Nubia - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 11:38:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जीबी नव्हे 1TB मेमरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Nubia Z50 5जी फोन लाँच https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-nubia-z50-5g-phone-launched-with-snapdragon-8-gen-2-soc-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-nubia-z50-5g-phone-launched-with-snapdragon-8-gen-2-soc-check-price-specifications-details/#respond Wed, 21 Dec 2022 05:22:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16199 टेक ब्रँड नुबियानं आपल्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करत टेक मंचावर नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा मोबाइल ‘झेड’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Nubia Z50 नावानं लाँच झाला आहे. हा फोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु टेक प्रेमींना या दमदार स्मार्टफोनची माहिती असणं आवश्यक आहे. हा झेड50 मॉडेल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 […]

The post जीबी नव्हे 1TB मेमरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Nubia Z50 5जी फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक ब्रँड नुबियानं आपल्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करत टेक मंचावर नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा मोबाइल ‘झेड’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Nubia Z50 नावानं लाँच झाला आहे. हा फोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु टेक प्रेमींना या दमदार स्मार्टफोनची माहिती असणं आवश्यक आहे. हा झेड50 मॉडेल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटला सपोर्ट करतो तसेच फोनमधील 35mm camera lens याला पोर्ट्रेट फोटोजसाठी बेस्ट आहे. कंपनीनं फोनचा 1TB व्हेरिएंट देखील सादर केला आहे.

नुबीया झेड50 चे स्पेसिफिकेशन्स

नुबिया झेड50 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईलसह येणारी ही स्क्रीन कर्व्ड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. कंपनीनं फोन डिस्प्ले यूएल प्लेटिनम लो ब्लू लाईट टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जी डोळ्यांना सुरक्षित ठेवते. हे देखील वाचा: फक्त 520 रुपयांमध्ये घरी आणा रियलमीचा 5G Phone! Realme 9i 5G मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

अँड्रॉइड 13 आधारित हा फोन मायओएस 13.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला शक्तिशाली क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. नुबिया झेड50 16GB LPDDR5X RAM आणि 1TB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी नुबिया झेड50 च्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.6 अपर्चर असलेला 64MP IMX787 सेन्सर देण्यात आला आहे जो 35mm focal length आणि OIS फीचरसह येतो. जोडीला रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे जी मॅक्रो लेन्स म्हणून देखील वापरता येते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Nubia Z50 5G ला सपोर्टसह मार्केटमध्ये आला आहे. हा फोन DTS:X Ultra आणि Snapdragon Sound ट्यून्ड आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा नुबिया फोन Black Lagoon, Lantau आणि White Island कलरमध्ये लाँच झाला आहे. हे देखील वाचा: HP Smart Tank 580 Printer Review: छोट्या उद्योजकांसाठी बेस्ट प्रिंटर; प्रिंटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी नवा पर्याय

नुबीया झेड50 ची प्राइस

नुबिया झेड50 5जी फोन 5 व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे जो चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या फोनचा 8GB RAM व 128GB Storage असलेला बेस मॉडेल 999 yuan (जवळपास 35,560 रुपये) मध्ये उपलब्ध होईल. तर 8GB RAM व 256GB Storage व्हेरिएंट 3399 yuan (जवळपास 40,305 रुपये), 12GB RAM व 256GB Storage मॉडेल 3699 yuan (जवळपास 43,860 रुपये), 12GB RAM व 512GB Storage व्हेरिएंट 3999 yuan (जवळपास 47,415 रुपये) आणि 16GB RAM व 1TB Storage व्हेरिएंट 5999 yuan (जवळपास 71,130 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

The post जीबी नव्हे 1TB मेमरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Nubia Z50 5जी फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-nubia-z50-5g-phone-launched-with-snapdragon-8-gen-2-soc-check-price-specifications-details/feed/ 0
कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/red-magic-7s-and-red-magic-7s-pro-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/red-magic-7s-and-red-magic-7s-pro-launched-check-price-and-specifications/#respond Thu, 14 Jul 2022 06:54:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11387 Red Magic 7S आणि RedMagic 7s Pro दोन्ही स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत.

The post कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nubia नं आपल्या होम मार्केट चीनमध्ये Red Magic 7S या गेमिंग स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. याची सुरुवात कंपनीनं क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देऊन केली आहे. जो लेटेस्ट आणि पावरफुल अँड्रॉइड प्रोसेसर आहे. ये दोन्ही स्मार्टफोन 18GB पर्यंत रॅम आणि 165Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आले आहेत.

