TRAI - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय https://www.91mobiles.com/marathi/trai-will-be-block-10-digit-unverified-number-which-using-for-telemarketing-promotional-call-message/ https://www.91mobiles.com/marathi/trai-will-be-block-10-digit-unverified-number-which-using-for-telemarketing-promotional-call-message/#respond Wed, 22 Feb 2023 10:18:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18058 TRAI Will Block 10 Digit Number: TRAI म्हणजे दूसरसंचार नियामक प्राधिकरणनं एका खूप मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायच्या निर्णयामुळे टेलिमार्केटिंग कंपन्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. एका रिपोर्टनुसार ट्राय त्या प्रमोशनल मेसेजेस आणि कॉल्सच्या विरोधात आता पाऊल उचलणार आहे जे मोबाइल युजर्सना त्यांच्या मर्जीविना पाठवले जातात. ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट सांगितलं आहे की त्यांनी प्रचारासाठी […]

The post हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ट्रायनं टेलिकंपन्यांना अनरजिस्टर्ड नंबर 30 दिवसांत बंद करण्यास सांगितले आहे.
  • नॉर्मल नंबरवरून प्रमोशनल मेसेज किंवा कॉल करून युजर्सना त्रास दिला जाऊ नये.
  • ट्रायच्या निर्णयामुळे लाखो फोन युजर्सना फायदा होणार आहे.

TRAI Will Block 10 Digit Number: TRAI म्हणजे दूसरसंचार नियामक प्राधिकरणनं एका खूप मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायच्या निर्णयामुळे टेलिमार्केटिंग कंपन्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. एका रिपोर्टनुसार ट्राय त्या प्रमोशनल मेसेजेस आणि कॉल्सच्या विरोधात आता पाऊल उचलणार आहे जे मोबाइल युजर्सना त्यांच्या मर्जीविना पाठवले जातात. ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट सांगितलं आहे की त्यांनी प्रचारासाठी अनरजिस्टर्ड नंबरचा वापर करू नये. आता ट्रायनं याबाबत कडक भूमिका घेतली आहे.

तुम्हाला कदाचित माहित नसेल की टेलिमार्केटिंगसाठी कंपन्यांना एक खास प्रकारचा नंबर दिला जातो जो नॉर्मल नंबरपेक्षा थोडा वेगळा असतो. प्रमोशनल कॉलसाठी टेलिकंपन्यांना स्पेशल नंबर मिळतो ज्यामुळे मोबाइल युजर्स नॉर्मल कॉल आणि प्रमोशनल कॉल मधील फरक समजू शकतात. परंतु अनेक कंपन्या या नियमांकडे दुर्लक्ष करून मोबाइल युजर्सना नॉर्मल 10 अंकी नंबरवरूनच काल करत आहेत. हे देखील वाचा: 6000mAh ची अवाढव्य बॅटरी! अत्यंत कमी किंमतीत Infinix Smart 7 भारतात लाँच

bsnl-90-days-validity-plan-180-gb-data-free-calling-ott-launched-stv-769

ट्रायनं घेतला कडक निर्णय

मोबाइल युजर्सना जबरदस्ती कॉल किंवा मेसेज करून त्रास देणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आता ट्राय कामाला लागली आहे. ट्रायनं एक आदेश जारी करून सांगितलं आहे की टेलिमार्केटिंग कंपन्यांनी प्रमोशनल कॉल किंवा मेसेजसाठी 30 दिवसांच्या आत नॉर्मल 10 अंकी नंबर्स बंद केले पाहिजेत. असे न केल्यास आणि या निर्णयाकडे दुर्लक्ष करून एखाद्या प्रमोशनल कॉलसाठी नॉर्मल नंबरचा वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल. हे देखील वाचा: एयरटेल युजर्सना धक्का; या 19 सर्कल्समधून काढून टाकला सर्वात स्वस्त प्लॅन

30 दिवसांत बंद होतील नंबर

TRAI नं सर्व टेलिकॉम कंपन्यांना नोटिस दिली आहे आणि 30 दिवसांत प्रमोशनल कॉलसाठी वापरण्यात येत असलेले अनरजिस्टर्ड नंबर बंद करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. जर तुम्ही एखाद्या नॉर्मल नंबरचा वापर प्रमोशनसाठी करत असाल तर त्वरित असं करणं बंद करा नाही तर तुमच्या विरोधातही कारवाई केली जाऊ शकते. यामुळे तुमचा मोबाइल नंबर बंद केला जाऊ शकतो. जे लोक अशा प्रमोशनल कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांनाही कंपनीच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

The post हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-will-be-block-10-digit-unverified-number-which-using-for-telemarketing-promotional-call-message/feed/ 0
आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम https://www.91mobiles.com/marathi/trai-caller-id-system-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/trai-caller-id-system-details-in-marathi/#respond Fri, 18 Nov 2022 10:35:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15108 अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स उचलणं सर्वानांच आवडत नाही. त्यावर उपाय म्हणून ट्रूकॉलर सारख्या अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. हे अ‍ॅप आपली मदत करतात परंतु आपला खाजगी डेटा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट सुरक्षित राहत नाही. तसेच वारंवार येणाऱ्या पॉप-अपचा वेगळाच त्रास होतो. परंतु आता येत्या काही दिवसात हे बदलू शकतं, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरसह त्या व्यक्तीचे […]

The post आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स उचलणं सर्वानांच आवडत नाही. त्यावर उपाय म्हणून ट्रूकॉलर सारख्या अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. हे अ‍ॅप आपली मदत करतात परंतु आपला खाजगी डेटा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट सुरक्षित राहत नाही. तसेच वारंवार येणाऱ्या पॉप-अपचा वेगळाच त्रास होतो. परंतु आता येत्या काही दिवसात हे बदलू शकतं, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरसह त्या व्यक्तीचे नाव देखील दिसेल. हे TRAI Caller ID System अंतगर्त होईल जी पूर्णपणे KYC Based असेल.

