Electric Vehicle - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 10 Jan 2023 06:31:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ‘छोटा हाथी’ आला इलेक्ट्रिक अवतारात! 154Km ची रेंज असलेल्या Tata Ace EV ची डिलिव्हरी सुरु https://www.91mobiles.com/marathi/tata-ace-ev-deliveries-begin-after-may-2022-launch/ https://www.91mobiles.com/marathi/tata-ace-ev-deliveries-begin-after-may-2022-launch/#respond Tue, 10 Jan 2023 06:31:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16709 Tata Motors नं मालवाहुतक करणाऱ्या Tata Ace EV ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनीनं हे इलेक्ट्रिक वाहन मे 2022 मध्ये लाँच केलं होतं. आता कंपनीनं या मिनी ट्रकची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. हे एक मजबूत इलेक्ट्रिक कार्गो वाहन आहे ज्यामुळे अनेक व्यावसायिकांना फायदा होईल. विशेष म्हणजे सर्वप्रथम Tata Ace EV ची डिलिव्हरी Amazon, Delhivery, […]

The post ‘छोटा हाथी’ आला इलेक्ट्रिक अवतारात! 154Km ची रेंज असलेल्या Tata Ace EV ची डिलिव्हरी सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Motors नं मालवाहुतक करणाऱ्या Tata Ace EV ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनीनं हे इलेक्ट्रिक वाहन मे 2022 मध्ये लाँच केलं होतं. आता कंपनीनं या मिनी ट्रकची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. हे एक मजबूत इलेक्ट्रिक कार्गो वाहन आहे ज्यामुळे अनेक व्यावसायिकांना फायदा होईल. विशेष म्हणजे सर्वप्रथम Tata Ace EV ची डिलिव्हरी Amazon, Delhivery, DHL(Express & Supply Chain), FedEx, Flipkart, Johnson & Johnson Consumer Health, MoEVing, Safexpress आणि Trent Limited सारख्या सामान डिलिव्हरी करणाऱ्या मोठ्या व्यवसायांना देण्यात आली आहे.

Tata Ace EV Price

Tata Ace Electric मे 2022 मध्ये लाँच केली होती. किंमत पाहता कंपनीनं हा ट्रक 9.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत सादर करण्यात आला आहे. जो आता सेलसाठी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे नवीन ईव्ही सहज सर्व वर्गातील लोकांना खरेदी करता यावा म्हणून कंपनी प्रमुख फायनान्स कंपन्यांशी भागेदारी करणार आहे. हे देखील वाचा: स्वस्तात हवी नोकियाची मजबुती? 5 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय Nokia C01 Plus, पाहा ऑफर

Tata Ace EV चे फीचर्स

Tata Ace EV कंपनीचा असा मिनी ट्रक आहे ज्यात EVOGEN पावरट्रेनचा वापर करण्यात आला आहे. ही EV एकदा चार्ज केल्यावर 154 किमीची रेंज देते. नवीन पावरट्रेनसह खास बॅटरी कुलिंग सिस्टम, दमदार ब्रेक सिस्टम आणि ऑल सीजन शानदार परफॉर्मन्सचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर Tata Ace EV मध्ये फास्ट आणि सामान्य दोन्ही प्रकारच्या चार्जिंगचा सपोर्ट मिळतो, त्यामुळे कमी डाउनटाइम मिळतो.

या मिनी ट्रकमध्ये 36 एचपीची मोटर देण्यात आली आहे, जी 130 एनएमचा पीक टॉर्क देते. यात सामान ठेवण्यासाठी तुम्हाला 208 क्युबिक फिटचा इन-सेगमेंट कार्गो वॉल्यूम आणि 22 टक्के ग्रेड-क्षमता मिळते.विशेष म्हणजे Tata Ace EV मध्ये सामान ठेवण्यासाठी कंटेनर खूप हलका आणि मजबूत आहे. त्यामुळे दूरवरचा प्रवास आणि चढण सहज पार होते. हे देखील वाचा: 108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येतोय POCO X5 Pro; याच महिन्यात येणार भारतात

कंपनीनं दावा केला आहे की या Tata Ace EV वर अनेक टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात युजर्सना 5 वर्षांचा मेंटेनेंस पॅकेज दिला जात आहे. तसेच टाटा मोटर्सनं जास्तीत जास्त अपटाइम देण्यासाठी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे, इलेक्ट्रिक व्हेईकल सपोर्ट सेंटर तयार करणे आणि टाटा फ्लीट एस फ्लीट मॅनेजमेंट सॉल्यूशन तयार करण्यासारख्या अनेक खास योजना बनवल्या आहेत.

The post ‘छोटा हाथी’ आला इलेक्ट्रिक अवतारात! 154Km ची रेंज असलेल्या Tata Ace EV ची डिलिव्हरी सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-ace-ev-deliveries-begin-after-may-2022-launch/feed/ 0
Electric Vehicle Fire: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक लागली आग! बॉडी वितळली, पाहा व्हिडीओ https://www.91mobiles.com/marathi/e-scooty-fire-blast-in-india-odisha-electic-vehicle-fire/ https://www.91mobiles.com/marathi/e-scooty-fire-blast-in-india-odisha-electic-vehicle-fire/#respond Wed, 09 Nov 2022 03:46:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14730 Electric Vehicle Fire च्या घटना वारंवार घडत आहेत. देशात कुठल्या न कुठल्या कोपऱ्यातून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागल्याच्या बातम्या समोर येत असतात. यात सर्वात जास्त प्रकरणं Electric Scooter, जिला E Scooty किंवा Battery Scooty देखील म्हणतात, यांच्या असतात. अशीच एक घटना आता ओडिशा (Odisha) मध्ये झाली आहे जिथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या electric two-wheeler मध्ये आग लागली […]

The post Electric Vehicle Fire: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक लागली आग! बॉडी वितळली, पाहा व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Vehicle Fire च्या घटना वारंवार घडत आहेत. देशात कुठल्या न कुठल्या कोपऱ्यातून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागल्याच्या बातम्या समोर येत असतात. यात सर्वात जास्त प्रकरणं Electric Scooter, जिला E Scooty किंवा Battery Scooty देखील म्हणतात, यांच्या असतात. अशीच एक घटना आता ओडिशा (Odisha) मध्ये झाली आहे जिथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या electric two-wheeler मध्ये आग लागली आणि ती इलेक्ट्रिक स्कूटर जळून राख झाली.

