांना न्याय मिळत नाही, परंतु यावर एक उपाय आता आला आहे.

तुम्हाला माहित आहे का अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट दोन्ही कंपन्या ओपन बॉक्स डिलिव्हरी चा ऑप्शन देत आहेत, जो सिलेक्ट केल्यावर प्रीपेड ऑर्डरच्या वेळी तुमची फसवणूक होणार नाही. चला या आर्टिकलमध्ये जाणून घेऊया की ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय आणि यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील. हे देखील वाचा: 10 हजारांच्या रेंजमध्ये 64MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच

Open Box Delivery म्हणजे काय?

जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉनवरून ओपन बॉक्स डिलिव्हरी सर्व्हिसचा ऑप्शन निवडला तर डिलिव्हरी बॉय कस्टमरला त्याच्या समोर पॅकेज ओपन करून दाखवतो. म्हणजे तुमच्या समोरच बॉक्स ओपन झाल्यामुळे तुम्ही मागवलेली वस्तू त्यात आहे की नाही हे तुमच्या समोरच स्पष्ट होते. परंतु सध्या ही सर्व्हिस सर्व पिनकोडसाठी उपलब्ध नाही. काही निवडक पिनकोडवरच ही सुविधा उपलब्ध आहे. याची माहिती ऑर्डर करते वेळी ओपन बॉक्स डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करताना तुम्हाला मिळेल.

ऑर्डरची वेळ करा सिलेक्ट

जर तुमच्या पिनकोडवर ओपन बॉक्स डिलिव्हरीची सर्व्हिस उपलब्ध असेल तर ऑर्डरच्या वेळी तुम्हाला ऑप्शन दिसेल. तुम्ही इथे हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर Delivery Boy तुमच्या समोर Box Open करेल.

ओपन बॉक्स डिलिव्हरीचा उपयोग

जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on Delivery) चा ऑप्शन निवडला तर तुम्हाला आधी पेमेंट करावं लागेल. त्यानंतर पेमेंट डिलिव्हरी बॉय बॉक्स उघडून दाखवेल. जर तुमची ऑर्डर डॅमेज असेल किंवा चुकीची असेल तर त्याक्षणीच रिटर्न आणि रिफंडची सुविधा मिळेल. जर तुम्ही आधी ऑनलाइन पेमेंट केलं असेल तर सेलर्सच्या रिटर्न पॉलिसीनुसार रिफंड मिळेल.

ओपन बॉक्स डिलिव्हरी चार्ज?

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर ओपन बॉक्स डिलिव्हरीची सर्व्हिस पूर्णपणे फ्री आहे. यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे जर तुम्ही कधीही महाग सामान ऑर्डर केलं तर हा ऑप्शन नक्की सिलेक्ट करा. हे देखील वाचा: Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम

या प्रोडक्ट्सवर मिळेल ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन

ओपन बॉक्सचा ऑप्शन खासकरून स्मार्टफोन आणि मोठे इलेक्ट्रॉनिक्स जसे की टेलिव्हिजन आणि वॉशिंग मशीन इत्यादी प्रोडक्ट्सच्या खरेदीच्या वेळी सिलेक्ट करता येईल.

नोट: ओपन बॉक्स डिलिव्हरी संबंधित अधिक माहिती तुम्ही फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा अ‍ॅपवर वाचू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post ऑनलाइन शॉपिंगमधील ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/open-box-delivery-flipkart-amazon-online-shopping/feed/ 0
55 हजारांच्या OnePlus 10T 5G च्या जागी 5 रुपयांचा भांडी घासण्याचा साबण; ‘या’ सेलमध्ये झाली फसवणूक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-orderd-on-amazon-customers-soap-bar-in-the-box/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-orderd-on-amazon-customers-soap-bar-in-the-box/#respond Fri, 30 Sep 2022 07:15:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13596 Amazon चा Great Indian Festival Sale आणि Flipkart चा The Big Billion days सेल म्हणजे भारतीयांसाठी शॉपिंगचा उत्सव. दोन्ही ई-कॉमर्स साइट्स आपले सेल जोरदार प्रोमोट करत आहेत तसेच डील्स व ऑफर्स देत आहेत. सूट व डिस्काउंट सोबतच ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या लोकांची फसवणूक देखील होत आहे. Online Fraud ची अशीच एक नवीन केस समोर आली आहे […]

