Vivo T3x 5G ची किंमत लाँचच्या आधी लीक, 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल हा फोन!

Vivo T3x 5G फोन 17 एप्रिलला भारतात लाँच होईल. हा फोन भारतीय बाजारात घोषणा होण्यामध्ये फक्त एक दिवस राहिला आहे तसेच लाँचच्या ठिक पहिले याची किंमत इंटरनेट वर लीक झाली आहे. या मोबाईलची ऑफर किंमत समोर आली आहे, ज्यानुसार विवो टी 3 एक्स 15 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये विकला जाईल. फोनची लीक झालेली किंमत व स्पेसिफिकेशन तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo T3x ची भारतातील किंमत (लीक)

  • 4GB RAM + 128GB Storage = ₹12,999 रुपये
  • 6GB RAM + 128GB Storage = ₹13,999 रुपये

विवो टी 3 एक्स 5 जी फोनची किंमत टिपस्टर अभिषेक यादवने शेअर केली आहे. लीकमध्ये फोनची ऑफर किंमत समोर आली आहे. लीकनुसार हा मोबाईल दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम सामिल असणार आहे. टिपस्टरनुसार कॅशबॅक व डिस्काऊंटनंतर बेस व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6 जीबी रॅमची इफेक्टिव किंमत 13,999 किंवा 14,999 रुपये असू शकते.

Vivo T3x ची परफॉर्मन्स

लाँचच्या आधी ही कंपनीकडून सांगण्यात आले आहे की विवो टी 3 एक्स 5 जी फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच होईल. हा 4nm फेब्रिकेशनवर बनलेला मोबाईल चिपसेट आहे जो 2.2GHz पर्यंत क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. Vivo ने सांगितले आहे​ की त्यांच्या फोनने 560K AnTuTu मिळवले आहे. तसेच या आठवड्यात भारतात लाँच झाला realme P1 Pro 5G फोन पण या चिपसेटसह आला आहे.

Vivo T3x चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.72″ FHD+ LCD 120Hz Display
  • 50MP + 2MP Camera
  • 8MP Selfie Camera
  • 6,000mAh Battery
  • 44W Charging

बॅटरी : ब्रँडकडून कंफर्म करण्यात आले आहे की Vivo T3x 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी जबरदस्त 6,000 एमएएच बॅटरी दिली जाईल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलला 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिले जाईल.

स्क्रीन : वीवी टी 3 एक्स स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे, तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Vivo T3x मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाईल. लीकनुसार हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सल मेन रिअर कॅमेरा सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्सला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी विवो टी 3 एक्समध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा पाहायला मिळू शकतो.

इतर फिचर्स : विवो टी 3 एक्स अँड्रॉईड 14 वर लाँच होईल. लीकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये IP64 rating, Side mounted fingerprint scanner आणि Dual stereo speakers पण पाहायला मिळतील. विवोनुसार या फोनची जाडी फक्त 0.799cm असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here