iPhone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 May 2023 10:23:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/tata-will-manufacture-iphone-15-and-iphone-15-plus-report/ https://www.91mobiles.com/marathi/tata-will-manufacture-iphone-15-and-iphone-15-plus-report/#respond Mon, 15 May 2023 10:23:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20889 Apple ची iPhone 15 सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते. त्याला अनेक दिवस बाकी आहेत परंतु ह्या सीरीजबद्दल सतत लीक्स आणि अफवा समोर येत असतात. ज्यात iPhone 15 सीरीज फोन्सच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि डिजाइन लीक होते. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार iPhone 15 सीरीजचे iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात […]

The post Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • भारतात Tata द्वारे असेंबल होतील iPhone 15 आणि iPhone 15 Plus
  • TrendForce च्या रिपोर्टमधून झाला खुलासा
  • टाटा आता चौथा असा ग्रुप असेल जो आयफोन निर्माण करेल

Apple ची iPhone 15 सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते. त्याला अनेक दिवस बाकी आहेत परंतु ह्या सीरीजबद्दल सतत लीक्स आणि अफवा समोर येत असतात. ज्यात iPhone 15 सीरीज फोन्सच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि डिजाइन लीक होते. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार iPhone 15 सीरीजचे iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात Tata द्वारे असेंबल केले जातील. पुढे या रिपोर्टबाबत सविस्तर जाणून घेऊया.

भारतात बनणार का आयफोन 15 सीरीज

TrendForce च्या रिपोर्टनुसार Tata Group भारतात iPhone 15 सीरीजच्या स्मार्टफोनचा काही भाग असेंबल करू शकतो. कंपनीनं काही दिवसांपूर्वी Wistron चं अधिग्रहण केलं आहे, जी भारतात आयफोन बनवत होती. म्हणजे टाटा आता Foxconn, Pegatron आणि Luxshare नंतर चौथा असा ग्रुप बनेल जो अ‍ॅप्पलसाठी आयफोनची निर्मिती करेल.

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस ची भारतात निर्मिती

रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की टाटा ग्रुप Apple iPhone 15 सीरीजच्या फोनचा 5 टक्के भाग बनवू शकतो. तर मोठा वाटा अजूनही फॉक्सकॉन, लक्सशेयर आणि पेगाट्रॉनकडे असेल. विशेष म्हणजे फॉक्सकॉनकडे आता पण आयफोन 15, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्सच्या असेंबली ऑर्डरचं 70 टक्के काम असेल तर आयफोन 15 प्लसच्या ऑर्डरचा 60 टक्के भाग असेल. ह्याचा अर्थ असा की टाटांना असेंबली ऑर्डर मिळू शकते. हे देखील वाचा: 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO F23 5G भारतात लाँच, ह्यात मिळते 16GB RAM ची ताकद

तर लक्सशेयरकडे Apple iPhone 15 सीरीजच्या iPhone 15 आणि iPhone 15 Pro Max ऑर्डरचं 25 टक्के काम असेल. Pegatron कडे iPhone 15 Plus च्या ऑर्डरचा 35 टक्के आणि iPhone 15 Pro च्या ऑर्डरचं 30 टक्के काम असेल. तसेच टाटा ग्रुपला आयफोन 15 प्रो मॉडेल म्हणजे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी कोणतीही आर्डर मिळणार नाही. Apple भविष्यात Tata Group ची असेंबली मधील टक्केवारी वाढवू देखील शकते.

The post Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-will-manufacture-iphone-15-and-iphone-15-plus-report/feed/ 0
10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा https://www.91mobiles.com/marathi/10-iphone-stolen-by-delivery-boy-and-replaced-with-fake-dummy-in-gurugram/ https://www.91mobiles.com/marathi/10-iphone-stolen-by-delivery-boy-and-replaced-with-fake-dummy-in-gurugram/#respond Sat, 29 Apr 2023 03:35:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20575 ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड संबंधित अशा घटना सतत कानावर पडत असतात की Amazon किंवा Flipkart वरून काही सामान मागवलं जातं आणि त्याबदल्यात साबण, दगड किंवा दुसरंच चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. असंच काहीसं गुरूग्राममध्ये देखील घडलं आहे जिथे डिलिव्हरी बॉयनं 1 किंवा 2 नव्हे तर संपूर्ण 10 iPhone चोरून त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच वस्तू पार्सलमध्ये ठेवल्या आणि […]

The post 10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयफोन्सच्या बदल्यात डमी फोन पार्सलमध्ये ठेवले.
  • पार्सलमध्ये आयफोन्ससह एयरपॉड देखील होते.
  • सर्व आयफोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून आले होते.

ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड संबंधित अशा घटना सतत कानावर पडत असतात की Amazon किंवा Flipkart वरून काही सामान मागवलं जातं आणि त्याबदल्यात साबण, दगड किंवा दुसरंच चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. असंच काहीसं गुरूग्राममध्ये देखील घडलं आहे जिथे डिलिव्हरी बॉयनं 1 किंवा 2 नव्हे तर संपूर्ण 10 iPhone चोरून त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच वस्तू पार्सलमध्ये ठेवल्या आणि लाखोंचा घोटाळा केला.

डिलिव्हरी बॉयनं चोरले 10 आयफोन

समोर आलेल्या रिपोर्टनुसार गुरूग्राममध्ये एका ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं 10 आयफोन्स चोरून त्यांच्या जागी डमी फोन म्हणजे नकली मोबाइल पार्सलमध्ये ठेवले. हे सर्व आयफोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनचे असल्याचं सांगण्यात आलं आहे जे कस्टमरला डिलिव्हर होणार होते. रिपोर्टनुसार आरोपी तरुण अ‍ॅमेझॉनचे पार्सल डिलिव्हर करणाऱ्या कंपनी Matrix Finance Solution साठी काम करता होता. हे देखील वाचा: स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री!

आरोपी तरुणाचे नाव ललित असल्याचं सांगण्यात आलं आहे. बातमीनुसार, ललितला एक पार्सल डिलिव्हर करण्याचं काम मिळालं होतं ज्यात 10 अ‍ॅप्पल आयफोन आणि एयरपॉड होता. जेव्हा हा तरुण पार्सल डिलिव्हर करण्यासाठी निघाला तेव्हा रस्त्यातच त्याने डब्ब्यांमधील iPhone आणि AirPods काढले होते आणि त्याऐवजी डमी मोबाइल ठेवले.

वस्तू रिप्लेस केल्यानंतर ललितनं ते पार्सल आपल्या भावाला दिले होते आणि ते पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. ललितनं खोटं सांगितलं की ज्या ग्राहकाला पार्सल द्यायचं होतं त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, म्हणून डिलिव्हरी उद्या करेल. जेव्हा पार्सल पुन्हा कंपनीत आलं तेव्हा पॅकेजिंगशी छेडछाड केल्याचा संशय आला. पॅकिंग काढल्यावर त्यातून नकली आयफोन निघाले. हे देखील वाचा: Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक

ग्राहकाला त्रास आणि कंपनीला फटका

साधारणतः आयटम डिलिव्हर करण्याच्या बाबतीत लोक ई-कॉमर्स वेबसाइट्सना दोष देतात. परंतु अनेकदा सामान डिलिव्हर करणाऱ्यांची चूक असते तसेच त्यांनी केलेला फ्रॉड कंपनी पर्यंत पोहचत देखील नाही. यामुळे तुम्ही ग्राहकांना त्रास होतो तर दुसरीकडे शॉपिंग साइट्स व डिलिव्हरी पार्टनर्सचे देखील नुकसान होते.

The post 10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-iphone-stolen-by-delivery-boy-and-replaced-with-fake-dummy-in-gurugram/feed/ 0
लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/ https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/#respond Thu, 20 Apr 2023 12:42:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20406 काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple […]

The post लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यावर्षीच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुपनं बनवलेले iPhone मार्केटमध्ये येऊ शकतात.
  • लवकरच टाटा बेंगळुरू मधील मॅनुफॅक्चरींग प्लांट विकत घेऊ शकते.
  • प्लांट विकत घेण्यासाठी 5000 कोटी रुपयांचा सौदा केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple products चं प्रोडक्शन सुरु केलं जाऊ शकतं.

अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स बनवू शकते टाटा

समोर आलेल्या माहितीनुसार Tata Sons आणि Wistron दरम्यान होणार सौदा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि टाटा ग्रुप्स लवकरच या सौद्यावर शिक्कामोर्तब करू शकतो. रिपोर्टनुसार बेंगळुरूमधील विस्ट्रॉन प्लांट खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप्सकडून 5 हजार कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, जी तैवानची कंपनी स्वीकारू शकते. या प्लांटमध्ये सध्या Apple iPhone 14 आणि iPhone 12 मॉडेल्सची निर्मिती होत आहे.

बातमी आहे की टाटा आणि विस्ट्रॉनची ही डील येत्या महिन्यात पूर्ण होईल ज्यामुळे सप्टेंबर 2023 पासून या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा कारभार टाटा ग्रुप्सद्वारे सांभाळला जाईल. विशेष म्हणजे यामुळे पहिल्यांदाच एखादी भारतीय कंपनी अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स व आयफोन्सची निर्मिती करेल. याआधी भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट बनू लागले होते परंतु सर्व कारभार परदेशी कंपन्यांकडे होता.

