OnePlus Nord 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Jun 2023 10:44:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Nord 3 ची किंमत लाँच पूर्वीच लीक; 5 जुलैला येतोय भारतात https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-in-india-and-specification-leaked-before-5-july-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-in-india-and-specification-leaked-before-5-july-launch/#respond Wed, 28 Jun 2023 10:44:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21791 OnePlus Nord 3 5 जुलैला भारतात लाँच होईल. ह्या फोन सोबतच कंपनी OnePlus Nord CE 3 5G फोन पण भारतीय बाजारात घेऊन येत आहे. वनप्लसनं अद्याप दोन्ही फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती सार्वजनिक केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नॉर्ड 3 5जी ची भारतातील किंमत समोर आली आहे. OnePlus Nord 3 5G प्राइस […]

The post OnePlus Nord 3 ची किंमत लाँच पूर्वीच लीक; 5 जुलैला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • प्रारंभिक किंमत 32 हजारांच्या आसपास असू शकते.
  • हा वनप्लस फोन 5 जुलैला भारतात लाँच होईल.
  • त्याचबरोबर OnePlus Nord CE 3 5G ची एंट्री देखील होईल.

OnePlus Nord 3 5 जुलैला भारतात लाँच होईल. ह्या फोन सोबतच कंपनी OnePlus Nord CE 3 5G फोन पण भारतीय बाजारात घेऊन येत आहे. वनप्लसनं अद्याप दोन्ही फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती सार्वजनिक केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नॉर्ड 3 5जी ची भारतातील किंमत समोर आली आहे.

OnePlus Nord 3 5G प्राइस (लीक)

वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनची किंमत टिपस्टर योगेश ब्रारनं शेयर केली आहे. इथे फोन व्हेरिएंट्सची ठोस किंमत तर देण्यात आली नाही परंतु असा दावा करण्यात आला आहे की ह्या मोबाइलची किंमत जवळपास 32,000 रुपयांपासून सुरु होऊन 37,000 रुपयांपर्यंत जाईल. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम मिळू शकतो.

OnePlus Nord 3 5G इंडिया लाँच

5 जुलैला ‘OnePlus Nord Summer Launch‘ इव्हेंटचं आयोजन केलं जात आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G फोनसह टीडब्ल्यूएस इअरबड्स OnePlus Nord Buds 2R भारतीय बाजारात येतील. हा लाँच इव्हेंट 5 जुलैला संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येईल.

OnePlus Nord 3 5G स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अ‍ॅमोलेड पॅनलसह 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच होऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डाइमेंसिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ह्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जो 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

The post OnePlus Nord 3 ची किंमत लाँच पूर्वीच लीक; 5 जुलैला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-in-india-and-specification-leaked-before-5-july-launch/feed/ 0
वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-nord-ce-3-full-specifications-emerge-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-nord-ce-3-full-specifications-emerge-ahead-of-launch/#respond Wed, 21 Jun 2023 09:27:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21675 OnePlus नं यंदा भारतात Nord CE 3 Lite लाँच केला होता. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Nord 3 सह Nord CE 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लसचे हे दोन आगामी फोन जुलैमध्ये लाँच होऊ शकतात. परंतु आतापर्यंत कंपनीनं अधिकृतपणे नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 च्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु दोन्ही […]

The post वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.7 इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये असू शकतो मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर
  • नॉर्ड सीई 3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसरसह येऊ शकतो

OnePlus नं यंदा भारतात Nord CE 3 Lite लाँच केला होता. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Nord 3 सह Nord CE 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लसचे हे दोन आगामी फोन जुलैमध्ये लाँच होऊ शकतात. परंतु आतापर्यंत कंपनीनं अधिकृतपणे नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 च्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु दोन्ही फोन्सचे अनेक लीक समोर आले आहेत. आता टिपस्टर मुकुल शर्मानं लाँचपूर्वीच वनप्लस नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 दोन्हीचे फुल स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत.

वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड 3 5जी मध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात सेल्फीसाठी पंच होल डिजाइनसह 120Hz रिफ्रेश रेट आहे.
  • प्रोसेसर: वनप्लस फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज असू शकते.
  • ओएस: OnePlus Nord 3 5G Android 13 आधारित OxygenOS 13.1 सह येऊ शकतो.
  • कॅमेरा: रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा होने की उम्मीद आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर असेल. सेल्फीसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • इतर फीचर: वनप्लस नॉर्ड 3 मध्ये ड्युअल स्पिकर, डॉल्बी एटमॉस, एक्स-अ‍ॅक्सिस मोटर एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि अलर्ट स्लाइडरचा समावेश केला जाऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड सीई 3 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.7 इंचाचा फ्लूइड AMOLED डिस्प्ले असू शकतो. जो 950 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.
  • प्रोसेसर: हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • रॅम आणि स्टोरेज: फोन 12GB पर्यंत LPDDR4X रॅम (16GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम) सह लाँच होण्याची शक्यता आहे.
  • ओएस: वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी ऑक्सीजनओएस 13.1 सह येऊ शकतो. असं देखील सांगण्यात आलं आहे की हा दोन वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेटसह येईल.
  • कॅमेरा: वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता आहे, ज्यात 50MP IMX890 प्रायमरी कॅमेरा (OIS), 8MP 112-डिग्री UW आणि 2MP 4cm मॅक्रो लेन्स असेल.
  • बॅटरी: फोन 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.
  • अन्य फीचर: वनप्लस नॉर्ड 3 प्रमाणे नॉर्ड सीई 3 देखील ड्युअल स्पिकर, हायपरटच, हायपरबूस्ट, डॉल्बी एटमॉस, एक्स-अ‍ॅक्सिस मोटर एनएफसी आणि आयआर ब्लास्टर असण्याची शक्यता आहे.

The post वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-nord-ce-3-full-specifications-emerge-ahead-of-launch/feed/ 0
OnePlus Nord 3 ची ऑफिशियल ईमेज लीक; लाँचपूर्वीच लुक आणि डिजाईन आली समोर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications-2/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications-2/#respond Tue, 20 Jun 2023 10:10:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21652 OnePlus Nord 3 टीज करत कंपनीनं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये भारतात लाँच केला जाईल. सध्या लाँच डेट तर समोर आली नाही परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ह्या मोबाइल फोनचे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले होते, ज्यातून नॉर्ड 3 च्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. ह्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू […]

The post OnePlus Nord 3 ची ऑफिशियल ईमेज लीक; लाँचपूर्वीच लुक आणि डिजाईन आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोटो चीनमधून लीक झाली आहे.
  • फोन दोन रंगात समोर आला आहे.
  • हा ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दिसला आहे.

OnePlus Nord 3 टीज करत कंपनीनं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये भारतात लाँच केला जाईल. सध्या लाँच डेट तर समोर आली नाही परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ह्या मोबाइल फोनचे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले होते, ज्यातून नॉर्ड 3 च्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. ह्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

वनप्लस नॉर्ड 3 5जीचा लुक आणि डिजाईन (लीक फोटो)

  • Punch-Hole Screen
  • Bezel-less Design
  • Dual LED Flesh
  • Alert Slider
  • Black/Green Colors

  • फ्रंट पॅनल : वनप्लस नॉर्ड 3 पंच-होल डिस्प्लेसह दाखवण्यात आला आहेत. सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी आहे जो बॉडी एज पासून थोडासा दूर आहे. हा फोन डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहे ज्याच्या चारही बाजूंना एज दिसत आहे.
  • बॅक पॅनल : फोटोजमध्ये हा वनप्लस फोन मॅट फिनिश असलेला दिसत आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपवर डावीकडे आहे. इथे दोन मोठे रिंग देण्यात आले आहेत ह्यातील एका रिंग मध्ये सिंगल सेन्सर तर दुसऱ्या रिंगमध्ये दोन सेन्सर आहेत. ह्या दोन्ही कॅमेरा रिंगच्या बाजूला एक-एक एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. पॅनल पूर्णपणे सपाट आहे तर मध्यभागी OnePlus चा लोगो आहे.
  • साइड पॅनल : OnePlus Nord 3 च्या टॉप एजवर मायक्रोफोनसह स्पिकर आणि आयआर ब्लास्टर देखील दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबतच सिम स्लॉट आणि स्पिकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर डावीकडे पावर बटन आहे. विशेष म्हणजे अलर्ट स्लाइडर देखील दिसत आहे.

