लॉन्चच्या आधीच वीवो ने शेयर केले डुअल डिस्प्ले असलेल्या नेक्स 2 चे फोटो, बघा पहिली झलक

वीवो ने कालच आॅफिशियल केले आहे की कंपनी येत्या 11 डिसेंबरला आपला पहिला डुअल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन नेक्स 2 लॉन्च करणार आहे. वीवो 11 डिसेंबरला चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या मंचावरून वीवोचा अनोखा स्मार्टफोन टेक मंचावर येईल. वीवो ने चीन मध्ये जारी केलेल्या मीडिया इन्वाईट मधून नेक्स 2 ची पहिली झलक आधीच दिली होती, पण आता कंपनी ने नेक्स 2 स्मार्टफोन चे फोटोज लॉन्चच्या आधीच आॅफिशियल केले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे फोनच्या डिस्प्ले, लुक व डिजाईनची माहिती मिळाली आहे.

वीवो ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून नेक्स 2 स्मार्टफोनचे फोटोज आॅफिशियल केले आहेत. या फोटोज मध्ये फोन दोन कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे ज्या रेड व ग्रीन रंगाच्या शेड आहेत. फोटोज मध्ये फोनच्या फ्रंट व बॅक पॅनल सोबत चारही साईड पॅनल पण ​दाखवण्यात आले आहेत. वीवो नेक्स2 च्या फ्रंट पॅनल सोबतच बॅक पॅनल वर पण डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे बेजल पण खूप कमी आहेत. फोनच्या मागील पॅनल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये दोन सेंसर गोलाकार रिंगच्या आत आहेत तर एक सेंसर व फ्लॅश लाईट रिंगच्या बाहेर आहे.

वीवो नेक्स 2 एक्रेलिक डिजाइन सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बेजल किंवा नॉच नाही. अशा आहे की वीवो नेक्स 2 मध्ये पॉप अप कॅमेरा दिला जाईल. तसेच फोनचा रियर डिस्प्ले पाहता नेक्स 2 चा बॅक कॅमेरा ही सेल्फी कॅमेऱ्याचे काम करू शकतो. फोनच्या खालच्या पॅनल मध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या जवळच लाउडस्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. वीवो नेक्स 2 च्या वरच्या पॅनल मध्ये 3.5 एमएम आॅडियो जॅक मिळेल.

वीवो नेक्स2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार वीवो नेक्स 2 मध्ये तुम्हाला मुख्य स्क्रीन 19.5:9 आसपेक्ट रेेशियो सह मिळेल तर मागील पॅनल वर 16:9 आसपेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. कंपनी हा फोन 6.59 इंचाच्या फुल एचडी+ प्राइमरी स्क्रीन सह सादर करू शकते. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर सादर होईल सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल.

कंपनी या फोन मध्ये 6जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज देऊ शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वरील तीन कॅमेरा सेंसर क्रमश 12-मेगापिक्सल, 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे असू शकतात . तसेच पावर बॅकअप साठी वीवो नेक्स 2 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,100एमएएच ची बॅटरी देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here