TRAI Caller ID System

ट्राय कॉलर आयडी सिस्टम भारत सरकारची नवीन योजना आहे जिच्यावर सध्या विचार सुरु आहे. सर्व मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असावेत तसेच जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करत असेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे फक्त कॉल करणाऱ्याचा मोबाइल नंबर नव्हे तर नंबरसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसावं अशी Telecom regulatory authority of india ची योजना आहे. हे तेच नाव असेल जे Adhaar Card वर असेल. हे देखील वाचा: OTT Releases this Week: या आठवड्यात ओटीटीवर Godfather, Dharavi Bank सह पाहा साऊथचे हे जबरदस्त चित्रपट

trai caller id system details in marathi

ट्राय कॉलर आयडीचा फायदा

ट्राय कॉलर आयडी सिस्टममध्ये कोणाचा फोन आल्यावर त्याचा नंबर आणि नाव दोन्ही स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे कॉल रिसीव करण्याआधी लोकांना त्यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजेल. हा नियम लागू झाल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख लपून राहणार नाही आणि त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील. भारत सरकारच्या या नियमानंतर ट्रूकॉलर सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची गरज भासणार नाही.

trai caller id system details in marathi

भारत सरकारची योजना

टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया येत्या तीन आठवड्यात आपल्या नव्या योजनेची घोषणा करू शकते. रिपोर्टनुसार ही पूर्णपणे केवायसी बेस्ड प्रक्रिया असेल. ज्या व्यक्तीच्या नावावर एखादं सिम कार्ड (Sim Card) इश्यू झालं असेल, त्या मोबाइल नंबरद्वारे कॉल केल्यावर तेच नाव दुसऱ्या व्यक्तीच्या फोनमध्ये दिसेल. हे देखील वाचा: काही मिनिटांत फुलचार्ज होईल विवोचा हा सुंदर फोन; कमी किंमतीत 12GB RAM सह 50MP Camera

सध्या अंदाज लावला जात आहे की हे नाव स्वतःहून बदलता येणार नाही तसेच आधार कार्ड किंवा ज्या ओळखपत्राच्या मदतीनं सिम विकत घेतलं असेल, तेच नाव TRAI Caller ID System मध्ये नोंदवलं जाईल. सध्यातरी ट्रायच्या या नव्या योजनेविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसांत भारतात लागू होणाऱ्या या नियमाविषयी सरकारकडून माहिती दिली जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-caller-id-system-details-in-marathi/feed/ 0
Reliance Jio, BSNL आणि Airtel सह या कंपन्यांना बसला 35 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/trai-fines-bsnl-airtel-reliance-jio-8-telecom-company-rs-35-crore/ https://www.91mobiles.com/marathi/trai-fines-bsnl-airtel-reliance-jio-8-telecom-company-rs-35-crore/#respond Thu, 26 Nov 2020 13:17:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9080 बीएसएनएल नंतर फेक एसएमएस पाठवण्याच्या प्रकरणात सर्वात जास्त दंड Vodafone Idea ला लागला आहे.

The post Reliance Jio, BSNL आणि Airtel सह या कंपन्यांना बसला 35 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TRAI अर्थात् टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडियाने वापरकर्त्यांना फेक एसएमएस पाठवण्याच्या केस मध्ये देशातील टेलिकॉम कंपन्यांना मोठा दंड ठोठावला आहे. ट्रायने या कंपन्यांवर वर एकूण 35 कोटी रुपयांचा फाइन लावला आहे. या 8 कंपन्यांमध्ये BSNL, Reliance Jio, Airtel, VI म्हणजे Vodafone Idea, MTNL, Tata Teleservices, Videocon आणि Quadrant Teleservices सारख्या नावांचा समावेश आहे ज्यांना दंड भरावा लागेल.

बातमीबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर या कंपन्यांवर त्यांच्या नेटवर्कच्या त्या युजर्सची माहिती सायबर क्रिमिनल्सना वापरण्याची परवानगी दिली होती जे आपल्या फोन वर डिजिटल पेमेंट करण्यासाठी वॉलेट ऍप्सचा वापर करतात, असा आरोप आहे. हे डिटेल्स वापरून इंटरनेट वर फसवणूक करणाऱ्या लोकांनी मोबाईल युजर्सच्या नंबर वर फेक एसएमएस पाठवायला सुरवात केली होती, जे सायबर क्राईमच्या श्रेणीत येते. ट्रायनुसार या टेलिकॉम कंपन्यांनी टेलिकॉम कमर्शल कम्युनिकेशन कस्टमर प्रीफरेंस रेगुलेशनचे उल्लंघन केले आहे.

