Aadhaar Card - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Jul 2023 12:20:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/#respond Fri, 14 Jul 2023 12:05:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21329 आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग […]

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग सेवा वापरू शकतात. आज आम्ही तुम्हाला आधारच्या मदतीनं बँक अकाऊंटमधील बॅलेन्स चेक करण्याची माहिती देणार आहोत.

आधार नंबरवरून बँक बँलेस चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

जर तुमच्या बँक अकाऊंटशी आधार लिंक असेल तर तुम्ही *99# सर्व्हिसच्या मदतीनं ऑफलाइनच बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.

स्टेप 2 : तुमच्या मोबाइल नंबरवर ‘वेलकम टू *99#’ मेसेज फ्लॅश होईल.

स्टेप 3 : ओकेवर क्लिक केल्यावर फ्लॅश मेसेजमध्ये मेन्यू ओपन होईल. त्यात तुम्हाला तिसऱ्या नंबरवर चेक बॅलेन्सचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : त्यामुळे बॅलेन्स चेक करण्यासाठी 3 टाइप करून रिप्लाय करा.

स्टेप 5 : थोड्या वेळानं फोनमध्ये फ्लॅश मेसेज येईल ज्यात तुम्हाला यूपीआय पिन रिप्लाय करावा लागेल.

स्टेप 6 : पुढील फ्लॅश मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्स समजेल.

नोट : जर तुमचे दोन किंवा अधिक बँक अकाऊंट असतील तर *99# सर्व्हिस तुम्हाला त्या बँकेतील बॅलेन्स सांगेल जी सरकारी यूपीआय अ‍ॅप BHIM मध्ये तुमची प्रायमरी बँक असेल.

*99# चे इतर फायदे

*99# द्वारे ऑफलाइन बँक बॅलेन्स चेक करण्यासोबतच इतर फीचर्स देखील वापरता येतात. ह्या सर्व्हिसचे इतर फीचर्स खाली देण्यात आले आहेत.

  • सेंड मनी
  • रिक्वेस्ट मनी
  • चेक बॅलेन्स
  • माय प्रोफाईल
  • पेंडिंग रिक्वेस्ट
  • ट्रँजॅक्शन्स
  • यूपीआय पिन

बँकेशी आधार लिंक कसं करायचं?

बँक अकाऊंटला आधार लिंक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही बँकेत जाऊन मॅन्युअली आधार लिंक करण्यासह ऑनलाइन आणि एटीएमवरून देखील तुमचं बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

बँकेत जाऊन : तुमच्या आधार कार्डच्या प्रतीसह एक अर्ज देऊन तुम्ही बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

ऑनलाइन : जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर लॉगइन करून अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

एटीएम : बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक एटीएममधून देखील करता येतं. एटीएम मध्ये कार्ड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार लिंकचा ऑप्शन मिळतो. इथून देखील तुम्ही तुमच्या अकाऊंटशी आधार लिंक करू शकता.

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/feed/ 0
आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-harvalyavar-kay-karayach/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-harvalyavar-kay-karayach/#respond Wed, 28 Jun 2023 12:22:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21797 जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घाबरून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं हे सांगणार आहोत. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये आधार कार्डचा दुरुपयोग कसा केला जाऊ शकतो ते देखील समजेल. आधार कार्ड हरवल्यास दुसरं आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन घर बसल्या दुसरं आधार कार्ड डाउनलोड […]

The post आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आधार कार्ड हरवल्यावर सहज दुसरं डाउनलोड करता येतं.
  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाइल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे.
  • नवीन आधार कार्डसाठी ऑफलाइन देखील अर्ज करता येतो.

जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घाबरून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं हे सांगणार आहोत. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये आधार कार्डचा दुरुपयोग कसा केला जाऊ शकतो ते देखील समजेल. आधार कार्ड हरवल्यास दुसरं आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन घर बसल्या दुसरं आधार कार्ड डाउनलोड करता येईल. जर तुम्हाला ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यास अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला ऑफलाइन दुसऱ्या आधार कार्डसाठी कसा अर्ज करायचा हे देखील सांगणार आहोत.

आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं?

आधार कार्ड हरवल्यावर तुम्ही ऑनलाइन नवीन कार्ड डाउनलोड करू शकता. ह्यासाठी आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही आधार क्रमांक विसरला असाल तरीही देखील रजिस्टर नंबरवरून आधार कार्ड डाउनलोड करता येईल. तसेच नंबर लिंक नसेल तर डुप्लीकेट आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करता येतो.

आधार नंबर कसा शोधायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम आधारच्या ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid वर जा.

स्टेप 2 : तिथे आधार क्रमांक सिलेक्ट करून, रजिस्टर्ड मोबाइल आणि कॅप्चा कोड टाकून ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो सबमिट केल्यावर तुमच्या मोबाइल नंबरवर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर पाठवला जाईल.