The post 55 हजारांच्या OnePlus 10T 5G च्या जागी 5 रुपयांचा भांडी घासण्याचा साबण; ‘या’ सेलमध्ये झाली फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon चा Great Indian Festival Sale आणि Flipkart चा The Big Billion days सेल म्हणजे भारतीयांसाठी शॉपिंगचा उत्सव. दोन्ही ई-कॉमर्स साइट्स आपले सेल जोरदार प्रोमोट करत आहेत तसेच डील्स व ऑफर्स देत आहेत. सूट व डिस्काउंट सोबतच ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या लोकांची फसवणूक देखील होत आहे. Online Fraud ची अशीच एक नवीन केस समोर आली आहे ज्यात अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमधून 54,999 रुपयांचा OnePlus 10T 5G Phone ऑर्डर करण्यात आला होता त्याऐवजी 5 रुपयांच्या भांडी घासण्याचा Exo साबण मिळाला आहे.

वनप्लस मोबाइलच्या डब्ब्यात भांडी घासण्याचा साबण

ही बातमी टाइम्सनाउच्या माध्यमातून मिळाली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार ही घटना मुबईमधील अशोक भंबानी या ग्राहकासोबत घडली आहे. रिपोर्टनुसार अशोकनं अ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या पहिल्याच दिवशी शॉपिंग साइटवर वनप्लस ब्रँडचा नवीन मोबाइल फोन वनप्लस 10टी 5जी ऑर्डर केला होता, ज्याची किंमत 54,999 रुपये आहे. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 13GB RAM च्या दमदार स्पेक्ससह लाँच झाला नवा फोन; किंमत 15 हजारांच्या आत

Oneplus 10T 5G Orderd On Amazon Customers Soap Bar In The Box

OnePlus 10T 5G Phone अशोकनं सकाळी ऑर्डर केला होता जो त्याच तारखेला संध्याकाळी त्याची घरी डिलिव्हर करण्यात आला होता. रिपोर्टनुसार अशोकनं ऑर्डर डिलिव्हर झाल्यानंतर ती न उघडताच रिसिव्ह केली तसेच बॉक्स उघडण्यासाठी त्याने नवरात्री सुरु होण्याची वाट बघितली.

54,999 रुपयांच्या फोन बॉक्समध्ये 5 रुपयांच्या साबण

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या सोमवारी अशोक भंबानीनं मोठ्या उत्साहाने आपल्या नवीन स्मार्टफोनची अनबाक्सिंग करण्याची तयारी केली आणि तो बॉक्स ओपन केला. परंतु फोन बॉक्स ओपन करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. वनप्लस 10टी 5जी फोनच्या बॉक्समध्ये कोणताही मोबाइल फोन नव्हता तसेच स्मार्टफोनच्या ऐवजी त्यात भांडी घासण्याच्या साबणाच्या वड्या होत्या.

Oneplus 10T 5G Orderd On Amazon Customers Soap Bar In The Box

54,999 रुपयांच्या OnePlus 10T 5G फोनच्या बॉक्समध्ये 5 रुपयांचा साबण पाहून अशोकला आपल्या सोबत फसवणूक झाल्याचं समजलं. या फ्रॉडची माहिती देऊन अशोकनं अ‍ॅमेझॉन कस्टमर सर्व्हिसकडे तक्रार केली आहे तसेच ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात पुढे काय होईल? अशोकला नुकसान भरपाई दिली जाईल? की नवीन स्मार्टफोन पाठवला जाईल? ही माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.

फ्लिपकार्टनं देखील पाठवल्या साबणाच्या वड्या

Flipkart Big Billion Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी शर्मा याने ऑफर पाहून वडिलांसाठी 50 हजारांचा लॅपटॉप ऑर्डर केला. परंतु फ्लिपकार्टनं लॅपटॉपच्या बॉक्समध्ये घडी डिटर्जंट साबणाच्या वड्या पाठवल्यामुळे ग्राहकाचे डोळे उघडले. फ्लिपकार्टनं हे प्रकरण पुढे नेण्यास नकार दिला आहे, कारण ओपन बॉक्स डिलिव्हरी असताना देखील ग्राहकाने डिलिव्हरी बॉय समोर बॉक्स ओपन करून प्रोडक्टची खात्री करून घेतली नाही. हे देखील वाचा: डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या

The post 55 हजारांच्या OnePlus 10T 5G च्या जागी 5 रुपयांचा भांडी घासण्याचा साबण; ‘या’ सेलमध्ये झाली फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-orderd-on-amazon-customers-soap-bar-in-the-box/feed/ 0
अमेझॉन – फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शाॅपिंग करताना फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, मिळणार नाही धोका https://www.91mobiles.com/marathi/best-tips-and-tricks-for-online-shopping-on-amazon-flipkart-sale/ https://www.91mobiles.com/marathi/best-tips-and-tricks-for-online-shopping-on-amazon-flipkart-sale/#respond Wed, 20 Jan 2021 13:36:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9713 अनेक लोक या सेल मध्ये नवीन प्रोडक्ट विकत घेण्याची योजना बनवत आहेत. पण या ऑनलाईन खरेदीच्या आधी काही अश्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, नाही तर तुमची मोठी फसवणूक पण होऊ शकते.

