Aadhaar - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Jul 2023 12:20:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/#respond Fri, 14 Jul 2023 12:05:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21329 आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग […]

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग सेवा वापरू शकतात. आज आम्ही तुम्हाला आधारच्या मदतीनं बँक अकाऊंटमधील बॅलेन्स चेक करण्याची माहिती देणार आहोत.

आधार नंबरवरून बँक बँलेस चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

जर तुमच्या बँक अकाऊंटशी आधार लिंक असेल तर तुम्ही *99# सर्व्हिसच्या मदतीनं ऑफलाइनच बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.

स्टेप 2 : तुमच्या मोबाइल नंबरवर ‘वेलकम टू *99#’ मेसेज फ्लॅश होईल.

स्टेप 3 : ओकेवर क्लिक केल्यावर फ्लॅश मेसेजमध्ये मेन्यू ओपन होईल. त्यात तुम्हाला तिसऱ्या नंबरवर चेक बॅलेन्सचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : त्यामुळे बॅलेन्स चेक करण्यासाठी 3 टाइप करून रिप्लाय करा.

स्टेप 5 : थोड्या वेळानं फोनमध्ये फ्लॅश मेसेज येईल ज्यात तुम्हाला यूपीआय पिन रिप्लाय करावा लागेल.

स्टेप 6 : पुढील फ्लॅश मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्स समजेल.

नोट : जर तुमचे दोन किंवा अधिक बँक अकाऊंट असतील तर *99# सर्व्हिस तुम्हाला त्या बँकेतील बॅलेन्स सांगेल जी सरकारी यूपीआय अ‍ॅप BHIM मध्ये तुमची प्रायमरी बँक असेल.

*99# चे इतर फायदे

*99# द्वारे ऑफलाइन बँक बॅलेन्स चेक करण्यासोबतच इतर फीचर्स देखील वापरता येतात. ह्या सर्व्हिसचे इतर फीचर्स खाली देण्यात आले आहेत.

  • सेंड मनी
  • रिक्वेस्ट मनी
  • चेक बॅलेन्स
  • माय प्रोफाईल
  • पेंडिंग रिक्वेस्ट
  • ट्रँजॅक्शन्स
  • यूपीआय पिन

बँकेशी आधार लिंक कसं करायचं?

बँक अकाऊंटला आधार लिंक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही बँकेत जाऊन मॅन्युअली आधार लिंक करण्यासह ऑनलाइन आणि एटीएमवरून देखील तुमचं बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

बँकेत जाऊन : तुमच्या आधार कार्डच्या प्रतीसह एक अर्ज देऊन तुम्ही बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

ऑनलाइन : जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर लॉगइन करून अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

एटीएम : बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक एटीएममधून देखील करता येतं. एटीएम मध्ये कार्ड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार लिंकचा ऑप्शन मिळतो. इथून देखील तुम्ही तुमच्या अकाऊंटशी आधार लिंक करू शकता.

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/feed/ 0
Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत https://www.91mobiles.com/marathi/google-pay-now-enables-aadhaar-based-authentication-for-upi-activation/ https://www.91mobiles.com/marathi/google-pay-now-enables-aadhaar-based-authentication-for-upi-activation/#respond Thu, 08 Jun 2023 11:58:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21483 जर तुम्हाला यूपीआय (UPI) अकाऊंट सेटअप करताना अडचण येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गुगल पे (Google Pay) नं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माध्यमातून आधार-बेस्ड ऑथेंटिकेशनची घोषणा केली आहे. ह्याचा अर्थ असा की काही कारणास्तव तुम्ही यूपीआय अकाऊंट तुमच्या मोबाइलवर सेटअप करू शकत नसाल तर आधार ऑथेंटिकेशनची मदत […]

The post Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्हाला यूपीआय (UPI) अकाऊंट सेटअप करताना अडचण येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गुगल पे (Google Pay) नं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माध्यमातून आधार-बेस्ड ऑथेंटिकेशनची घोषणा केली आहे. ह्याचा अर्थ असा की काही कारणास्तव तुम्ही यूपीआय अकाऊंट तुमच्या मोबाइलवर सेटअप करू शकत नसाल तर आधार ऑथेंटिकेशनची मदत घेता येईल. गुगल पे देशातील मोठ्या यूपीआय अ‍ॅप पैकी एक आहे आणि आता ह्या नवीन फीचरच्या मदतीनं अजून लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Google Pay UPI ID आधार कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं?