आता तुम्हाला आधार कार्ड नंबर मिळाला आहे. त्यामुळे सहज आधार कार्ड डाउनलोड करता येईल. पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आधार कार्ड डाउनलोड करण्याची माहिती देण्यात आली आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर तुम्ही थेट ही प्रोसेस करू शकता.

आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं?

स्टेप 1 : आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar ओपन करा.

स्टेप 2 : तिथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : पुढील पेजवर ओटीपी व्हेरिफाय करून ‘डाउनलोड’ वर क्लिक करा. काही सेकंदात आधार कार्ड डाउनलोड होईल.

ऑफलाइन डुप्लीकेट आधार कार्ड कसं बनवायचं?

जर तुमच्या आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला डुप्लीकेट आधार कार्डसाठी आधार सेंटर जावं लागेल. तुमच्या जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जा आणि तिथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल त्यात आवश्यक माहिती भरा. सोबत एक ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.

तुमचं बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर नवीन आधार कार्डसाठी विनंती करता येईल. तसेच तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देखील रजिस्टर करू शकता. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन आधार सर्व्हिसचा लाभ घेता येईल. काही दिवसांत तुमचं आधार कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल.

आधार कार्डचा गैरवापर करता येतो का?

आधार कार्ड हरवल्यावर त्याचा गैरवापर करता येत नाही. सरकारी किंवा खाजगी सर्व्हिस जसे की सिम कार्ड खरेदीसाठी आधार व्हेरिफाय करावं लागतं. ज्यासाठी ऑनलाइन, ओटीपी किंवा बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याव्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड कोणीही वापरू शकत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. परंतु तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात कार्ड हरवल्याची तक्रार करू शकता.

The post आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-harvalyavar-kay-karayach/feed/ 0
Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन आधार मिळवण्याची ऑनलाइन-ऑफलाइन पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-lost-aadhar-card-online-offline/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-lost-aadhar-card-online-offline/#respond Sun, 25 Jun 2023 03:30:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20995 भारतीय नागरिकांसाठी Aadhaar card खूप महत्वाचं डॉक्यूमेंट आहे. हे आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरता येतं. सध्या शाळा असो किंवा बँक अकाऊंट प्रत्येक कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड कधी हरवलं तर अडचणी वाढू शकतात. अनेक प्रकार आहेत, ज्यांच्या मदतीनं आधार कार्ड पुन्हा मिळवता येतं. चला जाणून घेऊया ह्या पद्धती… युआयडीएआयच्या वेबसाइटवरून कसं मिळवायचं आधार […]

The post Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन आधार मिळवण्याची ऑनलाइन-ऑफलाइन पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय नागरिकांसाठी Aadhaar card खूप महत्वाचं डॉक्यूमेंट आहे. हे आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरता येतं. सध्या शाळा असो किंवा बँक अकाऊंट प्रत्येक कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड कधी हरवलं तर अडचणी वाढू शकतात. अनेक प्रकार आहेत, ज्यांच्या मदतीनं आधार कार्ड पुन्हा मिळवता येतं. चला जाणून घेऊया ह्या पद्धती…

युआयडीएआयच्या वेबसाइटवरून कसं मिळवायचं आधार कार्ड

UIDAI पोर्टलच्या मदतीनं आधार कार्ड पुन्हा मिळवता येतं. तुम्ही इथून आधारची कॉपी डाउनलोड देखील करू शकता. ह्यासाठी नाव, आधार क्रमांक आणि जन्म तारीख आवश्यक आहे.

स्टेप 1: सर्वप्रथम युआयडीएआयच्या स्वयंसेवा पोर्टल https://ssup.uidai.gov.in/web/guest/ssup-home वर जा. इथे तुम्हाला Retrieve EID / Aadhaar number चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2: इथे तुम्हाला आधार क्रमांक आणि एनरॉलमेंट नंबरचा पर्याय मिळेल. यातील एकाची निवड कर.

स्टेप 3: त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी नोंदवा.

स्टेप 4: त्यानंतर कॅप्चा टाकून सेंड ओटीपी असलेल्या बटनवर टॅप करा.

स्टेप 5: तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी मिळेल, तो सबमिट करा

स्टेप 6: एकदा ओटीपी सबमिट केल्यावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर आधार नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर मिळेल.

स्टेप 7: पुन्हा युआयडीएआय सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर जा आणि डाउनलोड आधारचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 8: त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर, नाव, पिन कोड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

स्टेप 9: पुन्हा गेट वन टाइम पासवर्ड बटनवर क्लिक करा आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर आलेला ओटीपी टाका.

स्टेप 10: ओटीपी सबमिट झाल्यावर तुम्ही तुमच्या आधार कार्डची एक कॉपी डाउनलोड करू शकता.