The post अमेझॉन – फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शाॅपिंग करताना फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, मिळणार नाही धोका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लहानपणी शाळेत तुम्ही हि ओळ वाचली असेल, ‘भारत सणांचा देश आहे.’ आपल्या देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात कोणता ना कोणता सण व उत्सव साजरा होत असतो, मग तो धार्मिक असो वा राष्ट्रीय. मकर संक्रांती, बिहू व पोंगल झाले आहेत आणि आता प्रजासत्ताक दिवसाची तयारी सुरु आहे. अश्या सणांचा फायदा ऑनलाईन शाॅपिंग साइट्स पण मोठ्या खुबीने उचलतात आणि ‘फेस्टिवल सेल’ आयोजित करतात. ई-काॅमर्स साइट अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टने पण ‘रिपब्लिक सेल’ ची सुरवात केली आहे कि ज्यात आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. अनेक लोक या सेल मध्ये नवीन प्रोडक्ट विकत घेण्याची योजना बनवत आहेत. पण या ऑनलाईन खरेदीच्या आधी काही अश्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, नाही तर तुमची मोठी फसवणूक पण होऊ शकते.

ऑफर समजून घ्या

शाॅपिंग साइटचे होम पेज ओपन करताच समोर येतो 80 टक्के पर्यंतचा डिस्काउंट किंवा 15,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक. अश्या ओळी वाचून लोक उत्साहित होतात आणि लवकरात लवकर ते सामान विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण इथे ‘UP To’ वर लक्ष न देणे मोठे नुकसानदायक ठरू शकते. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर अशाप्रकारची शाॅपिंग करताना कोणताही प्रोडक्ट ‘कार्ट’ मध्ये टाकण्याच्या आधी त्यावर मिळणारी ऑफर नीट समजून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या बॅंक कार्ड, वाॅलेट व यूपीआई पेमेंट वर वेगवेगळ्या बेनिफिट मिळतात, त्यामुळे खरेदीच्या आधी या सर्व ऑफर्स नीट तपासून घ्या मग पुढे जा.

टर्म अँड कंडीशन्स ओळखा

मोठा डिस्काउंट किंवा कॅशबॅक बघून लोक शाॅपिंग सुरु तर करतात पण त्या बेनिफिटसाठी आवश्यक ‘Terms & Conditions’ कडे दुर्लक्ष करतात, ज्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. उदाहरणार्थ अमेझॉन यूपीआय पासून पेमेंट केले तर 20 टक्के कॅशबॅक मिळत आहे आणि त्याची एक कंडिशन अशी आहे कि, यूपीआय आयडी मॅन्युअली सब्मिट करायची नाही. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफर मध्ये कोणताही जुना फोन 8,000 रुपयांमध्ये जात असेल पण त्याची कंडिशन आहे कि बाॅडी वर डेंट नसावा, आणि जर असे असले तर 8,000 रुपये मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे अनेक टर्म अँड कंडीशन्स ऑनलाईन शाॅपिंग मध्ये प्रकाशित केल्या जातात ज्या शाॅपिंगच्या आधी बारकाईने वाचणे आणि समजणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : 2021 मध्ये Nokia च्या 5G फोन्सचा धुमाकूळ, इथे बघा लिस्ट