टाटाचे आयफोन

जवळपास 44 एकरमध्ये पसरलेल्या विस्ट्रॉन प्लांटमध्ये 8 असेंबली लाइन्स आहेत ज्यावर सध्या आयफोन 12 सीरीज तसेच आयफोन 14 सीरीजचे मोबाइल फोन्स बनवले जात आहेत. जर हे फोन मॉडेल डिस्कंटिन्यू नाही झाले तर आपल्याला टाटा द्वारे निर्मित आयफोन 12 आणि आयफोन 14 मॉडेल्स बाजारात दिसू शकतात. फक्त इतकेच नव्हे तर आगामी Apple iPhone 15 चे मॉडेल्स देखील भारतात Tata द्वारे बनवले जाऊ शकतात.

Apple करेल 6,300 कोटींची गुंतवणूक

रिपोर्टनुसार Tata Sons Chairman N Chandrasekaran यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत Apple CEO Tim Cook यांची भेट घेतली होती आणि भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सच्या निर्मिती आणि विक्रीवर चर्चा केली होती. अ‍ॅप्पल कंपनी तमिळनाडुमधील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये 6,300 कोटी रुपयांचा गुंतवणूक करण्याची योजना बनवत असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रोजेक्ट अंतगर्त जून पासून टाटाच्या प्लांटवर देखील अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सची निर्मिती केली जाऊ शकते.

The post लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/feed/ 0
अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/ https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/#respond Fri, 09 Sep 2022 12:03:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12989 iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत […]

The post अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु डील फायनल झाल्यास TATA भारतात पहिली कंपनी बनेल जी iPhones ची निर्मिती करेल.

TATA बनवू शकते iPhone?

रिपोर्टनुसार मॅन्युफॅक्चरिंगच्या जॉईंट वेंचरसाठी कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अशाप्रकारे टाटा ग्रुप (Tata Group) भारतात आयफोन असेंबल करणारी पहिली कंपनी बनू पाहत आहे. टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन कॉर्प (Wistron Corp.) यांच्यातील ही चर्चा आता सुरु झाली आहे, परंतु सर्व गोष्टी फायनल होण्यास वेळ लागू शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

सध्या आयफोन प्रामुख्याने तैवान मधील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीद्वारे असेंबल केला जातो. या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन असेंबल करतात. अ‍ॅप्पलला या चर्चेविषयी माहिती आहे की नाही हे अजूनतरी समजले नाही. दिग्गज अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅप्पलला चीनच्या बाहेर आपली मॅन्युफॅक्चरिंग आणायची आहे. तसेच अ‍ॅप्पलला भारतात आपल्या सप्लाई चेनचा देखील विस्तार करायचा आहे.

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

बातम्यांनुसार, Apple चीनच्या बाहेर आपल्या iPhones च्या निर्मितीसाठी पर्याय शोधत आहे आणि जगभरात आपले iPhone मॉडेल बनवणे आणि शिप करण्यासाठी चीनवर अवलंबून राहणं हळूहळू कमी करायचं आहे. यामागे चीनी आणि अमेरिकन सरकारमधील मतभेद कारणीभूत आहेत. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

जर बोलणी यशस्वी झाली तर टाटा आयफोनची निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी बनेल, जे काम आतापर्यंत प्रामुख्याने चीन आणि भारतात तैवानमधील विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप करत होते. Apple चा मेक इन इंडियाचा कल पाहता याचा Apple आणि भारतीय iPhone ग्राहकांना दोघांनाही फायदा होईल.

iPhone 14 सीरिज लाँच

एका मोठ्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते तर iPhone 14 Pro Max चा 1TB स्टोरेज असलेला मॉडेल 1,89,900 रुपयांमध्ये भारतात विकला जाईल. आयफोन 14 प्लस वगळता अन्य मॉडेल्सची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु होईल.

The post अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/feed/ 0
Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना https://www.91mobiles.com/marathi/apple-could-ship-20-million-foldable-iphone-in-2023/ https://www.91mobiles.com/marathi/apple-could-ship-20-million-foldable-iphone-in-2023/#respond Mon, 03 May 2021 14:26:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10804 Apple आपल्या फोल्डेबल आयफोन्सच्या निर्मितीत गुंतली आहे आणि कंपनी हे साल 2023 मध्ये बाजारात घेऊन येईल.

The post Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple एकमेव अशी टेक कंपनी आहे जी निवडक मोबाईल फोन लॉन्च करते पण त्या मोबाईल फोन्सच्या जीवावर टॉपवर असते. अ‍ॅप्पलचे iPhone प्रीमियम क्वॉलिटीसाठी ओळखले जातात आणि महाग असूनही लोकांना हे आवडतात. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते कि अ‍ॅप्पल पण आपल्या फोल्डेबल फोनवर काम करत आहे आणि हा 2023 मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच आता या foldable iPhone संबंधित अजून एक नवीन आणि मोठा अपडेट समोर आला आहे. (Apple could ship 20 million foldable iPhone in 2023)

foldable iPhone ची पहिली बातमी प्रसिद्ध एनॉलिस्ट कुओ यांनी दिली होती आणि त्यांनी सांगितले होते कि Apple कंपनी घडी होणाऱ्या मोबाईल फोनवर काम करत आहे आणि हा पहिला फोल्डेबल आयफोन साल 2023 मध्ये सादर केला जाईल. तसेच आता कुओने अजून एक नवीन माहिती दिली आहे कि अ‍ॅप्पलची योजना आहे कि या फोल्डेबल फोनचे 20 मिलियन यूनिट लॉन्चच्या पहिल्या वर्षात जगभरात विकले जातील.