युआयडीएआय हेल्पलाइनवरून कसं मिळवायचं आधार कार्ड

आधार कार्ड हरवल्यानंतर पुन्हा मिळवण्यासाठी युआयडीएआय हेल्पलाइन नंबर 1800-180-1947 (टोल-फ्री) किंवा 011-1947 (लोकल) वर देखील कॉल करता येतो. हेल्पलाइन आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

स्टेप 1: युआयडीएआय हेल्पलाइन नंबर 1800-180-1947 किंवा 011-1947 डायल करा.

स्टेप 2: आयवीआर सूचनांचे पालन करा आणि तुमचं आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी उपयुक्त ऑप्शनची निवड करा.

स्टेप 3: तुमचं नाव, जन्म तारीख अशी आवश्यक माहिती द्या.

स्टेप 4: एकदा दिलेली माहिती पटली की रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर मिळेल.

स्टेप 5: तुमच्या आधार कार्डची कॉपी डाउनलोड करण्यासाठी युआयडीएआय स्वयंसेवा पोर्टल किंवा आधार एनरॉलमेंट सेंटरवर जा.

आधार एनरॉलमेंट सेंटरवरून कसं मिळवायचं आधार कार्ड

जर तुम्हाला वरील पद्धतीनं आधार कार्ड मिळालं नाही तर तुम्ही डुप्लीकेट आधार कार्डसाठी आधार एनरॉलमेंट सेंटरवर जाऊ शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम जवळच्या आधार केंद्र म्हणजे एनरॉलमेंट सेंटर वर जा.

स्टेप 2: आधार करेक्शन फॉर्म भरा आणि तुमचं मूळ आधार कार्ड (जर तुमच्याकडे असेल), बायोमॅट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन) आणि तुमच्या आयडी प्रूफची एक प्रत जमा करा.

स्टेप 3: शुल्क भरा आणि फॉर्म जमा करा.

स्टेप 4: तुम्हाला तुमच्या एनरॉलमेंट नंबरसह एक पावती मिळेल.

अशाप्रकारे तुम्ही आधार कार्ड हरवल्यावर नवीन आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता.

The post Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन आधार मिळवण्याची ऑनलाइन-ऑफलाइन पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-lost-aadhar-card-online-offline/feed/ 0
पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/pan-card-la-aadhar-card-link-karnyachi-paddhat/ https://www.91mobiles.com/marathi/pan-card-la-aadhar-card-link-karnyachi-paddhat/#respond Tue, 25 Apr 2023 12:20:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20463 पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही सहज घर बसल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ही प्रोसेस करता येईल. आता पॅनशी आधार लिंक करण्यासाठी युजर्सना 1000 रुपयांचा चालान भरावा लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की कशाप्रकारे […]

The post पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.
  • लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचे चालान द्यावे लागेल.
  • आधार-पॅन लिंक ऑनलाइन करता येईल.

पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही सहज घर बसल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ही प्रोसेस करता येईल. आता पॅनशी आधार लिंक करण्यासाठी युजर्सना 1000 रुपयांचा चालान भरावा लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की कशाप्रकारे ही प्रोसेस सहज घर बसल्या पूर्ण करू शकता.

पॅन कार्डशी आधार कार्ड कसं लिंक करायचं

पॅनशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांचा चालान जमा करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक करू शकाल. चालान भरण्यासाठी तुम्हाला NSDL च्या वेबसाइटवर पेमेंट करावं लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप माहिती देत आहोत.

NSDL च्या वेबसाइटवर चालान कसं भरायचं?

स्टेप 1: सर्वप्रथम NSDL ची ऑफिशियल वेबसाइट https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp ओपन करा.

स्टेप 2: इथे टॅक्स पेमेंट पेजवर चालान नंबर./ITNS 280 अंतगर्त नॉन-TDS/TCS कॅटेगरी सिलेक्ट करा.

स्टेप 3: पुढील पेजवर हेड ‘(0021)’ आणि त्यानंतर ‘(500)’ सिलेक्ट करा.

स्टेप 4: स्क्रोल डाउन करून पेमेंट मोड सिलेक्ट करा. नंतर पॅन कार्डची माहिती आणि एसेसमेंट ईयर 2023-24 सिलेक्ट करून विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.

चालान पेमेंट यशस्वी झाल्यावर चार किंवा पाच दिवसांनी तुम्हाला पॅनशी आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस करा. जेणेकरून तुमचे पेमेंट डिटेल्स बिनदिक्कत व्हेरिफाय होतील. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन पॅनशी से आधार कार्ड लिंक कसं करायचं याची माहिती देत आहोत.