गुगल पे (Google Pay) वर आधारच्या माध्यमातून यूपीआय अ‍ॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. परंतु ही प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी तुमचा मोबाइल नंबर आधार आणि बँक अकाऊंटशी कनेक्टेड असणं आवश्यक आहे. आधारनं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा :

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अ‍ॅप गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  • त्यानंतर बँक अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी आधारचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार नंबरचे पहिले सहा अंक टाकावे लागतील.
  • क्रिएट पिनच्या ऑप्शनवर टॅप करा, त्यानंतर 6 अंकी आधार ओटीपी मिळेल.
  • ऑथेंटिकेट करण्यासाठी ओटीपी सबमिट करा.
  • ऑथेंटिकेट यशस्वी झाल्यावर तुम्हाला सर्व व्यवहारांसाठी 6 अंकी UPI पिन निवडावा लागेल.

गुगल साठवत नाही आधार नंबर

Google नुसार ह्या प्रक्रियादेत तुमचा आधार नंबर साठवला जात नाही. जेव्हा युजर आधारचे पहिले सहा अंक टाकतो तेव्हा ते ऑथेंटिकेशनसाठी एनपीसीआईच्या माध्यमातून युआयडीएआयसोबत शेयर केले जातात. त्यामुळे युजरच्या गोपनीयता आणि आधार नंबरची सुरक्षा राखली जाते.

ह्या नवीन सुविधेपूर्वी युजर यूपीआय आयडी डेबिट कार्ड नसलेल्या ग्राहकांसाठी अ‍ॅक्टिव्हेट करणं शक्य नव्हतं. आता ज्या युजर्सकडे डेबिट कार्ड नाही ते देखील यूपीआय वापरू शकतील. युआयडीएआयच्या आकडयांवरून समजलं आहे की 99.9% वयस्कर ललोकांकडे आधार नंबर आहे. आता त्यांना यूपीआय वापरता येईल.

The post Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pay-now-enables-aadhaar-based-authentication-for-upi-activation/feed/ 0
Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-link-voter-id-card-with-aadhaar-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-link-voter-id-card-with-aadhaar-in-marathi/#respond Sun, 07 May 2023 12:32:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15289 Aadhaar and Voter ID card linking: भारतीय नागरिकांसाठी Aadhaar Card आणि Voter ID Card महत्वाचे ओळखपत्र आहेत. आता हे दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी जोडण्याचे आदेश Election Commission of India नं दिले आहेत. हा निर्णय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आला आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्ड लिंक केल्याने निवडणुकी दरम्यान कोणतीही फसवणूक होणार नाही, असं या निर्णयाचा […]

The post Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhaar and Voter ID card linking: भारतीय नागरिकांसाठी Aadhaar Card आणि Voter ID Card महत्वाचे ओळखपत्र आहेत. आता हे दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी जोडण्याचे आदेश Election Commission of India नं दिले आहेत. हा निर्णय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आला आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्ड लिंक केल्याने निवडणुकी दरम्यान कोणतीही फसवणूक होणार नाही, असं या निर्णयाचा उद्देश आहे. बऱ्याचदा इलेक्शनच्या वेळी एकच मतदार दोन वेळा मतदान करतो आणि आता या लिंकिंगमुळे एक व्यक्ती फक्त एकच वेळा मतदान करू शकेल.

परंतु इलेक्शन कमीशन ऑफ इंडियानं अजूनतरी आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्ड लिंक करणे अनिवार्य केलं नाही. परंतु दोन्ही आयडी कार्ड्स लिंक करण्याची सुरुवात झाली आहे. इलेक्शन कमिशननं स्पष्ट केलं आहे की आधार लिंक नसल्यास कोणत्याही नागरिकाचे नाव वोटर लिस्टमधून हटवलं जाणार नाही. परंतु आगामी काळात ही प्रक्रिया अनिवार्य होऊ शकते. आता जाणून घेऊया की तुम्ही तुमचं आधार आणि वोटर आयडीशी कसं लिंक करू शकता. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

How to link Voter ID card with Aadhaar

तुम्हाला इथे सोपी पद्धत सांगत आहोत जिच्या मदतीनं तुम्ही ऑनलाइन तुमचं आधार आणि वोटर आयडी लिंक करू शकाल.

