Redmi Note 10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Jan 2023 05:33:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-giving-free-repair-service-to-redmi-note-10-pro-max-users-after-miui-13-update-camera-problem/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-giving-free-repair-service-to-redmi-note-10-pro-max-users-after-miui-13-update-camera-problem/#respond Wed, 14 Sep 2022 06:45:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13081 चीनी ब्रँड Xiaomi सध्या जास्त चर्चेत आहे परंतु त्यामागील कारण काही चांगलं नाही. कंपनीचे स्मार्टफोन्स तर कमी किंमतीत चांगले फीचर्स देत आहेत परंतु ED ची रेड, Phone Blast आणि MIUI Update मध्ये गडबड सारख्या बातम्यांमुळे कंपनीची प्रतिमा मालिन होत आहे. या ड्रमण्यां शाओमीनं आपल्या युजर्ससाठी Free Repair Service ऑफर सादर केली आहे ज्यात Redmi Note […]

The post वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी ब्रँड Xiaomi सध्या जास्त चर्चेत आहे परंतु त्यामागील कारण काही चांगलं नाही. कंपनीचे स्मार्टफोन्स तर कमी किंमतीत चांगले फीचर्स देत आहेत परंतु ED ची रेड, Phone Blast आणि MIUI Update मध्ये गडबड सारख्या बातम्यांमुळे कंपनीची प्रतिमा मालिन होत आहे. या ड्रमण्यां शाओमीनं आपल्या युजर्ससाठी Free Repair Service ऑफर सादर केली आहे ज्यात Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max मोफत रिपेयर केला जात आहे.

शाओमीची फ्री रिपेयर सर्व्हिस

शाओमी आपल्या फॅन्सना भेट म्हणून फ्री रिपेयर सर्व्हिस देत आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. उलट कंपनीनं अलीकडे जारी केलेल्या अपडेटनंतर अनेक रेडमी नोट 10 प्रो आणि नोट 10 प्रो मॅक्स मॉडेल बिघडू लागले आहेत तसेच या स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा व्यवस्थित काम करत नाही. कंपनी त्या रेडमी युजर्सचे फोन फ्रीमध्ये रिपेयर करेल ज्यांचे फोन्स शाओमी मीयुआयच्या नवीन अपडेटमुळे बिघडले आहेत.

यात वॉरंटीमध्ये नसलेल्या फोन्सचा समावेश असेल की नाही याची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु काही युजर्सनी कंपनीच्या ट्विटर हँडलवर केलेल्या संवादाचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, ज्यात आऊट ऑफ वॉरंटी असलेले डिवाइस देखील मोफत दुरुस्त केले जातील असा रिप्लाय देण्यात आला आहे. हे देखील वाचा: दमदार बॅटरी आणि वेगवान चार्जिंग परवडणाऱ्या किंमतीत; itel च्या आगामी स्मार्टफोनची डिजाइन लीक

शाओमी फोन्समध्ये बिघाड

Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max मध्ये सध्या सर्वात जास्त समस्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उपरोक्त स्मार्टफोन्सचे अनेक युजर्सना मोबाइल फोन्समध्ये MIUI 13 अपडेट केल्यानंतर समस्या येत आहे. ज्यामुळे Instagram किंवा Snapchat सारखं थर्ड पार्टी अ‍ॅप ओपन केल्यावर त्यांचा कॅमेरा क्रॅश होत आहे. हे अ‍ॅप्स वापरत असताना फोनचा कॅमेरा काम करत नाही आणि शाओमीनं मान्य केलंय की ही समस्या नवीन मीयुआय अपडेटमुळे आली आहे.

xiaomi giving free repair service to redmi note 10 pro max users after miui 13 update camera problem

Redmi Note 10 Pro Price in India

रेडमी नोट 10 प्रो भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या 6GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 15,999 रुपये तर 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सेल्फ ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीसह येतेय Xiaomi ची इलेक्ट्रिक कार; मिळणार थक्क करणारे फीचर्स

Redmi Note 10 Pro Max Price in India

रेडमी नोट 10 प्रो मॅक्स देखील दोन व्हेरिएंट्समध्ये विकला जात आहे. यातील 6GB RAM + 128GB Storage व्हेरिएंटची प्राइस 17,999 रुपये आहे तर 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-giving-free-repair-service-to-redmi-note-10-pro-max-users-after-miui-13-update-camera-problem/feed/ 0
64MP कॅमेरा, 128GB मेमरी असलेल्या Redmi Note 10 Pro वर 20 टक्क्यांची सूट; स्वस्तात टॉप फिचर https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-pro-at-rs-15999-on-amazon-check-details-here/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-pro-at-rs-15999-on-amazon-check-details-here/#respond Wed, 10 Aug 2022 11:26:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12154 Redmi Note 10 Pro स्मार्टफोनवर 20 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जात आहे.