आधारशी पॅन कार्ड लिंक कसं करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला इनकम टॅक्स ई-फाईलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ओपन करा. तिथे क्विक लिंकमध्ये ‘Link Aadhaar’ वर टॅप करा.

स्टेप 2: पुढील पेजवर तुम्हाला पॅन आणि आधार नंबर टाकावा लागेल.

स्टेप 3: जर पॅन कार्ड दुसऱ्या आधारशी आधीच लिंक असेल तर तुम्हाला एरर मेसेज मिळेल. त्यामुळे तुम्हाला ई-फाईलिंग हेल्पडेस्कवर तक्रार करावी लागेल. जर असं नसेल तर आधार आणि पॅन कार्ड व्हॅलिडेशननंतर ओटीपीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करा.

NSDL वर चालानचं पेमेंट व्हेरिफाय झालं असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

स्टेप 1: पॅन आणि आधार डेटा व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला एक पॉप अप “Your payment details are verified” (पेमेंट डिटेल्स व्हेरिफाय झाली) मेसेज मिळेल. मग ‘Continue’ बटनवर क्लिक करून आधार लिंक रिक्वेस्ट सब्मिट करा.

स्टेप 2: नवीन पेजवर पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव आणि फोन नंबर डिटेल्स भरा.

स्टेप 3: पुढील पेजवर मोबाइल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी टाका. अशाप्रकारे तुमच्या पॅनशी आधार लिंकची रिक्वेस्ट कंप्लीट होईल.

जर तुमचं चालान व्हेरिफाय झालं नसेल तर तुम्हाला काही दिवसांची वाट पाहावी लागेल. तसेच ई-फायलिंग हेल्पडेस्कवर तक्रार करा.

पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं जाणून घ्यायचं

30 जूननंतर सर्व पॅन कार्ड अमान्य होतील जे आधार कार्डशी लिंक नाहीत. त्यामुळे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे सहज जाणून घेता येईल. यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1: सर्वप्रथम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal ओपन करा आणि ‘लिंक आधार स्टेटस’ वर क्लिक करा.

स्टेप 2: नवीन पेजवर पॅन आणि आधार नंबर टाकून ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

जर तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला पॉप-अप मेसेजमध्ये माहिती मिळेल. तुम्ही उपरोक्त प्रोसेसद्वारे पॅनशी आधार लिंक करू शकता.

The post पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pan-card-la-aadhar-card-link-karnyachi-paddhat/feed/ 0
सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली https://www.91mobiles.com/marathi/pan-aadhaar-linking-date-extend-to-june-30-know-all-details/ https://www.91mobiles.com/marathi/pan-aadhaar-linking-date-extend-to-june-30-know-all-details/#respond Tue, 28 Mar 2023 12:45:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19843 पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. परंतु, आता अर्थ मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन माहिती जारी करून सांगितलं आहे की पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे. या तारखेनंतर अनलिंक असलेले पॅन कार्ड निष्क्रिय मानले जातील. […]

The post सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • पॅन-आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली.
  • 1000 रुपये शुल्क देऊन आधार-पॅन लिंक करता येईल.
  • इनकम टॅक्स अ‍ॅक्टच्या कलम 139AA अंतगर्त हे आवश्यक आहे.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. परंतु, आता अर्थ मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन माहिती जारी करून सांगितलं आहे की पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे. या तारखेनंतर अनलिंक असलेले पॅन कार्ड निष्क्रिय मानले जातील. निष्क्रिय होण्याव्यतिरिक्त, ज्यांचं आधार आणि पॅन जोडलेलं नसेल त्यांना इनकम टॅक्स रिफंड मिळणार नाही. तसेच जेवढ्या कालावधीसाठी पॅन निष्क्रिय राहील त्या कालावधीसाठी रिफंडवर व्याज मिळणार नाही.

PIB नं सोशल मीडियावर दिली माहिती

पीआयबीनं ट्विट करून सांगितलं आहे की करदात्यांना आणखी थोडा वेळ देण्यासाठी पॅन-आधार जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलून 30 जून 2023 करण्यात आली आहे. Aadhaar आणि PAN Card लिंक करण्याची तारीख पुढे ढकलल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (सेबी) नं गुंतवणूकदारांना या कालावधीत आपलं पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी सांगितलं आहे. जर हे काम वेळेवर केलं नाही तर गुंतवणूकदार एनएसई आणि बीएसई सारख्या शेअर मार्केट्सवर व्यवहार करू शकणार नाहीत. अनिवासी भारतीय, भारताचे नागरिक नसलेली व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पॅन-आधार लिंकिंग आवश्यक नाही. तसेच, आसाम, मेघालय आणि जम्मू कश्मीरच्या रहिवाश्याना देखील आपलं पॅन आधारशी लिंक करण्याची गरज नाही. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन

पॅनशी आधार लिंक करणं का आवश्यक आहे

इनकम टॅक्स अ‍ॅक्टच्या कलम 139AA अंतगर्त पॅनशी आधार लिंक करण आवश्यक आहे. तसेच 1 जुलै 2017 पूर्वी जारी करण्यात आलेल्या पॅनसह आधार नंबर जोडणं आवश्यक आहे आणि हे काम पॅन-आधार लिंक करून करता येतं. सरकारनं गेल्यावर्षी जुलैमध्ये संसदेत सांगितलं होतं की आतापर्यंत एकूण 61,73,16,313 लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आलं आहे. यातील 46,70,66,691 लोकांनी आपलं पॅन, आधारशी लिंक केलं आहे.