  • सर्वप्रथम Voter Helpline App डाउनलोड करा. हे गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवर आहे.
  • हे अ‍ॅप ओपन केल्यानंतर ‘I Agree’ वर टॅप करा आणि नेक्स्ट ऑप्शनवर जा.
  • त्यानंतर ‘Voter Registration’ वर क्लिक करा.
  • वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर Electoral Authentication Form (Form 6B) वर जा. त्यानंतर ‘Lets Start’ वर क्लिक करा.
  • ही प्रोसेस संपताच तुमचा ऑफिशियल मोबाइल नंबर जो आधारशी लिंक आहे तो टाका. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
  • तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
  • पुढील स्टेपमध्ये तुम्हाला विशाल जाईल की तुमच्याकडे वोटर आयडी आहे का? मग यसवर क्लिक करा आणि नेक्स्टवर जा.
  • पुढे वोटर आयडी नंबर टाका. ज्यात तुम्हाला तुमचं राज्य टाकून चेक करावं लागेल.
  • पुढे प्रोसीड करून आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि Place of authentication टाका. त्यानंतर डनवर क्लिक करा.
  • या अखेरच्या प्रोसेस नंतर फॉर्म सिक्स बी प्रीव्यू पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही तुमचे डिटेल चेक करू शकता. डिटेल सही असल्यास कंफर्म नंतर फाइनल सबमिशन करा.
  • या सर्व प्रोसेसनंतर तुमचं आधार कार्ड वोटर आयडी कार्डशी लिंक होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-link-voter-id-card-with-aadhaar-in-marathi/feed/ 0
आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे असं जाणून घ्या; पाहा नवीन नंबर करण्याची अपडेट करण्याची पद्धत https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-linked-mobile-number-check-and-how-to-update-it/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-linked-mobile-number-check-and-how-to-update-it/#respond Tue, 17 Jan 2023 11:04:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16964 आधार कार्ड भारतीयांसाठी एक महत्वाचं डॉक्यूमेंट आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी असो किंवा घर, तसेच बँकेत अकाऊंट ओपन करायचं असो किंवा शाळेत अ‍ॅडमिशन करायचं असेल तरी Aadhaar Card विना अशक्य आहेत या गोष्टी. आज आधार कार्ड संबंधित बऱ्याच सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यासाठी तुमचं आधार कार्ड […]

The post आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे असं जाणून घ्या; पाहा नवीन नंबर करण्याची अपडेट करण्याची पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर कसा जाणून घ्यायचा?
  • आधार कार्डमध्ये नवीन मोबाइल नंबर लिंक कसा होतो?
  • जुना मोबाइल नंबर बंद असेल तर आधार कार्डशी नवीन नंबर कसा लिंक होईल?

आधार कार्ड भारतीयांसाठी एक महत्वाचं डॉक्यूमेंट आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी असो किंवा घर, तसेच बँकेत अकाऊंट ओपन करायचं असो किंवा शाळेत अ‍ॅडमिशन करायचं असेल तरी Aadhaar Card विना अशक्य आहेत या गोष्टी. आज आधार कार्ड संबंधित बऱ्याच सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यासाठी तुमचं आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर विसरला असाल किंवा नवीन मोबाइल नंबर आधारशी लिंक करू इच्छित असाल तर इथे आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.

आधार कार्डशी लिंक आलेल्या मोबाइल नंबरची माहिती

Aadhaar Card शी लिंक मोबाइल नंबर ऑनलाइन घर बसल्या जाणून घेता येतो. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा.

स्टेप 1 – UIDAI च्या ऑफिशियल वेबसाइटवर My Aadhaar वर लॉगइन करा.

स्टेप 2 – इथे ‘व्हेरिफाय आधार’ वर क्लिक करा.

स्टेप 3 – आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरल्यानांतर सबमिटवर क्लिक करा.

स्टेप 4 – पुढील पेजवर तुम्हाला आधार कार्डची माहिती मिळेल. तसेच आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील. अशाप्रकारे तुम्ही आधार कार्डवरील रजिस्टर मोबाइल नंबर जाणून घेऊ शकता.

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर कसा लिंक करायचा

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर लिंक करणं सोपं आहे. तुम्ही घर बसल्या हे सहज तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरवरून करू शकता.

स्टेप 1 – सर्वप्रथम UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट https://uidai.gov.in/ ओपन करा आणि My Aadhaar मध्ये लॉगइन करा. आता “Aadhaar Services” वर क्लिक करा.

स्टेप 2 – आता तुम्हाला “Update your Mobile Number” लिंक दिसेल.

स्टेप 3 – ओपन झालेल्या नवीन पेजवर तुम्हाला तुमचा 12-अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून “Send OTP” बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्स मोबाइल नंबरवर OTP मिळेल तो Submit करा.

स्टेप 4 – OTP सबमिट केल्यावर तुम्हाला नवीन मोबाइल नंबर विचारला जाईल तो द्या आणि “Submit” वर क्लिक करा.

त्यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या नवीन मोबाइल नंबर वर UIDAI करून ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन कोड येईल आणि तुमचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक होईल.

जुना नंबर बंद झाल्यास अशाप्रकारे आधारशी नवीन मोबाइल नंबर लिंक करा

जर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला जुना मोबाइल नंबर बंद असेल किंवा हरवला असेल तर तुम्हाला आधार कार्डवर नवीन नंबर लिंक करण्यासाठी जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल. आधार सेंटरवर तुम्हाला तुमचा ऑरिजनल आधार कार्ड आणि एक ओळखपत्र (पॅन कार्ड, वोटर आयडी किंवा पासपोर्ट) घेऊन जावं लागेल. आधार कार्ड अपडेशन किंवा करेक्शन फॉर्म भरून तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये नवीन मोबाइल नंबर रजिस्टर करू शकता.