The post 64MP कॅमेरा, 128GB मेमरी असलेल्या Redmi Note 10 Pro वर 20 टक्क्यांची सूट; स्वस्तात टॉप फिचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सध्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल सुरु आहे. हा सेल 6 ऑगस्टपासून 10 ऑगस्ट पर्यंत चालू राहील. या सेल अंतगर्त अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही एक शानदार स्मार्टफोन कमी किंमतीत विकत घेण्याचा विचार करत असाल तर, Redmi चा Redmi Note 10 Pro डिवाइस तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. हा शानदार डिवाइस भारतीय ग्राहकांना खूप आवडला आहे आणि आतापर्यंत याला अ‍ॅमेझॉनवर खूप चांगली रेटिंग मिळाली आहे. खास बाब म्हणजे हा डिवाइस सध्या खूप कमी किंमतीत विकला जात आहे. कंपनी Redmi Note 10 Pro वर सुमारे 4,000 रुपयांच्या डिस्काउंटसह बँक ऑफर आणि EMI ऑप्शनसह अन्य काही डील्स देखील देत आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या सर्व ऑफर्सबाबत.

Redmi Note 10 Pro वरील ऑफर्स

Redmi Note 10 Pro ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 19,999 मध्ये विकला जात होता. परंतु सेलमध्ये या फोनवर 20 टक्के म्हणजे 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे, या मोठ्या डिस्काउंटनंतर तुम्ही हा डिवाइस फक्त 15,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. ही डिवाइसच्या 6GB रॅम व 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. तासेक्स फोनसाठी ग्राहकांना डार्क नाइट कलर ऑप्शन मिळेल. त्याचबरोबर बँक ऑफर अंतगर्त एसबीआय क्रेडिट कार्डवर नॉन EMI ट्रांजॅक्शनच्या मदतीने फोन घेतल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तर EMI ऑप्शनवर देखील 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. परंतु या ऑफरसाठी तुम्हाला कमीत कमी 5,000 रुपयांचे ट्रांजॅक्शन करावं लागेल. तसेच नो कॉस्ट EMI ऑप्शनच्या माध्यमातून देखील तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता.

Redmi Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात HDR 10 सपोर्ट, 1200nits पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळते. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. शानदार ऑडियोसाठी Hi-Res सपोर्टसह स्टीरियो स्पिकर देखील मिळतात.

फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम Snapdragon 732G प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला ग्राफिक्ससाठी Adreno 618 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो. सोबतीला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देखील मिळते. फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

असा आहे कॅमेरा

Redmi Note 10 Pro क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2x झूम सह 5-मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स, 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

The post 64MP कॅमेरा, 128GB मेमरी असलेल्या Redmi Note 10 Pro वर 20 टक्क्यांची सूट; स्वस्तात टॉप फिचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-pro-at-rs-15999-on-amazon-check-details-here/feed/ 0
Redmi Note 10 Pro चा 5G मॉडेल पण होईल लॉन्च, फोनमध्ये मिळेल स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-pro-5g-phone-specs-price-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-pro-5g-phone-specs-price-launch-soon/#respond Thu, 06 May 2021 13:33:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10839 Redmi Note 10 Pro 5G फोनची माहिती इंडियन टिपस्टर अभिषेक यादवच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार शाओमी कंपनी लवकरच रेडमी नोट 10 प्रो 5जी फोन अनाउंस करू शकते.