Red Magic 7S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Red Magic 7S फोनमध्ये 6.8-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 165Hz रिफ्रेश रेट आणि 720Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळतो. सोबतीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा गेमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित Red Magic OS 5.5 वर चालतो. हे देखील वाचा: स्वस्तात 128 जीबी मेमरी असलेला स्मार्टफोन; 5000mAh च्या बॅटरीसह Tecno Camon 19 Neo आणि Camon 19 लाँच

या फोनमध्ये ICE Magic कूलिंग सिस्टम 9.0, 520Hz टच सॅम्पलिंग रेट असलेले शोल्डर ट्रिगर आणि मॅजिक GPU स्टेबल फ्रेम इंजिन असे गेमिंग सेंट्रिक फीचर्स देण्यात आले आहेत. नूबियाच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबतीला 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Red Magic 7S स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Red Magic 7S Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Red Magic 7S Pro स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स Red Magic 7S सारखेच आहे. या फोनमध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनचा ट्रान्सपरंट एडिशन RGB कूलिंग फॅनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 960Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 165Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 18GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते. कंपनीनं ICE Magic Cooling 10.0 सिस्टम दिली आहे. पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 135W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या फोनचा रियर कॅमेरा Red Magic 7S प्रमाणे आहे. फोनच्या फ्रंटला 16MP चा अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा शूटर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर

किंमत आणि उपलब्धता

Red Magic 7S सीरीज डार्क नाइट आणि ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट व्हेरिएंट देण्यात आला आहे. तसेच Red Magic 7S Pro चा ट्रांसफॉर्मस एडिशन बंबलबी प्रेरित डिजाइनसह सादर करण्यात आला आहे.

Red Magic 7S ची किंमत

  • 8GB+128GB: CNY 3,999 (सुमारे 47,300 रुपये)
  • 12GB+256GB: CNY 4,799 (सुमारे 56,800 रुपये)
  • 12GB+256GB ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट: CNY 4,899 (सुमारे 57,900 रुपये)
  • 16GB+512GB ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट: CNY 5,499 (सुमारे 65,000 रुपये)

Red Magic 7S Pro ची किंमत

  • 12GB+256GB: CNY 5,199 (सुमारे 61,500 रुपये)
  • 16GB+512GB: CNY 5,999 (सुमारे 71,000 रुपये)
  • 18GB+1TB: CNY 7,499 (सुमारे 88,700 रुपये)
  • 12GB+256GB ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट : CNY 5,299 (सुमारे 62,700 रुपये)
  • 16GB+512GB ट्रांसफॉर्मस एडिशन : CNY 6,499 (सुमारे 76,900 रुपये)

The post कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/red-magic-7s-and-red-magic-7s-pro-launched-check-price-and-specifications/feed/ 0
Nubia लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Red Magic 6R, जाणून घ्या याची वैशिष्टये https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-6r-specifications-leaked-ahead-of-launch-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-6r-specifications-leaked-ahead-of-launch-check-details/#respond Wed, 12 May 2021 12:18:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10902 Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या डिजाइनबद्दल सध्या अधिकृत माहिती शेयर करण्यात आली नाही. समोर आलेल्या काही चित्रांमध्ये या स्मार्टफोनची डिजाइन समोर आली आहे, ज्यात मागे चार कॅमेरा सेंसर दिसत आहे. कॅमेरा सेटअपसह मोठा फ्लॅश मॉड्यूल दिसत आहे.

The post Nubia लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Red Magic 6R, जाणून घ्या याची वैशिष्टये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अपकमिंग Nubia Red Magic 6R स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स FCC वेबसाइटवर लीक झाले आहेत. हा गेमिंग फोन गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या RedMagic 6 चा टोन डाउन वेरिएंट असेल. लॉन्चपूर्वी आलेल्या Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार, हा फोन 8GB RAM, 128GB स्टोरेज आणि Bluetooth 5.2 आणि Bluetooth LE सपोर्टसह 4,100mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. या गेमिंग स्मार्टफोनच्या चार्जिंग स्पीडबद्दल लीक रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि हा फोन 30W फास्ट चार्ज सपोर्टसह येऊ शकतो. तर काही मध्ये दावा केला जात होता कि यात 40W फास्ट चार्जला सपोर्ट दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे 3C च्या लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि हा गेमिंग स्मार्टफोन 55W फास्ट चार्जला सपोर्ट करू शकतो. (Nubia Red Magic 6R specifications leaked ahead of launch check details)

Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या डिजाइनबद्दल सध्या अधिकृत माहिती शेयर करण्यात आली नाही. समोर आलेल्या काही चित्रांमध्ये या स्मार्टफोनची डिजाइन समोर आली आहे, ज्यात मागे चार कॅमेरा सेंसर दिसत आहे. कॅमेरा सेटअपसह मोठा फ्लॅश मॉड्यूल दिसत आहे.