सूट आणि डिस्काउंट किती योग्य, किती चुकीची

ऑनलाईन सेल मध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट आकर्षित करते तर ती असते डिस्काउंट. अमेझॉन असो वा फ्लिपकार्ट, या शाॅपिंग साइट्स वर कोणताही प्रोडक्ट जुन्या किंमतीत दाखवला जातो आणि त्यानंतर त्या सोबत प्रोडक्ट वर मिळणारी सूट आणि नंतर डिस्काउंट नंतरची किंमत. उदाहरणार्थ एखाद्या प्रोडक्टची वास्तविक किंमत 20,000 सांगण्यात आली आहे आणि त्यावर 5,000 रुपयांची सूट दिल्यानंतर सेल प्राइस 15,000 सांगण्यात आली आहे. पण लक्ष देण्याची बाब म्हणजे खरच त्या प्रोडक्टची किंमत 20,000 रुपयेच आहे का. अश्यावेळी लोकांचे लक्ष फक्त 5,000 रुपयांची डिस्काउंट वर जाते आणि त्या प्रोडक्टची खरी किंमत चेकच केली जात नाही. कदाचित त्या प्रोडक्टची खाती किंमत 15,600 रुपये असावी 20,000 रुपये नाही. त्यामुळे इतर वेबसाइट्स व मार्केट प्लॅटफॉर्म वर त्या प्रोडक्टची खरी किंमत पण तपासून पहा.

सेलर कोण आहे

चला तर थेट स्मार्टफोन विकत घेण्याचे उदाहरण घेऊन बोलूया. समजा तुम्हाला Apple किंवा Samsung चा एखादा नवीन मोबाईल फोन विकत घ्यायचा आहे. तुम्ही फोनची मिळत असलेली ऑफर आणि डिस्काउंट वाचता, पण यावर लक्ष देत नाही कि तो फोन कोण विकत आहे. ऑनलाईन शाॅपिंग सेल मध्ये Apple चा फोन आहे ऍप्पल विकत नाही आणि सॅमसंग फोन असेल तर Samsung च विकत नाही. अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या शाॅपिंग साइट्स वर थेट कंपनी आपले सामान विकत नाही तर प्रोडक्ट विकणारे ‘Seller’ वेगळे असतात. त्यामुळे फक्त मोबाईल फोनच नाही तर इतर सामान विकत घेण्याआधी नीट बघून घ्या कि सेलर कोण आहे. त्या सेलरसाठी काही रिव्यू व फीडबॅक पण असेल तो वाचून घ्या.

हे देखील वाचा : TV स्क्रीन वर दिसणाऱ्या या नंबर्स मागे कोणते कारण आहे, जाणून घ्या का हे घालवतात टीव्ही बघण्याची मजा

पेमेंट करा सिक्योर

सामान 500 रुपयांचे असो वा 50,000 चे. ऑनलाईन शाॅपिंग करताना याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कि तुमच्याद्वारे केलेले पेमेंट पूर्णपणे सिक्योर असेल. बॅंक कार्ड्स, यूपीआय आयडी आणि वाॅलेट इत्यादी पूर्णपणे सुरक्षित ठेवा आणि तुमची खाजगी माहिती कोणाकडे शेयर करू नका. जर तुम्ही कॅश-ऑन-डिलिव्हरी अंतगर्त सामान विकत घेतले असेल तर डिलिव्हरीवाल्याला पण पेमेंट करताना आपले बॅंकिंग डिटेल देऊ नका. जर तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट आली असेल ती घाईत एक्सेप्ट करू नका एकदा अमाउंट पण चेक करा.

The post अमेझॉन – फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शाॅपिंग करताना फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, मिळणार नाही धोका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-tips-and-tricks-for-online-shopping-on-amazon-flipkart-sale/feed/ 0
ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/#respond Tue, 03 Dec 2019 18:59:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5955 प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

The post ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच एक बातमी समोर आली होती ज्यात ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवणाऱ्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये विटा डिलीवर केल्या गेल्या. ऑनलाइन फसवणुकीची शिकार हा व्यक्ती अजूनही आपल्या महाग प्रोडक्टची वाट बघत आहे, कि कधी कंपनी त्याचा कॅमेरा देईल. असेच अजून एक प्रकरण प्रकाशात आले आहे ज्यात शॉपिंग साइट अमेझॉन वरून Xiaomi Redmi 7 स्मार्टफोन मागितल्यावर तरुणाचे पैसे तर कट केले पण फोन त्याच्याकडे डिलीवरच झाला नाही. प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

बदलत्या काळात आणि ट्रेंडसह चालताना काहीजण आपल्या कमाईचा काही भाग फक्त इंटरनेट कनेक्शनद्वारे असे लोकांना देतात ज्यांच्यबद्दल त्यांना माहित नसते. पैसे देऊन सामान्य माणूस आपला हक्क मिळण्याची वाट बघत असतो परंतु ना त्याचे सामान मिळते ना त्याचे पैसे. अशीच फसवणूक झाली आहे हरियाणा मधील हिसार जिल्ह्यातील प्रवीण कुमार सोबत.