2 कोटी foldable iPhone

Apple आपल्या फोल्डेबल आयफोन्सच्या निर्मितीत गुंतली आहे आणि कंपनी हे साल 2023 मध्ये बाजारात घेऊन येईल. नवीन रिपोर्टनुसार अ‍ॅप्पल कंपनीने टारगेट ठेवले आहे कि लॉन्चच्या पहिल्या वर्षातच या foldable iPhone चे 20 मिलियन यूनिट म्हणजे 2,00,00,000 फोल्डेबेल आयफोन संपूर्ण जगभरात विकले जातील. रिपोर्टनुसार अ‍ॅप्पलला अपेक्षा आहे कि वर्ष 2023 मध्ये 15 ते 20 मिलियन फोल्डेबल आयफोन मोबाईल युजर्सद्वारे विकत घेतले जातील.

Foldable iPhone चा फोटो

Samsung देणार फोल्डेबल डिस्प्ले

20 मिलियन शिपमेंटच्या मोठ्या टारगेटसह Apple ने अपने फोल्डेबल फोनची निर्मिती सुरु केली आहे. या मोबाईल फोन्समधील फोल्डेबल ओएलईडी डिस्प्लेसाठी अ‍ॅप्पलने टेक कंपनी Samsung शी भागेदारी केली आहे आणि सॅमसंगच foldable OLED display ची एक्सक्लूसिव सप्लायर असेल.

हे देखील वाचा : iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट

असा असेल घडी होणारा आयफोन

रिपोर्टनुसार Apple foldable iPhone चा डिस्प्ले 7.5 इंच ते 8 इंचापर्यंत असू शकतो तसेच कुओच्या नवीन अपडेटनुसार अ‍ॅप्पलचा हा पहिला फोल्डेबल आयफोन 8 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोनमध्ये अ‍ॅप्पलचा लेटेस्ट बॉयोनिक चिपसेट दिला जाईल त्याचबरोबर अ‍ॅडव्हान्स आयओएस को मिळेल. हा आयओएस वर्जन फोल्डेबल मोबाईलच्या फंक्शन्सनुसार बनवला जाईल. पण या फोल्डेबल आयफोनसाठी 2023 ची वाट बघावी लागेल.

अ‍ॅप्पल आयफोन 12 व्हिडीओ

The post Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-could-ship-20-million-foldable-iphone-in-2023/feed/ 0
ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा… https://www.91mobiles.com/marathi/youth-orders-a-cheap-iphone-online-receives-a-phone-shaped-coffee-table/ https://www.91mobiles.com/marathi/youth-orders-a-cheap-iphone-online-receives-a-phone-shaped-coffee-table/#respond Fri, 26 Mar 2021 15:39:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10412 ओरिएंटल डेली मलेशियाच्यानुसार, थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने जेव्हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किंमत असलेला iPhone 8 बघितला तेव्हा तो उत्साहित झाला आणि तपासणी न करता त्याने ऑर्डर दिली.

The post ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
घर बसल्या ऑनलाइन शॉपिंग करून वेळ वाचवणे हा सध्याचा एक ट्रेंड आहे. कमी किंमत आणि शानदार ऑफर्स मुळे लोक आपोआप ऑनलाइन शॉपिंग साइट्सकडे आकर्षित होतात. पण, ऑनलाइन शॉपिंगमध्ये होणाऱ्या फसवणुकीककडे दुर्लक्ष करता येत नाही. नेहमीच ऐकायला मिळते कि ऑनलाइन जे सामान मागवले जाते तेचे मिळत नाही. डीलिवर बॉयची चुकी किंवा शॉपिंग साइटच्या चुकीमुळे अनेकदा आपल्या ऑर्डरच्या जागी दुसरे सामान येते. असेच काहीसे थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झाले आहे. पण इथे चूक ऑर्डर करणाऱ्या तरुणाची होती. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. (youth orders a cheap iphone online receives a phone shaped coffee table)

ऑर्डर केला होता iPhone 8

ओरिएंटल डेली मलेशियाच्यानुसार, थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने जेव्हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किंमत असलेला iPhone 8 बघितला तेव्हा तो उत्साहित झाला आणि तपासणी न करता त्याने ऑर्डर दिली. त्यानंतर तो iPhone ची आतुरतेने वाट बघू लागला. पण जेव्हा त्याला पॅकेज मिळाले तेव्हा तो iPhone 8 च्या ऐवजी iPhone सारखा दिसणारा मोठा कॉफी टेबल निघाला. मोबाईलच्या जागी टेबल बघून तरुण हैराण झाला.