हे देखील वाचा : 15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान

Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या नावावरून समजत आहे कि हा फोन Red Magic 6 पेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो. नुबियाच्या या अपकमिंग गेमिंग स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा फोन हाई रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि Red Magic 6R स्मार्टफोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले पॅनल दिला जाऊ शकतो. शक्यतो या फोनमध्ये 120Hz किंवा 144Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये लॉन्च झाला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s 2021, बघा या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Red Magic 6R स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. सध्या अनेक स्मार्टफोन कंपन्या आपला फ्लॅगशिप स्मार्टफोनचे टोन डाउनवेरिएंट R, S किंवा Lite नावाने सादर करत आहेत. बोलले जात आहे कि Red Magic 6R स्मार्टफोन येत्या काही दिवसांत सादर केला जाऊ शकतो.

The post Nubia लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Red Magic 6R, जाणून घ्या याची वैशिष्टये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-6r-specifications-leaked-ahead-of-launch-check-details/feed/ 0
12 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला हा पावरफुल गेमिंग फोन होत आहे भारतात लॉन्च, बघा फोनची ताकद https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-3s-gaming-phone-to-launch-in-india-soon-company-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-3s-gaming-phone-to-launch-in-india-soon-company-tweet/#respond Fri, 11 Oct 2019 15:35:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5512 वीडियो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन प्लस चिपसेट दाखवत Red Magic 3S मधील कूलिंग टेक्नॉलॉजी टीज करण्यात आली आहे.

The post 12 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला हा पावरफुल गेमिंग फोन होत आहे भारतात लॉन्च, बघा फोनची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Nubia ने गेल्या महिन्यात चीनी बाजरात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Red Magic 3S लॉन्च केला होता. रेड मॅजिक सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा डिवाईस एक गेमिंग फोन आहे जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. चीन मध्ये यशस्वी झालेला हा दमदार फोन 5000एमएएच बॅटरी आणि 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो. गेमिंगच्या भारतीय चाहत्यांसाठी खुशखबरी देत आज नुबियाने घोषणा केली आहे कि Red Magic 3S इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल.

Nubia Red Magic 3S ची माहिती Red Magic India ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून दिली आहे. कंपनीने फोनच्या लॉन्चची तारीख सांगितली नाही, लेकिन ट्वीट करून स्पष्ट केले आहे कि लवकरच हा पावरफुल गेमिंग स्मार्टफोन भारतीय बाजरात लॉन्च केला जाईल. आपल्या ट्वीट मध्ये नुबियाने एक वीडियो शेयर केला आहे जो 21 सेकंदांचा आहे. या वीडियो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन प्लस चिपसेट दाखवत Red Magic 3S मधील कूलिंग टेक्नॉलॉजी टीज करण्यात आली आहे.

Nubia Red Magic 3S

Red Magic 3S ने चीनी मध्ये पाऊल टाकले आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 6.65 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा नुबिया फोन कंपनीने 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सह दिला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित आहे जो रेडमॅजिक ओएस 2.1 कस्टम स्कीन वर चालतो.

Nubia Red Magic 3S आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट 855 प्लस वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. चीनी बाजारात Red Magic 3S दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी पावरफुल रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी यूएफसी 3.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Red Magic 3S च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.75 अपर्चर असेलला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Red Magic 3S डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Red Magic 3S पावर बॅकअप साठी 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह येतो.

Nubia Red Magic 3S भारतात कोणत्या तारखेला लॉन्च होईल आणि भारतीय बाजारात या गेमिंग फोनची किंमत किती असेल यासाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 12 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला हा पावरफुल गेमिंग फोन होत आहे भारतात लॉन्च, बघा फोनची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-3s-gaming-phone-to-launch-in-india-soon-company-tweet/feed/ 0
डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/#respond Thu, 08 Aug 2019 14:41:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5006 Nubia Z20 ची मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेला डुअल डिस्प्ले आहे.

The post डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ZTE चा सब-ब्रँड Nubia ने गेल्याच आठवड्यात अधिकृत माहिती दिली होती कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला आपल्या झेड सीरीजचा विस्तार करत Nubia Z20 सादर करणार आहे. आज कंपनीने फ्लॅगशिप डिवाईस सादर केला आहे. खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात आला आहे. Nubia Z20 ची मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेला डुअल डिस्प्ले आहे. चला जाणून घेऊया Nubia Z20 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

डुअल डिस्प्ले

Nubia Z20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.42-इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 5.1-इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. Nubia Z20 ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो. या डिस्प्ले वर फोन अनलॉक न करता टेक्स्ट, ग्राफिक्स व वीडियो इत्यादी बघता येतात.