The post सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pan-aadhaar-linking-date-extend-to-june-30-know-all-details/feed/ 0
UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही https://www.91mobiles.com/marathi/aadhaar-online-document-update-facility-free-till-june-14/ https://www.91mobiles.com/marathi/aadhaar-online-document-update-facility-free-till-june-14/#respond Thu, 16 Mar 2023 09:14:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19550 आधार कार्ड धारकांसाठी UIDAI नं एक खुशखबर दिली आहे. UIDAI नं माहिती दिली आहे की आता आधार अपडेट करण्यासाठी कार्डधारकांना 15 मार्च, 2023 ते 14 जून, 2023 पर्यंत कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजे या कालावधीत आधार अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात आलं आहे. परंतु ही सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी लागू असेल. 14 […]

The post UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • UIDAI नं आधार अपडेट करण्यासाठी लागणारं शुल्क रद्द केलं आहे.
  • 14 जून, 2023 पर्यंत आधार कार्ड मोफत ऑनलाइन अपडेट करता येईल.
  • त्यानंतर Aadhaar अपडेट केल्यास 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

आधार कार्ड धारकांसाठी UIDAI नं एक खुशखबर दिली आहे. UIDAI नं माहिती दिली आहे की आता आधार अपडेट करण्यासाठी कार्डधारकांना 15 मार्च, 2023 ते 14 जून, 2023 पर्यंत कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजे या कालावधीत आधार अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात आलं आहे. परंतु ही सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी लागू असेल.

14 जूनपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट मोफत

UIDAI नं आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून अशी माहिती दिली आहे की आधार धारकांना या फ्री आधार अपडेटच्या सुविधेचा फायदा तीन महिने मिळेल. म्हणजे होल्डर्स 15 मार्च, 2023 पासून 14 जून, 2023 पर्यंत आपलं आधार कार्ड मोफत ऑनलाइन अपडेट करू शकतील. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला Infinix Hot 30i, 27 मार्चला होणार भारतात एंट्री

आधार एनरोलमेंट आणि अपडेट रेग्युलेशन 2016 नुसार आधार कार्ड जारी होऊन जर 10 वर्षांचा कालावधी झाला असेल तर तुम्ही हा अपडेट करू शकता. दरम्यान अनेकांचा पत्ता, नाव इत्यादी बदलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव UIDAI नं सर्व आधार कार्ड अपडेट करण्याची सूचना दिली आहे. आधार अपडेटचा ऑनलाइन वेग वाढवण्यासाठी सरकारकडून आकारली जाणारी 50 रुपयांची फी आता रद्द करण्यात आली आहे.

नोट: डेमोग्राफिक डिटेल (नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी ) बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागल्यास सामान्य शुल्क लागू होईल.

आधारमधील माहिती अपडेट कशी करायची

तुम्हाला आधारवरील माहिती अपडेट करायची असेल तर (Uidai) युआयडीएआय तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी स्वीकारेल. ज्यात युजरचं नाव आणि फोटोची माहिती असेल. या आयडेंटिफिकेशन डॉक्यूमेंटमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी सारख्या डॉक्यूमेंटचा समावेश असेल. डॉक्यूमेंट अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टल (myAadhaar portal) आणि माय आधार अ‍ॅप (myAadhaar app) चा वापर करता येईल. तसेच तुम्ही बदल करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार एनरोलमेंट सेंटर (Aadhaar enrolment center) वर देखील जाऊ शकता. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

तुमच्या आधार कार्डवर पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (Self Service Update Portal) (SSUP) ची मदत घेता येईल. जर तुम्हाला आधारवरील नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ, जेंडर किंवा मोबाइल नंबर बदलायचा असेल किंवा फिंगरप्रिंट बायोमेट्रिकमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला यासाठी आधारच्या पर्मनंट एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल.

