OPPO A74 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Apr 2021 13:47:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/#respond Thu, 22 Apr 2021 13:47:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10683 तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तसे पाहता भारतात अजून 5G नेटवर्कची सुरुवात झाली नाही, पण मोबाईल निर्माता कंपन्यांनी आतापासून कंबर बांधली आहे. 5G नेटवर्कच्या सुरुवातीविना मोबाईल कंपन्या गेल्यावर्षीपासून भारतात 5G स्मार्टफोन सादर करत आहेत. आता एक पाऊल पुढे टाकत कंपन्या 5G फोन ग्राहकांच्या खिशाच्या विचार करून सादर करत आहेत. आज रियलमीने पण आपला नवीन फोन Realme 8 5G सादर केला आहे, ज्याची किंमत ग्राहकांच्या खिशाचा विचार करून खूप कमी ठेवण्यात आली आहे. ते पाहता आज आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन बाबत जाणून घेऊया, जे शानदार लुकसह पावरफुल स्पेसिफिकेशनसोबत येतात. जर तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील. (Best 5G phone under RS 20000)

Realme 8G 5G

सर्वप्रथम बोलूया 20,000 रुपयांमध्ये आज सादर करण्यात आलेल्या Realme 8G 5G बाबत. 5G फोनची वाढती मागणी पाहून रियलमीने आपला नवीन आणि स्वस्त 5जी फोन भारतीय बाजारात आणला आहे. हा फोन भारतातील सर्वात कमी किंमत असलेला 5G फोन आहे. कंपनीने हा फोन 14,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. तर, 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडा कमजोर आहे. पण, पण या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब अशी आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. हा फोन Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येते. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode कोला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही साइड कॅमेऱ्यात 30fps च्या रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

OPPO A74 5G

हा फोन OPPO का आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय मोबाईल फॅन्सना भेट देत OPPO A74 5G सादर केला होता. शानदार फीचर्स आणि आकर्षक लुक असलेला हा 5जी फोन ओपोने फक्त 17,990 रुपयांमध्ये सादर केला होता. OPPO A74 5G मध्ये 6.5 इंचाच्या फुल एचडी+ पंच-होल डिस्प्ले सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत.

OPPO A74 5G

फोटोग्राफीसाठी फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.7 लेंससह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या

Realme Narzo 30 Pro 5G

स्वस्त 5G फोनच्या या लिस्टमध्ये अजून एक फोन Realme चा आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Realme Narzo 30 Pro 5G सादर केला होता. या फोनची किंमत पाहता, फक्त 16,999 रुपयांमध्ये याचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी वेरिएंट विकत घेता येईल. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे फोनची खासियत पाहता, या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 5000 एमएएचची बॅटरी, हाई रेंज ऑडियो, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट आहे.

realme narzo 30 pro

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एआय आधारित ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. हा f/1.8 अपर्चर, 6P लेंस आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तर, दुसरी 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आहे. हा f/2.3 अपर्चर, FOV 119 डिग्री आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तिसरी 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस अपर्चर f/2.4 सह आहे. तसेच, फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी सेंसर देण्यात आला आहे. तसेच अपर्चर f/2.1 आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G+5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G 5G

या लिस्टमध्ये Motorola चा हा एकमेव फोन आहे जो ज्याची किंमत 20,000 मध्ये नाही. पण, या लिस्टमध्ये आम्ही हा फोन यासाठी समाविष्ट केला आहे कारण याची किंमत इतकी जास्त नाही. Moto G 5G एक कमी किंमत असलेला शानदार 5G फोन आहे जो 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 5,000mAh ची बॅटरी मिळेल, जी 20W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येईल. फोनच्या मागच्या पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 750G चिपसेटसह येईल. इतकेच नव्हे तर तुम्ही इतर फोन्स काही पैसे जास्त देऊन हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह विकत घेता येईल.