स्पेसिफिकेशन्स

Nubia Z20 चा हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित नुबिया यूआई 7.0 वर सादर केला गेला आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालतो. कंपनीने हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्यात 6जीबी रॅम व 8जीबी रॅम देण्यात आला आहे. हे वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी च्या इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Z20 ट्रिपल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप रियर व फ्रंट दोन्हींचे काम करतो. कंपनीने फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे जो 30एक्स डिजीटल झूमला सपोर्ट करतो.

Nubia Z20 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स व फिंगरप्रिंट सेंसर सोबत पावर बॅकअप साठी 27वॉट फास्ट चार्जिंग व क्विक चार्ज 4.0 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Nubia Z20 रेड, ब्लू आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. किंमत पाहता फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 3499 युआन (जवळपास 35,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. त्याचप्रमाणे फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 3699 युआन (जवळपास 37,000 रुपये) आणि 8जीबी रॅम + 512जीबी मेमरी वेरिएंट 4199 युआन (जवळपास 42,000 रुपये) मध्ये आला आहे. चीन मध्ये हा फोन 16 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/feed/ 0
फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/nubia-z20-nx627j-listed-on-tenaa-with-dual-display-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-z20-nx627j-listed-on-tenaa-with-dual-display-12gb-ram/#respond Wed, 31 Jul 2019 12:05:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4944 फोनच्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल दोन्ही बाजूला स्क्रीन दिली जाईल.

The post फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ZTE च्या सब-ब्रँड Nubia ने गेल्याच आठवड्यात अधिकृतपणे माहिती दिली होती कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला आपल्या झेड सीरीजचा विस्तार करत Nubia Z20 सादर करणार आहे. या दिवशी कंपनी चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा आगामी फ्लॅगशिप फोन टेक मंचावर येईल. फोनच्या लॉन्चची माहिती देत नुबियाने लॉन्च टीजर पण शेयर केला होता ज्यात Nubia Z20 फोटो सेंट्रिक स्मार्टफोन असल्याची माहिती मिळाली होती. आता लॉन्चच्या आधी नुबियाच्या या दमदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Nubia Z20 लॉन्चच्या आधीच चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला आहे. टेना वर फोन Nubia NX627J मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो तर दाखवण्यात आला नाही पण Nubia Z20 फुल स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट आहे. लिस्टिंग मध्ये स्पष्ट झाले आहे कि नुबिया आपला हा स्मार्टफोन डुअल डिस्प्ले सह बाजारात आणेल. म्हणजे फोनच्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल दोन्ही बाजूला स्क्रीन दिली जाईल.

दोन्ही डिस्प्ले असतील OLED

टेना नुसार Nubia Z20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल. फोनच्या फ्रंट पॅनल वर 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.42-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाईल जो ओएलईडी पॅनल वर बनलेला असेल. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वरील डिस्प्लेचे रेज्ल्यूशन पण 1080 x 2340 पिक्सल सांगण्यात आले आहे. हा रियर डिस्प्ले पण ओएलईडी असेल आणि याची साईज 5.1-इंचाची असेल.

हे देखील वाचा: मोठ्या बॅटरी सह येईल Samsung Galaxy M20s, समोर आली माहिती

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Nubia Z20 चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार झेड सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 2.956गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर वर सादर केला जाईल जो क्वालकॉमच्या सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल. तसेच हा फोन टेना वर एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे. टेना वर Nubia Z20 तीन रॅम वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम, 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमचा समावेश आहे.

तीन रॅम वेरिएंट्स मध्ये येणारा Nubia Z20 चार स्टोरेज वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो. या वेरिएंट्स मध्ये 64जीबी मेमरी, 128जीबी स्टोरेज, 256जीबी मेमरी सोबत 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लिस्टिंग नुसार Nubia Z20 मध्ये माइक्रोएसडी कार्ड वापरता येणार नाही. फोनच्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर टेना वर Nubia Z20 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे Nubia Z20 बद्दल बोलले जात आहे कि या फोनच्या एकाच पॅनल वर कॅमेरा दिला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग

Nubia Z20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. लीक मध्ये फोनच्या तिन्ही कॅमेरा सेंसर्सची माहिती समोर आली नाही पण बोलले जात आहे कि Nubia Z20 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते. टेना नुसार Nubia Z20 रेड आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-z20-nx627j-listed-on-tenaa-with-dual-display-12gb-ram/feed/ 0
12जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Nubia Red Magic 3, OnePlus ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-3-launched-in-india-with-12gb-ram-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-3-launched-in-india-with-12gb-ram-specifications-price/#respond Wed, 19 Jun 2019 09:57:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4598 विजुअल क्वालिटी साठी फोन मध्ये कंपनीने 90Hz सपोर्ट असलेला मोठा डिस्प्ले आहे.