मीडिया रिपोर्टनुसार ही दुर्घटना ओडिशाच्या सोनपुर जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक इलेक्ट्रिक टू-व्हीलर पार्किंगमध्ये उभी होती आणि अचानक त्यात धमाका झाला आहे. ब्लास्ट सोबतच इलेक्ट्रिक स्कूटीनं पेट घेतला आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं. इतक्यात लोकांनी अग्निशमन विभागाला सूचित केलं परंतु जेव्हा फायरब्रिग्रेडनं तिथे पोहचून आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ती स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली होती. हे देखील वाचा: फक्त 90 हजार देऊन घरी आणा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; Tata Tiago EV देते सिंगल चार्जवर 315km ची रेंज

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग

E Scooty Fire ची ही घटना Odisha Bytes नावाच्या युट्युब चॅनेलवर अपलोड देखील करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर रबी नारायण सेनापती नावाच्या व्यक्तीची होती, अशी माहिती देण्यात आली आहे. नारायण या स्कूटरवरून घराजवळच्या एका दुकानात गेला होता. दुकानावर जाताना त्याने स्कूटर रस्त्यावर उभी केली दिया आणि तो दुकानात गेला. थोड्यावेळाने अचानक त्या स्कूटरनं पेट घेतला आणि धूर येऊ लागला.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आग लागण्यापूर्वी त्या स्कूटरमध्ये धमाका झाला होता. परंतु या स्फोटाचे कारण मात्र अजूनपर्यंत समोर आलं नाही. ब्लास्टच्या वेळी ही स्कूटर चार्जिंगवर नव्हती किंवा ती रिपेयर केली जात होती किंवा चालवली देखील जात नव्हती. उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये स्फोट होऊन आग लागल्यामुळे पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांमुळे लोकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोनच्या यादीत OPPO A58 5G ची एंट्री; वॉटरप्रूफ बॉडीसह 50MP Camera आणि 13GB RAM

वरील व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता की आग इतकी भयानक होती की त्या स्कूटरची बॉडी पूर्णपणे वितळली आहे ते वाहनाची पूर्णपणे राख झाली. ही E Scooty म्हणजे Electric Scooter कोणत्या कंपनीची होती, ही माहिती अजूनतरी समोर आली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Electric Vehicle Fire: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक लागली आग! बॉडी वितळली, पाहा व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/e-scooty-fire-blast-in-india-odisha-electic-vehicle-fire/feed/ 0
Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/what-is-battery-swapping-policy-know-the-benefit-electric-vehicle-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-battery-swapping-policy-know-the-benefit-electric-vehicle-in-india/#respond Sun, 23 Oct 2022 04:23:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14249 Electric Vehicle जेव्हा भारतात नवीन होते तेव्हा हे चालणार नाहीत, असा दावा लोक करत होते. काहींच्या मते यांचा पिक-अप चांगला नाही तर काहींना या वाहनांवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु आता लोकांना इलेक्ट्रिक व्हेईकल्स आवडू लागेल आहेत. परंतु एक समस्या आहे की सध्या Electric Car, Electric Scooter आणि Electric Bike च्या किंमती भारतात थोड्या जास्त आहेत […]

The post Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Vehicle जेव्हा भारतात नवीन होते तेव्हा हे चालणार नाहीत, असा दावा लोक करत होते. काहींच्या मते यांचा पिक-अप चांगला नाही तर काहींना या वाहनांवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु आता लोकांना इलेक्ट्रिक व्हेईकल्स आवडू लागेल आहेत. परंतु एक समस्या आहे की सध्या Electric Car, Electric Scooter आणि Electric Bike च्या किंमती भारतात थोड्या जास्त आहेत आणि त्यामुळे सामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रिक व्हेईकल्सचं मार्केट बदलणार आहे. विजेवर चालणाऱ्या या वाहनांची किंमत कमी होईल आणि याला Battery Swapping Policy कारणीभूत असेल.

Battery Swapping Policy

नावावरून समजलं असेल की बॅटरी स्वॅपिंग म्हणजे बॅटरीची अदलाबदल. समजा तुमच्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी डाउन झाली आहे, आता ही चार्ज करण्यासाठी 5-6 तास लागू शकतात. परंतु तुमच्याकडे तितका वेळ नाही. अशावेळी तुम्ही चार्जिंग स्टेशनवर जाल तुमची डिस्चार्ज बॅटरी तिथे ठेवाल आणि त्याबदल्यात दुसरी फुल्ली चार्ज बॅटरी घेऊन याल. हेच आहे बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी मध्ये. म्हणजे युजरला बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही आता डिस्चार्ज बॅटरी देऊन त्याबदल्यात फुल्ली चार्ज्ड बॅटरी घेता येईल. हे तुमच्या गॅस सिलेंडर सारखं आहे जो संपला की तुम्ही रिकामा सिलेंडर देऊन भरलेला घेता. हे देखील वाचा: How to port SIM: नंबर तोच ठेवून मोफत मिळवा 5G सिम, जाणून घ्या सिम पोर्ट करण्याची सोपी पद्धत

वरील माहिती वाचून समजलं असेल की बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी म्हणजे काय. परंतु गॅस सिलेंडर असलेलं उदाहरण वाचून असं समजू नका की प्रत्येक चार्ज बॅटरीसाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील, असं होणार नाही. डिस्चार्ज बॅटरी देऊन चार्ज बॅटरी घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार नाही. इथे जास्तीत जास्त तेवढेच पैसे घेतले जातील जितकं चार्जिंग दरम्यान पावर कंजप्शन होतं. आणि येत्या काळात वेगवेगळे चार्जिंग स्टेशन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सब्सक्रिप्शन पॅक देखील विकू शकतात.