MotoG 5G

तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मोटो जी 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मागे अपर्चर एफ/1.7 सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल वाइड-अँगल आणि अपर्चर एफ/2.4 सह मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये पुढे अपर्चर एफ/2.2 सह 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पण आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी मोटो या फोनमध्ये 5जी, एनएफसी, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस आणि इतर फीचर्स आहेत.

Realme X7 5G

20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतीय बाजारात सध्या रियलमीकडे एक दोन नव्हे तर तीन फोन आहेत. या लिस्टमध्ये रियलमीचा तिसरा फोन Realme X7 5G आहे. रियलमी एक्स7 5जी च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर फोनची खासियत पाहता यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर आणि फोनमध्ये जीव ओतण्यासाठी 4310 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50 वॉट सुपरडार्ट चार्ज आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Realme X7

तसेच फोनमध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.3 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी एक्स7 स्मार्टफोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/feed/ 0
OPPO A74 5G भारतात लाॅन्च, देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्समध्ये झाला समावेश https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-phone-launched-in-india-price-sale-specifications-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-phone-launched-in-india-price-sale-specifications-offer/#respond Tue, 20 Apr 2021 12:04:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10648 OPPO A74 5G कंपनीने 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे.

The post OPPO A74 5G भारतात लाॅन्च, देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्समध्ये झाला समावेश first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2021 जेव्हा सुरु झाले तेव्हा सर्वांच्या लक्षात आले होते कि हे वर्ष 5G साठी ओळखले जाईल, पण 5जी सपोर्टेड फोन लोवर मिड बजेटमध्ये उपलब्ध होतील याची अपेक्षा नव्हती. टेक ब्रँड OPPO ने आज स्वस्त 5जी फोन सादर करत पुन्हा सिद्ध केले आहे. कंपनीने OPPO A74 5G फोन भारतात लाॅन्च केले आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा 5जी फोन फक्त 17,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे, त्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन्सच्या यादीत सामील झाला आहे. (OPPO A74 5G phone launched in India price sale specifications offer)

लुक व डिजाईन

OPPO A74 5G फोन कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर सादर केला आहे ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्यावर डावीकडे देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. ओपो ए74 चा हा 5जी मॉडेल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप आयताकृती आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर डावीकडे वर्टिकली देण्यात आले आहेत तसेच डावीकडे लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे.

बॅक पॅनलचा लुक प्रीमियम आहे, तिथे कोणताही सेंसर दिसत नाही. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आहे तसेच डाव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या लोवर पॅनलवर स्पीकरसह यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. या फोनचे डायमेंशन 162.9×74.7×8.4एमएम आहे तर वजन 188 ग्राम आहे. ओपो ए74 5जी फोन Fluid Black आणि Fantastic Purple कलर वेरिएंटमध्ये विकत घेता येईल.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A74 5G कंपनीने 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. ओपो ए74 5जी चा स्क्रीन-टू-बाॅडी रेशियो 90.5 टक्के आहे तर फोनचा डिस्प्ले 405पीपीआई, आणि 480निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 काॅन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लो बजेट असलेला पावरफुल Poco M2 Reloaded भारतात लॉन्चसाठी तयार, किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी

ओपो ए74 5जी फोन अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला गेला आहे जो कलरओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालणाऱ्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वाॅलकाॅमचा 480 चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी बॅंडला सपोर्ट करतो. कंपनीच्या मते, हा चिपसेट 245 Mbps पर्यंतचा अपलोड स्पीड तसेच 2.1 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड देऊ शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A74 5G च्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी ओपो ए74 5जी मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Moto G40 Fusion स्मार्टफोन Snapdragon 732G SoC आणि 6000mAh सह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