The post आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे असं जाणून घ्या; पाहा नवीन नंबर करण्याची अपडेट करण्याची पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-linked-mobile-number-check-and-how-to-update-it/feed/ 0
How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय https://www.91mobiles.com/marathi/how-to-verify-aadhaar-card/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-verify-aadhaar-card/#respond Tue, 10 Jan 2023 10:31:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16730 आधार कार्ड सध्या भारतीयांसाठी सर्वाधिक महत्वाचं ओळखपत्र आहे. आजच्या घडीला फक्त सरकारी नव्हे तर बिगर सरकारी कामांसाठी देखील आधार कार्डची विचारणा केली जाते. बँक अकाऊंट सुरु करायचं असो किंवा नवीन फोन कनेक्शन घ्यायचं असो. इतकंच काय तर मुलांचा शाळेत प्रवेश देखील आधार कार्डविना होत नाही. Aadhaar card सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आधार […]

The post How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड सध्या भारतीयांसाठी सर्वाधिक महत्वाचं ओळखपत्र आहे. आजच्या घडीला फक्त सरकारी नव्हे तर बिगर सरकारी कामांसाठी देखील आधार कार्डची विचारणा केली जाते. बँक अकाऊंट सुरु करायचं असो किंवा नवीन फोन कनेक्शन घ्यायचं असो. इतकंच काय तर मुलांचा शाळेत प्रवेश देखील आधार कार्डविना होत नाही. Aadhaar card सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड फक्त एक ओळखपत्र नाही तर यात आधार कार्ड धारकाची बायोमॅट्रिक माहिती देखील असते. परंतु आयडी प्रूफ म्हणून देत असलेलं आधार कार्ड नकली निघालं तर? अशावेळी तुमचं काम अडकून राहू शकतं. पुढे आम्ही अशी पद्धत सांगितली आहे जिचा वापर करून तुम्ही कोणाचाही आधार कार्ड असली आहे की नकली ते व्हेरिफाय करू शकता.

आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड व्हेरिफाय करण्याची पद्धत सांगणार आहोत. हे काम सरकारी वेबसाइटवर सहज करता येतं. यामुळे तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करून फसवणुकीपासून वाचू शकता. आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी तुम्ही UIDAI च्या वेबसाइट किंवा mAadhaar अ‍ॅपचा वापर करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगत आहोत. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

वेबसाइटद्वारे आधार कसं व्हेरिफाय करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या फोन किंवा कंप्यूटरच्या ब्राउजरवर UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in ओपन करा.

स्टेप 2: इथे तुमचा आधार नंबर टाकून लॉगइन करा. त्यानंतर खाली स्क्रोल करून Verify Aadhaar वर क्लिक करा.

स्टेप 3: पुढील पेजवर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफाय आधार वर क्लिक करा.

स्टेप 4: आता तुम्हाला आधार कार्ड संबंधित माहिती दिली जाईल, ज्यात वय आणि पत्ता असेल.

मोबाइल अ‍ॅप मधून आधार व्हेरिफाय करा

स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये Google Play Store किंवा Apple App Store वरून mAadhaar अ‍ॅप इंस्टॉल करा.

स्टेप 2: अ‍ॅप मध्ये लॉगइन करून होम स्क्रीनवर Verify Aadhaar वर टॅप करा.

स्टेप 3: ज्या व्यक्तीचा आधार व्हेरिफाय करायचं आहे तिचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि व्हेरिफायवर क्लिक करा.

स्टेप 4: अगले पेजवर तुम्हाला आधार कार्डची माहिती दिसेल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह भारतातील पहिला फोन; iQOO 11 मुळे वनप्लसच्या साम्रज्याला धोका?

आधार कार्ड व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला टाकलेला आधार नंबर अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळेल. यात नाव व्हेरिफाय होत नाही परंतु वर, लिंग आणि पत्तापता व्हेरिफाय करता येतो.

The post How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-verify-aadhaar-card/feed/ 0
महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत https://www.91mobiles.com/marathi/10-years-old-aadhaar-card-how-to-update-address-identity-online/ https://www.91mobiles.com/marathi/10-years-old-aadhaar-card-how-to-update-address-identity-online/#respond Sat, 07 Jan 2023 12:48:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16644 आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) नं दहा वर्षांपूर्वी बनलेले आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. आधार कार्ड धारक ज्यांनी आपल्या कार्डमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कोणतेही अपडेट केले नाहीत त्यांना त्यांचा आधार डेटाबेस अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. UIDAI नं आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि राहत्या पत्त्याच्या […]

The post महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) नं दहा वर्षांपूर्वी बनलेले आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. आधार कार्ड धारक ज्यांनी आपल्या कार्डमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कोणतेही अपडेट केले नाहीत त्यांना त्यांचा आधार डेटाबेस अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. UIDAI नं आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि राहत्या पत्त्याच्या पुरावा आधार डेटाबेसमध्ये अपलोड करण्यास सांगितलं आहे. यासाठी कार्ड धारक myAadhaar पोर्टलचा वापर करू शकतात. तसेच जवळच्या आधार कार्ड सेंटरवर देखील ही सुविधा देण्यात आली आहे.