The post 12जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Nubia Red Magic 3, OnePlus ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ZTE च्या सब-ब्रान्ड Nubia ने एप्रिल मध्ये अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली स्मार्टफोन सीरीज वाढवत Red Magic 3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नुबिया ने हा फोन सर्वात आधी चीन मध्ये उतरवला होता ज्याने एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून टेक मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. Red Magic 3 च्या लॉन्च सोबतच कंपनीने सांगितले होते कि हा फोन लवकरच ग्लोबल मंचावर पण येईल जो इंडियन मार्केट मध्ये पण विकला जाईल. आज Nubia ने हा पावरफुल स्मार्टफोन भारतीय बाजारात पण लॉन्च केला आहे. अनोख्या लुक सोबत Red Magic 3 पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो.

सुपरफास्ट गेमिंग

Nubia Red Magic 3 कंपनीने गेमिंग स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. हा फोन Xiaomi Black Shark 2 चा मोठा प्रतिस्पर्धी असल्याचे बोलले जात आहे. गेमिंग लवर्स साठी नुबिया ने आपला फोन एयर लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. तसेच फोन मध्ये Red Magic Game Space 2.0 मोड पण आहे जो गेमिंग एक्सपीरियंस शानदार करतो. तसेच चांगल्या विजुअल क्वालिटी साठी फोन मध्ये कंपनीने 90Hz सपोर्ट असलेला मोठा डिस्प्ले आहे.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता हा मेटल बॉडी वर बनला आहे. Nubia Red Magic 3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.65-इंचाच्या फुलएचडी एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनीने फोनला 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केले आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित रेडमॅजिक 2.0 वर सादर केला गेला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वरील क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 540 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Red Magic 3 च्या बॅक पॅनल वर एफ/1.75 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा Sony IMX586 रियर सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. नुबिया रेड मॅजिक 3 डुअल सिम सोबतच 4जी एलटीई ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत व उपलब्धता

Nubia Red Magic 3 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 27 जून पासून कंपनी की वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. फोनचा 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट देशात 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा 12जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वाला पावरफुल वेरिएंट 46,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

वीडियो

The post 12जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Nubia Red Magic 3, OnePlus ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-3-launched-in-india-with-12gb-ram-specifications-price/feed/ 0
भारतात येत आहे हातावर बांधता येणारा स्मार्टफोन, लुक पाहून व्हाल दिवाने https://www.91mobiles.com/marathi/nubia-alpha-foldable-smartwatch-launch-in-india-in-may/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-alpha-foldable-smartwatch-launch-in-india-in-may/#respond Thu, 11 Apr 2019 14:39:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4075 हा अनोखा डिवाईस उघडून फोनप्रमाणे वापरला जाऊ शकतो तसेच हा बेंड करून एखाद्या घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येतो.

The post भारतात येत आहे हातावर बांधता येणारा स्मार्टफोन, लुक पाहून व्हाल दिवाने first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चाइनीज टेक ब्रँन्ड नूबिया ने यावर्षी बार्सिलोना मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये आपला Nubia Alpha वियरेबल स्मार्टफोन सादर केला होता. त्यानंतर हा फ्लेक्सिबल स्क्रीन असलेला फोन कंपनी ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला. पण जर तुम्ही या डिवाइसची वाट भारतात बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण कंपनी ने घोषणा केली आहे कि Nubia Alpha मे मध्ये भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

पण कंपनी ने याची लॉन्च डेट सांगितली नाही. नूबियाच्या या फोनची सर्वात खास बाब अशी कि हा तुम्ही तुमच्या मनगटावर घड्याळाप्रमाणे बांधू शकता. फोन सहज फोल्ड होऊन हातावर फिट व्हावा यासाठी यात फ्लेक्सिबल स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Nubia Alpha सोबत nubia pods पण सादर केले जातील. नूबिया ईयर पॉड्स बद्दल बोलायचे तर हे खऱ्या अर्थाने कंपनीचे पहिले वायरलेस ईयरबड आहेत आणि यांच्या डिजाइन साठी कंपनी ने 1MORE शी भागेदारी केली आहे.