OPPO A74 5G एक डुअल सिम फोन आहे जो 5जी सोबतच 4जी एलटीईला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post OPPO A74 5G भारतात लाॅन्च, देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्समध्ये झाला समावेश first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-phone-launched-in-india-price-sale-specifications-offer/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-officially-launch-in-india-specs-price-rs-13490-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-officially-launch-in-india-specs-price-rs-13490-sale-offer/#respond Mon, 19 Apr 2021 11:51:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10623 OPPO A54 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आज भारतात आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO A54 लॉन्च केला आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा मोबाईल 5,000एमएएचची मोठी बॅटरी आणि 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 13,490 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो येत्या एप्रिलपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO A54 ची संपूर्ण माहिती देण्यापूर्वी सांगू इच्छितो कि उद्या म्हणजे 20 एप्रिलला OPPO A74 5G फोन पण भारतात लॉन्च होणार आहे. (OPPO A54 Officially launch in india specs price rs 13490 sale offer)

लुक व डिजाईन

OPPO A54 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात आहे. हा फोन 3D Delicate Design वर बनला आहे.

फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. ओपो ए54 च्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट व स्पीकर ग्रिल देण्यात आला आहे. ओपोचा हा फोन Starry Blue, Crystal Black आणि Moonlight Gold कलरमध्ये विकत घेता येईल. फोनचे डायमेंशन 163.6×75.7×8.4एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A54 कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. ओपोचा हा फोन आईपीएक्स4 रेटेड आहे ज्यामुळे हा पाण्यापासून सुरक्षित राहतो. फोन का स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.2 टक्के आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी जी8320 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच पावर बॅकअपसाठी OPPO A54 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व प्राइस

OPPO A54 भारतात तीन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या पहिल्या वेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 13,490 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तर तिसरा वेरिएंट 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 14,490 रुपये आणि 15,990 रुपये आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-officially-launch-in-india-specs-price-rs-13490-sale-offer/feed/ 0
OPPO A74 5G ची किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी, Xiaomi-Realme आणि Vivo च्या नाकात होईल दम https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-india-launch-date-april-19-20-price-specifications-sale-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-india-launch-date-april-19-20-price-specifications-sale-amazon-india/#respond Fri, 16 Apr 2021 11:59:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10604 Amazon वर बनलेल्या Oppo A74 5G च्या प्रोडक्ट पेजवर फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला नाही.

The post OPPO A74 5G ची किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी, Xiaomi-Realme आणि Vivo च्या नाकात होईल दम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A74 5G भारतात 20 एप्रिलला लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट जारी करून याची माहिती दिली आहे. फोन ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर लिस्ट झाला आहे. आशा आहे कि ओपो A74 5G चा भारतीय वेरिएंट या महिन्याच्या सुरुवातीला कंबोडिया आणि थायलंडच्या बाजारांमध्ये लॉन्च केल्या गेलेल्या मॉडेलपेक्षा वेगळा असेल. Oppo A74 5G व्यतिरिक्त, कंपनी आपल्या A-सीरीजमध्ये 19 एप्रिलला Oppo A54 भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. Flipkart ने Oppo A54 साठी एक माइक्रोसाइट बनवली आहे, ज्यात देशातील लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे. (Oppo A74 5G India launch date April 19-20 price specifications sale Amazon India)

Oppo A74 5G India launch डिटेल

Amazon वर बनलेल्या Oppo A74 5G च्या प्रोडक्ट पेजवर फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला नाही. तर, भारतात फोन 20 एप्रिलला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल, ज्याची माहिती कंपनीने दिली आहे. तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फोनचा लाइव लॉन्च बघता येईल.

हे देखील वाचा : 20 एप्रिलला आहे Apple चा मोठा ईवेंट, नवीन iPhone पासून AirPods पर्यंत होऊ शकतात या मोठ्या घोषणा

Oppo A74 5G price in India

Oppo A74 5G या महिन्याच्या सुरुवातीला कंबोडिया आणि थायलंडमध्ये सिंगल 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला होता, ज्याची किंमत जवळपास 21,500 रुपये आहे. पण, कंपनीने ऑफिशियल इनवाइट शेयर करून सांगितले आहे कि फोनची किंमत 20,000 रुपये असेल.