हे देखील वाचा : 5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च

कुठे झाली चूक

रिपोर्टनुसार यात ई-कॉर्मस साइटची चूक नाही. कारण तरुणाने ऑर्डर करण्याआधी प्रोडक्टबाबत संपूर्ण माहिती बघितली नाही. ई-कॉमर्स वेबसाइटवर कथितरित्या लिहिण्यात आले होते कि हा एक iPhone च्या आकाराचा कॉफी टेबल आहे.

हे देखील वाचा : Moto G100 5G फोन लॉन्च, डुअल पंच-होलसह आहे 64MP रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स

सोशल मीडियावर वायरल होत आहे फोटो

iPhone सह युवकाचे फोटोज आता सोशल मीडियावर वायरल होत आहेत. पण असे वाटते आहे कि तो आपल्या खरेदीमुळे खुश आहे. विशेष म्हणजे कॉफी टेबल अगदी iPhone 6s सारखा दिसतो आणि आकाराने मोठा आहे. यात एक स्क्रीन आहे जी काळ्या रंगाची आहे, एक टच-आयडी आणि एक नकली माइक आहे. खाली सफेद रंगात चार स्टॅन्ड आहेत.

ऍप्पल आयफोन 8 व्हिडीओ

The post ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/youth-orders-a-cheap-iphone-online-receives-a-phone-shaped-coffee-table/feed/ 0
जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/#respond Fri, 04 Dec 2020 13:07:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9167 अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात.

The post जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बाजारात अनेक म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप आहेत ज्यातील अनेक ऍप्स युजर्सना फ्री ऍक्सेस पण देतात. पण हे म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप्स असतानाही YouTube ची गरज आपल्याला पडतेच हे देखील तेव्हढेच मोठे सत्य आहे. इंटरनेट वर फक्त व्हिडीओज बघण्यासाठी नाही तर गाणी ऐकण्यासाठी पण आपण यू-ट्यूब कडे वळतो. स्मार्टफोन मध्ये यू-ट्यूब वापरताना आपण इतर ऍप्सचा वापर करू शकत नाही आणि हि समस्या नेहमीच येते. पण आज आम्ही तुम्हाला अश्या सोप्प्या ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बॅकग्राउंड मध्ये पण YouTube वापरू शकाल आणि यू-ट्यूब वर गाणी ऐकत फोन मध्ये इतर कामे करू शकाल.

अश्याप्रकारे वापरा बॅकग्राउंड मध्ये यू-ट्यूब

1. सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये गुगल क्रोम बाउजर वर जा आणि यू-ट्यूब उघडा.

2. YouTube उघडल्यावर तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यावर ‘तीन डॉट’ दिसतील, त्यावर क्लिक करा.

3. इथे ऑप्शन्सची एक लिस्ट येईल, त्यात खाली जाऊन ‘Desktop Site’ वर क्लिक करा.

4. आता तुमच्या आवडीची गाणी किंवा व्हिडीओ प्ले करा, आणि मग होम बटन दाबा.

5. आता फोनचा नोटिफिकेशन पॅनल उघडा, इथे तुम्हाला व्हिडीओ प्लेबॅकचा ऑप्शन मिळेल. प्ले बटन वर क्लिक करताच तो व्हिडीओ सुरु होईल.

6. चांगली गोष्ट अशी कि आता तुम्ही जर तुमचा फोन लॉक पण केला तरीदेखील हा व्हिडीओ सुरु राहील आणि तुम्ही नोटिफिकेशन पॅनल वरून तो कंट्रोल करू शकाल.

अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात. आयफोनच्या सफारी ब्राउजर किंवा गुगल क्रोम, दोन्ही मध्ये हि ट्रिक वापरता येईल. अँड्रॉइड मध्ये ब्राउजरच्या वरच्या कोपऱ्यावर तीन डॉट्स क्लिक करायच्या असतात तर आयफोन मध्ये वर डावीकडे डावीकडे असलेल्या ‘aA’ लोगो वर टॅप करून, ‘डेस्कटॉप साइट’ वर क्लिक करावे लागेल. बाकी सर्व प्रोसेस सारखीच असेल. अश्याप्रकारे कोणत्याही मोबाईलचा युजर आपल्या कामात व्यत्यय न आणता YouTube बॅक ग्राउंड मध्ये पण चालू ठेऊ शकतो आणि इतर ऍप्सचा वापर पण सोबतच करू शकतो.

The post जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/feed/ 0
20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/ https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/#respond Fri, 20 Nov 2020 13:24:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9024 एका डिलिव्हरी बॉयने फोन योग्य ठिकाणी पोहोचवण्याऐवजी, विकूनच टाकले. ते पण 1-2 नाही तर संपूर्ण 14 सर्वात लेटेस्ट आणि महाग iPhone 12 Pro Max.