युजरला होईल फायदा

Battery Swapping Policy मुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या किंमती कमी होतील तर बॅटरी स्वॅपिंगची ही प्रक्रिया ग्राहकांना उपयुक्त ठरेल. प्रवासात युजर एक एक्स्ट्रा बॅटरी फुल चार्ज करून वाहनात ठेऊ शकतात ज्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होण्याची भीती आणि तासंतास चार्जिंग स्टेशनवर उभं राहण्याचं झंझट संपेल. जे काम मोबाइल फोनसाठी पावरबँक करते तोच बॅटरी स्वॅपिंगमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल. चार्जिंग कनेक्शन उपलब्ध नसल्यास पावर डाउन होण्याची भीती कमी होईल आणि बॅटरी डिस्चार्ज होण्याचं टेंशन राहणार नाही.

कोरियामध्ये कशी होते बॅटरी स्वॅपिंग पाहा :-

ATM सारखे असतील बॅटरी स्वॅपिंग सेंटर

पाश्चात्य देश अशाप्रकारच्या पॉलिसीवर आधीपासून काम करत आहेत. जवळपास प्रत्येक 5 किलोमीटरवर एक बॅटरी स्वॅपिंग सेंटर मिळू शकतं. अशा सेंटर्ससाठी मोठ्या सेटअपची गरज नाही. बॅटरी स्वॅपिंग मशीन एखाद्या एटीएम मशीन प्रमाणे असेल जिथे 8 ते 10 चार्ज्ड बॅटरीज ठेवल्या जातील. कोणताही युजर टोकन वैगरे घेऊन त्या मशीनमधून चार्ज्ड बॅटरी काढू शकेल आणि खाली झालेल्या स्लॉटमध्ये आपली डिस्चार्ज बॅटरी ठेऊ शकेल. तसेच डिस्चार्ज बॅटरी मशीनमध्ये जाताच चार्ज होण्यास सुरु होईल. हे देखील वाचा: टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु

बॅटरी स्वॅपिंगचा फायदा

बॅटरी स्वॅपिंगसाठी Electric Vehicle मधील बॅटरी सहज काढता येणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे दोन बॅटरीज असणं देखील आवश्यक आहे जेणेकरून एक फुल चार्ज्ड बॅटरी वाहनात राहील आणि दूसरी डिस्चार्ज बॅटरी बाहेर चार्जिंगवर लावता येईल. देशात बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू होताच बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा वेगळा पार्ट बनेल. बॅटरी वेगळी झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन बनवणारे ब्रँड्स फक्त व्हेईकलचं प्रोडक्शन करतील त्यामुळे वाहनाच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये बॅटरीची कॉस्ट नसेल. याचा अर्थ असा की इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमती कमी होतील. यासाठी आम्ही स्मार्टफोन ब्रँड्सचं उदाहरण घेऊ शकतो जे आपले मोबाइल फोन्स वेगळे बनवतात तसेच ईयरफोन व इअरबड्स फोन बॉक्समध्ये न देता वेगळे विकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-battery-swapping-policy-know-the-benefit-electric-vehicle-in-india/feed/ 0
चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू! https://www.91mobiles.com/marathi/7-year-old-died-in-electric-socter-blast/ https://www.91mobiles.com/marathi/7-year-old-died-in-electric-socter-blast/#respond Tue, 04 Oct 2022 07:40:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13682 Electric Scooter explodes: इलेक्ट्रिक व्हेईकल्स भारतीय बाजारात जेवढी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेवढ्याच जास्त दुर्घटना देखील समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अशा घटना समोर आल्यात आहेत ज्यात इलेक्टिक वाहनांमध्ये आग लागली आहे. अशीच एक घटना आता राज्यातील वसई परिसरात घडली आहे जिथे इलेक्टिक स्कूटर चार्ज करत असताना त्याच्या बॅटरीमध्ये आग लागली […]

The post चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Scooter explodes: इलेक्ट्रिक व्हेईकल्स भारतीय बाजारात जेवढी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेवढ्याच जास्त दुर्घटना देखील समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अशा घटना समोर आल्यात आहेत ज्यात इलेक्टिक वाहनांमध्ये आग लागली आहे. अशीच एक घटना आता राज्यातील वसई परिसरात घडली आहे जिथे इलेक्टिक स्कूटर चार्ज करत असताना त्याच्या बॅटरीमध्ये आग लागली तसेच ब्लास्ट झाला. या Electric Scooter blast मुळे 7 वर्षांच्या निरागस मुलाचा मृत्यू झाला आहे.

Electric Scooter Blast

इलेक्टिक स्कूटरमुळे ही मोठी दुर्घटना महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंसारी नावाच्या एका व्यक्तीनं नवीन इलेक्टिक स्कूटर खरेदी केली होती. एका रात्री त्यांनी आपली स्कूटरची बॅटरी चार्जवर ठेवली होती आणि चार्जिंग दरम्यान अचानक त्या बॅटरीमध्ये मोठा धमाका झाला. अंसारी यांचा 7 वर्षांचा मुलगा शब्बीर शाहनवाज या Battery blast च्या तावडीत सापडला आणि भयानक पद्धतीनं भाजला गेला. हे देखील वाचा: T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह

https://zeenews.india.com/marathi/mumbai/electric-scooter-battery-explodes-in-vasai-death-7-year-old-boy-gs/655753

वसई पूर्वेकडील रामदास नगरचे रहिवाशी शाहनवाज अंसारी यांनी 23 सप्टेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले.