Xiaomi Redmi 7 विकत घेणे पडले महाग

प्रवीण कुमार याने Xiaomi चा लो बजेट स्मार्टफोन Redmi 7 अमेझॉन वरून विकत घेतला होता. Xiaomi Redmi 7 च्या सेल मध्ये प्रवीणने प्रीपेड पेमेंट करून अमेझॉन वर फोन ऑर्डर केला होता. फोन विकत घेताना प्रवीणने 5,399 रुपये दिले होते. पेमेंट झाल्यावर अमेझॉन कडून ऑर्डर यशस्वी झाल्याचा मेसेज आला आणि डिलीवरीची तारीख सांगण्यात आली. प्रवीण कुमारने Xiaomi Redmi 7 चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 3 ऑक्टोबरला ऑर्डर केला होता जो 9 ऑक्टोबरला डिलीवरी होणार होता.

एक दिवस आधीच आला ‘Phone Delivered’ चा मेसेज

नवीन Xiaomi Redmi 7 फोन 9 ऑक्टोबरला डिलीवर होणार होता, पण एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरला प्रवीणला ईमेल आला कि, ‘तुमचा फोन यशस्वीरीत्या डिलीवर झाला आहे.’ हा मेसेज पाहून प्रवीणला धक्का बसला आणि त्याने अमेझॉन इंडियाच्या कस्टमर केयर नंबर वर कॉल केला. अमेझॉनने सांगितले कि, ‘हा मेल चुकून पाठवला गेला आहे. प्रतीक्षा करा, तुमचा फोन 10 ऑक्टोबरला डिलीवर केला जाईल.’

मेल चुकून सेंड झालेला सांगून अमेझॉनने दोन दिवसानंतर फोन डिलीवर करणार असल्याचे सांगितले. पण जेव्हा सांगितलेल्या तारखेला पण Xiaomi Redmi 7 फोन आला नाही तेव्हा ग्राहकाने पुन्हा अमेझॉनला फोन केला आणि तेव्हा ते म्हणाले कि, ’14 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करा, आम्ही प्रकरणाची चौकशी करू.’ पण 14 ऑक्टोबरला अमेझॉनने काबुल केले कि प्रवीणचा फोन ‘हरवला’ आहे तसेच कंपनी 18 ऑक्टोबर पर्यंत त्याचे पैसे परत देईल.

मिळाली फक्त तारीख पे तारीख

फोन ऑर्डर केल्यानंतर दोन आठवडे होऊनही जेव्हा 18 ऑक्टोबरला पैसे परत मिळाले नाहीत तेव्हा प्रवीणने अमेझॉनला पुन्हा फोन लावला. यावेळी त्याला सांगण्यात आले कि, ‘तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली आहे, तुमचे पैसे 23 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होतील.’ पैशांची वाट बघण्यात 23 ऑक्टोबरचा दिवस गेला आणि मग प्रवीणने 24 ऑक्टोबरला पुन्हा अमेझॉनला कॉल केला. पण यावेळी अमेझॉनचे उत्तर होते कि, ‘तुमचा फोन 8 ऑक्टोबरलाच डिलीवर केला गेला आहे.’

अमेझॉनने प्रवीण कुमारला उद्धटपणे उत्तर दिले कि तुमचा फोन आम्ही डिलीवर केला आहे आणि आमच्याकडे डिलीवर डिटेल्स सोबतच तुमची सही पण आहे. प्रवीणला पहिला झटका या गोष्टीचा लागला कि त्याचे पैसे पाण्यात गेले आहेत, तर दुसरा झटका फोन न मिळता अमेझॉनकडे त्याची सही जाण्याचा लागला. तसेच जेव्हा अमेझॉनला सही दाखवण्यास सांगण्यात आले तेच कंपनीला स्पष्ट नकार दिला.

Xiaomi भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रांड आहे आणि Amazon इंडियन ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी. Xiaomi स्मार्टफोन डिलीवरीच्या नावावर कंपनीच्या नाकाखाली रॅकेट चालू आहे, याची माहिती क्वचितच स्वतः Xiaomi ला असेल. पण Amazon ने असे प्रकरण गांभीर्याने न घेणे कंपनीप्रति नकरात्मक विचार करण्यास भाग पाडते तसेच ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली होत असलेल्या अश्या फसवणुकीमुळे सामान्यांच्या खिश्याला कात्री लागते. Xiaomi Redmi 7 ऑर्डर करणाऱ्या प्रवीण कुमारने Amazon द्वारा करण्यात आलेल्या या फसवणुकीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात केस दाखल केली आहे.