ओळखपत्र आणि पत्ता करा अपडेट

UIDAI नं एका विधानात म्हटलं आहे की, “असे भारतीय नागरिक ज्यांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड जारी करण्यात आलं होती आणि ज्यांनी या वर्षांमध्ये कधीही आधार कार्ड अपडेट केलं नाही. त्यांनी UIDAI पोर्टलवर आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. ही प्रोसेस खूप सोपी आहे. आधार कार्ड धारक आपला आधार डेटा ऑनलाइन किंवा ऑफलाईन अपडेट करू शकतात.”

आधार कार्ड धारक आपला पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकतात. तसेच तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर ईमेलसह बायोमॅट्रिक (फिंगरप्रिंट, आयरिस आणि फोटोग्राफ) चेंज करायची असेल तर तुम्हाला जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल.

ऑनलाइन आधार कार्ड असं करा अपडेट

आधार कार्डवरील ओळखपत्र आणि पत्ता ऑनलाइन कसा अपडेट करायचा हे जाणून घेऊया.

स्टेप 1 – सर्वप्रथम आधार सेल्फ अपडेट पोर्टल uidai.gov.in ओपन करा आणि अपडेट अ‍ॅड्रेस ऑनलाइनवर सिलेक्ट करा.

स्टेप 2 – इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा VID टाकावा लागेल.

स्टेप 3 – सिक्योरिटी कोड टाकल्यांनंतर OTP रिक्वेस्ट करा, जो तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर येईल.

स्टेप 4 – मोबाइलवर आलेला OTP टाका.

स्टेप 5 – आता तुम्हाला तुमच्या पत्त्याची माहिती टाकावी लागेल आणि सबमिट बटनवर क्लिक करा.

स्टेप 6 – खाली स्क्रोल केल्यावर आता तुमच्या राहत्या पत्त्याचा एक पुरावा द्यावा लागेल. यासाठी डॉक्यूमेंटची कलर स्कॅन जवळ ठेवा आणि अपलोड करा.

स्टेप 7 – त्यानंतर BPO वर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. आता तुमची अपडेट रिक्वेस्ट आधार डेटाबेसमध्ये जमा होईल. तुमचे डॉक्यूमेंट योग्य असले तर एका आठवड्यात तुमचा पत्ता आधार डेटाबेसवर अपडेट होईल.

तुम्हाला रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलवर URN नंबर मिळेल, जो तुम्ही तुमचं अपडेट स्टेटस जाणून घेण्यासाठी वापरू शतक.

नोट: तुम्ही तुमच्या सपोर्ट डॉक्यूमेंटची स्कॅन फाईल अपलोड केली नाही तर तुमच्या आधार कार्डवरील अपडेट यशस्वी होणार नाही.

The post महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-years-old-aadhaar-card-how-to-update-address-identity-online/feed/ 0
Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/#respond Tue, 03 Jan 2023 00:30:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15530 Aadhar Card Download: आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ओळखपत्र असून देखील आधार कार्डला प्राथमिकता दिली जाते. सर्व प्रकारच्या सरकारी व बिगर सरकारी संस्था जसे की शाळा, हॉस्पिटल, बँक व फायनान्स सर्व्हिसेजमध्ये ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु कधीकधी हे आधार कार्ड हरवतं आणि मग मोठी पंचाईत होते. तुम्ही देखील […]

The post Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhar Card Download: आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ओळखपत्र असून देखील आधार कार्डला प्राथमिकता दिली जाते. सर्व प्रकारच्या सरकारी व बिगर सरकारी संस्था जसे की शाळा, हॉस्पिटल, बँक व फायनान्स सर्व्हिसेजमध्ये ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु कधीकधी हे आधार कार्ड हरवतं आणि मग मोठी पंचाईत होते. तुम्ही देखील तुमच्या परिवारातील किंवा मित्राचं आधार कार्ड हरवल्याचं किंवा फाटल्याचं ऐकलं असेल. अशाप्रसंगी आधार कार्डची फोटोकॉपी हवी मिळवणं देखील कठीण असतं.