ब्लास्टमुळे निरागस मुलाचा मृत्यू

बॅटरी ब्लास्टच्या तावडीत सापडलेल्या 7 वर्षाच्या मुलाचे शरीर 70 टक्क्यांपर्यंत भाजलं होतं आणि घाई घाईने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. खूप जास्त भाजल्यामुळे मुलाला रिकव्हर होता आलं नाही आणि काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केलं. रिपोर्टमधून अजूनतरी आतापर्यंत Electric Scooter ब्रँड आणि मॉडेलची माहिती मात्र समोर आली नाही.

https://zeenews.india.com/marathi/mumbai/electric-scooter-battery-explodes-in-vasai-death-7-year-old-boy-gs/655753

Electric Scooter Showroom मध्ये आग

गेल्या महिन्यात एक इलेक्ट्रिक स्कूटर शोरूममध्ये आग लागल्याची घटना समोर आली होती. ही दुर्घटना इतकी मोठी होती की यात 8 लोकांचा मृत्यू झाला तसेच जवळपास अर्धा डझन लोक जखमी झाले होते. ही घटना तेलंगानामधील सिकंदराबादमध्ये घडली होती. जिथे एक E-Scooter शोरूमवर इलेक्ट्रिक बाइक चार्ज केली जात होती. अचनाक आग लागली आणि संपूर्ण शोरूममध्ये ही आग वेगानं पसरली आणि आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. आग इतकी भयानक होती की अनेक लोकांनी इमारतीच्या वरच्या माळ्यांवरून उडी घेऊन आपला जीव वाचवावा लागला.हे देखील वाचा: अजून एक 5जी विवो फोन लाँच; 48MP कॅमेऱ्यासह शानदार Vivo Y52 5G ची एंट्री

The post चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7-year-old-died-in-electric-socter-blast/feed/ 0
437km रेंज असलेल्या Tata Nexon EV ला टक्कर देईल आनंद महिंद्रांची Mahindra XUV400, टीजर आला समोर https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-teased-ahead-september-8-launch-range-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-teased-ahead-september-8-launch-range-price-and-features/#respond Fri, 02 Sep 2022 11:21:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12762 Mahindra Electric XUV 400 Launch: महिंद्रा अँड महिंद्रानं गेल्या महिन्यात 15 ऑगस्टला आपल्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक मॉडेल (Electric Vehicles) सादर केले होते. आता या महिन्यात 8 सप्टेंबरला Mahindra इलेक्ट्रिक मोबिलिटी डिव्हिजन Mahindra XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिंद्रा ऑटोमोबाइलच्या […]

The post 437km रेंज असलेल्या Tata Nexon EV ला टक्कर देईल आनंद महिंद्रांची Mahindra XUV400, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mahindra Electric XUV 400 Launch: महिंद्रा अँड महिंद्रानं गेल्या महिन्यात 15 ऑगस्टला आपल्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक मॉडेल (Electric Vehicles) सादर केले होते. आता या महिन्यात 8 सप्टेंबरला Mahindra इलेक्ट्रिक मोबिलिटी डिव्हिजन Mahindra XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिंद्रा ऑटोमोबाइलच्या नवीन इलेक्ट्रिक कार, महिंद्रा एक्सयूव्ही 400 चा एक टीजर शेयर केला आहे. चला जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक कारची संभाव्य किंमत आणि फीचर्स.

Mahindra XUV400 या दिवशी होईल लाँच

आनंद महिंद्रांनी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी व्हिडीओ टीजर शेयर करून ट्वीट केलं, “आज एक खूप शुभ दिवस आहे, त्यामुळे लवकरच अजून एक लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे.” विशेष म्हणजे नवीन XUV400 इलेक्ट्रिक SUV ची टेस्ट ड्राईव्ह गेल्या काही आठवड्यांपासून सुरु होती. टेस्टिंगचे काही फोटो देखील याआधी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत

Mahindra XUV400 काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Mahindra XUV400 कार 8 सप्टेंबर 2022 ला लाँच केली जाईल. लाँच झाल्यावर ही Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX ला टक्कर देईल. Mahindra XUV400 EV ची किंमत 15 लाख रुपये ते 18 लाख रुपये (सबसिडी आधी एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.

Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत

XUV400 मोठ्या प्रमाणवर SsangYong Tivoli आधारित असेल, ज्यावर XUV300 ICE-संचालित SUV आधारित आहे. त्यामुळे XUV400 XUV300 पेक्षा जास्त लांब असेल आणि हिची लांबी जवळपास 4.2m असण्याची शक्यता आहे. XUV300 डायमेंशनल स्वरूपात बदलण्यात आली आहे आणि भारत सरकारकडून 4m लांबी असलेल्या वाहनांवरील कर लाभ मिळवण्यासाठी हिची लांबी 4m पेक्षा कमी करण्यात आली आहे.

जेव्हा प्रश्न कॉस्मेटिक्सचा येतो तेव्हा XUV400 Tivoli आणि XUV300 दोन्ही वेगळ्या ठरतात. XUV400 मध्ये ब्लँक्ड-आउट ग्रिल, कंटूरेड फ्रंट बंपर आणि त्रिकोणी फॉग लॅम्प हाउसिंग मिळण्याची शक्यता आहे. हेडलॅम्प क्लस्टर नव्याने तयार केला गेला आहे. मागील बाजूस, XUV400 मध्ये एलईडीसह रॅप-अराउंड टेल लॅम्पची एक जोडी आणि एक नवीन डिजाइन करण्यात आलेलं टेलगेट मिळेल. साइड प्रोफाईल नवीन अलॉय व्हील्सद्वारे वाढवण्यात येईल आणि XUV400 मध्ये 17-इंचाचा मोठा अलॉयचा एक सेट मिळू शकतो. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच

XUV400 मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे जी पुढील चाकांना चालवेल आणि जवळपास 150bhp ची पीक पावर देईल. बॅटरी क्षमतेनुसार दोन पर्याय असतील. XUV400 मध्ये एक अपग्रेडेड इंफोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे आणि यात ADAS फंक्शंससह लेटेस्ट ADRENOX प्लॅटफॉर्म देखील मिळू शकतो.