Nubia Alpha ची किंमत
Nubia Alpha ब्लूटूथ आणि सेल्युलर दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. स्मार्टवॉचचा ब्लूटूथ वेरिएंट 449 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार 36,300 रुपयांच्या आसपास आहे. तसेच सेल्युलर वेरिएंट 549 यूरो म्हणजे जवळपास 44,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच कंपनी ने या स्मार्टवॉचचा एक गोल्ड वेरिएंट पण सादर केला आहे ​ज्याची किंमत 649 यूरो म्हणजे अंदाजे 52,500 रुपये आहे.

जबरदस्त ​फीचर्स
Nubia Alpha फ्लेक्सीबल ओएलईडी डिस्प्ले वर बनवण्यात आला आहे. हा अनोखा डिवाईस उघडून फोनप्रमाणे वापरला जाऊ शकतो तसेच हा बेंड करून एखाद्या घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येतो. Nubia Alpha मध्ये 45:9 अल्ट्रा वाइट आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस 960 x 192 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 4-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. या डिवाईसची स्क्रीन पॉलीमाइडने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या मटेरियल मुळे डिस्प्ले गरम होत नाही.

या स्मार्टवॉच मध्ये वॉयस कमांड द्वारे मेन्यू ऑपरेट केला जाऊ शकतो. स्मार्टवॉच मध्ये बॅक मेन्यू वर जाण्यासाठी तसेच वॉयस कमांड एक्टिवेट करण्यासाठी दोन फिजिकल बटण देण्यात आले आहेत. या बटणाव्यतिरिक्त एयर जेस्चर द्वारे पण स्मार्टवॉचचा मेन्यू वापरला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला हवेत हातवारे करावे लागतील आणि मेन्यू मागे किंवा पूढे जाईल. सोबतच Nubia Alpha फिटनेस ट्रॅकरचे पण काम करतो आणि यातून स्लीम, एक्सरसाईज तसेच हार्टरेट इत्यादि ट्रॅक केली जाऊ शकते.

Nubia Alpha चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Nubia Alpha मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे. हा डिवाईस 8जीबी इंटरनल मेमोरीला सपोर्ट करतो ज्यात फोटोज, वीडियो व गाणी सेव करता येतील. हा स्मार्टवॉच एडरॉयड आपरेटिंग सिस्टम वर बनलेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने Nubia Alpha मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन वियर 2100 चिपसेट दिला आहे. तसेच फोटो घेण्यासाठी हा स्मार्ट डिवाईस 5-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. पावर साठी यात 500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीनुसार एकदा चार्ज केल्यावर 2 दिवस चालते.

The post भारतात येत आहे हातावर बांधता येणारा स्मार्टफोन, लुक पाहून व्हाल दिवाने first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-alpha-foldable-smartwatch-launch-in-india-in-may/feed/ 0
अद्भुत : आला हाताला बांधता येणारा स्मार्टफोन, फोल्डेबल फोनला पण मागे टाकेल या कंपनीने https://www.91mobiles.com/marathi/nubia-alpha-foldable-smartwatch-launched-price-feature-specifications-mwc-2019-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-alpha-foldable-smartwatch-launched-price-feature-specifications-mwc-2019-in-marathi/#respond Tue, 26 Feb 2019 14:12:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3724 स्मार्टवॉचचा ब्लूटूथ वेरिएंट 449 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post अद्भुत : आला हाताला बांधता येणारा स्मार्टफोन, फोल्डेबल फोनला पण मागे टाकेल या कंपनीने first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या आधी सॅमसंग ने जगासमोर आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला होता. सॅमसंग नंतर एमडब्ल्यूसीच्या मंचावरून हुआवई ने पण जगासमोर आपला फोल्डेबल फोन ठेवला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची डिजाईन आणि इनकी अनोखी टेक्नॉलॉजी बघून फक्त स्मार्टफोन फॅन आणि टेक लवर हैराण नसून इतर टेक कंपन्या पण फोल्डेबल फोनच्या डिजाईन मध्ये रस घेत आहेत. जर सॅमसंग आणि हुआवईचे हे फोल्डेबल फोन बघून तुम्हाला वाटत असेल कि मोबाईल फोन्स बदलणार आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि या दोन्ही कंपन्यांच्या चार पाऊले पुढे जात नुबिया ने असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो मनगटावर घड्यळाप्रमाणे बांधता येईल.

