4020एमएएच बॅटरी असलेल्या Vivo Y90 चा फोटो झाला लीक, पुढल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात

91मोबाईल्सने टेक कंपनी Vivo बद्दल एक बातमी पब्लिश केली होती कि कंपनी भारतात आपल्या वाय सीरीजच्या विस्तारासाठी काम करत आहे आणि याच सीरीज अंतर्गत लवकरच एक नवीन डिवाईस Vivo Y90 लॉन्च करणार आहे. Vivo Y90 एक लो बजेट फोन असेल जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात येईल. Vivo Y90 बद्दल कंपनीने अजूनतरी कोणती अधिकृत माहिती दिली नाही पण या फोन संबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत. तसेच आता फोन ऑफिशियल होण्याआधीच Vivo Y90 ची रियल ईमेज पण इंटरनेट वर शेयर करण्यात आली आहे.

Vivo Y90 ची रियल ईमेज एमएसपी वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये शेयर केली आहे. या रिपोर्ट मध्ये Vivo Y90 चे फोटोज दाखवण्यात आले आहेत. वेबसाइटने दोन फोटो शेयर केले आहेत आणि दोन्ही फोटो मध्ये Vivo Y90 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल दिसत आहेत. एका फोटो मध्ये फोनचा कलर ब्लॅक आहे तसेच दुसऱ्या फोटो मध्ये Vivo Y90 गोल्ड कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. हा फोटो बघून असे समजते कि Vivo Y90 भारतात या दोन कलर वेरिंएट्स मध्ये लॉन्च शकतो. Vivo Y90 च्या या फोटोच्या मागे ‘डमी फोन’ लिहिण्यात आले आहे.

Vivo Y90 च्या समोर आलेल्या या रियल फोटोज बद्दल बोलायचे तर फोनच्या बॅक पॅनल वर रियल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेंसरच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही देण्यात आला पण तिथे Vivo ची ब्रांडिंग आहे. फोनचा फ्रंट पॅनल पाहता यात बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला ज्याच्या वर ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या दोन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडी चिन आहे.

Vivo Y90 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार Vivo Y90 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला जाऊ शकतो ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट मिळेल. Vivo Y90 च्या या लीक मध्ये फोन 2 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे जो दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

Vivo Y90 च्या लीक मध्ये हा फोन 16जीबी इंटरनल मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y90 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नसल्यामुळे Vivo Y90 मध्ये फेस अनलॉक फीचर सपोर्ट असू शकतो. तसेच पवार बॅकअप साठी या फोन मध्ये 4,030एमएएच ची बॅटरी असेल.

आशा आहे कि Vivo लवकरच Vivo Y90 हा भारतात लॉन्च करेल. विशेष म्हणजे 91मोबाईल्सला आधीच माहिती मिळाली आहे कि कंपनी Vivo Y90 चा बेस वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल आणि हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here