The post 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हा डायलॉग तो अक्सर नेहमी ऐकायला मिळतो कि जे लोक Apple iPhone वापरतात ते लोक श्रीमंत असतात. कोणाकडे ऍप्पलचा लेटेस्ट आयफोन असेल तर त्याला स्टेट्स सिंबल म्हणून बघितले जाते. महाग आयफोन बाळगण्याचे अनेकांचे स्वप्न असते पण असा किस्सा पहिल्यांदा ऐकला असेल कि एका डिलिव्हरी बॉयने फोन योग्य ठिकाणी पोहोचवण्याऐवजी, विकूनच टाकले. ते पण 1-2 नाही तर संपूर्ण 14 सर्वात लेटेस्ट आणि महाग iPhone 12 Pro Max.

हा विचित्र हैराण करणारा किस्सा चीनचा आहे. सविस्तर सांगायचे झाले तर टँग नावाचा एक व्यक्ती ऍप्पलच्या डिलिव्हरी कंपनी मध्ये काम करत होता. टँगला Apple iPhone 12 Pro Max चे 14 यूनिट्स एका ऍप्पल स्टोर वरून दुसऱ्या ऍप्पल स्टोर वर डिलिव्हर करण्याचे काम मिळाले. टँग सांगितलेल्या वेळेवर ऍप्पल स्टोर वर पोहोचला आणि 14 आयफोन 12 प्रो मॅक्स फोन्स घेऊन दुसऱ्या स्टोरकडे निघाला. पण रस्त्यात टँगचा ईमान डगमगला आणि iPhone 12 Pro Max दुसऱ्या स्टोर वर डिलिव्हर कारण्याऐवजी तो फरार झाला.

मीडिया रिपोर्टनुसार त्या 14 आयफोन्सची किंमत 20 लाख 29 हजार रुपयांच्या आसपास होती. Apple iPhone 12 Pro Max चे यूनिट्स ऍप्पल स्टोर वर डिलिव्हर करण्याच्या ऐवजी टँगने ती ऑर्डर कॅन्सल केली त्यानंतर त्याला फक्त 113 रुपयांच्या आसपास दंड भरावा लागला. प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा टँगचा शोध सुरु झाला आणि काही दिवसानंतर चीनच्या पोलिसांनी त्याला पकडले.

उडवून टाकले पैसे

टँग जेव्हा पकडला गेला तेव्हा समजले कि त्याने 14 पैकी एक Apple iPhone 12 Pro Max स्वतःसाठी ठेवला आणि एक आयफोन 12 प्रो मॅक्स त्या मित्राला विकला ज्याच्याकडून त्याने काही पैसे उधार घेतले होते. एक आयफोन टँगने एका दुकानात गहाण ठेवला, ज्याच्या बदल्यात त्याला जवळपास 1,00,000 रुपये मिळाले. अश्याप्रकारे जवळपास 1,13,000 रुपयांच्या एक iPhone 12 Pro Max टँगने मोबाईल शॉप वर फक्त 79,999 रुपयांमध्ये विकला.

एकसाथ मिळालेले इतके पैसे सांभाळणे सर्वांना जमत नाही आणि हीच चूक टँगने केली. लाखो रुपये मिळवून टँगने शॉपिंग सुरु केली आणि महाग कपडे विकत घेतले. फक्त इतकेच नव्हे तर टँगने आपला शौक पूर्ण करण्यासाठी एक बीएमडब्ल्यू कार पण भाड्याने घेतली. अखेरीस जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा टँग कडून 10 iPhone 12 Pro Max रिकवर करण्यात आले आणि तपास केल्यानंतर डिलिव्हरी बॉयला जेल मध्ये टाकण्यात आले.

अशी आहे Apple iPhone 12 Pro Max ची किंमत

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स भारतीय बाजारात तीन स्टोरेज मॉडेल्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस मॉडेल 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1,29,900 रुपये आहे. तर आयफोन 12 प्रो मॅक्सचा 256GB स्टोरेज मॉडेल कंपनीने 1,39,900 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्सचा सर्वात मोठा मॉडेल 512GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1,59,900 रुपये आहे. आयफोन 12 प्रो मॅक्स Silver, Graphite, Gold आणि Pacific Blue कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स व्हिडीओ

The post 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/feed/ 0
Apple बाबत मोठी बातमी, चीन सोडून भारतात येत आहेत 6 नवीन प्रोडक्शन लाईन्स https://www.91mobiles.com/marathi/apple-planning-to-shift-around-six-production-lines-from-china-to-india-iphone-ipad-imac-macbook/ https://www.91mobiles.com/marathi/apple-planning-to-shift-around-six-production-lines-from-china-to-india-iphone-ipad-imac-macbook/#respond Mon, 03 Aug 2020 11:15:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7734 ऍप्पलने आईफोन 11 च्या निर्मितीसाठी Foxconn शी भागेदारी केली आहे आणि फॉक्सकॉनने आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये iPhone 11 चे प्रोडक्शन पण सुरु केले आहे.