The post UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhaar-online-document-update-facility-free-till-june-14/feed/ 0
महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत https://www.91mobiles.com/marathi/10-years-old-aadhaar-card-how-to-update-address-identity-online/ https://www.91mobiles.com/marathi/10-years-old-aadhaar-card-how-to-update-address-identity-online/#respond Sat, 07 Jan 2023 12:48:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16644 आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) नं दहा वर्षांपूर्वी बनलेले आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. आधार कार्ड धारक ज्यांनी आपल्या कार्डमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कोणतेही अपडेट केले नाहीत त्यांना त्यांचा आधार डेटाबेस अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. UIDAI नं आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि राहत्या पत्त्याच्या […]

The post महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) नं दहा वर्षांपूर्वी बनलेले आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. आधार कार्ड धारक ज्यांनी आपल्या कार्डमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कोणतेही अपडेट केले नाहीत त्यांना त्यांचा आधार डेटाबेस अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. UIDAI नं आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि राहत्या पत्त्याच्या पुरावा आधार डेटाबेसमध्ये अपलोड करण्यास सांगितलं आहे. यासाठी कार्ड धारक myAadhaar पोर्टलचा वापर करू शकतात. तसेच जवळच्या आधार कार्ड सेंटरवर देखील ही सुविधा देण्यात आली आहे.

ओळखपत्र आणि पत्ता करा अपडेट

UIDAI नं एका विधानात म्हटलं आहे की, “असे भारतीय नागरिक ज्यांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड जारी करण्यात आलं होती आणि ज्यांनी या वर्षांमध्ये कधीही आधार कार्ड अपडेट केलं नाही. त्यांनी UIDAI पोर्टलवर आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. ही प्रोसेस खूप सोपी आहे. आधार कार्ड धारक आपला आधार डेटा ऑनलाइन किंवा ऑफलाईन अपडेट करू शकतात.”

आधार कार्ड धारक आपला पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकतात. तसेच तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर ईमेलसह बायोमॅट्रिक (फिंगरप्रिंट, आयरिस आणि फोटोग्राफ) चेंज करायची असेल तर तुम्हाला जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल.

ऑनलाइन आधार कार्ड असं करा अपडेट

आधार कार्डवरील ओळखपत्र आणि पत्ता ऑनलाइन कसा अपडेट करायचा हे जाणून घेऊया.

स्टेप 1 – सर्वप्रथम आधार सेल्फ अपडेट पोर्टल uidai.gov.in ओपन करा आणि अपडेट अ‍ॅड्रेस ऑनलाइनवर सिलेक्ट करा.

स्टेप 2 – इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा VID टाकावा लागेल.

स्टेप 3 – सिक्योरिटी कोड टाकल्यांनंतर OTP रिक्वेस्ट करा, जो तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर येईल.

स्टेप 4 – मोबाइलवर आलेला OTP टाका.

स्टेप 5 – आता तुम्हाला तुमच्या पत्त्याची माहिती टाकावी लागेल आणि सबमिट बटनवर क्लिक करा.

स्टेप 6 – खाली स्क्रोल केल्यावर आता तुमच्या राहत्या पत्त्याचा एक पुरावा द्यावा लागेल. यासाठी डॉक्यूमेंटची कलर स्कॅन जवळ ठेवा आणि अपलोड करा.

स्टेप 7 – त्यानंतर BPO वर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. आता तुमची अपडेट रिक्वेस्ट आधार डेटाबेसमध्ये जमा होईल. तुमचे डॉक्यूमेंट योग्य असले तर एका आठवड्यात तुमचा पत्ता आधार डेटाबेसवर अपडेट होईल.

तुम्हाला रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलवर URN नंबर मिळेल, जो तुम्ही तुमचं अपडेट स्टेटस जाणून घेण्यासाठी वापरू शतक.

नोट: तुम्ही तुमच्या सपोर्ट डॉक्यूमेंटची स्कॅन फाईल अपलोड केली नाही तर तुमच्या आधार कार्डवरील अपडेट यशस्वी होणार नाही.

The post महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-years-old-aadhaar-card-how-to-update-address-identity-online/feed/ 0
Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/#respond Tue, 03 Jan 2023 00:30:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15530 Aadhar Card Download: आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ओळखपत्र असून देखील आधार कार्डला प्राथमिकता दिली जाते. सर्व प्रकारच्या सरकारी व बिगर सरकारी संस्था जसे की शाळा, हॉस्पिटल, बँक व फायनान्स सर्व्हिसेजमध्ये ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु कधीकधी हे आधार कार्ड हरवतं आणि मग मोठी पंचाईत होते. तुम्ही देखील […]

The post Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhar Card Download: आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ओळखपत्र असून देखील आधार कार्डला प्राथमिकता दिली जाते. सर्व प्रकारच्या सरकारी व बिगर सरकारी संस्था जसे की शाळा, हॉस्पिटल, बँक व फायनान्स सर्व्हिसेजमध्ये ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु कधीकधी हे आधार कार्ड हरवतं आणि मग मोठी पंचाईत होते. तुम्ही देखील तुमच्या परिवारातील किंवा मित्राचं आधार कार्ड हरवल्याचं किंवा फाटल्याचं ऐकलं असेल. अशाप्रसंगी आधार कार्डची फोटोकॉपी हवी मिळवणं देखील कठीण असतं.