आधार कार्ड खराब झाल्यास आपण त्याचा वापर कुठेही करू शकत नाही आणि किंवा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा मारतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनं आधार कार्डची नवीन कॉपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आधार काढता येईल आणि कुठेही अवशक्यतेनुसार आधार कार्ड कॉपीच्या ऐवजी देता येईल. आधार कार्ड खराब झाल्यास किंवा फाटल्यास ही कॉपी प्रत्येक ठिकाणी सहज वापरता येईल. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा Samsung फोन हवा? मग Galaxy M54 5G Phone साठी काही काळ थांबा

Aadhar Card Download

1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा: uidai.gov.in

2. इथे होम पेजवरच ‘My Aadhaar’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

3. ‘माय आधार’ सेक्शनमध्ये अनेक पॉईंट्स दिसतील, यातील एक ‘डाउनलोड आधार’ ऑप्शन निवडा आणि क्लिक करा.

4. ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करताच नवीन टॅब ओपन होईल, जिथे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणजे डिजीटल आधार कार्ड डाउनलोड करण्यास सांगितलं जाईल.

5. इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन मिळतील, ज्यात Aadhar Number, Enrolment ID (EID) आणि Virtual ID (VID) चा समावेश आहे.

हे देखील वाचा: Jio पेक्षा अर्ध्या किंमतीत BSNL देतेय दुप्पट फायदे; 100 दिवसांची वैधता आणि रोज 2GB डेटा

6. तुमच्यकडे जो रेकॉर्ड उपलब्ध असेल त्यानुसार एक निवडा आणि तुमची पसर्नल आयडी सबमिट करा.

7. नंबर टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ च्या ऑप्शनवर क्लिक करा, आपके आधार कार्डसह जो मोबाइल नंबर लिंक असेल त्यावर वन टाइम पासवर्ड येईल, तो सबमिट करा.

8. वेबसाइटवर देण्यात आलेला सर्वे पूर्ण केल्यानंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल.

9. ‘व्हेरिफाय अँड डाउनलोड’ वर क्लिक करा, आधार कार्ड पीडीएफ फॉरमेटमध्ये डाउनलोड होईल.

10. आधार कार्डची ही कॉपी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉप इत्यादीवर ओपन कराल तेव्हा दरवेळी हा पासवर्ड टाकावा लागेल.

The post Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/feed/ 0
Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/#respond Fri, 05 Feb 2021 13:43:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9918 आधार कार्ड खराब झाल्यावर आपल्याला त्याचा कुठेही वापर करता येत नाही आणि पुन्हा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिचा वापर करून केल्यास तुम्हाला तुमचा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही आणि पैसे पण खर्च करावे लागणार नाहीत.

The post Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhaar Card भारतीयांची ओळख आहे. अनेक ओळखपत्रांमध्ये आधार कार्डला प्राधान्य दिले जाते. सर्व सरकारी व इतर संस्थांमध्ये तसेच शाळा, हॉस्पिटल, बॅंक व फाइनेंस सर्विसेज मध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून अनेकदा असे ऐकायला मिळते कि त्यांचे आधार कार्ड हरवले आहे किंवा फाटून खराब झाले आहे. त्यामुळे जेव्हा कुठे आधार कार्डची फोटोकॉपी मागितली जाते तेव्हा त्यांना अडचण येते.

आधार कार्ड खराब झाल्यावर आपल्याला त्याचा कुठेही वापर करता येत नाही आणि पुन्हा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिचा वापर करून केल्यास तुम्हाला तुमचा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही आणि पैसे पण खर्च करावे लागणार नाहीत. फक्त ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डची नवीन कॉपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आधार काढता येतो आणि तो कुठेही आधार कार्ड कॉपीच्या जागी वापरता येतो. आधार कार्ड खराब झाला, हरवला किंवा फाटला तर हि कॉपी प्रत्येक ठिकाणी वापरता येते.

1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा : uidai.gov.in

2. इथे होम पेजवरच ‘My Aadhaar’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

3. ‘माय आधार’ सेक्शन मध्ये अनेक पॉईंट्स दिसतील, यातील एक ‘डाउनलोड आधार’ ऑप्शन निवडा आणि क्लिक करा.

4. ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करताच नवीन टॅब ओपन होईल, जिथे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणजे डिजीटल आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी विचारले जाईल.

5. इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन असतील, त्यात Aadhar Number, Enrolment ID (EID) आणि Virtual ID (VID) चा समावेश आहे.

हे देखील वाचा : Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर DND ऍक्टिव्हेट करण्याची सर्वात सोप्पी पद्धत, काही सेकंदात मिळवा स्पॅम कॉल्सपासून मुक्तता

6. तुमच्याकडे जो रेकॉर्ड उपलब्ध आहे तो निवडा आणि तुमचा पसर्नल आयडी सबमिट करा.

7. नंबर टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ च्या ऑप्शनवर क्लिक करा, तुमच्या आधार कार्डसह जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर वन टाईम पासवर्ड येईल, तो सबमिट करा.