OnePlus Nord 3 5G प्राइस (लीक)

वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनच्या किंमतीची माहिती अलीकडेच लीक झाली आहे. त्यानुसार हा वनप्लस फोन भारतीय बाजारात 30 हजारांच्या बजेटमध्ये येऊ शकतो. ह्या फोनची प्रारंभिक किंमत 30,000 रुपयांपासून 32,000 रुपयांदरम्यान ठेवली जाऊ शकते. तसेच अजून एका लीकमध्ये फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 40 हजारांच्या आसपास सांगितली जात आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera

  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच होऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ह्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाची 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर असेल जी 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सल थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जी च्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

The post OnePlus Nord 3 ची ऑफिशियल ईमेज लीक; लाँचपूर्वीच लुक आणि डिजाईन आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications-2/feed/ 0
OnePlus Nord 3 ची किंमत, रॅम आणि स्टोरेज लीक; लाँचपूर्वीच जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-ram-storage-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-ram-storage-leaked/#respond Wed, 14 Jun 2023 09:49:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21607 OnePlus Nord 3 स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारासह भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. नवीन मोबाइल फोन ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. कंपनीनं सध्या ह्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही, परंतु सतत लीक समोर येत आहेत. आता एका ताज्या लीकमध्ये टिपस्टरनं फोनच्या स्टोरेज ऑप्शन आणि किंमतीची माहिती दिली आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे […]

The post OnePlus Nord 3 ची किंमत, रॅम आणि स्टोरेज लीक; लाँचपूर्वीच जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बेस मॉडेल 35,000 रुपयांमध्ये येऊ शकतो.
  • ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर असू शकतो.
  • फोनमध्ये 16GB रॅम +256GB स्टोरेज मिळू शकते.

OnePlus Nord 3 स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारासह भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. नवीन मोबाइल फोन ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. कंपनीनं सध्या ह्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही, परंतु सतत लीक समोर येत आहेत. आता एका ताज्या लीकमध्ये टिपस्टरनं फोनच्या स्टोरेज ऑप्शन आणि किंमतीची माहिती दिली आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord 3 प्राइस लीक

OnePlus Nord 3 संबंधित नवीन माहिती टिपस्टर Roland Quandt नं माहिती दिली आहे ज्यातून फोनची युरोपियन प्राइस आणि मेमरी ऑप्शन समोर आले आहेत. लीकनुसार नॉर्ड 3 च्या 8GB रॅम +128GB स्टोरेज बेस मॉडेलची किंमत 449 यूरो म्हणजे 39,900 रुपये असू शकते. तसेच 16GB रॅम +256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 549 यूरो म्हणजे 48,800 रुपये असू शकते. हा डिवाइस ग्रीन आणि ग्रे सारख्या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.

कमी असू शकते भारतीय किंमत

भारतीय किंमत पाहता OnePlus Nord 3 ची किंमत थोडी आणखी कमी असू शकते. भारतात फोनचा बेस मॉडेल 35,000 आणि टॉप व्हेरिएंट 40,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. स्टोरेज आणि किंमत लीक होण्यापूर्वी मोबाइलचे डिजाइन रेंडर्स देखील समोर आले आहेत. ज्यातून स्पष्ट झालं आहे की डिवाइस OnePlus Ace 2V च्या का रीबॅज व्हर्जन असेल. जो चीनमध्ये यावर्षीच लाँच करण्यात आला होता.

OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : OnePlus Nord 3 चे लीक स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.74 इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 2772 x 1240 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.
  • प्रोसेसर : कंपनी डिवाइसमध्ये दमदार मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर वापर करेल.
  • स्टोरेज : स्टोरेज ऑप्शन पाहता ह्याआधी समोर आलं आहे की फोन 8GB रॅम +256GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात सादर केला जाईल.
  • बॅटरी : बॅटरी पाहता स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची शक्यता कमी आहे.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
  • अन्य : फोनमध्ये सुरक्षेसाठी अलर्ट स्लाइडर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5G सपोर्ट आयआर ब्लास्टर सारखे फीचर्स मिळतील.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन OS 13 वर चालेल.

The post OnePlus Nord 3 ची किंमत, रॅम आणि स्टोरेज लीक; लाँचपूर्वीच जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-ram-storage-leaked/feed/ 0
अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications/#respond Tue, 13 Jun 2023 09:43:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21568 OnePlus Nord 3 ची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी अजूनही ह्या फोनबद्दल कोणतीही माहिती नाही परंतु लीक्समधून फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती येत आहे. आता वनप्लस नॉर्ड 3 चे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले आहेत, ज्यातून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे. वनप्लस नॉर्ड 3 5जी चा लुक आणि डिजाईन (लीक फोटो) Punch-Hole […]

The post अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोटो चीनमधून लीक झाले आहेत.
  • फोन दोन रंगात समोर आला आहे.
  • ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल.

OnePlus Nord 3 ची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी अजूनही ह्या फोनबद्दल कोणतीही माहिती नाही परंतु लीक्समधून फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती येत आहे. आता वनप्लस नॉर्ड 3 चे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले आहेत, ज्यातून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी चा लुक आणि डिजाईन (लीक फोटो)

  • Punch-Hole Screen
  • Bezel-less Design
  • Dual LED Flesh
  • Alert Slider
  • Black/Green Colors
  • फ्रंट पॅनल : वनप्लस नॉर्ड 3 पंच-होल डिस्प्लेसह दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वरच्या मध्यभागी असलेल्या पंचहोलमध्ये दिला जाईल. हा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहेत ज्याच्या चारही बाजूंना बारीक एज दिसत आहेत.
  • बॅक पॅनल : फोटोजमध्ये हा वनप्लस फोन मॅट फिनिश असलेला दिसत आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप डावीकडे आहे. ज्यात दोन मोठे रिंग देण्यात आले आहेत यातील एका रिंगमध्ये सिंगल सेन्सर तर दुसऱ्या रिंगमध्ये दोन सेन्सर आहेत. ह्या दोन्ही कॅमेरा रिंगच्या बाजुकला एक-एक एलईडी फ्लॅश आहे. पॅनल पूर्णपणे सपाट आहे तर मध्यभागी मध्ये OnePlus चा लोगो देण्यात आला आहे.
  • साइड पॅनल : OnePlus Nord 3 च्या टॉप एजवर मायक्रोफोनसह स्पिकर आणि आयआर ब्लास्टर देखील दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबतच सिम स्लॉट आणि स्पिकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे तर डाव्या पॅनलवर पावर बटन आहे. विशेष म्हणजे अलर्ट स्लाइडरही दिसत आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera
  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 सह लाँच होऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ज्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅमचा समावेश असू शकतो. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर असेल जोडीला 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकतो.

The post अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications/feed/ 0
OnePlus Nord 3 ची महत्वाची माहिती लीक; प्राइस आणि स्पेसिफिकेशनसह लाँच टाइमलाईनचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-specifications-and-price-in-india-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-specifications-and-price-in-india-leaked/#respond Fri, 14 Apr 2023 05:19:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20276 OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन भारतात लाँच झाला आहे जो 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता कंपनी भारतात अजून एक डिवाइस सादर करण्याची योजना बनवत आहे. बातमी आहे की लवकरच देशात ‘नॉर्ड’ सीरीज अंतगर्त OnePlus Nord 3 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. एक नवीन लीकमध्ये नॉर्ड 3 प्राइस रेंज आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर […]