BSNL वर सर्वात जास्त दंड

या आठ कंपन्यांपैकी TRAI ने सर्वात जास्त दंड BSNL कंपनीला ठोठावला आहे. या सरकारी दूरसंचार कंपनीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम 30.1 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार या दंडाचा निर्णय घेण्याआधी ट्रायने बीएसएनएल ला ‘कारणे दाखवा नोटिस’ पण पाठवली होती, ज्याचे उत्तर कंपनीने दिले नाही. सोबतच बीएसएनएल परफॉर्मन्स मॉनिटरिंग रिपोर्ट पण ट्रायला दाखवू शकली नाही.

हे देखील वाचा : TRAI च्या या निर्णयामुळे Jio ला झटका, एयरटेल आणि वोडाफोनला दिलासा

कोणाला बसला किती दंड

बीएसएनएल नंतर फेक एसएमएस पाठवण्याच्या प्रकरणात सर्वात जास्त दंड Vodafone Idea ला लागला आहे. या दंडाची रक्कम 1.82 कोटी रुपये आहे. या लिस्ट मध्ये तिसऱ्या नंबर वर Quadrant Teleservices आहे जिला 1.41 कोटी रुपये दंड द्यावा लागेल तसेच यानंतर Airtel कंपनीचे नाव चौथ्या नंबर वर आले आहे जिला 1.33 कोटी रुपयांचा दंड द्यावा लागेल. रिलायंस जियो, एमटीएनएल व इतर कंपन्यांची नवे यादीत यांनतर आहेत.

प्रकरण आहे तरी काय

फेक एसएमएस आणि स्पॅम कॉलचा खेळ नवीन नाही. ग्राहकांना फेक एसएमएस पाठवणारे आणि स्पॅम कॉल करणाऱ्या अश्याच सर्विस प्रोवाइडरच्या विरोधात दिल्ली हायकोर्टाने ने सप्टेंबर मध्ये ट्रायला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच ट्रायनुसार कि या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या नेटवर्क वरून जाणारे एसएमएस योग्यरीत्या मॉनिटर केले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना दंड भरावा लागला आहे. मॉनिटरिंग चुकीची झाल्यामुळे युजर्सना फेक एसएमएस आणि कॉल्स मिळत होते. ट्रायच्या या निर्णयाचा फायदा पेटीएम सारख्या डिजिटल पेमेंट कंपन्यांना नक्की होईल.

The post Reliance Jio, BSNL आणि Airtel सह या कंपन्यांना बसला 35 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-fines-bsnl-airtel-reliance-jio-8-telecom-company-rs-35-crore/feed/ 0
1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/ https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/#respond Fri, 03 Jan 2020 10:53:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6181 ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

The post 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राई देशातील टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ट्राईच्या नवीन नियमांनुसार आता येत्या 1 मार्च 2020 पासून टीव्ही ग्राहकांना 130 रुपयांमध्ये (टॅक्स वगळता) कमीत कमी 200 फ्री टू एयर चॅनेल बघायला मिळतील. याआधी ग्राहकांना 130 रुपयांमध्ये फक्त 100 चॅनेल मिळत होते.

पुन्हा बदलेल चॅनेल्सची किंमत

ट्राईने स्पष्ट केले आहे कि कंपन्यांना नवीन टॅरिफची माहिती 15 जानेवारी पर्यंत आपल्या वेबसाइट वर अपडेट करावी लागेल. 30 जानेवारी पर्यंत पुन्हा सर्व चॅनेल्सची रेट लिस्ट अपडेट केली जाईल, ज्यानंतर ग्राहक चॅनेल नवीन किंमतींसह निवडू शकतील. ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/09/oneplus-tv-main-image.jpg

ट्राईच्या नवीन नियमानंतर केबल ऑपरेटर आपल्या ग्राहकांकडून फ्री चॅनल्ससाठी प्रतिमाह 160 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊ शकणार नाही. इतकेच नव्हे तर 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारे सर्व टीव्ही चॅनेल कोणत्याही बुकेचा भाग असणार नाहीत. जर ग्राहकनाची इच्छा असेल तर ते हे चॅनल्स घेऊ शकतील. याआधी ग्राहकांना जबरदस्तीने 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत किंमत असणारे टीव्ही चॅनेल बुके मध्ये घ्यावे लागत होते.

साल 2019 मध्ये भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजे ट्राईने केबल आणि डीटीएच सब्सक्राइबर्सना आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या नवीन नियमानंतर ग्राहक आपल्या वापरानुसार, चॅनेलची लोकप्रियता तसेच भाषेच्या आधारावर निवड करू शकत होते. यामुळे त्यांना फक्त त्याच चॅनेल्ससाठी पैसे द्यावे लागतात जे त्यांना बघायचे आहेत. यात किड्स चॅनेल्स, मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनेल्स सह प्रादेशिक भाषांचा पण समावेश आहे.

त्याआधी केबल ऑपरेटर व डीटीएच सर्विसेजकडून ग्राहकांना मंथली पॅकेज मिळायचे. या पॅकेज मध्ये कोणत्या चॅनेलची किंमत किती आहे तसेच कोणता चॅनेल फ्री आहे हि माहिती कधीही यूजर्सना मिळत नसे. पण आता असे होत नाही.