OPPO A74 5G स्पेसिफिकेशन्स

OPPO A74 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची IPS LCD स्क्रीन दिली जाऊ शकते, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+, आस्पेक्ट रेश्यो 20:9, रिफ्रेश रेट 90Hz आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन लेटेस्ट Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर चालतो. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

OPPO A74 5G स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअप पाहता यात 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. सेल्फी कॅमेरा पाहता या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A74 5G दूसरे मार्केटमध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : ASUS ZenFone 8 Mini लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, यात असेल 16GB रॅम

ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 480 चिपसेटसह 6 GB रॅम मिळू शकतो. या फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळू शकते. यात microSD कार्ड स्लॉट असेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. स्पेसिफिकेशन्स बघून वाटत आहे कि OPPO A74 5G स्मार्टफोन चीनमध्ये यावर्षीच्या सुरुवातीला लॉन्च केलेला OPPO A93 5G चा रिब्रँड असू शकतो.

The post OPPO A74 5G ची किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी, Xiaomi-Realme आणि Vivo च्या नाकात होईल दम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-india-launch-date-april-19-20-price-specifications-sale-amazon-india/feed/ 0
48MP रियर कॅमेरा आणि 5G च्या पावरसह OPPO A74 झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-4g-5g-launch-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-4g-5g-launch-price-specification/#respond Tue, 06 Apr 2021 16:21:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10528 कंपनीने हा फोन सध्या Philippines च्या टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे.

The post 48MP रियर कॅमेरा आणि 5G च्या पावरसह OPPO A74 झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतीय मार्केटमध्ये आपला नवीन फोन OPPO F19 को लॉन्च केला आहे. याआधी कंपनीने ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो प्लस लॉन्च केले आहेत. तसेच कंपनीने आपल्या A-सीरीजमध्ये नवीन फोन OPPO A74 4G आणि OPPO A74 5G स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन सध्या Philippines च्या टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. अनेक दिवस या फोनबद्दल लीक आणि माहिती समोर येत होती, ज्यांच्यावर आज पूर्णपणे विराम लावला आहे. पुढे तुम्हाला OPPO A74 च्या 4G आणि 5G फोनबाबत संपूर्ण माहिती देत आहोत. (oppo a74 4g 5g launch price specification)

डिजाइन

OPPO 4G आणि 5G च्या डिजाइन बद्दल बोलायचे तर हे दोन्ही फोन एकसारखे आहेत. पण, या वेरिएंटच्या फीचर्समध्ये थोडा फरक आहे, ज्याची माहिती तुम्हाला पुढे देण्यात आली आहे. या दोन्ही फोनचा फ्रंट लुक पाहत यात फ्रंटला टॉप लेफ्ट कॉर्नरवर होल-पंच देण्यात आला आहे. या पंच-होलमुळे फोनच्या फ्रंटला तिन्ही बाजूंनी नगण्य बेजल आहेत. तसेच बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. 4G च्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा आहे. दुसरीकडे 5G फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

OPPO A54 4G चे स्पेसिफिकेशन्स

OPPO A74 4G मध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो FHD+ रिज्योलूशनसह येतो. तसेच, स्क्रीनमध्ये स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज सपोर्ट आहे. डिवाइस Qualcomm’s Snapdragon 662 चिपसेट पावरसह येतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 610 GPU आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ

फोटोग्राफी पाहता यात ट्रिपल रियर-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP की डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा यूनिट आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी A74 4G मध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 4 जी, वाय-फाय 802.11 बी / जी / एन / एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक आहे.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट आहे. तसेच ओपो ए74 4G काहीसा OPPO F19 सारखा आहे. ओपो A74 Prism Black आणि Midnight Blue कलरमध्ये आला आहे.