चीनी कंपनी नुबिया ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावर आपली हि अनोखी टेक्नॉलॉजी सादर केली आहे. कंपनीने सादर केलेला डिवाईस स्मार्टफोन नव्हे तर स्मार्टवॉचच्या कॅटेगरी मध्ये येतो. पण या स्मार्टवॉचचा डिस्प्ले पूर्णपणे स्मार्टफोन प्रमाणे बनवण्यात आला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या घड्याळात फोटो घेण्यासाठी कॅमेरा पण देण्यात आला आहे. यात सर्व फंक्शन, यूजर इंटरफेस आणि कॉलिंग सारख्या सुविधासह रॅम आणि इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. या घड्याळात कोणतीही डायल नाही, पण वॉचच्या बॅंडच्या भागावर डिस्प्ले बनवण्यात आला आहे. आणि हाच मोठा डिस्प्ले याला स्मार्टफोन बनवतो. नुबिया ने आपल्या या डिवाईसला अल्फा स्मार्टवॉचचे नाव दिले आहे.

जबरदस्त ​फीचर्स
नुबिया अल्फा फ्लेक्सीबल ओएलईडी डिस्प्ले वर बनवण्यात आला आहे. हा अनोखा डिवाईस उघडून फोनप्रमाणे वापरला जाऊ शकतो तसेच हा बेंड करून एकाद्या घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येतो. नुबिया अल्फा मध्ये 45:9 अल्ट्रा वाइट आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस 960 x 192 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 4-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. या डिवाईसची स्क्रीन पॉलीमाइडने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या मटेरियल मुळे डिस्प्ले गरम होत नाही.

या स्मार्टवॉच मध्ये वॉयस कमांड द्वारे मेन्यू ऑपरेट केला जाऊ शकतो. स्मार्टवॉच मध्ये बॅक मेन्यू वर जाण्यासाठी तसेच वॉयस कमांड एक्टिवेट करण्यासाठी दोन फिजिकल बटण देण्यात आले आहेत. या बटणाव्यतिरिक्त एयर जेस्चर द्वारे पण स्मार्टवॉचचा मेन्यू वापरला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला हवेत हातवारे करावे लागतील आणि मेन्यू मागे किंवा पूढे जाईल. सोबतच नुबिया अल्फा फिटनेस ट्रॅकरचे पण काम करतो आणि यातून स्लीम, एक्सरसाईज तसेच हार्टरेट इत्यादि ट्रॅक केली जाऊ शकते.

लॉन्च झाला 6.9-इंच डिस्प्ले आणि 5,810एमएएच बॅटरी असलेला लेनोवो वी7, स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हींचे करेल काम

नुबिया अल्फा चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता नुबिया अल्फा मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे. हा डिवाईस 8जीबी इंटरनल मेमोरीला सपोर्ट करतो ज्यात फोटोज, वीडियो व गाणी सेव करता येतील. हा स्मार्टवॉच एडरॉयड आपरेटिंग सिस्टम वर बनलेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने नुबिया अल्फा मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन वियर 2100 चिपसेट दिला आहे. तसेच फोटो घेण्यासाठी हा स्मार्ट डिवाईस 5-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. पावर साठी यात 500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीनुसार एकदा चार्ज केल्यावर 2 दिवस चालते.

किंमत
नुबिया अल्फा ब्लूटूथ आणि सेल्युलर दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. स्मार्टवॉचचा ब्लूटूथ वेरिएंट 449 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार 36,300 रुपयांच्या आसपास आहे. तसेच सेल्युलर वेरिएंट 549 यूरो म्हणजे जवळपास 44,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच कंपनी ने या स्मार्टवॉचचा एक गोल्ड वेरिएंट पण सादर केला आहे ​ज्याची किंमत 649 यूरो म्हणजे अंदाजे 52,500 रुपये आहे.

The post अद्भुत : आला हाताला बांधता येणारा स्मार्टफोन, फोल्डेबल फोनला पण मागे टाकेल या कंपनीने first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-alpha-foldable-smartwatch-launched-price-feature-specifications-mwc-2019-in-marathi/feed/ 0
डुअल डिस्प्ले सह लॉन्च झाला हा अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेरा घेईल सेल्फी https://www.91mobiles.com/marathi/nubia-x-launched-with-dual-display-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-x-launched-with-dual-display-features-specifications-price-in-marathi/#respond Wed, 31 Oct 2018 14:01:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2723 नुबिया एक्स ची सर्वात मोठी खासियत याची डुअल डिस्प्ले वाली डिजाईनच आहे.

