Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट

Samsung ने वर्षाच्या सुरवातीला इंडियन मार्केट मध्ये ‘गॅलेक्सी एम’ नावाने नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज अंतर्गत आता पर्यंत Samsung Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे चारही फोन बजेट प्राइस मध्ये शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतात. आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज वर खास ऑफरची सुरवात केली आहे. या ऑफर अंतर्गत Amazon Prime Day दरम्यान Galaxy M सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स खूप आर्कषक किंमतीत डिस्काउंट सह विकत घेता येतीलयेईल.

Samsung ने Amazon Prime Day सेल अंतर्गत Galaxy M सीरीज शानदार ऑफर्स सह विकले जातील. हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल. Amazon Prime Day मध्ये Samsung चे Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन फक्त स्वस्तात विकत घेता येणार नाहीत तर कंपनी कडून अतिरिक्त बेनिफिट पण दिले जातील.

अशा आहेत ऑफर्स

Samsung Galaxy M10

गॅलेक्स एम10 Samsung द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे Galaxy M10 चा 2जीबी रॅम वेरिएंट 7,990 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Amazon Prime Day सेल मध्ये फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy M10 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट फक्त 7,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. सोबतच एचडीएफसी कार्डने शॉपिंग केल्यावर ग्राहकांना 10 टक्क्यांची सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M20

हा स्मार्टफोन पण भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये Galaxy M20 चे पण दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. सोबतच जुना फोन एक्सचेंज केल्यास कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देईल.

Samsung Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट कंपनीने 12,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. तसेच अमेझॉनच्या खास सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथे पण एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

Samsung Galaxy M20 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M30

Samsung द्वारा Galaxy M30 चा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच गॅलेक्सी एम30 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. Amazon Prime Day दरम्यान फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

Amazon Prime Day मध्ये Galaxy M30 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सेल मध्ये विकत घेताना एचडीएफसी कार्ड वापरल्यास 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M30 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M40

Samsung Galaxy M40 या सीरीजचा सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल फोन आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज वाला स्मार्टफोन आहे जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण Amazon Prime Day दरम्यान Galaxy M40 वर कंपनी थेट 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. सोबतच गॅलेक्सी एम40 एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

हा फोन मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर सोबत प्राइम सेल मध्ये नवीन कॉकटेल आरेंज कलर मध्ये पण विकत घेता येईल.

Samsung Galaxy M40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here