प्रथमदर्शनी हे प्रकरण स्थानिक गडबडीचे वाटते. पण तरीही या प्रकरणी अमेझॉनच्या उत्तराची वाट बघितली जात आहे, जे मिळताच दुसरी बाजू पण अपडेट केली जाईल.

The post ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/feed/ 0
केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट https://www.91mobiles.com/marathi/kerala-kannur-man-orders-camera-worth-27500-rupees-flipkart-delivered-tiles-brick/ https://www.91mobiles.com/marathi/kerala-kannur-man-orders-camera-worth-27500-rupees-flipkart-delivered-tiles-brick/#respond Tue, 03 Dec 2019 10:59:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5945 समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Flipkart ने विष्णु सुरेशला एका आठवड्यात नवीन कॅमेरा देण्याचा शब्द दिला आहे.

The post केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग गेल्या काही वर्षांत भारतात वेगाने लोकप्रिय झाली आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सोबत इतर अनेक अश्या ईकॉमर्स साइट सध्या भारतात सक्रिय आहेत ज्या प्रोडक्ट्सची मोठी रेंज ऑनलाइन विकतात. ऑनलाइन शॉपिंग जितकी सोप्पी आणि फास्ट आहे, खरेदीच्या वेळी आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागते. पण ग्राहकाने काळजी घेऊन पण अनेकदा असे प्रसंग घडतात, जे फक्त ऑनलाइन शॉपिंगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तसेच डिजीटल शॉपिंग वर पण डाग लावतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवल्यावर बॉक्स मध्ये विटा मिळाल्या आहेत.

हि घटना केरळ मधील कन्नूर शहरातील आहे, जिथे शॉपिंग साइट वरून कॅमेरा मागवल्यावर ग्राहकाला बॉक्स मध्ये विटा डिलीवर करण्यात आल्या आहेत. या घटनेची बातमी मलयालम मनोरमा वेबसाइट वर प्रसिद्ध झाली आहे. या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार हि घटना कन्नूर मधील विष्णु सुरेश नावाच्या व्यक्तीसोबत घडली आहे. रिपोर्ट नुसार विष्णु सुरेश याला स्वतःसाठी एक कॅमेरा हवा होता आणि या तरुणाने हा कॅमेरा ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वरून विकत घेण्याचे ठरवले.

विष्णुने 20 नोव्हेंबरला शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक कॅमेरा निवडला आणि तो ऑर्डर केला. या कॅमेऱ्याची किंमत 27,500 रुपये सांगण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला ऑर्डर केल्यानंतर 4 दिवसांनी 24 नोव्हेंबरला विष्णु सुरेशच्या पत्त्यावर कॅमेरा डिलीवर केला गेला. रिपोर्टनुसार हि डिलीवरी Flipkart च्या पार्टनर कंपनी Ekart Logistics ने केली होती. कॅमेरा डिलीवर झाल्यानंतर जेव्हा उत्सहाने विष्णु सुरेशने बॉक्स उघडला तर त्याला धक्का बसला.

विष्णु सुरेशने जेव्हा कॅमेऱ्याचा बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नाही तर कॅमेऱ्याच्या ऐवजी विटा व टाईल्स ठेवल्या होत्या. या बॉक्स मध्ये विटांसह कॅमेऱ्याचा मॅनुअल बुक आणि वारंटी कार्ड पण होते. 27,500 रुपये दिल्यानंतर कॅमेऱ्याच्या जागी बॉक्स मध्ये विटा बघून विष्णु हैराण झाला आणि घाईत त्याने Flipkart ला कळवले. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Flipkart ने विष्णु सुरेशला एका आठवड्यात नवीन कॅमेरा देण्याचा शब्द दिला आहे.

कॅमेऱ्याच्या बॉक्स मध्ये विटांसह मॅनुअल बुक आणि वारंटी कार्ड बघून अंदाज लावला जात आहे कि कदाचित हा गुन्हा डिलीवरी बॉयने केला असेल आणि कॅमेरा ग्राहकांपर्यंत पोचवण्याआधी बॉक्स उघडून त्यातील कॅमेरा काढला असेल. गुन्हा कोणी केला आहे हे अजून समोर आले नाही, पण Flipkart वर झालेल्या या शॉपिंगमुळे ईकॉमर्स साइट सह ऑनलाइन शॉपिंग वर पण प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

The post केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kerala-kannur-man-orders-camera-worth-27500-rupees-flipkart-delivered-tiles-brick/feed/ 0
जियो बनवणार देशी शॉपिंग साइट, अमेझॉन-फ्लिपकार्टला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-to-launch-e-commerce-platform-compete-with-amazon-flipkart-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-to-launch-e-commerce-platform-compete-with-amazon-flipkart-in-india-in-marathi/#respond Tue, 22 Jan 2019 11:40:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3428 मेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना चांगली टक्कर मिळू शकते हे निश्चित.