The post 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/feed/ 0
बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट https://www.91mobiles.com/marathi/mobile-number-portability-mnp-new-rules-from-11-november-trai-india-jio-airtel-vodafone-idea-bsnl/ https://www.91mobiles.com/marathi/mobile-number-portability-mnp-new-rules-from-11-november-trai-india-jio-airtel-vodafone-idea-bsnl/#respond Mon, 04 Nov 2019 11:35:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5660 हि सर्विस 11 नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरु होईल.

The post बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्या मोबाईल यूजर्सना आकर्षित करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ग्राहक टिकवण्यासाठी नवनवीन व आर्कषक प्लान्स घेऊन येतात, पण तरीही भारतात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी सर्विसचा वापर खूप जास्त केला जातो. काही भारतीय यूजर आपल्या सर्विस प्रोवाइडरमुळे नाखुश आहेत तर काही ग्राहकांना दुसऱ्या कंपनीचे आकर्षक प्लान्स हवे असतात. भारतात Mobile Number Portability म्हणजे MNP लवकरच नवीन रूप घेणार आहे. MNP ची हि नवीन प्रणाली तयार झाली आहे पण तिचा लाभ घेण्याआधी यूजर्सना थोडी वाट बघावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाले तर आज म्हणजे 4 नोव्हेंबर पासून 11 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण देशात MNP सर्विस बंद केली जात आहे.

टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI ने देशात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी सर्विस बदलण्याची घोषणा केली आहे. TRAI च्या आदेशाचे पालन देशातील सर्व टेलीकॉम कंपन्यांना करावे लागेल. ट्राईच्या निर्णयानंतर भारतात MNP सर्विसचा चेहरामोहरा बदलून जाईल पण त्याआधी Reliance Jio, Bharti Airtel तसेच Vodafone Idea सहित BSNL च्या उपभोक्त्यांना काही काळ आपला नंबर पोर्ट करता येणार नाही.

आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही सर्विस बंद

TRAI च्या आदेशानुसार आज म्हणजे 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच देशात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी बंद केली होईल. पण हि बंदी काही काळासाठी आहे जी 11 नोव्हेंबरला उठवली जाईल. 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत कोणताही यूजर MNP अंतर्गत आपला नंबर दुसऱ्या नेटवर्क वर पोर्ट करू शकणार नाही. लक्षात असू दे कि ज्या युजर्सना 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्याच्या आधी आपल्या फोन मधून पोर्ट मेसेज पाठवून UPC कोड जेनरेट केला आहे त्यांच्यासाठी MNP सर्विस चालू राहील.

पोर्ट प्रक्रियेबद्दल बोलायचे तर आपला नंबर दुसऱ्या कपंनीत पोर्ट करण्यासाठी 1900 वर आपल्या नंबर सह अशी PORT 91xxxxx पोर्ट रिक्वेस्ट पाठवावी लागत होती. हा मेसेज केल्यानंतर ऑपरेटर कडून UPC कोड पाठवला जायचा, जो काही दिवसांसाठी वैध असायचा आणि मग एक्सपायर व्हायचा. हा UPC कोड दुसऱ्या नेटवर्क ऑपरेटरला दाखवून त्या कंपनीत नंबर पोर्ट व्हायचा. पण आता 11 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही यूजरला PORT रिक्वेस्ट पाठवून UPC कोड मिळणार नाही. हि सर्विस 11 नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरु होईल.

फक्त 2 दिवसांत होईल नंबर पोर्ट

आता पर्यंत आपला नंबर पोर्ट करण्यासाठी यूजरला साधारणतः एका आठवड्यची वाट बघावी लागत होती. पण आता TRAI च्या नवीन नियमांतर्गत सर्व कंपन्यांना असा आदेश दिला जाणार आहे कि नंबर पोर्ट करण्याच्या प्रक्रियाच वेळ 7 दिवसांच्या ऐवजी फक्त 2 दिवस केला जावा. TRAI येत्या 11 नोव्हेंबरला आपले नवीन दिशानिर्देश आणि नियम सार्वजनिक करणार आहे. आणि त्यानंतर भारतात MNP सर्विस मध्ये मोठा बदल मिळेल.

रिंग टाईमची मर्यादा झाली 30 सेकंद

तुम्हाला सांगू इच्छितो कि TRAI ने सर्व ऑपरेटर्स साठी 30 सेकंदांची रिंग टाइम निर्धारित केली आहे. मागे झालेल्या टेलीकॉम जगातील उलथापालथानंतर ट्राई ने नवीन नियम जाहीर करून सर्व कंपन्यांना रिंग टाईम 30 सेकंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ट्राईचा हा निर्णय Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone Idea आणि BSNL सर्वांना पाळावा लागेल तसेच हा नियम इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही कॉल्स वर लागू होईल.

The post बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mobile-number-portability-mnp-new-rules-from-11-november-trai-india-jio-airtel-vodafone-idea-bsnl/feed/ 0
4जी डाउनलोड स्पीड मध्ये Jio पुन्हा एक नंबर, वोडाफोन ने इथे मारली बाजी https://www.91mobiles.com/marathi/jio-4g-download-speed-top-in-august-2019/ https://www.91mobiles.com/marathi/jio-4g-download-speed-top-in-august-2019/#respond Tue, 17 Sep 2019 12:52:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5336 एका महिन्यात जियोने 0.3 एमबीपीएस स्पीड वाढवला आहे.