8. वेबसाइटवर देण्यात आलेला सर्वे पूर्ण करा, नंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल.

9. ‘वेरीफाय अँड डाउनलोड’ वर क्लिक करा, आधार कार्ड पीडीएफ फॉरमेट मध्ये डाउनलोड होईल.

हे देखील वाचा : Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत

10. आधार कार्डची हि कॉपी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही हि तुमच्या फोन किंवा लॅपटॉप इत्यादी मध्ये ओपन कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.

The post Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-download-e-aadhaar-card-online-in-marathi/feed/ 0
Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-change-update-mobile-number-and-e-mail-id-in-aadhaar-card-uidai-changed-the-process-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-change-update-mobile-number-and-e-mail-id-in-aadhaar-card-uidai-changed-the-process-in-india/#respond Thu, 23 Jan 2020 12:50:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6373 मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी च्या रिक्वेस्ट सह तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.

The post Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक भारतीयाची ओळख त्याचे आधार कार्ड आहे. शाळा असो वा हॉस्पिटल, बॅंक अकांउट असो वा एखादे सरकारी काम, प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून Aadhaar Card मागितला जातो. सरकारने आधार कार्ड मध्ये धारकाची सर्व माहिती समाविष्ट केली आहे. आधार कार्ड मध्ये यूजरचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी देणे पण सरकारने आवश्यक असल्याचे सांगितले आहे कारण भविष्यात Aadhaar मध्ये बदल करण्यासाठी यांच्यावरच OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड येतो. देशातील अनेक ठिकाणी असे लोक आहेत ज्यांच्या आधार कार्ड मध्ये योग्य मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी नाही. त्यामुळे यूजर्सच्या अडचणी कमी करत आधारचा कार्यभार सांभाळणाऱ्या UIDAI ने आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट करण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे जो आधीपेक्षा जास्त सरळ व सोप्पा आहे.

Aadhaar बनवणारी संस्था Unique Identification Authority of India म्हणजे यूआईडीएआई ने आपल्या सोशल मीडिया हँडेलच्या माध्यमातून देशातील नागरिकांना या मोठ्या बदलाची माहिती दिली आहे. UIDAI ने अधिकृतपणे अशी घोषणा केली आहे कि आतापासून आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे फक्त ज्यांच्या कार्ड मध्ये चुकीचा नंबर किंवा मेल ऍड्रेस देण्यात आला आहे आशा लोकांना फायदा होईल असे नाही तर त्या लोकांवर पण याचा परिणाम होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे आणि तो त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये जोडायचा आहे.

असा आहे नवीन बदल

आधार कार्ड मध्ये जर एखाद्या यूजरला आपला जुना मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी बदलायचा असेल किंवा नवीन नंबर द्यायचा सेल तर त्यासाठी आधार केंद्रावर कोणतेही डाक्यूमेंट घेऊन जाण्याची गरज नाही. UIDAI ने स्पष्ट केले आहे कि आता आधार केंद्रावर फक्त तुमचा Aadhaar Card घेऊन जावा लागेल तसेच आता वोटर कार्ड, जन्माचा दाखला किंवा पॅन कार्ड इत्यादी दाखवण्याची गरज नाही.

आधार सेवा केंद्रातील कर्मचारी यूजरचा आधार कार्ड बघून ऑनलाईन त्यात बदल करतील. आधार केंद्रावर रिक्वेस्ट टाकल्यावर जुना मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी मध्ये बदल करून नवीन मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी आधार कार्ड मध्ये अपडेट केला जाईल. यूआईडीएआई ने या प्रक्रियासाठी फक्त 50 रुपयांचे शुल्क ठेवले आहे. म्हणजे मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी च्या रिक्वेस्ट सह तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.

Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट असणे खूप आवश्यक आहे. कारण भविष्यात कधीही जर आधार कार्ड मध्ये बदल करायचा असेल तेव्हा किंवा एखादी वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडी वर ओटीपी पाठवला जातो. आणि जर आधार कार्ड मध्ये योग्य मोबाईल नंबर व मेल आईडी नसेल तर वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच UIDAI ने स्पष्टपणे सांगितले आहे कि जर कोणत्याही आधार सेवा केंद्रात 50 रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेतले गेले तर त्याची तक्रार करावी.

The post Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-change-update-mobile-number-and-e-mail-id-in-aadhaar-card-uidai-changed-the-process-in-india/feed/ 0
आधार नंबर बद्दल सरकार ने दिली चेतावणी! जाणून घ्या काय आहे प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/uidai-warns-indians-against-public-sharing-aadhar-details-online-after-trai-rs-sharma-gambit-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/uidai-warns-indians-against-public-sharing-aadhar-details-online-after-trai-rs-sharma-gambit-in-marathi/#respond Wed, 01 Aug 2018 15:18:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1496 ट्वीटर वरील लोकांकडून मिळालेले हे चॅलेंज एक्सेप्ट कर आरएस शर्मा ने ट्वीट मध्ये आपला आपला आधार नंबर शेयर केला.