The post जियो बनवणार देशी शॉपिंग साइट, अमेझॉन-फ्लिपकार्टला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो आल्यामुळे भारतीय टेलीकॉम बाजरीची दिशा बदलली आहे आणि हि बाब कोणीच नाकारू शकत नाही. जियो ने मोफत डेटा आणि वॉइस कॉल देऊन लाखो लोकांपर्यंत इंटरनेटची सेवा पोहचवली आहे. टेलीकॉम इंडस्ट्रीच्या जुन्या कंपन्यांना टक्कर दिल्यानंतर जियो आपल्या गीगाफाइबर सर्विसने ब्रॉडबँड क्षेत्रात पॉल टाकणार आहे. तसेच आता मुकेश अंबानी यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे कि कंपनी आता लवकरच आपल्या स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हजे जियोची शॉपिंग वेबसाइट पण सुरु करणार आहे.

रिलायंस जियोचे मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी अधिकृत घोषणा केली आहे कि जियो लवकरच आपली स्वतःची शॉपिंग वेबसाइट सुरु करणार आहे. हि वेबसाइट अमेझॉन व फ्लिपकार्ट प्रमाणे असेल जी एकाच प्लॅटफॉर्म वर अनेक प्रकारच्या वस्तू विकेल. जियोच्या या नवीन योजनेमुळे देशातील अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील व मिंत्रा सारख्या शॉपिंग साइट्सना चांगलीच टक्कर मिळणार आहे.

जियो तर्फे बोलताना मुकेश अंबानी ने सांगितले कि जियो लवकरच आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सुरवात करेल. हि वेबसाइट रिलांयस रिटेल आणि रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) च्या ऑफलाईन रिटेल सहयोयोगींद्वारा चालवली जाईल. या नवीन प्रोजेक्टची सुरवात गुजरात पासून केली जाईल. मुकेश अंबानी नुसार जियो ई-कॉमर्स वेबसाइट मुळे गुजरात मध्ये 12 लाखापेक्षा जास्त लघु उद्योगांना, दुकानदारांना तसेच रिटेलर्सना लाभ मिळेल.

जियो ई-कॉमर्स वेबसाइट ‘ऑफलाइन-टू-ऑनलाइन’ च्या तत्वावर काम करेल जी येत्या 12 ते 18 महिन्यांत पूर्णपणे सुरु होईल. हि डिजीटल प्लॅटफॉर्म जियो नेटवर्क तसेच रिलायंसशी जोडल्या गेलेल्या उद्योगांच्या मदतीने चालेल. स्थानिक दुकानातील तसेच लघु उद्योगांद्वारा निर्मित सामान जियोच्या या शॉपिंग साइट वर विकला जाईल. प्रत्येक छोटामोठा दुकानदार या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले सामान दूरवर विकू शकेल .

प्राप्त माहितीनुसार छोटे दुकान व रिटेल स्टोर्स रिलायंस जियो द्वारा कंपनीच्या होलसेल स्टोर्स ​अंतर्गत सामील केले जातील. तसेच या दुकानांत सामान डिजीटली विकले जाईल. आशा आहे कि स्थानिक वस्तूंसोबतच जियो ई-कॉमर्स वेबसाइट वर प्रत्येक कॅटेगरी व ब्रँडच्या वस्तू पण खरेदीसाठी उपलब्ध होतील. ​जियोच्या या घोषणेनंतर सामान्य लोक व जियो फॅन्स खुश आहेत पण ​अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना चांगली टक्कर मिळू शकते हे निश्चित.