The post 437km रेंज असलेल्या Tata Nexon EV ला टक्कर देईल आनंद महिंद्रांची Mahindra XUV400, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-teased-ahead-september-8-launch-range-price-and-features/feed/ 0
हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ! https://www.91mobiles.com/marathi/dhruv-vidyut-electric-cycle-anand-mahindra/ https://www.91mobiles.com/marathi/dhruv-vidyut-electric-cycle-anand-mahindra/#respond Thu, 01 Sep 2022 06:07:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12692 Electric Vehicle खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तरी भारतात हे वेड वेगानं वाढत आहे. फक्त Electric Cars नव्हे तर ग्राहक Electric Bike, Electric Scooter सह Electric Cycles देखील विकत घेत आहेत. आता एक अशीच अनोखी Electric Cycle किट समोर आलं आहे ज्याचं कौतुक सर्वच करत आहेत. या विजेवर चालणाऱ्या सायकल किटची निर्मिती एका स्वदेशी […]

The post हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Vehicle खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तरी भारतात हे वेड वेगानं वाढत आहे. फक्त Electric Cars नव्हे तर ग्राहक Electric Bike, Electric Scooter सह Electric Cycles देखील विकत घेत आहेत. आता एक अशीच अनोखी Electric Cycle किट समोर आलं आहे ज्याचं कौतुक सर्वच करत आहेत. या विजेवर चालणाऱ्या सायकल किटची निर्मिती एका स्वदेशी माणसाने केली आहे. जी जास्त पैसे खर्च न करता किंवा मेहनत न करता साध्य सायकलला इलेक्ट्रिक सायकल बनवू शकते.

गुरसौरभ सिंह नावाच्या एका व्यक्तीनं या अनोख्या डिवायसचा शोध लावला जो कोणत्याही सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करू शकतो. Gursaurabh Singh च्या या डिवायस तसेच इनोव्हेशनचं कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केलं आहे आणि त्यांनी ट्वीट करून या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. गुरसौरभ यांनी Dhruv Vidyut नावाचं एक स्टार्टअप सुरु केलं आहे आणि सायकलला इलेक्ट्रिक पावर देणारं एक किफायतशीर आणि शानदार डिवायस बनवलं आहे. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच

Dhruv Vidyut E Cycle Indicator

कोणतीही सायकल बनेल Electric Cycle

ध्रुव विद्युत अंतगर्त बनव्यात आलेलं हे टेक सॅव्ही डिवायस एटलस किंवा हीरो, कोणत्याही कंपनीच्या साधारण सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करू शकतं. हे एक कॉम्पेक्ट डिवायस आहे जे सायकलला जोडण्यासाठी मोठे बदल करावे लागत नाहीत. सायकलच्या कोणत्याही भागाची तोडमोड करावी लागत नाही रसिक हे डिवाइस सहज सायकलच्या पेडलच्या वर नट व बोल्टसह बसवता येतं. स्टार्टअपच्या इंस्टाग्राम पेजनुसार या डिवाइसची जोडणी करण्यासाठी फक्त 20 मिनिटांचा कालावधी लागतो.

Dhruv Vidyut E Cycle and Gursaurabh Singh

इलेक्ट्रिक सायकलची खासियत

डिवायस जोडून इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती केली जाऊ शकते, जी चालवण्यासाठी पेडल मारण्याची देखील गरज नाही. Dhruv Vidhyut Electric Cycle ताशी 25 किलोमीटर वेग देऊ शकते. ही सायकल 170 किलोग्राम पर्यंतचं वजन वाहून नेऊ शकते तसेच फुल चार्जवर 40 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. विशेष म्हणजे ध्रुव विद्युत डिवायस पूर्णपणे फायर प्रूफ आणि वॉटर प्रूफ आहे तसेच सायकल चिखलात पडल्यास देखील डिवाइसवर काही परिणाम होत नाही. हे देखील वाचा: जुन्या आठवणी होणार ताज्या! रस्त्यावर पुन्हा धावणार LML Scooter; 29 सप्टेंबरला 3 Electric Two-Wheeler घेणार एंट्री

थक्क करणारी बाब म्हणजे ही सायकल चार्ज करण्यासाठी फक्त विजेवर अवलंबुन राहण्याची गरज नाही. सायकलवर 20 मिनिटे पेडल केल्यावर याची बॅटरी आपोआप 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. सायकलमध्ये बॅटरी इंडिकेटर देखील आहे जिथे चार्जिंगची टक्केवारी दिसते. या इलेक्ट्रिक सायकलनं तुम्ही तुमचा मोबाइल फोन देखील चार्ज करू शकता. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर गुरसौरभच्या ध्रुव विद्युत डिवायसचं कौतुक करत ही कल्पना सुधारून बाजारात लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे.

The post हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/dhruv-vidyut-electric-cycle-anand-mahindra/feed/ 0
6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज https://www.91mobiles.com/marathi/gensol-make-affordable-ev-with-200-km-range-for-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/gensol-make-affordable-ev-with-200-km-range-for-india-soon/#respond Wed, 13 Jul 2022 07:12:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11348 देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे, त्यामुळे आता या कार्स कमी किंमतीत बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अहमदाबादची एक कंपनी जेनसोल इंजीनियरिंग (Gensol Engineering) नं दावा केला आहे की ते सुमारे 6 लाख रुपयांमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक कार देण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतातील रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन देणाऱ्या कंपनी जेनसोल इंजीनियरिंगनं गेल्या आठवड्यात यूएस-आधारित ईव्ही स्टार्टअपसह […]

The post 6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे, त्यामुळे आता या कार्स कमी किंमतीत बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अहमदाबादची एक कंपनी जेनसोल इंजीनियरिंग (Gensol Engineering) नं दावा केला आहे की ते सुमारे 6 लाख रुपयांमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक कार देण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतातील रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन देणाऱ्या कंपनी जेनसोल इंजीनियरिंगनं गेल्या आठवड्यात यूएस-आधारित ईव्ही स्टार्टअपसह भागेदारी अधिकृत केली आहे. जेनसोल इंजीनियरिंगचं लक्ष्य स्वदेशी ईव्हीसाठी या स्टार्टअपच्या आरअँडडी सुविधांचा वापर करणे आहे.