The post Redmi Note 10 Pro चा 5G मॉडेल पण होईल लॉन्च, फोनमध्ये मिळेल स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या रेडमी नोट 10 चा विस्तार करणार आहे आणि याअंतगर्त येत्या 13 मेला भारतात कंपनीचा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Redmi Note 10S लॉन्च केला जाईल. हा गेमिंग फोन 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. रेडमी नोट 10एस भारतात येण्यापूर्वी बातमी आली आहे कि कंपनी आपल्या ‘नोट 10’ सीरीजमध्ये एक नवीन 5जी फोन पण जोडण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन Redmi Note 10 Pro 5G नावाने लॉन्च केला जाईल. (Xiaomi Redmi Note 10 Pro 5G Phone Specs Price launch soon)

Redmi Note 10 Pro 5G फोनची माहिती इंडियन टिपस्टर अभिषेक यादवच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार शाओमी कंपनी लवकरच रेडमी नोट 10 प्रो 5जी फोन अनाउंस करू शकते. या सीरीजमध्ये आतापर्यंत Redmi Note 10 च 5जी सपोर्टसह लॉन्च झाला होता. फोनच्या माहिती सोबतच रेडमी नोट 10 प्रो 5जी ची टीजर ईमेज पण इंटरनेटवर शेयर करण्यात आली आहे ज्यात फोनच्या डिजाईन सोबतच याच्या बऱ्याच महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला आहे.

लीक झाले डिटेल

Redmi Note 10 Pro 5G बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट डुअल बॅंड 5जीला सपोर्ट करतो. फोनच्या टीजर ईमेजमध्ये रियर कॅमेरा डिजाईन पण दाखवण्यात आली आहे. बॅक पॅनलवर डावीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये सर्वात वर एक मोठी लेंस, त्याखाली हॉरिजॉन्टल शेपमध्ये दोन लेंस आणि मग एक मोठी लेंस आहे. टीजर ईमेजने स्पष्ट केले आहे कि रेडमी नोट 10 प्रो 5जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि यूएसबी टाईप-सी पोर्टला पण सपोर्ट करेल.

Redmi Note 10S

अलीकडेच कंपनीने टीज केलेल्या रीटेल बॉक्सच्या फोटोनुसार Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा असेल आणि हा फोन MIUI 12.5 वर काम करेल. तसेच, फोनमध्ये तीन कलर ऑप्शन खरेदीसाठी उपलब्ध असतील, ते आहेत ब्लू, डार्क ग्रे आणि व्हाइट. फोनबद्दल टीज केले गेले आहे कि हा गेमिंग सेंट्रिक फोन असेल, ज्यात Hi-Res Audio सपोर्ट आणि सुपर डिस्प्ले फीचर केला जाईल.

हे देखील वाचा : Jio चे स्वस्त Recharge Plans, रोज 2GB पर्यंत डेटा असलेल्या या टॉप प्लानबाबत जाणून घ्या सर्वकाही

Redmi Note 10s चा फोटो

या फोनच्या ग्लोबल वर्जनचे स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा अँड्रॉइड 11 आधारित MIUI 12.5 वर सादर केला होता. यात 6.43 इंचाचा फुल एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड होल-पंच डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी995 प्रोसेसर देण्यात आला होता. तसेच या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली होती जी 33 वॉच फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगपिक्सलचा, सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे. रेडमी नोट 10एस 13 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लिस्ट झाला आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर व AI Face Unlock सपोर्ट मिळू शकतो. आशा आहे कि या फोनची किंमत 12,499 रुपयांच्या आसपास असू शकते.

The post Redmi Note 10 Pro चा 5G मॉडेल पण होईल लॉन्च, फोनमध्ये मिळेल स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-pro-5g-phone-specs-price-launch-soon/feed/ 0
108MP कॅमेरा, 8GB रॅम आणि 5020mAh बॅटरी, फुल पावरपॅक होऊन आला Redmi Note 10 Pro Max https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-pro-max-launched-in-india-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-pro-max-launched-in-india-specs-price-sale-offer/#respond Thu, 04 Mar 2021 12:39:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10264 Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max ची जाडी 8.1एमएम आणि वजन 192ग्राम आहे. हे दोन्ही मोबाईल फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहेत जे Vintage Bronze, Glacial Blue आणि Dark Night कलर मध्ये लॉन्च केले गेले आहेत.

The post 108MP कॅमेरा, 8GB रॅम आणि 5020mAh बॅटरी, फुल पावरपॅक होऊन आला Redmi Note 10 Pro Max first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज टेक मार्केटमध्ये आपली मजबूत दावेदारी सादर करत रेडमी नोट 10 सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max नावांसह आले आहेत. 108 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा, 6.67 इंचाचा डिस्प्ले आणि 5,020एमएएच बॅटरी असलेले हे फोन 8 जीबीच्या पावरफुल रॅमला सपोर्ट करतात. रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्सची माहित आम्ही पुढे दिली आहे तर रेडमी नोट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा) (redmi note 10 pro max launched in india specs price sale offer)