आधार कार्ड खराब झाल्यास आपण त्याचा वापर कुठेही करू शकत नाही आणि किंवा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा मारतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनं आधार कार्डची नवीन कॉपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आधार काढता येईल आणि कुठेही अवशक्यतेनुसार आधार कार्ड कॉपीच्या ऐवजी देता येईल. आधार कार्ड खराब झाल्यास किंवा फाटल्यास ही कॉपी प्रत्येक ठिकाणी सहज वापरता येईल. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा Samsung फोन हवा? मग Galaxy M54 5G Phone साठी काही काळ थांबा

Aadhar Card Download

1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा: uidai.gov.in

2. इथे होम पेजवरच ‘My Aadhaar’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

3. ‘माय आधार’ सेक्शनमध्ये अनेक पॉईंट्स दिसतील, यातील एक ‘डाउनलोड आधार’ ऑप्शन निवडा आणि क्लिक करा.

4. ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करताच नवीन टॅब ओपन होईल, जिथे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणजे डिजीटल आधार कार्ड डाउनलोड करण्यास सांगितलं जाईल.

5. इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन मिळतील, ज्यात Aadhar Number, Enrolment ID (EID) आणि Virtual ID (VID) चा समावेश आहे.

हे देखील वाचा: Jio पेक्षा अर्ध्या किंमतीत BSNL देतेय दुप्पट फायदे; 100 दिवसांची वैधता आणि रोज 2GB डेटा

6. तुमच्यकडे जो रेकॉर्ड उपलब्ध असेल त्यानुसार एक निवडा आणि तुमची पसर्नल आयडी सबमिट करा.

7. नंबर टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ च्या ऑप्शनवर क्लिक करा, आपके आधार कार्डसह जो मोबाइल नंबर लिंक असेल त्यावर वन टाइम पासवर्ड येईल, तो सबमिट करा.

8. वेबसाइटवर देण्यात आलेला सर्वे पूर्ण केल्यानंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल.

9. ‘व्हेरिफाय अँड डाउनलोड’ वर क्लिक करा, आधार कार्ड पीडीएफ फॉरमेटमध्ये डाउनलोड होईल.

10. आधार कार्डची ही कॉपी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉप इत्यादीवर ओपन कराल तेव्हा दरवेळी हा पासवर्ड टाकावा लागेल.

The post Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/feed/ 0
Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/#respond Fri, 05 Feb 2021 13:43:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9918 आधार कार्ड खराब झाल्यावर आपल्याला त्याचा कुठेही वापर करता येत नाही आणि पुन्हा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिचा वापर करून केल्यास तुम्हाला तुमचा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही आणि पैसे पण खर्च करावे लागणार नाहीत.

The post Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhaar Card भारतीयांची ओळख आहे. अनेक ओळखपत्रांमध्ये आधार कार्डला प्राधान्य दिले जाते. सर्व सरकारी व इतर संस्थांमध्ये तसेच शाळा, हॉस्पिटल, बॅंक व फाइनेंस सर्विसेज मध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून अनेकदा असे ऐकायला मिळते कि त्यांचे आधार कार्ड हरवले आहे किंवा फाटून खराब झाले आहे. त्यामुळे जेव्हा कुठे आधार कार्डची फोटोकॉपी मागितली जाते तेव्हा त्यांना अडचण येते.

आधार कार्ड खराब झाल्यावर आपल्याला त्याचा कुठेही वापर करता येत नाही आणि पुन्हा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिचा वापर करून केल्यास तुम्हाला तुमचा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही आणि पैसे पण खर्च करावे लागणार नाहीत. फक्त ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डची नवीन कॉपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आधार काढता येतो आणि तो कुठेही आधार कार्ड कॉपीच्या जागी वापरता येतो. आधार कार्ड खराब झाला, हरवला किंवा फाटला तर हि कॉपी प्रत्येक ठिकाणी वापरता येते.

1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा : uidai.gov.in

2. इथे होम पेजवरच ‘My Aadhaar’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

3. ‘माय आधार’ सेक्शन मध्ये अनेक पॉईंट्स दिसतील, यातील एक ‘डाउनलोड आधार’ ऑप्शन निवडा आणि क्लिक करा.

4. ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करताच नवीन टॅब ओपन होईल, जिथे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणजे डिजीटल आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी विचारले जाईल.

5. इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन असतील, त्यात Aadhar Number, Enrolment ID (EID) आणि Virtual ID (VID) चा समावेश आहे.