The post जियो बनवणार देशी शॉपिंग साइट, अमेझॉन-फ्लिपकार्टला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-to-launch-e-commerce-platform-compete-with-amazon-flipkart-in-india-in-marathi/feed/ 0
अमेझॉन वरून मागवली होती 34,000 हजारांची म्युजिक सिस्टम, बॉक्स मधून निघाला नारळ! https://www.91mobiles.com/marathi/amazon-india-delivered-coconut-in-music-system-box-worth-rs-34000-fraud-online-shopping-cheat-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-india-delivered-coconut-in-music-system-box-worth-rs-34000-fraud-online-shopping-cheat-in-marathi/#respond Fri, 16 Nov 2018 13:22:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2885 ऋषभ ने आपल्या सोबत घडलेली हि घटना सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक वर पोस्ट केली आहे आणि सोबतच त्यात अमेझॉन इंडियाला पण टॅग केले आहे.

The post अमेझॉन वरून मागवली होती 34,000 हजारांची म्युजिक सिस्टम, बॉक्स मधून निघाला नारळ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरवातीला देशातील नामी शॉपिंग साइट अमेझॉनचे नाव हेडलाईन्स मध्ये होते. या हेडलाईन्स चे कारण कोणताही शॉपिंग सेल किंवा रेकॉर्ड तोड विक्री हे नव्हते, तर कारण होते अमेझॉन वरून मागवलेल्या फोनच्या बॉक्स मधून निघणारे साबण. अमेझॉन वर आरोप लागले होते कि वेबसाइट वरून पैसे देऊन स्मार्टफोन मागवल्यावर फोनच्या बॉक्स मधून साबण डिलीवर करण्यात आला होता. या घटनेमुळे अमेझॉन वर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. पण आता असे वाटते कि अमेझॉन वर लागलेले डाग कमी होणार नाहीत. हे प्रकरण अजून संपले नव्हते कि पुन्हा एकदा अमेझॉन च्या नावे अजून एकफसवणुकीची केस झाली आहे. नवीन प्रकरणात अमेझॉन वरून मागवलेल्या सामानात 34,000 रुपयांच्या म्युजिक सिस्टम ऐवजी ‘नारळ’ निघाला आहे.

दिल्ली मधील ऋषभ गुलाटी ने 14 नोव्हेंबरला अमेझॉन इंडिया वरून एक म्युजिक सिस्टम आॅर्डर केली होती. हि म्युजिक सिस्टम बॉस कंपनीची होती जिची किंमत 33,638 रुपये होती. ऋषभ ने वेबसाइट वर म्युजिक सिस्टम आॅर्डर देताना सर्व पैसे दिले होते. एका दिवसानंतर म्हणजे 15 नोव्हेंबरला अमेझॉन ने हि म्युजिक सिस्टम दिल्लीतील महाराणी बाग भागातील ऋषभ च्या घरात डिलीवर केली.

You'd think this is a rumour, until it happens to you. Just revieced a Bose speaker box from Amazon India that had a…

Rishabh Gulati यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

अमेझॉन कडून डिलीवर केल्यानंतर ऋषभ ने म्युजिक सिस्टमचा बॉक्स खोलातच तो हैराण झाला. अमेझॉनची पॅकिंग असलेल्या बॉक्स मध्ये म्युजिक सिस्टम नसून म्युजिक सिस्टम च्या जागी काही जुनी रद्दी कपड़े आणि दोन नारळ होते. म्युजिक सिस्टमचा बॉक्स हलका वाटू नये आणि संशय येऊ नये यासाठी त्या बॉक्स मध्ये दोन नारळ ठेवण्यात आले होते जे त्या बॉक्सला वजनदार बनवत होते.

ऋषभ ने आपल्या सोबत घडलेली हि घटना सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक वर पोस्ट केली आहे आणि सोबतच त्यात अमेझॉन इंडियाला पण टॅग केले आहे. बातमी लिहिस्तोवर अमेझॉन ने ऋषभ शी कोणताही संपर्क केला नव्हता. 33,638 रुपयांची मोठी रक्कम दिल्यानंतर अशा प्रकारचा धोका झाल्यामुळे ऋषभ ला फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे. पण अमेझॉन अशा प्रकारच्या फ्रॉड वर काय पाऊले उचलेले हे सजुनती सांगता येणार नाही. परंतु अशाप्रकारच्या आॅनलाईन फसवणुकीची प्रकरणे सतत वाढत असल्यामुळे एकीकडे आॅनलाईन शॉपिंग वरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे तर दुसरीकडे डिजीटल इंडिया सारख्या घोषणांचा स्वर पण कमी होताना दिसत आहे.

The post अमेझॉन वरून मागवली होती 34,000 हजारांची म्युजिक सिस्टम, बॉक्स मधून निघाला नारळ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-india-delivered-coconut-in-music-system-box-worth-rs-34000-fraud-online-shopping-cheat-in-marathi/feed/ 0