The post आधार नंबर बद्दल सरकार ने दिली चेतावणी! जाणून घ्या काय आहे प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड किंवा आधार नंबर सध्या सर्व भारतीयांची सर्वात पहिली आणि सर्वात मोठी ओळख बनली आहे. भारतीय नागरिकांच्या ओळखी संबंधी सर्व माहिती आधार नंबर मध्ये असते. आधार कार्ड सुरवाती पासून चर्चेत आहे. काही जणांना हा सुरक्षित वाटत नाही तर काहींना हा सेफ वाटतो. गेल्या काही दिवसांत आधार कार्ड संबधी अशी मोठी घटना झाली आहे ज्यानंतर प्रत्येकाच्या गोपनीयतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या दरम्यान यूआईडीएआई ने सक्त चेतावणी जाहिर केली आहे की कोणत्याही व्यक्तीने इंटरनेट किंवा सोशल साइट वर आपला आधार नंबर शेयर करू नये.

यूआईडीएआई म्हणजे भारतीय विशेष ओळख प्राधिकरण ने स्पष्ट शब्दांत आधार नंबर आॅनलाईन प्लॅटफार्म वर शेयर न करायाला सांगितले आहे. विभागाने सांगितले आहे की कोणत्याही व्यक्तीने आपल्या आधार नंबर किंवा आधार कार्ड संबधी माहिती आॅनलाईन प्लॅटफार्म वर शेयर करू नये. आधार ची सर्वेसर्वा असलेल्या यूआईडीएआई ने सांगितले आहे की आधार नंबर सार्व​जनिक करणार्‍या किंवा असे करायाला भाग पडणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. विभागाने चेतावणी देत काही दिवसांपूर्वी झालेल्या घटने पासून लोकांना शिकवण घ्यायला सांगितली आहे.

काय आहे प्रकरण

गेल्या आठवड्यात टेलीकॉम रेग्यूलेटरी अॅथारिटी आॅफ इंडिया म्हणजे ट्राई चे हेड आरएस शर्मा ने आपल्या ट्वीटर हँडल वर स्वतः चा आधार नंबर शेयर केला होता. आरएस शर्मा ने ट्वीट करून सांगितले होते की आधार नंबर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणताही हॅकर याचा सर्वर अ‍ॅक्सेस करू शकत नाही. शर्मा च्या या विधाना नंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरवात झाली.

काही यूजर्स ने ट्रोल करत सांगितले की, जर आधार इतकाच सुरक्षित असेल तर तुमचा आधार नंबर शेयर करा. आणि ट्वीटर वरील लोकांकडून मिळालेले हे चॅलेंज एक्सेप्ट कर आरएस शर्मा ने ट्वीट मध्ये आपला आपला आधार नंबर शेयर केला.

शर्मा यांनी आधार नंबर शेयर केल्यानंतर त्यांच्याच ट्वीटर अकाउंट वर लोक त्यांचीच खाजगी माहिती पोस्ट करू लागले. लोकांनी ने आरएस शर्मा चा फोन नंबर, त्यांच्या घराचा एड्रेस, त्यांचा व्हाट्सॅप नंबर, शर्मा वापरत असलेल्या फोनचा मॉडेल तसेच त्यांच्या व्हाट्सॅप वरील प्रोफाइल फोटो पण ट्वीटर वर शेयर केली.

हे इथेच थांबले नाही. लोकांनी शर्मा यांचे बँक डिटेल, त्यांचा अकाउंट नंबर तसेच पासपोर्ट नंबर पण त्यांना ट्वीट केला. इतकेच नव्हे तर लोकांनी त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पण टाकायला सुरवात केली. काही यूजर्सनी आरएस शर्मा यांच्या अकाउंट मध्ये 1 रुपया ट्रांसफर केला. ट्वीटर वर घडलेल्या या प्रसंगानंतर शर्मा यांना मान्य करावेच लागले की आधार नंबर तितका सुरक्षित नाही जितका ते बोलत होते तर दुसरीकडे भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने यावर आक्षेप घेतला आहे.

तसेच यूआईडीएआई आरएस शर्मा यांच्या विरोधात काही कारवाई करेल की नाही हे स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे जेव्हा आधार ची सुरवात झाली होती तेव्हा या विभागाचे (भारतीय विशेष ओळख प्राधिकरणचे ) पहिले डायरेक्टर जनरल आरएस शर्मा च होते.

The post आधार नंबर बद्दल सरकार ने दिली चेतावणी! जाणून घ्या काय आहे प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/uidai-warns-indians-against-public-sharing-aadhar-details-online-after-trai-rs-sharma-gambit-in-marathi/feed/ 0