हे देखील वाचा : Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर DND ऍक्टिव्हेट करण्याची सर्वात सोप्पी पद्धत, काही सेकंदात मिळवा स्पॅम कॉल्सपासून मुक्तता

6. तुमच्याकडे जो रेकॉर्ड उपलब्ध आहे तो निवडा आणि तुमचा पसर्नल आयडी सबमिट करा.

7. नंबर टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ च्या ऑप्शनवर क्लिक करा, तुमच्या आधार कार्डसह जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर वन टाईम पासवर्ड येईल, तो सबमिट करा.

8. वेबसाइटवर देण्यात आलेला सर्वे पूर्ण करा, नंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल.

9. ‘वेरीफाय अँड डाउनलोड’ वर क्लिक करा, आधार कार्ड पीडीएफ फॉरमेट मध्ये डाउनलोड होईल.

हे देखील वाचा : Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत

10. आधार कार्डची हि कॉपी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही हि तुमच्या फोन किंवा लॅपटॉप इत्यादी मध्ये ओपन कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.

The post Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/feed/ 0
Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-change-update-mobile-number-and-e-mail-id-in-aadhaar-card-uidai-changed-the-process-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-change-update-mobile-number-and-e-mail-id-in-aadhaar-card-uidai-changed-the-process-in-india/#respond Thu, 23 Jan 2020 12:50:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6373 मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी च्या रिक्वेस्ट सह तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.

The post Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक भारतीयाची ओळख त्याचे आधार कार्ड आहे. शाळा असो वा हॉस्पिटल, बॅंक अकांउट असो वा एखादे सरकारी काम, प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून Aadhaar Card मागितला जातो. सरकारने आधार कार्ड मध्ये धारकाची सर्व माहिती समाविष्ट केली आहे. आधार कार्ड मध्ये यूजरचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी देणे पण सरकारने आवश्यक असल्याचे सांगितले आहे कारण भविष्यात Aadhaar मध्ये बदल करण्यासाठी यांच्यावरच OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड येतो. देशातील अनेक ठिकाणी असे लोक आहेत ज्यांच्या आधार कार्ड मध्ये योग्य मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी नाही. त्यामुळे यूजर्सच्या अडचणी कमी करत आधारचा कार्यभार सांभाळणाऱ्या UIDAI ने आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट करण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे जो आधीपेक्षा जास्त सरळ व सोप्पा आहे.

Aadhaar बनवणारी संस्था Unique Identification Authority of India म्हणजे यूआईडीएआई ने आपल्या सोशल मीडिया हँडेलच्या माध्यमातून देशातील नागरिकांना या मोठ्या बदलाची माहिती दिली आहे. UIDAI ने अधिकृतपणे अशी घोषणा केली आहे कि आतापासून आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे फक्त ज्यांच्या कार्ड मध्ये चुकीचा नंबर किंवा मेल ऍड्रेस देण्यात आला आहे आशा लोकांना फायदा होईल असे नाही तर त्या लोकांवर पण याचा परिणाम होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे आणि तो त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये जोडायचा आहे.

असा आहे नवीन बदल

आधार कार्ड मध्ये जर एखाद्या यूजरला आपला जुना मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी बदलायचा असेल किंवा नवीन नंबर द्यायचा सेल तर त्यासाठी आधार केंद्रावर कोणतेही डाक्यूमेंट घेऊन जाण्याची गरज नाही. UIDAI ने स्पष्ट केले आहे कि आता आधार केंद्रावर फक्त तुमचा Aadhaar Card घेऊन जावा लागेल तसेच आता वोटर कार्ड, जन्माचा दाखला किंवा पॅन कार्ड इत्यादी दाखवण्याची गरज नाही.

आधार सेवा केंद्रातील कर्मचारी यूजरचा आधार कार्ड बघून ऑनलाईन त्यात बदल करतील. आधार केंद्रावर रिक्वेस्ट टाकल्यावर जुना मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी मध्ये बदल करून नवीन मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी आधार कार्ड मध्ये अपडेट केला जाईल. यूआईडीएआई ने या प्रक्रियासाठी फक्त 50 रुपयांचे शुल्क ठेवले आहे. म्हणजे मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी च्या रिक्वेस्ट सह तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.

Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट असणे खूप आवश्यक आहे. कारण भविष्यात कधीही जर आधार कार्ड मध्ये बदल करायचा असेल तेव्हा किंवा एखादी वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडी वर ओटीपी पाठवला जातो. आणि जर आधार कार्ड मध्ये योग्य मोबाईल नंबर व मेल आईडी नसेल तर वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच UIDAI ने स्पष्टपणे सांगितले आहे कि जर कोणत्याही आधार सेवा केंद्रात 50 रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेतले गेले तर त्याची तक्रार करावी.

The post Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-change-update-mobile-number-and-e-mail-id-in-aadhaar-card-uidai-changed-the-process-in-india/feed/ 0