The post डुअल डिस्प्ले सह लॉन्च झाला हा अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेरा घेईल सेल्फी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नुबिया एक्स संबंधित पहिला लीक जेव्हा इंटरनेट वर आला होता तेव्हापासून संपूर्ण टेक विश्वाच्या नजर या फोनच्या लॉन्च वर होते. याचे कारण असे कि नुबियाच्या या फोनच्या फक्त फ्रंट पॅनल वरच नव्हे तर फोनच्या बॅक पॅनल वर पण डिस्प्ले देण्यात आला आहे. टेक प्रेमींची प्रतीक्षा संपवत नुबिया ने आज आपला हा अनोखा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. नुबिया ने आज अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला डुअल डिस्प्ले वाला स्मार्टफोन नुबिया एक्स आॅफिशियली सादर केला आहे.

नुबिया एक्स ची सर्वात मोठी खासियत याची डुअल डिस्प्ले वाली डिजाईनच आहे. नुबिया एक्स च्या फ्रंट तसेच बॅक दोन्ही पॅनल्स वर स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 7000 सीरीज एल्युमीनियम बॉडी वर बनला आहे. कंपनी ने या फोनच्या दोन्ही पॅनल वर डिस्प्ले देण्यासोबतच दोन्ही पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर पण दिला आहे जो कंपनी च्या दाव्यानुसार 0.1 सेकेंड मध्ये फोन अनलॉक करतो. फोनचा फ्रंट डिस्प्ले कपंनी ने 2.5डी ग्लासने प्रोटेक्ट केला आहे तर बॅक डिस्प्ले कर्व्ड 3डी ग्लासने कोटेड आहे.

नुबिया एक्स च्या फ्रंट पॅनल वर 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे तर फोनच्या बॅक पॅनल वर 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करणारा 5.1-इंचाचा एचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे. बॅक पॅनल वरील डिस्प्लेला कंपनी सेकेंडरी स्क्रीन असे बोलत आहे ज्यात आॅलवेज आॅन तसेच आई प्रोटेक्शन मोड आहे. फोनचे दोन्ही डिस्प्ले 19:9 आस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतात.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता नुबिया एक्स एंडरॉयड 8.1 सोबत कंपनीच्या यूआई 6.0 एक्स वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 6जीबी रॅम/64जीबी मेमरी, 8जीबी रॅम/128जीबी मेमरी तसेच 8जीबी रॅम/256जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट सामील आहेत. तिन्ही वेरिएंट यूएसएस 2.1 टेक्नॉलॉजी सह वेगाने डेटा डाटा ट्रांसफर करतात. नुबिया एक्स मध्ये एक्ट्रनल मेमरी कार्ड टाकता येणार नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नुबिया एक्स मध्ये कोणताही सेल्फी कॅमेरा देण्यात आला नाही. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे जो सेकेंडरी डिस्प्ले सोबत मिळून सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. फोन मध्ये एफ/1.8 अर्पचर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. नुबिया एक्स का कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लैश से लैस आहे. पीडीएएफ व एआई जैसे फीचर्स सह नुबिया एक्स सेल्फी को पण शानदार बनाता आहे।

नुबिया एक्स मध्ये कंपनी ने एआई डुअल-स्क्रीन स्विचिंग फीचर दिया आहे जो यूजर्स को आॅप्शन प्रदान करता आहे कि कोई पण फोटो, ​वीडियो या अन्य कटेंट वह फोन की फ्रंट डिस्प्ले देखना चाहते आहें या बॅक पॅनल पर. यह फोन 4जी वोएलटीई सपोर्ट करता आहे तथा पावर बॅकअप के लिए नुबिया एक्स मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,800एमएएच की बैटरी दी गई आहे. किंमत पाहता नुबिया एक्स डुअल डिस्प्ले फोनचा 6जीबी/64जीबी वेरिएंट डीप ग्रे व ब्लॅक गोल्ड वेरिएंट 3299 युआन (जवळपास 34,900 रुपये) तसेच सी ब्लू कलर वेरिएंट 3399 युआन (जवळपास 36,600 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

तसेच फोनचा 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वाला डीप ग्रे व ब्लॅक गोल्ड वेरिएंट 3699 युआन (जवळपास 39,100 रुपये) तर सी ब्लू कलर वेरिएंट 3799 युआन (जवळपास 40,200 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वाला ब्लॅक गोल्ड वेरिएंट 4199 युआन तसेच ब्लू गोल्ड वेरिएंट 4299 युआन मध्ये आला आहे. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 44,500 रुपये व 46,600 रुपयांच्या आसपास आहेत.

The post डुअल डिस्प्ले सह लॉन्च झाला हा अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेरा घेईल सेल्फी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-x-launched-with-dual-display-features-specifications-price-in-marathi/feed/ 0