The post Apple बाबत मोठी बातमी, चीन सोडून भारतात येत आहेत 6 नवीन प्रोडक्शन लाईन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple बाबत अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी फक्त भारतात आपली मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी व प्रोडक्टशन वाढवणार आहे तसेच कंपनीच्या फ्लॅगशिप फोन iPhone 11 ची निर्मिती पण भारतात सुरु झाली आहे. अशी माहिती मिळाली होती कि आईफोन 11 सोबतच ऍप्पल येत्या काळात iPhone SE 2020 पण भारतातचा बनवेल. तर आता ऍप्पल संबंधित मोठी बातमी समोर येत आहे कि कंपनी चीन मधील संपूर्ण प्रोडक्शन लाईन बंद करून भारतात घेऊन येणार आहे आणि येत्या काळात फक्त iPhone नाही तर iPad, iMac आणि MacBook पण ‘Make In India’ असतील.

मिळालेल्या माहितीनुसार Apple कंपनी चीन मधील आपले प्रोडक्शन शिफ्ट करून भारतात आणण्याचा विचार करत आहे. TOI च्या रिपोर्टनुसार ऍप्पल जवळपास 6 प्रोडक्शन लाईन्स चीन मध्ये बंद करून त्या भारतात स्थापन करण्याची योजना बनवत आहे. आशा आहे कि भारतात सुरु होणाऱ्या या प्रोडक्शन लाइन्स वर फक्त आईफोनच नाही तर आईपॅड, आईमॅक आणि मॅकबुकची निर्मिती पण केली जाईल.

मिळतील 55,000 नोकऱ्या

प्रसिद्ध अमेरिकन कंपनी Apple ने भारतात प्रोडक्शन सुरु केल्याने फक्त जगभरात ‘ इंडिया’ निर्मित आईफोन व इतर प्रोडक्ट्स विकले जातील असे नाही तर सोबत या नवीन लाईन्समुळे देशात हजारो लोकांना नोकऱ्या मिळतील. मीडिया रिपोर्टनुसार ऍप्पलने जर चीन मध्ये आपले काम बंद करून ते भारतात सुरु केले तर देशात जवळपास 55,000 नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि मोठ्या प्रमाणात भारतीयांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील.

स्वस्त मिळतील Apple प्रोडक्ट

Apple कंपनीने भारतात आपल्या फ्लॅगशिप फोन iPhone 11 चे प्रोडक्शन सुरु केले आहे. iPhone 11 भारतात इम्पोर्ट केल्यावर Apple ला जवळपास 22 टक्के आयात शुल्क दयावे लागत होते. या टॅक्सनुसार आईफोन 11 ची किंमत ठरत होती. पण आता आईफोन 11 ची निर्मिती भारतातच झाल्यामुळे ऍप्पलला हि इम्पोर्ट ड्यूटी दयावी लागणार नाही आणि याचा थेट परिणाम Apple iPhone 11 च्या किंमतीवर होईल. येत्या काळात आईफोन 11 ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा पण कमी होऊ शकते.

हा फोन चेन्नई जवळील चित्तूर मधील प्लांट मध्ये बनवला जात आहे. ईटी टेकच्या बातमीनुसार ऍप्पलने आईफोन 11 च्या निर्मितीसाठी Foxconn शी भागेदारी केली आहे आणि फॉक्सकॉनने आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये iPhone 11 चे प्रोडक्शन पण सुरु केले आहे. रिपोर्टनुसार चेन्नई व आंध्रप्रदेशच्या काही रिटेलर्सना भारतात बनलेले ऍप्पल आईफोन 11 मोबाईल विक्रीसाठी पण उपलब्ध झाले आहेत.

ऍप्पल आईफोन 11 वीडियो

The post Apple बाबत मोठी बातमी, चीन सोडून भारतात येत आहेत 6 नवीन प्रोडक्शन लाईन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-planning-to-shift-around-six-production-lines-from-china-to-india-iphone-ipad-imac-macbook/feed/ 0
मोफत वाटण्यात आले 2000 Apple iPhone, जाणून घ्या नेमके काय घडले https://www.91mobiles.com/marathi/2000-apple-iphone-6s-unit-distributed-to-diamond-princess-coronavirus-cruise-ship/ https://www.91mobiles.com/marathi/2000-apple-iphone-6s-unit-distributed-to-diamond-princess-coronavirus-cruise-ship/#respond Wed, 19 Feb 2020 13:11:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6638 त्या जहाजाला मीडियाने ‘coronavirus cruise ship’ चे नाव दिले आहे. जापान सरकारने या समस्येचा सामना शिप मधील 2,000 प्रवाशांना मोफत iPhone वाटून केला.