The post OnePlus Nord 3 ची महत्वाची माहिती लीक; प्राइस आणि स्पेसिफिकेशनसह लाँच टाइमलाईनचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord CE 3 Lite नंतर आता नॉर्ड 3 लाँच होईल.
  • हा वनप्लस मोबाइल मे च्या अखेरीस बाजारात येऊ शकतो.
  • OnePlus Nord 3 ची प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन भारतात लाँच झाला आहे जो 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता कंपनी भारतात अजून एक डिवाइस सादर करण्याची योजना बनवत आहे. बातमी आहे की लवकरच देशात ‘नॉर्ड’ सीरीज अंतगर्त OnePlus Nord 3 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. एक नवीन लीकमध्ये नॉर्ड 3 प्राइस रेंज आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

वनप्लस नॉर्ड 3 ची किंमत (लीक)

OnePlus Nord 3 संबंधित नवीन लीक टिपस्टर योगेश बरारनं शेयर केलं आहे. किंमत पाहता योगेशनुसार नॉर्ड 3 ची किंमत भारतात जवळपास 30 हजार रुपयांपासून सुरु होऊ शकते आणि या फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 40 हजारांच्या बजेट पर्यंत जाऊ शकते. हे देखील वाचा: 17 एप्रिलला येतोय Samsung Galaxy M14 5G भारतात; मिळेल 50MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी

वनप्लस नॉर्ड 3 भारतात कधी लाँच होईल

लीकमध्ये नेमकी तारीख तर सांगण्यात आली नाही परंतु लाँच टाइमलाईनची माहिती मिळाली आहे. टिपस्टरनं दावा केला आहे की OnePlus Nord 3 पुढील 6 ते 8 आठवड्यांच्या आत बाजारात सादर केला जाईल. म्हणजे हा वनप्लस मोबाइल मे च्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ 1.5K AMOLED
  • 120Hz Refresh rate
  • MediaTek Dimensity 9000
  • 64+8+2MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 80W Fast Charging

OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकमध्ये दावा केला जात आहे की हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 1.5के रिजोल्यूशनसह येईल. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल.

वनप्लस नॉर्ड 3 एक 5जी फोन असेल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा मोबाइल अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होईल जोडीला ऑक्सिजन ओएसची युआय लेयर मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे इतर सेन्सर मिळू शकतात. तसेच फ्रंट पॅनलवर 16एमपीचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम

OnePlus Nord 3 बद्दल लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात एंट्री करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळेल असं टिपस्टर योगेश बरारनं सांगितलं आहे.

The post OnePlus Nord 3 ची महत्वाची माहिती लीक; प्राइस आणि स्पेसिफिकेशनसह लाँच टाइमलाईनचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-specifications-and-price-in-india-leaked/feed/ 0
कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये https://www.91mobiles.com/marathi/7-march-oneplus-ace-2v-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/7-march-oneplus-ace-2v-launch-date/#respond Tue, 28 Feb 2023 05:30:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18222 OnePlus संबंधित बातमी येत आहे की कंपनी आपल्या ‘एस’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OnePlus Ace 2V नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. कंपनी प्रेसिडेंट Louis Li यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर पोस्ट करत या मोबाइल फोनचा लाँच टीज केला आहे. एक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वनप्लस एस 2वी ची लाँच डेट देखील समोर आली आहे. विशेष […]

The post कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2V 7 मार्चला चीनमध्ये लाँच होईल.
  • हा फोन भारतात OnePlus Nord 3 बनून सादर केला जाईल.
  • MediaTek Dimensity 9000 असलेला हा पहिला फोन असू शकतो.

OnePlus संबंधित बातमी येत आहे की कंपनी आपल्या ‘एस’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OnePlus Ace 2V नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. कंपनी प्रेसिडेंट Louis Li यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर पोस्ट करत या मोबाइल फोनचा लाँच टीज केला आहे. एक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वनप्लस एस 2वी ची लाँच डेट देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन भारतात OnePlus Nord 3 नावानं एंट्री करू शकतो.