शानदार डिजाईन

Xiaomi ने आपली रेडमी नोट 10 सीरीज पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केली आहे ज्याच्या बॅक पॅनलवर वरच्या कोपऱ्यात रियर कॅमेरा आहे. कंपनीने याला Evol डिजाईनचे नाव दिले आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीन बेजल लेस देण्यात आली आहे तर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. तसेच रियर कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात आहे ज्यात एक सेंसर मोठ्या वर्तुळात आहे तर बाकी त्याखाली आहेत. Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max ची जाडी 8.1एमएम आणि वजन 192ग्राम आहे. हे दोन्ही मोबाईल फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहेत जे Vintage Bronze, Glacial Blue आणि Dark Night कलर मध्ये लॉन्च केले गेले आहेत.

हे देखील वाचा : मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात

आकर्षक डिस्प्ले

Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max दोन्ही स्मार्टफोन 6.67 इंचाच्या मोठ्या सुपर एमोलेड डिस्प्लेवर लॉन्च झाले आहेत जो फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाईल फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतात. 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर-10 सपोर्ट असलेला हा डिस्प्ले टीयूवी लो ब्लू लाईट सर्टिफाइड पण केला गेला आहे जो फोनचा जास्त वापर केल्यास डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.

ताकदवान प्रोसेसिंग

रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर लॉन्च केले गेले आहेत जे मीयुआय 12 सह काम करतात. प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हे दोन्ही स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतात.

दमदार कॅमेरा

Xiaomi ने आपले दोन्ही स्मार्टफोन्स क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केले आहेत. Redmi Note 10 Pro ने 64 मेगापिक्सलच्या Samsung ISOCELL GW3 प्राइमरी सेंसरसह मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे तर Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन 108 मेगापिक्सलचा प्राइमरी Samsung ISOCELL HM2 सेंसरला सपोर्ट करतो.

त्याचबरोबर स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनलवर 5 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत.

पावरफुल बॅटरी

पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन मध्ये 5,020एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. तसेच युजर्ससाठी चांगली बाब अशी आहे कि कंपनी आपल्या दोन्ही मोबाईल फोन्ससह 33वॉट चार्जर बॉक्स सोबतच देत आहे.

हे देखील वाचा : OPPO घेऊन येत आहे अजून एक नवीन 5G फोन Reno 5Z, मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह होईल लॉन्च

रॅम व स्टोरेज

Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max दोन्ही स्मार्टफोन्स भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले गेले आहेत. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर सर्वात मोठा वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजवर लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे कि रेडमी नोट 10 प्रो ची विक्री 17 मार्च तर नोट 10 प्रो मॅक्स ची विक्री 18 मार्च पासून सुरु होईल.

किंमत

Redmi Note 10 Pro

6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 18,999 रुपये

Redmi Note 10 Pro Max

6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 18,999 रुपये

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 19,999 रुपये

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 21,999 रुपये

The post 108MP कॅमेरा, 8GB रॅम आणि 5020mAh बॅटरी, फुल पावरपॅक होऊन आला Redmi Note 10 Pro Max first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-pro-max-launched-in-india-specs-price-sale-offer/feed/ 0
Redmi Note 10 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च, यात आहे 48MP कॅमेरा, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-price-in-india-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-price-in-india-specs-sale-offer/#respond Thu, 04 Mar 2021 11:54:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10261 Redmi Note 10 भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 11,999 रुपये आहे.

The post Redmi Note 10 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च, यात आहे 48MP कॅमेरा, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Xiaomi ने आज मोबाईल बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एकसाथ तीन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. रेडमी नोट 10 सीरीजमधील हे स्मार्टफोन Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max नावाने लॉन्च झाले आहेत. सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल मध्ये 108 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे तर सर्वात छोटा मॉडेल रेडमी नोट 10 48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम आहे तसेच Redmi Note 10 ची किंमत फक्त 11,999 रुपयांपासून सुरु होत आहे. (redmi note 10 price in india specs sale offer)

Redmi Note 10

शाओमी रेडमी नोट 10 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. त्याचबरोबर हा फोन 1100निट्स ब्राइटनेसला पण सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात

Redmi Note 10 अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 678 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 612 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : OPPO घेऊन येत आहे अजून एक नवीन 5G फोन Reno 5Z, मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह होईल लॉन्च

Xiaomi Redmi Note 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 10 मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व प्राइस

Redmi Note 10 भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 11,999 रुपये आहे. फोनचा मोठा वेरिएंट 6 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 13,999 रुपये आहे. रेडमी नोट 10 येत्या 16 मार्चपासून Aqua Green, Shadow Black आणि Frost White कलर मध्ये विकत घेता येईल.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

The post Redmi Note 10 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च, यात आहे 48MP कॅमेरा, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-price-in-india-specs-sale-offer/feed/ 0
Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-series-might-launch-in-india-on-10-march/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-series-might-launch-in-india-on-10-march/#respond Wed, 10 Feb 2021 12:36:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9979 Redmi Note 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो.

