8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला Redmi 9 स्मार्टफोन

Xiaomi ने भारतीय बाजारात आपली ओळख कायम ठेवत आज अजून एक नवीन लो बजेट फोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन ‘रेडमी सीरीज’ मध्ये जोडला आहे जो Redmi 9 नावाने मार्केट मध्ये आला आहे. नावावरून समजले असेलच कि हा फोन गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Redmi 8 स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन आहे. शाओमीने आपला हा नवीन डिवाईस 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आणला आहे जो येत्या 31 ऑगस्ट पासून पहिल्या विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Redmi 9 चा लुक आणि डिजाईन पाहता हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता चौकोनी आकाराचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि स्पीकर तर वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे. फोनच्या साईड पॅनल्स वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Redmi 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेट रेशियो वर सादर केला गेला आहे हा फोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. शाओमीने फोनचा डिस्प्ले पी2आई टेक्नॉलॉजी सह आणला आहे जी वापर करताना डोळ्यांचे संरक्षण करते.

Xiaomi ने हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन IMG PowerVR GE8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Redmi 9 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi 9 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व किंमत

Xiaomi Redmi 9 कंपनीने दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन येत्या 31 ऑगस्ट पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी 9 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here