OnePlus Ace 2V चा लाँच

वनप्लस एस 2वी संबंधित माहिती समोर आली आहे की हा स्मार्टफोन येत्या 7 मार्चला लाँच केला जाऊ शकतो. कंपनी हा मोबाइल फोन सर्वप्रथम होम मार्केट चीनमध्ये सादर करू शकते जो नंतर अन्य मार्केट्समध्ये उपलब्ध होऊ शकतो. काही लीक्सनुसार हाच वनप्लस फोन भारतात OnePlus Nord 3 नावानं येईल जो जुलैमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी

OnePlus Ace 2V चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP selfie shooter
  • 5,000mAh battery

वनप्लस एस 2वी मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर असू शकतो.

वनप्लस एस 2वी ब्रँडचा पहिला असा स्मार्टफोन असू शकतो जो मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच हा प्रोसेसर 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला असू शकतो जो हेव्ही टास्क तसेच गेमिंगसाठी बेस्ट मानला जातो. आतापर्यंत कोणत्याही वनप्लस मोबाइलमध्ये या प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला नाही. आशा आहे की OnePlus Ace 2V मध्ये याचा सपोर्ट मिळेल. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

OnePlus Ace 2V चे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 16 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जोडीला 512 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. फोनचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येऊ शकतात. हा वनप्लस मोबाइल अँड्रॉइड 13 सह येईल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7-march-oneplus-ace-2v-launch-date/feed/ 0
OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-feature-specifications-leaked-with-launch-timeline/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-feature-specifications-leaked-with-launch-timeline/#respond Fri, 24 Feb 2023 04:09:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18100 अलीकडेच बातमी आली होती की OnePlus 11 आणि OnePlus 11R नंतर कंपनी आपल्या ‘नोर्ड’ सेग्मेंटमध्ये देखील नवीन मोबाइल फोन सादर करेल. या फोनचं नाव OnePlus Nord 3 असेल, असं सांगण्यात आलं होतं. आता नवीन लीकमध्ये या स्मार्टफोनच्या लाँच डिटेल सह अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आणि 80W SuperVOOC चार्जिंग […]

The post OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord 3 ची लाँच टाइमलाइन लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • यात 12GB RAM आणि MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • वनप्लस नॉर्ड 3 80W SuperVOOC टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.

अलीकडेच बातमी आली होती की OnePlus 11 आणि OnePlus 11R नंतर कंपनी आपल्या ‘नोर्ड’ सेग्मेंटमध्ये देखील नवीन मोबाइल फोन सादर करेल. या फोनचं नाव OnePlus Nord 3 असेल, असं सांगण्यात आलं होतं. आता नवीन लीकमध्ये या स्मार्टफोनच्या लाँच डिटेल सह अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आणि 80W SuperVOOC चार्जिंग आधी काही या फोनची वैशिष्ट्ये असतील. संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord 3 काही लाँच होणार

टेक वेबसाइट माय स्मार्ट प्राइसनं या मोबाइल फोनची लाँच टाइमलाइन शेयर केली आहे. रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोन दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला मार्केटमध्ये एंट्री करेल. अर्थात हा वनप्लस फोन मिड जून किंवा जुलैमध्ये लाँच होऊ शकतो. म्हणजे Nord 3 5G को बाजारात येण्यास अजून काही काळ आहे. हे देखील वाचा: सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; चार्जिगविना धावते 150KM

OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ AMOLED 120Hz display
  • 12GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP triple rear camera
  • 16MP selfie camera
  • 80W SuperVOOC charging
  • 5000mAh battery

रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेन्सिटी 9000 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. ही मोबाइल चिप 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनली आहे आणि 5जीला सपोर्ट करते. नॉर्ड 3 बद्दल सांगितलं जात आहे की हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

OnePlus Nord 3 मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असेल, असं सांगण्यात आलं आहे. जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. या वनप्लस मोबाइलमध्ये अलर्ट स्लाइडर देखील मिळेल. हे देखील वाचा: Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे.