The post 4जी डाउनलोड स्पीड मध्ये Jio पुन्हा एक नंबर, वोडाफोन ने इथे मारली बाजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नवीन सरासरी 4G डाउनलोड स्पीडचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळी ट्राईने ऑगस्ट महिन्याचे आकडे जाहीर केले आहेत, ज्यात रिलायंस जियोने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ऑगस्ट मध्ये जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 21.3 एमबीपीएस होता जो जुलै मध्ये 21 एमबीपीएस होता. याचा अर्थ असा कि एका महिन्यात जियोने 0.3 एमबीपीएस स्पीड वाढवला आहे.

कंपनीने 4जी डाउनलोड स्पीड मध्ये हे स्थान मिळवण्याची हि पहिली वेळ नाही. याआधी पण कंपनी 8 महिने 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत टॉपला राहिली आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये मध्ये पण रिलायंस जियो स्पीडच्या बाबती सर्वात वेगवान 4जी ऑपरेटर होती. 2018 मध्ये बाराही महिने जियोचा 4जी सरासरी डाउनलोड स्पीड सर्वात जास्त होता.

TRAI ने प्रकाशित केलेल्या आकड्यांनुसार ऑगस्ट मध्ये भारती एयरटेलचा 4जी डाउनलोड स्पीड 8.2 एमबीपीएस नोंदवण्यात आला आहे. याआधी जुलै मध्ये हा स्पीड 8.8 एमबीपीएस, एप्रिल मध्ये 9.5 एमबीपीएस, मे मध्ये 9.3 एमबीपीएस आणि जून मध्ये 9.2 एमबीपीएस होता. या आकड्यांच्या आधारवर असे म्हणता येईल कि एयरटेलच्या 4जी डाउनलोड स्पीड मध्ये घसरण होत आहे.

हे देखील वाचा: Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट

दूसरी ओर वोडाफोन आणि आइडिया सेल्युलरने यांचे विलीनीकरण झाले आहे आणि आता वोडाफोन आइडिया नावाने काम चालू पण ट्राई दोन्हीचे आकडे वेगवेगळे दाखवते. आइडियाने ऑगस्ट मध्ये 4जी डाउनलोड स्पीड 6.1 एमबीपीएस नोंदवला आहे. तर वोडाफोन नेटवर्कच्या सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड मध्ये कोणताही बदल नाही. जुलै प्रमाणे ऑगस्ट मध्ये पण वोडाफोनचा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड 7.7 एमबीपीएस आहे.

इथे वोडाफोनने मारली बाजी

जियो सरासरी 4जी डाउनलोड स्पीड मध्ये टॉपला आहे तर ऑगस्ट मध्ये 5.5 एमबीपीएस सह वोडाफोन सरासरी 4 जी अपलोड स्पीडच्या यादीत सर्वात वर आहे. वोडाफोनचा अपलोड स्पीड जुलैच्या तुलनेत कमी आहे. जुलै मध्ये वोडाफोनचा 4जी अपलोड स्पीड 5.8 एमबीपीएस होता.

हे देखील वाचा: OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर

आइडिया आणि एयरटेलचा ऑगस्ट मध्ये सरासरी 4जी अपलोड स्पीड क्रमशः 5.1 एमबीपीएस आणि 3.1 एमबीपीएस होता. दोघांचाही सरासरी 4 जी अपलोड स्पीड काहीसा कमी झाला आहे. तर Jio ने 4.4 एमबीपीएस सरासरी 4जी अपलोड स्पीड देत सुधारणा दाखवली आहे.

ट्राई सरासरी स्पीडची माहिती रियल टाइम आकड्यांच्या आधारावर देते. जे ट्राईच्या माईस्पीड ऍपच्या मदतीने गोळा केले जातात.

The post 4जी डाउनलोड स्पीड मध्ये Jio पुन्हा एक नंबर, वोडाफोन ने इथे मारली बाजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-4g-download-speed-top-in-august-2019/feed/ 0
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झाली स्वस्त, आता द्यावे लागतील 6 रुपयांपेक्षा कमी पैसे https://www.91mobiles.com/marathi/trai-said-new-mobile-portability-fee-from-september-30/ https://www.91mobiles.com/marathi/trai-said-new-mobile-portability-fee-from-september-30/#respond Thu, 12 Sep 2019 12:52:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5290 मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची नवीन किंमत 30 सप्टेंबर पासून लागू केली जाईल

The post मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झाली स्वस्त, आता द्यावे लागतील 6 रुपयांपेक्षा कमी पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल यूजर्स साठी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने साल 2011 मध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) ची सुरवात केली होती. तेव्हा यूजर्सना एक नेटवर्क वरून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जाण्यासाठी 19 रुपये दयावे लागत होते. पण आता ते कमी करण्यात आले आहेत.

जरी याचा सब्सक्राइबर्सना काही खास फायदा होणार नसला तरी देशातील टेलीकॉम ऑपरेटर्स साठी हि चांगली बातमी आहे. ट्राई ने आता मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची नवीन किंमत 5.74 रुपये ठरवली आहे.

