Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री

वीवोने भारतीय ग्राहकांना भेट देत आपल्या स्मार्टफोन Vivo V20 SE स्वस्त केला आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि Vivo V20 SE आता 1,000 रुपये कपातीसह विकत घेता येईल. इतकेच नव्हे तर फोनसह एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 2,000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळेल. Vivo V20 SE मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात सुपर नाइट मोड सपोर्ट आहे. हा फोन कंपनीने Vivo V20 सीरीज मध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सादर केला होता. (vivo v20 se price cut rs 1000 sale india)

नवीन किंमत

Vivo V20 SE चा 8GB + 128GB मॉडेल कंपनीने 20,990 रुपयांमध्ये सादर केला होता. पण, आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर हा फोन 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. फोनच्या नवीन किंमतीची माहिती स्वतः वीवो CEO Jerome Chen यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून शेयर केली आहे. फोन दोन रंगात येतो, ज्यात एक्वामरीन ग्रीन आणि ग्रेविटी ब्लॅकचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 22 मार्चला लॉन्च होईल पावरफुल फीचर्स असलेला OPPO Reno 5F, सॅमसंग आणि शाओमीला मिळेल आव्हान

स्पेसिफिकेशन्स

वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो वी20 एसई व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here