5-6 लाख रुपयांमध्ये इलेक्ट्रिक कार

एक मीडिया रिपोर्टनुसार जेनसोलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनमोल सिंह जग्गी यांनी म्हटलं आहे की, “भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कारची गरज आहे. इथे अश्या कार्स हव्या आहेत ज्यांची किंमत 5-6 लाख रुपये असेल.” जग्‍गी यांच्या मते भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्‍ट्रीमध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा देशात इलेक्ट्रिक कार 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत विकली जाईल. हे देखील वाचा: Hero Splendor सारखी दिसणारी electric bike लाँच, सिंगल चार्जमध्ये 140km रेंज

टाटा कंपनीकडे आहे भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

भारतात सध्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor आहे, जिची किंमत 12.4 लाख रुपये आहे. Hyundai देखील स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. एमजी मोटर्स इंडिया (MG Motor India) नं देखील माहिती दिली होती की, 10-12 लाख रुपयांच्या आत इलेक्ट्रिक कार बाजारात घेऊन येईल. जागतिक बाजारात 4,200 डॉलर म्हणजे सुमारे 3.15 लाख रुपयांची Wuling Hongguang Mini EV सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.

जेनसोल इंजीनियरिंग भारत आणि विदेशांमध्ये सौर योजना सेटअप करण्याची सेवा देते. तसेच कंपनी जेनसोल समूहातील कंपन्यांचा एक भाग आहे. जेनसोल इंजीनियरिंगनं 7 जुलैला यूएस-आधारित ईव्ही स्टार्टअपसह एक टर्म शीट साइन केली आहे ज्यानुसार भारतीय बाजारात एक ईव्ही आणण्याची योजना आहे. जेनसोलनं आपल्या गुंतवणूकदारांना माहिती दिली आहे कंपनीनं टेक्निकल डेव्हलपमेंटसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर बनवू इच्छित आहे आणि 2023 मध्ये पुण्यात निर्मिती सुरु करण्याची योजना आहे. हा प्लांट सुरुवातीला 12,000 कार निर्माण करू शकेल. हे देखील वाचा: बॅड न्यूज! Bajaj Chetak electric scooter महागली; जाणून घ्या नवीन किंमत

कंपनी भारतात हॅचबॅक सेगमेंटचा विचार करू शकते, जो भारतीय बाजाराचा 46 टक्के भाग आहे. जेनसोलनुसार ईव्ही हॅचबॅक सेगमेंटचे मूल्य जवळपास 70,983 कोटी रुपये आहे आणि आशा आहे की भारतात ईव्ही बाजार 2030 पर्यंत वार्षिक सेलप्रमाण जवळपास 2,00,000 युनिट्सपर्यंत पोहोचेल, थोडक्यात बाजारात 105 टक्के वृद्धी होण्याची अपेक्षा आहे.

The post 6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gensol-make-affordable-ev-with-200-km-range-for-india-soon/feed/ 0
Hero Splendor सारखी दिसणारी electric bike लाँच, सिंगल चार्जमध्ये 140km रेंज https://www.91mobiles.com/marathi/hero-splendor-lookalike-electric-bike-adms-boxer-range-140km-launched/ https://www.91mobiles.com/marathi/hero-splendor-lookalike-electric-bike-adms-boxer-range-140km-launched/#respond Tue, 12 Jul 2022 05:41:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11300 Hero Splendor बाईक कमी मेंटेनेंस आणि चांगल्या मायलेजमुळे भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय बाईक आहे. आता एका कंपनीनं स्प्लेंडरसारखी दिसणारी एक इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) भारतीय बाजारात सादर केली आहे. ही ई-बाईक इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कंपनी ADMS eBikes नं शोकेस केली आहे. ADMS नं ही बॅटरी असलेली बाईक Boxer नावानं इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या मार्केटमध्ये सादर केली आहे. चला […]

The post Hero Splendor सारखी दिसणारी electric bike लाँच, सिंगल चार्जमध्ये 140km रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hero Splendor बाईक कमी मेंटेनेंस आणि चांगल्या मायलेजमुळे भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय बाईक आहे. आता एका कंपनीनं स्प्लेंडरसारखी दिसणारी एक इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) भारतीय बाजारात सादर केली आहे. ही ई-बाईक इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कंपनी ADMS eBikes नं शोकेस केली आहे. ADMS नं ही बॅटरी असलेली बाईक Boxer नावानं इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या मार्केटमध्ये सादर केली आहे. चला जाणून घेऊया या बाईक बाबत सर्वकाही.

Hero Splendor सारखी डिजाईन

Hero Splendor सारखी दिसणारी ही ई-बाईक बंगळुरूमध्ये आयोजित ग्रीन व्हेईकल एक्सपोच्या थर्ड एडिशनमध्ये शोकेस करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक असल्यामुळे कंपनीनं यात इंजिन नव्हे तर त्याजागी इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. त्यामुळे बाईकचा लुक थोडा वेगळा वाटतो. त्या व्यतिरिक्त ही बाईक पूर्णपणे हीरो स्पलेंडर सारखी दिसते. हे देखील वाचा: बॅड न्यूज! Bajaj Chetak electric scooter महागली; जाणून घ्या नवीन किंमत

एडीएमएस बॉक्सर (ADMS Boxer) मध्ये आयताकृती हेडलॅम्प, फ्रंट काउल, फ्रंट आणि रियर मडगार्ड, फ्यूल टँक, सीट डिजाइन आणि ग्रॅब रेल आहेत. जर तुम्ही लांबून ही बाईक बघितली तर ही तुम्हाला हीरो स्प्लेंडरच वाटेल. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रियर शॉक अब्जॉर्बरचा सस्पेंशन सेटअप देखील स्प्लेंडर सारखा वाटतो.