इकनॉमिक टाइम्स कडे बोलताना ट्राई चे चेयरमेन आर.एस. शर्मा यांनी सांगितले कि मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची नवीन किंमत 30 सप्टेंबर पासून लागू केली जाईल. यामुळे जिथे आधी 19 रुपये द्यावे लागत होते तेथे आता 5.74 रुपये द्यावे लागतील.

या नवीन किंमतीचा फायदा टेलिकॉम ऑपरेटर्सना होईल. प्रत्येक मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी ट्रँजॅक्शन साठी ऑपरेटर्सने पैसे द्यावे लागतात. आता नंबर पोर्ट करणाऱ्या यूजर्समागे टेलीकॉम ऑपरेटर्सना प्रत्येक नवीन ग्राहकासाठी 5.74 रुपये दयावे लागतील.

नोट: मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी यूजर्सना कोणतीही किंमत द्यावी लागत नाही.

The post मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झाली स्वस्त, आता द्यावे लागतील 6 रुपयांपेक्षा कमी पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-said-new-mobile-portability-fee-from-september-30/feed/ 0
Reliance Jio पुन्हा ठरला देशातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vodafone-idea-airtel-4g-download-upload-speed-india-trai-july-2019-report/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vodafone-idea-airtel-4g-download-upload-speed-india-trai-july-2019-report/#respond Mon, 19 Aug 2019 16:35:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5058 अपलोड स्पीड बद्दल बोलायचे झाले तर इथे Vodafone चे नाव सर्वात वर आहे.

The post Reliance Jio पुन्हा ठरला देशातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance ने गेल्या आठवड्यात आपल्या 42व्या ऍन्युल जनरल मीटिंग (AGM) च्या मंचावरून Jio Fiber ची घोषणा केली आहे. टेलीकॉम मार्केट मध्ये यश मिळवल्यानंतर या सर्विस सोबत Jio देशातील ब्रॉडबँड बाजारात प्रवेश करत आहे. थोड्याच काळात Vodafone Idea आणि Airtel ला मागे टाकत Jio देशातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा देणारी कंपनी बनली आहे. Reliance Jio एकीकडे खूप कमी किंमतीत आपल्या सेवा देत आहे तर कंपनी सर्विसच्या बाबतीत प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा कितीतरी पुढे गेली आहे. असाच खुलासा TRAI च्या नवीन रिपोर्ट मध्ये पण झाला आहे.

टेलीकॉम रेग्युलरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI ने आपला रिपोर्ट सादर केला आहे ज्यात जुलै महिन्याचे वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांनी दिलेला 4G स्पीड चा लेखाजोखा आहे. या रिपोर्ट मध्ये आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत कि Jio फक्त देशात सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देत नाही तर Jio चा स्पीड Vodafone Idea आणि Airtel सारख्या कंपन्यांपेक्षा दुप्पटीने जास्त आहे.

4G डाउनलोड स्पीड

TRAI नुसार जुलै 2019 मध्ये Reliance Jio ने 4G नेटवर्क वर सरासरी 21.0 एमबीपीएस चा डाउनलोड स्पीड दिला आहे. या स्पीड सह Jio ने पुन्हा एकदा देशातील सर्वात वेगवान 4जी नेटवर्क असल्याचे सिद्ध झाले आहे. Jio नंतर Airtel कंपनी दुसऱ्या नंबर वर आहे. जुलै महिन्यात Airtel नेटवर्क वर सरासरी 4G डाउनलोड स्पीड 8.8 एमबीपीएस मोजण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नंबर वरील कंपन्यांच्या मध्ये दुपटीपेक्षा जास्त अंतर आहे.

या रिपोर्ट नुसार Vodafone नेटवर्क तिसऱ्या नंबर वर आहे. जुलै 2019 मध्ये Vodafone नेटवर्क वर 7.7 एमबीपीएस चा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड आला आहे. तर 6.6 एमबीपीएस सरासरी 4जी डाउनलोड स्पीड देत Idea चे नाव चौथ्या नंबर वर आहे.

4G अपलोड स्पीड

त्याचप्रमाणे 4G नेटवर्क वर अपलोड स्पीड बद्दल बोलायचे झाले तर इथे Vodafone चे नाव सर्वात वर आहे. जुलै मध्ये वोडाफोन ने 5.8 एमबीपीएस चा सरासरी 4जी अपलोड स्पीड दिला आहे जो सर्व कंपन्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यानंतर Idea चे नाव दुसऱ्या नंबर वर आहे. जुलै 2019 मध्ये आइडिया नेटवर्क वर सरासरी 4जी डाउनलोड स्पीड 5.3 एमबीपीएस चा आहे.

4G नेटवर्क वर सरासरी अपलोड स्पीड मध्ये Reliance Jio तिसऱ्या स्थानावर आहे. Jio ने जुलै 2019 मध्ये 4.3 एमबीपीएस चा सरासरी 4G अपलोड स्पीड दिला आहे. तसेच 3.2 एमबीपीएस चा सरासरी 4जी अपलोड स्पीड देते Airtel ला चौथे स्थान मिळाले आहे.