The post Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि टेक कंपनी Xiaomi भारतात आपल्या ‘नोट’ डिवायसेजच्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत रेडमी नोट 10 सीरीज लाॅन्च केली जाईल. आज या बातमीवर शिक्कामोर्तब करत कंपनीने स्वतः Redmi Note 10 सीरीजच्या भारतीय लाॅन्चची घोषणा केली आहे. पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये रेडमी नोट 10 सीरीज भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात रेडमी नोट 10 सीरीज लाॅन्च करणार आहे. हि घोषणा आज म्हणजे 10 फेब्रुवारीला करण्यात आली आहे. कंपनीने आतापर्यंत सीरीजच्या लाॅन्चची तारीख सांगितली नाही पण आशा आहे कि रेडमी नोट 10 सीरीज 10 मार्चला भारतात लाॅन्च होऊ शकते तसेच या सिरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन येऊ शकतात.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीकनुसार Redmi Note 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच, पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार

अलीकडे एक रिपोर्ट समोर आला होता कि रेडमी नोट 10 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. तर रेडमी नोट 10 प्रो मध्ये 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

कलर ऑप्शन पाहता Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. आतापर्यंत फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही लीक माहिती आली नाही. पण, सांगण्यात आले होते कि Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असू शकते.

The post Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-series-might-launch-in-india-on-10-march/feed/ 0
Redmi Note 10 इंडियन साइटवर झाला लिस्ट, इतिहास घडवण्यापासून काही पाऊले दूर Xaiomi! https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-india-launch-bis-certification/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-india-launch-bis-certification/#respond Fri, 29 Jan 2021 14:09:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9819 BIS सर्टिफिकेशन साइट व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी असाच मॉडेल (M2101K7AG) असेलला एक फोन FCC वेबसाइटवर दिसला होता.

The post Redmi Note 10 इंडियन साइटवर झाला लिस्ट, इतिहास घडवण्यापासून काही पाऊले दूर Xaiomi! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 10 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. 91मोबाईल्सने सर्वातआधी माहिती दिली होती कि रेडमी नोट 10 फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. लॉन्च टाइमलाइन व्यतिरिक्त या हँडसेटच्या रॅम व स्टोरेज वेरियंटबाबत पण आम्ही कालच माहिती दिली होती. आता मॉडेल नंबर M2101K7AI सह हा स्मार्टफोन BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. याआधी मॉडेल नंबर M2101K6I सह BIS वर रेडमी नोट 10 प्रो लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशनवरून स्पष्ट झाले आहे कि फोन लॉन्च होण्यास थोडाच वेळ शिल्लक आहे.

BIS सर्टिफिकेशन साइट व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी असाच मॉडेल (M2101K7AG) असेलला एक फोन FCC वेबसाइटवर दिसला होता. या लिस्टिंगवरून रेडमी नोट 10 च्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला होता. पण अजूनही रेडमी नोट 10 सीरीजच्या लॉन्च डेटची माहिती समोर आली नाही.

हे देखील वाचा : Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी

Redmi Note 10 चे लीक स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीकनुसार रेडमी नोट 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता कि रेडमी नोट 10 मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. दुसरीकडे रेडमी नोट 10 प्रो मध्ये 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान

कलर ऑप्शन पाहता Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. आतापर्यंत फोनच्या किंमतीबद्दल कोणताही लीक आला नाही. पण, सांगण्यात आले होते कि Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असू शकते.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

The post Redmi Note 10 इंडियन साइटवर झाला लिस्ट, इतिहास घडवण्यापासून काही पाऊले दूर Xaiomi! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-india-launch-bis-certification/feed/ 0
Redmi Note 10 सीरीजच्या इंडिया लॉन्चच्या आधी समोर आली महत्वाची माहिती, लवकरच होईल टेक मंचावर एंट्री https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-note-10-pro-india-ram-and-storage-variants-launch-february/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-note-10-pro-india-ram-and-storage-variants-launch-february/#respond Thu, 28 Jan 2021 13:41:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9805 टिप्सटर नुसार Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असेल.