140KM ची रेंज

रेंज बाबत बोलायचे झाले तर यात 140 किमीची रेंज मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यासाठी ही बॅटरी असलेली बाईक ईको मोडमध्ये ड्राइव्ह करावी लागेल. कंपनीनं यात यात लिथियम-आयन बॅटरी दिली आहे जी हब माउंटेड मोटरला पावर देती आहे. ADMS Boxer मध्ये 3 राईड मोड मिळतात तसेच एक रिवर्स मोड देखील देण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक बाईक (electric bike) असल्यामुळे ADMS Boxer मध्ये काही खास फीचर्स देखील आहेत. यात वेगवेगळ्या हँडलबार डिजाइन आणि पोजिशनिंग, क्रोम-टिप्ड ग्रिप्स आणि यूनिक स्विच क्यूब आहे, तसेच कॉकपिट सेक्शन आणि ट्विन पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये ओळखीची डिजाइन मिळते. फ्यूल गेज बॅटरी पर्सेंटेज इंडिकेटरमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. लेफ्ट पॉडमध्ये स्प्लेंडर प्रमाणेच स्पीडोमीटर आणि मीलोमीटर आहे. डायलमधील ग्राफिक्स स्प्लेंडरपेक्षा वेगळे आहेत. ADMS Boxer चा मिड-सेक्शन पूर्णपणे फेयर्ड आहे आणि बॅटरी पॅक काढण्यासाठी कोणतीही ओपनिंग नाही. हे देखील वाचा: फक्त 10,599 रुपयांमध्ये घरी घेऊन या 140 किलोमीटर रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर

किंमत आणि उपलब्धता

अजूनतरी ADMS Boxer बाबत संपूर्ण माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच या बाईकच्या सेलबद्दल पण कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या बाईकची किंमत पाहता, एडीएमएस बॉक्सर बाईकची किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

The post Hero Splendor सारखी दिसणारी electric bike लाँच, सिंगल चार्जमध्ये 140km रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hero-splendor-lookalike-electric-bike-adms-boxer-range-140km-launched/feed/ 0
फक्त 10,599 रुपयांमध्ये घरी घेऊन या 140 किलोमीटर रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर https://www.91mobiles.com/marathi/okinawa-ipraise-plus-electric-scooter-price-range-and-emi-options/ https://www.91mobiles.com/marathi/okinawa-ipraise-plus-electric-scooter-price-range-and-emi-options/#respond Mon, 11 Jul 2022 07:10:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11267 इलेक्ट्रिक स्कुटरचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्ही कमी किंमतीत बॅटरी स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय घेऊन आलो आहोत. तुम्ही फक्त 10,599 रुपयांच्या डाउनपेमेंटवर 139 किलोमीटरची रेंज असलेली शानदार बॅटरी स्कुटर विकत घेऊ शकता. ही ऑफर Okinawa iPraise+ वर सुरु आहे. जिची एक्स शोरूम किंमत 1,05,990 रुपये […]

The post फक्त 10,599 रुपयांमध्ये घरी घेऊन या 140 किलोमीटर रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इलेक्ट्रिक स्कुटरचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्ही कमी किंमतीत बॅटरी स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय घेऊन आलो आहोत. तुम्ही फक्त 10,599 रुपयांच्या डाउनपेमेंटवर 139 किलोमीटरची रेंज असलेली शानदार बॅटरी स्कुटर विकत घेऊ शकता. ही ऑफर Okinawa iPraise+ वर सुरु आहे. जिची एक्स शोरूम किंमत 1,05,990 रुपये आहे. परंतु राज्य आणि टॅक्सनुसार ऑन रोड किंमत बदलू शकते.

Okinawa iPraise+ चा ईएमआय ऑप्शन

वर सांगितल्याप्रमाणे Okinawa iPraise+ तुम्ही फक्त 10,599 रुपये डाउन पेमेंट करून विकत घेऊ शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारातील किंमत 1,05,990 रुपये आहे. परंतु 10,599 रुपयांच्या डाउन पेमेंट उर्वरित 94,990 रुपयांचं कर्ज तुम्हाला मासिक हप्त्यांनी फेडावं लागेल. या रकमेवर 9.7 टक्के व्याज दराने 36 महिने 3,052 रुपये दरमहा हप्ता द्यावा लागेल.

तीन वर्षात तुम्हाला एकूण 120,472 रुपये द्यावे लागतील, म्हणजे मूळ किंमतीपेक्षा तुम्हाला जवळपास 14,882 रुपये जास्त द्यावे लागतील. व्याजाची ही रक्कम तीन वर्षांच्या कालावधीसाठी इतकी जास्त वाटत नाही. कारण या कळत तुम्ही स्कुटरचा वापर देखील करत असणार. या किंमतीत तसेच व्याजदरात ठिकाण आणि बँकेवर फरक पशु शकतो. तसेच डाउन पेमेंट देखील वेगळं असू शकतं. फायनान्सच्या जास्त माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या Okinawa शोरूममध्ये जाऊन माहिती मिळवू शकता.

Okinawa iPraise+ इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स

Okinawa iPraise+ चे स्पेसिफिकेशन पाहता ही स्कूटर 2500W च्या मोटर पावरसह येते. सर्वात खास बाब म्हणजे ही स्कुटर एकदा फुल चार्ज केल्यावर 139 किलोमीटरची रेंज देते. यामध्ये 3.3 KWH क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. बीएलडीसी टेक्नॉलॉजी असलेली ही स्कुटर साध्या चार्जरने देखील अवघ्या 4 ते 5 तासांमध्येच पूर्णपणे चार्ज होते. शहरातील कामांसाठी ही परफेक्ट ठरू शकते. ऑफिस, विकेंडची भटकंती किंवा शॉपिंगसाठी या स्कुटरचा वापर करता येईल.