The post OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-feature-specifications-leaked-with-launch-timeline/feed/ 0
OnePlus Nord 3 च्या डिस्प्लेची माहिती लीक; मुख्य कॅमेऱ्यात मिळू शकतं स्टॅबिलायजेशन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-specs-tipped-again/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-specs-tipped-again/#respond Tue, 14 Feb 2023 06:39:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17786 यशस्वीरीत्या OnePlus 11 5G भारतात लाँच केल्या नंतर चिनी स्मार्टफोन ब्रँड OnePlus आता आपल्या नॉर्ड सीरिजमधील OnePlus Nord 3 सादर करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्याआधीच वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स पुन्हा समोर आले आहेत. आधीच्या लिक्स पेक्षा हे स्पेक्स थोडे वेगळे आहेत. चिपसेटमध्ये कोणताही बदल नसला तरी हा फोन 1.5K डिस्प्ले रिजोल्यूशनसह येणार नाही, […]

The post OnePlus Nord 3 च्या डिस्प्लेची माहिती लीक; मुख्य कॅमेऱ्यात मिळू शकतं स्टॅबिलायजेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord 3 येत्या काही महिन्यात लाँच केला जाईल.
  • या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा मिळेल.
  • OnePlus Nord 3 मध्ये 1.5K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळणार नाही.

यशस्वीरीत्या OnePlus 11 5G भारतात लाँच केल्या नंतर चिनी स्मार्टफोन ब्रँड OnePlus आता आपल्या नॉर्ड सीरिजमधील OnePlus Nord 3 सादर करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्याआधीच वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स पुन्हा समोर आले आहेत. आधीच्या लिक्स पेक्षा हे स्पेक्स थोडे वेगळे आहेत. चिपसेटमध्ये कोणताही बदल नसला तरी हा फोन 1.5K डिस्प्ले रिजोल्यूशनसह येणार नाही, अशी माहिती नव्या लीक मधून समोर आली आहे.

OnePlus Nord 3 चे लीक स्पेसिफिकेशन्स

प्रसिद्ध टिपस्टर देबायान रॉयनं नवीन माहिती लीक केली आहे. त्यानुसार OnePlus Nord 3 मध्ये आधी आलेल्या लिक्सनुसार 1.5के डिस्प्ले दिला जाणार नाही. त्याऐवजी फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतोकॅमेरा सेगमेंट पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यातील मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन असलेला 50MP चा मुख्य कॅमेरा असू शकतो आणि जोडीला एक 8MP चा कॅमेरा मिळू शकतो. तिसऱ्या सेन्सरची माहिती मात्र समोर आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

OnePlus Nord 3 मध्ये प्रोसेसिंगसाठी MediaTek Dimensity 8100 Max किंवा Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 4,500mAh किंवा 5,000mAh ची बॅटरी मिल शकते, परंतु हा फोन वनप्लस 11 सीरिज प्रमाणे 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: चिनी 5G Phone आवडत नाहीत? भारतीय मोबाइल कंपनी लावाचा 5जी फोन होतोय लाँच

OnePlus Nord 3 ची लाँच डेट

OnePlus Nord 3 भारतात यंदा जूनमध्ये भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. परंतु कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

भारतात आलेल्या OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.74″ AMOLED 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear + 16MP Selfie
  • 100W SuperVOOC fast charging

वनप्लस 11आर 5जी फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा डिस्प्ले 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 1450निट्स ब्राइटनेस, 450पीपीआय आणि 1.07बिलियन कलरला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 730 जीपीयू आहे. हा वनप्लस फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 ROM ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर वाले 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: लाँच होण्याआधीच Flipkart लिस्ट झाली Vivo V27 सीरीज; शानदार डिजाइन आणि फीचर्ससह येणार बाजारात