The post Redmi Note 10 सीरीजच्या इंडिया लॉन्चच्या आधी समोर आली महत्वाची माहिती, लवकरच होईल टेक मंचावर एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro पुढल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये चीन सोबतच भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाऊ शकतो. Xiaomi च्या या फोन्सच्या लॉन्च डेट बद्दल ऑफिशियल माहिती देण्यात आली नाही. पण, Redmi च्या जनरल मॅनेजर Lu Weibing ने अलीकडेच या सीरीजचा चायना लॉन्च टीज केला होता. 91mobiles ने पण काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव रिपोर्ट देऊन सांगितले होते कि रेडमी 10 फेब्रुवारी मध्ये भारतात येईल. आता इंडस्ट्री इंसाइडर ईशान अग्रवालने टेक वेबसाइट MySmartPrice ला Redmi Note 10 आणि Note 10 Pro च्या इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंटची माहिती दिली आहे.

Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro चे रॅम व स्टोरेज वेरिएंट

ईशान अग्रावलने दिलेल्या माहितीनुसार भारतात Redmi Note 10 4GB+64GB आणि 6GB+64GB वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. Redmi Note 10 Pro कंपनी 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB कॉन्फिग्रेशन मध्ये येईल. या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये फक्त हीच माहिती समोर आली आहे.

कलर ऑप्शन

याआधी आम्ही माहिती दिली होती कि Redmi Note 10 फोन्स कंपनी भारतात फेब्रुवारी मध्ये लॉन्च करेल. तसेच ईशान अग्रवालने आम्हाला माहिती दिली आहे कि Note 10 Gray, White, आणि Green कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. तर, Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल.

टिप्सटर नुसार Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असेल.

हे देखील वाचा : Jio च्या आधी Airtel चे 5G नेटवर्क झाले तयार, जाणून घ्या कधी होईल लॉन्च, किती मिळेल स्पीड

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत Redmi Note 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले नाहीत. पण, काही लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे कि Pro मॉडेल कंपनीद्वारे 120Hz एलसीडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट, 64MP प्राइमरी सेंसर आणि 5,050mAh बॅटरीसह सादर केला जाईल. तसेच रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये जिथे 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : प्रतीक्षा संपली, यादिवशी होईल POCO M3 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसरसह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेऱ्याला पण सपोर्ट करतील जे पंच-होल डिजाइन मध्ये दिला जाऊ शकतो. आम्हाला आशा आहे कि Redmi Note 10 सीरीज लवकरच भारतात लॉन्च केली जाईल.

The post Redmi Note 10 सीरीजच्या इंडिया लॉन्चच्या आधी समोर आली महत्वाची माहिती, लवकरच होईल टेक मंचावर एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-note-10-pro-india-ram-and-storage-variants-launch-february/feed/ 0
Redmi Note 10 चा लॉन्च आला जवळ, Xiaomi अधिकाऱ्यांनी सीरीज केली टीज https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-pro-series-launch-teaser/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-pro-series-launch-teaser/#respond Mon, 25 Jan 2021 13:55:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9772 91मोबाईल्सला टिप्स्टर इशान अग्रवालच्या हवल्यातून माहिती मिळाली आहे कि शाओमीची रेडमी नोट10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये भारतात लाॅन्च केली जाईल.

The post Redmi Note 10 चा लॉन्च आला जवळ, Xiaomi अधिकाऱ्यांनी सीरीज केली टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या आठवड्यातच आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि टेक कंपनी शाओमी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Redmi Note 10 आणि Xiaomi Mi 11 सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीने आतापर्यंत या दोन्ही सीरीजची लॉन्च डेट सांगितली नाही पण शाओमीचे जनरल मॅनेजर लू वेइबिंग यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून Redmi Note 10 सीरीज बाजारात आणण्याची ऑफिशियल घोषणा केली आहे.

Xiaomi जीएमने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत फॅन्सना प्रश्न विचारला आहे कि रेडमी नोट 9 सीरीज नंतर मोबाईल युजरना रेडमी नोट 10 सीरीजकडून कोणती अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शाओमी कंपनीने ‘Redmi Note 10’ चा उल्लेख अधिकृतपणे केला आहे. आता शाओमी कधी या सीरीजच्या लॉन्च डेटची घोषणा करेल याची प्रतीक्षा आहे. चर्चा आहे कि या सीरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाॅन्च केले जातील.