The post मोफत वाटण्यात आले 2000 Apple iPhone, जाणून घ्या नेमके काय घडले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone बद्दल एक विनोद प्रसिद्ध आहे कि, ‘जर आयफोन घ्यायचा असेल तर किडनी विकावी लागेल’. आजही अनेकजण आयफोनला स्टाईल आणि स्टेटस म्हणून पाहतात आणि ऍप्पलने नवीन आयफोन लॉन्च केल्यावर तो घेण्याचा विचार करतात. सर्वांनाच माहिती आहे कि iPhone किती महाग असतात आणि याच कारणामुळे हा महागडा फोन एंडरॉयड स्मार्टफोन्सच्या तुलनेत कमी विकला जातो. पण जरा विचार करा कोणी तुमच्याकडून एक रूपया पण ना घेता iPhone दिला आणि तेही अगदी मोफत तर कसे वाटेल? अशीच एक घटना समोर आली आहे जिथे एक किंवा दोन नाही तर 2,000 iPhone वाटण्यात आले आहेत. पण हैराण करणारी बाब हि नाही कि Apple iPhone लोकांना मोफत मिळाले तर फोन मोफत का वाटण्यात आले हे याचे कारण जास्त हैराण करणारे आहे.

2,000 Apple iPhone मोफत देण्याचा हि घटना जापान मधील आहे. प्रथमदर्शीनी हि बातमी मजेदार वाटेल पण यामागील कारण धक्कादायक आहे. हे आयफोन एका समुद्री जहाजावरील प्रवाशांना वाटण्यात आले आहेत. झाले असे कि या महिन्याच्या सुरवातीला Diamond Princess cruise नावाच्या एका शिप वर प्रवास करत असलेल्या प्रवाशांमधील एका प्रवाश्याला प्रवाशाला कोरोना वायरसची लागण झाली होती. हि शिप आपल्या प्रवासाला निघाली होती आणि प्रवासात समजले कि एका व्यक्तीला कोरोना वायरसची लागण झाली आहे. या बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधले होते.

हा खतरनाक वायरस एक व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरत आहे आणि प्रवाशांमध्ये कोरोना वायरस पॉजिटिव सापडल्यामुळे त्या शिप वरील सर्व प्रवाशांवर संशय वाढला. हे प्रकरण इतके वाढले कि त्या जहाजाला मीडियाने ‘coronavirus cruise ship’ चे नाव दिले आहे. जापान समवेत संपूर्ण जगभरात सर्वांना चिंता वाटू लागली कि जर शिप वरील हजारो प्रवाशांमध्ये जर हा वायरस पसरला तर स्थिती गंभीर होऊ शकते. जापान सरकारने या समस्येचा सामना शिप मधील 2,000 प्रवाशांना मोफत iPhone वाटून केला.

iPhone चा हा मॉडेल निवडण्यात आला

जापान सरकारने प्रवाशांना 2,000 Apple iPhone दिले आहेत. हे सर्व डिवाईस iPhone 6S आहेत. स्वास्थ्य मंत्रालयाने सर्वात आधी या सर्व आयफोन्स मध्ये एक खास ऍप इंस्टाल करण्यात आला. या ऍपच्या मदतीने सर्व प्रवाशी आणि डॉक्टर्सच्या टीमचा थेट कॉन्टेक्ट करवण्यात आला आहे. जेणेकरून प्रत्येकाला आपल्या तब्येतीची माहिती डॉक्टरला सांगता यावी आणि डॉक्टर्सच्या टीमला प्रत्येक प्रवाशाचा डेटा चांगल्याप्रकारे मिळावा.

iPhone 6S च्या आधी जापान मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, लेबर एंड वेलफेयरने प्रवाशांना एंडरॉयड स्मार्टफोन्स देण्याचा विचार केला होता पण त्यात असे समजले कि फोन मध्ये इंस्टाल केला गेलेला ऍप एंडरॉयड फोन मध्ये समस्या निर्माण करत होता. या महत्वपूर्ण ऑपरेशन मध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने 2000 Apple iPhone 6S वाटण्याचा निर्णय घेतला.

या क्रूज शिप वरून आता प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. सर्वात आधी वृद्ध, अस्वस्थ लोक आणि त्या प्रवाशांना उतरवले जात आहे ज्यांच्या केबिनला खिडकी नव्हती. त्यानंतर हळूहळू इतर प्रवाशांना बाहेर काढले जाईल. coronavirus cruise ship मधुनन काढण्यात आलेल्या या लोकांना खास शिबिरात ठेवण्यात येत आहे जिथे कोरोना वायरसची तपासणी केली जात आहे. या जीवघेण्या कोरोना वायरसमुळे यावर्षी आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी मोबाईल टेक कॉफ्रेंस मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस MWC 2020 पण स्थगित करण्यात आली आहे.

The post मोफत वाटण्यात आले 2000 Apple iPhone, जाणून घ्या नेमके काय घडले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/2000-apple-iphone-6s-unit-distributed-to-diamond-princess-coronavirus-cruise-ship/feed/ 0