OPPO A74 5G चे स्पेसिफिकेशन्स

ओपो A74 5G मॉडेल वेगवेगळ्या हार्डवेयरसह येतो, यात मागे एक अतिरिक्त 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे आणि यात 4G वेरिएंटच्या तुलनेत 90Hz रिफ्रेश रेट आहे. A74 5G मध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिवाइसमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर आहे जो बाजूला आहे. तसेच फोन स्नॅपड्रॅगॉन 480 5G SoC सह येतो जो 6GB रॅम आणि 128GB च्या इंटरनल स्टोरेजसह आला आहे. A74 4G प्रमाणे, 5G मॉडेल पण आउट ऑफ द बॉक्स 11 अँड्रॉइडवर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ व माइक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा आहे. डिवाइसमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. A74 5G कंपनीने Fluid Black आणि Space Silver कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

हे देखील वाचा : Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च

OPPO A74 4G आणि 5G ची किंमत

OPPO A74 4G आता Philippines स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फोन OPPO Cambodia ऑफिशियल साइटवर लिस्ट झाला आहे. किंमत पाहता ओपो ए74 ची किंमत PHP 12,000 (जवळपास 18,174 रुपये) आहे. ओपो ए74 5जी बद्दल बोलायचे तर हा कंपनीने जवळपास 21,000 रुपयांमध्ये सादर केला आहे.

The post 48MP रियर कॅमेरा आणि 5G च्या पावरसह OPPO A74 झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-4g-5g-launch-price-specification/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-full-specification-price-leake-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-full-specification-price-leake-before-launch/#respond Mon, 05 Apr 2021 15:48:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10507 Oppo A74 5G एका ऑस्ट्रेलियन रिटेलरच्या वेबसाइट JB Hi-Fi वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइटवर फोनच्या कलर आणि किंमतीची माहिती पण समोर आली आहे.

The post 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात Oppo F19 सीरीज 6 एप्रिलला लॉन्च केला जाईल. बातमी समोर येत आहे कि Oppo लवकरच एक स्वस्त 5जी मोबाईल Oppo A74 लॉन्च करणार आहे, ज्याबाबत माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ओपो ए74 च्या फुल स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला होता. आता लॉन्चच्यापूर्वी ओपो ए74 5G ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशनची माहिती समोर येत आहे. कंपनीने आतापर्यंत ओपो A74 5G च्या अधिकृत किंमत आणि लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

OPPO A74 5G ची डिजाइन

रिटेल वेबसाइटवर ओपो A74 5G च्या फोटो नुसार डिवाइसच्या टॉपला डावीकडे होल-पंच असेल. तसेच, फोनमध्ये बॉटमला जाड बेजल दिसत आहेत. फोनच्या तिन्ही कडा खूप पातळ असल्याच्या दिसत आहेत. डिवाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर पण आहे.

हे देखील वाचा : LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण

Oppo A74 5G
Oppo A74 5G

OPPO A74 5G ची किंमत

Oppo A74 5G एका ऑस्ट्रेलियन रिटेलरच्या वेबसाइट JB Hi-Fi वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइटवर फोनच्या कलर आणि किंमतीची माहिती पण समोर आली आहे. लिस्टिंगनुसार फोन Fluid Black आणि Space Silver मध्ये स्पॉट केला गेला आहे. फोनच्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत AUD 444 (जवळपास 24,800 रुपये) आहे. लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि फोन 13 एप्रिलला लॉन्च केला जाईल.

Oppo A74 5G चे स्पेसिफिकेशन

JB Hi-Fi लिस्टिंग नुसार फोनमध्ये 6.5-inch full-HD+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असेल जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. तसेच फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 SoC आणि 6GB रॅम व 128GB स्टोरेज असेल. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल.

Oppo A74 5G मध्ये क्वाड-रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि दोन 2-मेगापिक्सलचा सेंसरचा समावेश असेल. फ्रंटला डावीकडे 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल.

हे देखील वाचा : Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन

ओपो A74 5G मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, जीपीएस आणि 3.5एमएम हेडफोन्स जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. तसेच, पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. त्याचबरोबर OPPO A74 5G मध्ये ColorOS 11.1 बेस्ड Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

The post 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a74-5g-full-specification-price-leake-before-launch/feed/ 0