Xiaomi जीएमने वेईबो वर प्रश्न विचारला आहे कि रेडमी नोट 10 सीरीजकडून काय अपेक्षा आहे

91मोबाईल्सला टिप्स्टर इशान अग्रवालच्या हवल्यातून माहिती मिळाली आहे कि शाओमीची रेडमी नोट10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये भारतात लाॅन्च केली जाईल. या सीरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाॅन्च होतील जे कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये घेऊन येईल. सूत्रांच्या मते रेडमी नोट 9 सीरीज जास्त यशस्वी न झाल्यामुळे शाओमी इंडिया रेडमी नोट 10 सीरीजची किंमत खूप कमी ठेवणार आहे. सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन Gray, White आणि Green कलर मध्ये बाजारात येतील.

हे देखील वाचा : Redmi K40 च्या लॉन्चच्या आधी समोर आली महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी मध्ये करेल एंट्री

मी 11 सीरीज पाहता मिळालेल्या माहितीनुसार सीरीज अंतगर्त Mi 11 आणि Mi 11 Lite स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. यातील मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तसेच Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.

Redmi Note 10 सीरीज

रेडमी नोट 10 प्रो बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा 750जी चिपसेट मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 10 प्रो कंपनी 5G आणि 4G दोन्ही मॉडेल्स मध्ये लाॅन्च करेल आणि भारतात फोनचा 4जी मॉडेलच लाॅन्च केला जाईल. दुसरीकडे रेडमी नोट 10 मध्ये मीडियाटेकचा चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

हे देखील वाचा : Nokia एक-दोन नाही तर घेऊन येत आहे 3 नवीन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला आव्हान देण्याची आहे तयारी

फोटोग्राफीसाठी या सीरीज क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असेल. रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे तर रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेऱ्याला पण सपोर्ट करतील जो पंच- होल डिजाईन मध्ये दिला जाऊ शकतो.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

The post Redmi Note 10 चा लॉन्च आला जवळ, Xiaomi अधिकाऱ्यांनी सीरीज केली टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-pro-series-launch-teaser/feed/ 0
Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/#respond Wed, 20 Jan 2021 11:50:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9710 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.

The post Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi चे काही नवीन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट्स वर दिसले होते. यात Redmi Note 10 Pro आणि Mi 11 Lite चा समावेश आहे, ज्यांच्याबाबत चर्चा आहे कि शाओमी लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करेल. आता 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.

91मोबाईल्सला टिप्स्टर इशान अग्रवालच्या हवल्यातून माहिती मिळाली आहे कि शाओमीची रेडमी नोट10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये भारतात लाॅन्च केली जाईल. या सीरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाॅन्च होतील जे कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये घेऊन येईल. सूत्रांच्या मते रेडमी नोट 9 सीरीज जास्त यशस्वी न झाल्यामुळे शाओमी इंडिया रेडमी नोट 10 सीरीजची किंमत खूप कमी ठेवणार आहे. सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन Gray, White आणि Green कलर मध्ये बाजारात येतील.

Photo courtesy: firstpost.com

मी 11 सीरीज पाहता मिळालेल्या माहितीनुसार सीरीज अंतगर्त Mi 11 आणि Mi 11 Lite स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. यातील मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तसेच Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 Pro इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लाॅन्च आला जवळ

Redmi Note 10 सीरीज

रेडमी नोट 10 प्रो बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा 750जी चिपसेट मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 10 प्रो कंपनी 5G आणि 4G दोन्ही मॉडेल्स मध्ये लाॅन्च करेल आणि भारतात फोनचा 4जी मॉडेलच लाॅन्च केला जाईल. दुसरीकडे रेडमी नोट 10 मध्ये मीडियाटेकचा चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Redmi Note 10 Pro

फोटोग्राफीसाठी या सीरीज क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असेल. रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे तर रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेऱ्याला पण सपोर्ट करतील जो पंच- होल डिजाईन मध्ये दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च

Mi 11 सीरीज

लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करेल. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनल वर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. सध्या मार्केट मधील POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह येतो.

Xioami Mi 11 Lite

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये 8 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. लीकनुसार वियतनाम मध्ये या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/feed/ 0