कंपनीच्या वेबसाईटनुसार, या बॅटरीवर काही अटींसह सुमारे तीन वर्षांपर्यंतची वॉरंटी मिळते. अनेक इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये हा ऑप्शन दिला जात नाही, परंतु ओकीनावाच्या या स्कूटरचा हा प्लस पॉईंट म्हणता येईल. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 58 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

या स्कूटरमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटरपासून, डिजिटल क्लॉक आणि डिजिटल ट्रिप मीटर देखील मिळतो. इतकेच नव्हे तर ही बॅटरी असलेली स्कूटर रिमोट स्टार्ट आणि पुश बटन स्टार्टला देखील सपोर्ट करते. त्याचबरोबर अँटी थेफ्ट अ‍ॅप आणि चार्जर विथ ऑटो कट सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

कंपनीनं Okinawa iPraise+ मध्ये ट्यूबलेस टायर दिले आहेत आणि यात तुम्हाला फ्रंट अँड बॅकमध्ये एलईडी लाईट मिळते. एकंदरीत ही एक स्मार्ट स्कूटी आहे जी खूप शानदार फीचर्ससह बाजारात आली आहे. तसेच आता ईएमआय ऑप्शनमुळे स्वस्तात खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे.

The post फक्त 10,599 रुपयांमध्ये घरी घेऊन या 140 किलोमीटर रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/okinawa-ipraise-plus-electric-scooter-price-range-and-emi-options/feed/ 0
अर्ध्या तासात 80 टक्के चार्जिंग; 418km ची दमदार रेंज असलेली Electric SUV Car येतेय भारतात https://www.91mobiles.com/marathi/418km-range-electric-car-volvo-xc40-recharge-suv-india-launch-26-july/ https://www.91mobiles.com/marathi/418km-range-electric-car-volvo-xc40-recharge-suv-india-launch-26-july/#respond Thu, 07 Jul 2022 13:46:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11213 EV म्हणजे Electric Vehicles अत्यंत वेगानं भारतात आपला जम बसवत आहेत. अनेक कंपन्या electric scooter, electric bike आणि electric cars सादर करत आहेत. या यादीत आता ऑटोमोबाईल ब्रँड Volvo च्या नावाचा देखील लवकरच समावेश होणार आहे. कंपनी येत्या 26 जुलैला भारतात आपली पहली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 Recharge लाँच करणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. […]

The post अर्ध्या तासात 80 टक्के चार्जिंग; 418km ची दमदार रेंज असलेली Electric SUV Car येतेय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
EV म्हणजे Electric Vehicles अत्यंत वेगानं भारतात आपला जम बसवत आहेत. अनेक कंपन्या electric scooter, electric bike आणि electric cars सादर करत आहेत. या यादीत आता ऑटोमोबाईल ब्रँड Volvo च्या नावाचा देखील लवकरच समावेश होणार आहे. कंपनी येत्या 26 जुलैला भारतात आपली पहली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 Recharge लाँच करणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. ही कंपनीची पहिली Electric SUV Car आहे जी पावरफुल फीचर्ससह सादर केली जाईल.

Volvo XC40 Recharge Electric SUV

वॉल्वो एक्ससी40 रिचार्ज कंपनीची पहली इलेक्ट्रिक एसयूवी कार आहे जी आता भारतात सादर केली जाणार आहे. ही कार 26 जुलैला अधिकृतपणे लाँच् करण्यात येईल, जी काही महिन्यांच्या आताच देशभरात विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल. SUV कॅटेगरीमध्ये येणारी ही विजेवर चालणारी कार खूप शक्तिशाली फीचर्ससह बाजारात येईल, त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या बाजारातील सध्याच्या प्रीमियम इलेक्ट्रिक कार्सना चांगली टक्कर मिळेल. Volvo XC40 Recharge Electric SUV ची निर्मिती स्वीडनच्या कंपनीद्वारे केली जात आहे आणि हिची असेम्ब्ली पूर्णपणे भारतात केली जाईल. हे देखील वाचा: घोडेस्वार Swiggy डिलिव्हरी बॉयला शोधा आणि मिळवा मोठं बक्षीस; कंपनीनं केली घोषणा

Volvo XC40 Recharge चे फीचर्स

या Electric SUV मध्ये दमदार प्रीमियम फीचर्स देण्यात येतील. Volvo XC40 Recharge एकदा फुल चार्ज केली की 418 किलोमीटरची रेंज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. म्हणजे सिंगल चार्जमध्ये ही कार 400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारमध्ये 78kWh बॅटरी पॅकचा वापर केला गेला आहे जो दीर्घकाळ बॅकअप देऊ शकतो. इतकेच नव्हे तर ही कार 150kw DC fast charging station टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल, त्यामुळे जवळपास 28 मिनिटांत गाडी 10 वरून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

Volvo XC40 Recharge Electric SUV मध्ये 660Nm पिक टॉर्क देण्याची क्षमता आहे, तसेच या कारची पावर 408hp पर्यंत जाऊ शकते. कंपनीच्या माहितीनुसार, एक्ससी40 रिचार्ज इलेक्ट्रिक एसयूवी कार फक्त 4.सेकंदात 0 ते 100 किलोमीटर ताशी स्पीड पकडू शकते. अन्य फीचर्स पाहता, यात 12.3-इंचाची ड्रायव्हर फुली डिजिटल स्क्रीन आणि एक 9.0-इंचाची वर्टिकल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. तसेच वायरलेस चार्जिंग, पॅनोरमिक सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असे अनेक शानदार फीचर्स या कारमध्ये असतील. हे देखील वाचा: नादच खुळा! 11 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरी Tecno Spark 8P लाँच

पावर सोबतच या Volvo XC40 Recharge कारला अजून अ‍ॅडव्हान्स देखील बनवलं जात आहे, ज्यात Best-in-class navigation, Google Assistant, Google Pla, App remote services आणि Harman Kardon Premium Sound system सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. ही इलेक्ट्रिक एसयूवी कार 360-डिग्री कॅमेऱ्याला देखील सपोर्ट करेल त्यामुळे ड्रायव्हर आपल्या सीटवर बसून कारच्या चारही बाजूंना बघू शकेल. Volvo XC40 Recharge Electric SUV च्या किंमत व सेलची माहिती 26 जुलैला मिळेल.

The post अर्ध्या तासात 80 टक्के चार्जिंग; 418km ची दमदार रेंज असलेली Electric SUV Car येतेय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/418km-range-electric-car-volvo-xc40-recharge-suv-india-launch-26-july/feed/ 0