The post Reliance Jio पुन्हा ठरला देशातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vodafone-idea-airtel-4g-download-upload-speed-india-trai-july-2019-report/feed/ 0
भारतात मोबाईल युजर्सची संख्या 116 कोटीच्या वर, बघा कोणाचा झाला फायदा आणि कोणचे नुकसान https://www.91mobiles.com/marathi/trai-march-2019-report-india-mobile-user-reliance-jio-vodafone-idea-bharti-airtel/ https://www.91mobiles.com/marathi/trai-march-2019-report-india-mobile-user-reliance-jio-vodafone-idea-bharti-airtel/#respond Wed, 22 May 2019 13:26:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4364 मार्च 2019 मध्ये 5.30 मिलियन युजर्सनी आपले नेटवर्क बदलण्यासाठी एमएनपी म्हणजे Mobile Number Portability (MNP) ची रिक्वेस्ट टाकली होती.

The post भारतात मोबाईल युजर्सची संख्या 116 कोटीच्या वर, बघा कोणाचा झाला फायदा आणि कोणचे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत जगात सर्वात वेगवान विकसित होणारा मोबाईल बाजार आहे. सध्या देशात 1,021.75 मिलियन म्हणजे जवळपास 102 कोटी मोबाईल युजर्स आहेत. गेल्या काही वर्षांत भारताच्या मोबाईल बाजारात रेकॉर्ड वाढ झाली आहे. या वाढीचे श्रेय थेट Reliance Jio ला दिले जात आहे. जियोच्या एंट्री नंतरच इंटरनेट डेटा आणि वॉयस कॉलिंग पॅकच्या किंमती कमी झाल्या आहेत. आता ट्राईच्या ताजा रिपोर्टने पण स्पष्ट केले आहे कि गेल्या महिन्यात इंडियन टेलीकॉम कंपन्यांचा यूजरबेस कमी झाला आहे पण Jio ने आपला यूजर बेस अजून मजबूत केला आहे.

जियोला फायदा तर वोडाफोन आइडिया आणि एयरटेलचे नुकसान
टेलीकॉम कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर मार्च मध्ये Reliance Jio ने 9.4 कोटी नवीन युजर्सना आपल्या नेटवर्कशी जोडले आहे. जियोच्या यूजरबेस मध्ये वाढ झाली आहे तर Vodafone Idea आणि Airtel टेलीकॉम कंपन्यांचे युजर्स आधीपेक्षा कमी झाले आहेत. ट्राईच्या रिपोर्ट नुसार फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत Vodafone Idea चे 14.5 मिलियन उपभोक्ता कमी झाले आहेत तर Airtel ने 15.1 मिलियन युजर्स गमावले आहेत.

एका महिन्यात झालेल्या या मोठ्या बदलानंतर 31 मार्च 2019 पर्यंत Reliance Jio चा उपभोक्ता आधार 307.7 मिलियन झाला आहे. म्हणजे जियो नेटवर्क वर एकूण 30.7 कोटी युजर्स जोडले गेले आहेत. तर याच तारखेपर्यंत Vodafone Idea नेटवर्क वर एकूण 394.8 मिलियन म्हणजे 39.48 कोटी युजर्स मोजले गेले आहेत तसेच Bharti Airtel ची एकूण युजर्स संख्या 325.2 मिलियन म्हणजे 32.52 कोटी आहे.

हे देखील वाचा: पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Realme X, किंमत असेल जवळपास 18 हजार रुपये

मार्च मध्ये कमी झाले युजर्स
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) ने मार्च महिन्याचा रिपोर्ट सादर केला आहे ज्यात इंडियन मोबाईल बाजार सोबत टेलीकॉम कंपन्यांची पण आकडेवारी आहे. ट्राईने सांगितले आहे कि मार्च मध्ये भारताची एकूण मोबाईल ग्राहक संख्या 116.18 कोटी आहे. हैराणीची बाब म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये हा आकडा 118.36 कोटी होता. म्हणजे एका महिन्यात 2.18 कोटी मोबाईल यूजर कमी झाले आहेत.

ट्राई नुसार जियो नेटवर्क वर वाढ झाली तर वोडाफोन आइडिया आणि एयरटेलला नुकसान झाले नंतर देशातील एकूण मोबाईल युजर्सची संख्या कमी झाली आहे. सोबतच भारताची टेलीडेन्सिटी पण आधीपेक्षा 1.82 टक्के घटली आहे. फेब्रुवारी मध्ये देशाची टेलीडेन्सिटी 91.86 टक्के होती पण मार्च 2019 मध्ये भारताची टेलीडेन्सिटी कमी होऊन 90.11 टक्क्यांपर्यंत पोचली आहे.

हे देखील वाचा: 48MP कॅमेऱ्यासह 28 मे ला समोर येईल Redmi K20 स्मार्टफोन, करेल सर्वांची सुट्टी

गावात कमी झाले जास्त यूजर
या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या शहरांत 65.65 कोटी मोबाईल युजर्स होते जे मार्च 2019 मध्ये कमी होऊन 65.04 कोटी झाले आहेत. तर ग्रा​मीण भागांत मार्च 2019 मध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या 51.13 कोटी होती जी फेब्रुवारी 2019 मध्ये 52.71 कोटी होती. म्हणजे शहरी क्षेत्रात मोबाईल युजर्सची संख्या 0.90 टक्के कमी झाली तर ग्रामीण विभागात 2.98 टक्के युजर्स कमी झाले आहेत.