वनप्लस 11आर 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएसला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post OnePlus Nord 3 च्या डिस्प्लेची माहिती लीक; मुख्य कॅमेऱ्यात मिळू शकतं स्टॅबिलायजेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-specs-tipped-again/feed/ 0
वनप्लस नॉर्ड 3 च्या लाँच पूर्वीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती ऑनलाइन लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-display-soc-specifications-tipped-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-display-soc-specifications-tipped-launch/#respond Wed, 01 Feb 2023 04:55:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17382 OnePlus ये वर्ष भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R लाँच करून सुरु करू शकते, जे याच आठवड्यात 7 फेब्रुवारीला येतील. त्यानंतर कंपनी आपल्या नॉर्ड सीरिजचा विस्तार करणं अपेक्षित आहेत. यात OnePlus Nord 3 आणि Nord CE 3 अशा दोन मॉडेल्सचा समावेश केला जाऊ शकतो. आता वनप्लस नॉर्ड 3 च्या लाँच पूर्वीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि […]

The post वनप्लस नॉर्ड 3 च्या लाँच पूर्वीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती ऑनलाइन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन ऑनलाइन लीक.
  • फोनमध्ये पंच होल कट आऊट, ट्रिपल कॅमेरा आणि अलर्ट स्लायडर मिळू शकतो.
  • OnePlus Nord 3 मध्ये 1.5के डिस्प्ले, मीडियाटेक Dimensity 8200 चिपसेट आणि 100W फास्ट चार्जिंग असण्याची शक्यता

OnePlus ये वर्ष भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R लाँच करून सुरु करू शकते, जे याच आठवड्यात 7 फेब्रुवारीला येतील. त्यानंतर कंपनी आपल्या नॉर्ड सीरिजचा विस्तार करणं अपेक्षित आहेत. यात OnePlus Nord 3 आणि Nord CE 3 अशा दोन मॉडेल्सचा समावेश केला जाऊ शकतो. आता वनप्लस नॉर्ड 3 च्या लाँच पूर्वीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे.

OnePlus Nord 3 स्मार्टफोन बाजारात मीडियाटेकच्या Dimensity 8200 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. यात 100W फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. तसेच या आगामी स्मार्टफोनची डिजाईन याच सीरिज मधल्या नॉर्ड 2टी सारखी दिसत आहे, ज्यात दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आणि पंच होल कट आऊट आहे. हा फोन कधी लाँच होईल हे मात्र समजलं नाही परंतु हा मिड रेंज स्मार्टफोन असू शकतो. हे देखील वाचा: पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत

OnePlus Nord 3 ची डिजाईन

OnePlus Nord 3 ची लीक डिजाईन पाहता या फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी एक पंच होल कट आऊट दिला जाऊ शकतो ज्यात सेल्फी कॅमेरा फिट केला जाऊ शकतो. पावर बटन आणि अलर्ट स्लायडर फोनच्या उजव्या पॅनलवर असू शकतो, तर व्हॉल्युम रॉकर डावीकडे दिला जाऊ शकतो. फोनच्या मागे दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहेत. ज्यातील वरच्या रिंगमध्ये प्रायमरी कॅमेरा मिळेल तर खालच्या रिंगमध्ये दोन सेन्सर असू शकतात.

OnePlus Nord 3 चे लीक स्पेसिफिकेशन्स

लिक्सनुसार OnePlus Nord 3 मध्ये 6.74 इंचाचा 1.5के अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये 4nm प्रोसेसरवर बनेलला मीडियाटेकचा Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो जोडीला Mali-G610 MC6 जीपीयू मिळू शकतो, त्यामुळे दमदार परफॉर्मन्स अपेक्षित आहेत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजनओएस 13.1 मिळू शकतो. हे देखील वाचा: Indian Gadget Awards 2022: हे आहेत देशातील सर्वात मोठ्या मोबाइल अवॉर्डचे विजेते

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 3 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. परंतु यातील कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र अजून समोर आली नाही. लिक्सनुसार या फोनमध्ये 64MP चा ओम्नीव्हिजन सेन्सर किंवा 50MP चा सोनी IMX890 सेन्सर मेन कॅमेरा म्हणून दिला जाऊ शकतो. जोडीला एक 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा सेन्सर मिळू शकतो. OnePlus Nord 3 मध्ये 4,500 किंवा 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

The post वनप्लस नॉर्ड 3 च्या लाँच पूर्वीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती ऑनलाइन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-display-soc-specifications-tipped-launch/feed/ 0