ऍक्टिव्ह युजर्स बद्दल बोलायचे तर सध्या सर्वात जास्त ऍक्टिव्ह युजर्स Airtel नेटवर्कशी जोडलेले आहेत. Airtel चे 100 टक्के ऍक्टिव्ह युजर्स आहेत. तर Vodafone Idea चे ऍक्टिव्ह यूजर 93.27 टक्के आहेत तसेच Reliance Jio चे सर्वात कमी 84 टक्के ऍक्टिव्ह युजर्स आहेत. विशेष म्हणजे मार्च 2019 मध्ये 5.30 मिलियन युजर्सनी आपले नेटवर्क बदलण्यासाठी एमएनपी म्हणजे Mobile Number Portability (MNP) ची रिक्वेस्ट टाकली होती.

The post भारतात मोबाईल युजर्सची संख्या 116 कोटीच्या वर, बघा कोणाचा झाला फायदा आणि कोणचे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-march-2019-report-india-mobile-user-reliance-jio-vodafone-idea-bharti-airtel/feed/ 0
पुन्हा एकदा 4जी डाउनलोड स्पीड मध्ये जियोने मारली बाजी तर वोडाफोन ने केली हि कामल, बघा इतर कंपन्यांचे हाल https://www.91mobiles.com/marathi/jio-4g-download-speed-top-in-february-2019-trai-report/ https://www.91mobiles.com/marathi/jio-4g-download-speed-top-in-february-2019-trai-report/#respond Fri, 15 Mar 2019 14:44:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3878 रती एयरटेलचा डाउनलोड स्पीड 9.5 एमबीपीएस वरून कमी होऊन फेब्रुवारीत 9.4 एमबीपीएस झाला आहे.

The post पुन्हा एकदा 4जी डाउनलोड स्पीड मध्ये जियोने मारली बाजी तर वोडाफोन ने केली हि कामल, बघा इतर कंपन्यांचे हाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दूरसंचार नियामक ट्राई ने यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या जाहीर केलेल्या ताजा आकड्यांनुसार सरासरी 4G डाउनलोड स्पीड मध्ये रिलायंस जियो ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. फेब्रुवारी मध्ये जियोने सरासरी डाउनलोड स्पीड 20.9 एमबीपीएएस नोंदवला, जो जानेवारी मधील 18.8 एमबीपीएस स्पीड पेक्षा जास्त आहे.

गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये सर्वात वेगवान 4 जी ऑपरेटरचे स्थान पण रिलायंस जियो कडे होते, जियोचा डाउनलोड स्पीड वर्षभरात सर्वांपेक्षा जास्त होता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) द्वारा जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, भारती एयरटेलचा डाउनलोड स्पीड 9.5 एमबीपीएस वरून कमी होऊन फेब्रुवारीत 9.4 एमबीपीएस झाला आहे.

शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत

वोडाफोन आणि आइडिया सेल्युलर एक झाल्या आहेत आणि आता वोडाफोन आइडिया म्हणून काम करत आहे. पण ट्राई ने दोन्ही नेटवर्कचा डाउनलोड, अपलोड स्पीड वेगवेगळा दाखवला आहे. वोडाफोन नेटवर्कचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड जानेवारीतील 6.7 एमबीपीएस वरून वाढत फेब्रुवारीत 6.8 एमबीपीएस झाला आहे.

आइडिया ने पण जानेवारीत 5.5 एमबीपीएस स्पीड मध्ये सुधार दाखवला आहे. फेब्रुवारीत त्यांचा सरासरी डाउनलोड स्पीड 5.7 एमबीपीएस झाला आहे. फेब्रुवारीत वोडाफोन ने 4जी अपलोड स्पीड मध्ये नंबर एकचे स्थान मिळवले आहे. पहिले स्थान कंपनीने आइडियाला मागे टाकून मिळवले आहे. जानेवारीत आइडिया अपलोड स्पीड मध्ये नंबर एक होती. वोडाफोनचा 4जी अपलोड स्पीड गेल्या महिन्याच्या 5.4 एमबीपीएस वरून वाढून फेब्रुवारीत 6.0 एमबीपीएस झाला आहे.

3 कॅमेरा आणि क्वॉलकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च झाले असूसचे दोन फोन, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फेब्रुवारीत आइडिया आणि एयरटेल नेटवर्कच्या सरासरी 4जी अपलोड स्पीड मध्ये थोडी घसरण दिसली आहे. आइडियाचा 4जी अपलोड स्पीड 5.6 एमबीपीएस आणि एयरटेल चा 3.7 एमबीपीएस आहे. विशेष म्हणजे Jio चा सरासरी अपलोड स्पीड सुधारला आहे जो फेब्रुवारीत 4.5 एमबीपीएस आहे. ट्राई द्वारा सरासरी स्पीडची मोजणी केलेल्या आकड्यांच्या आधारे केली जाते जी रिअल टाईम आधारवर माईस्पीड ऍप्लिकेशनच्या मदतीने केली जाते.

The post पुन्हा एकदा 4जी डाउनलोड स्पीड मध्ये जियोने मारली बाजी तर वोडाफोन ने केली हि कामल, बघा इतर कंपन्यांचे हाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-4g-download-speed-top-in-february-2019-trai-report/feed/ 0