Jio Cinema च्या ‘धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये कसं सहभागी व्हायचं? विजेत्यांना मिळतेय कार

Highlights

  • आयपीएल पाहताना जिंका ‘धन धना धन’ कॉन्टेस्ट
  • विजेत्यांना मिळत आहे कार.
  • प्रत्येक सामन्यात कार जिंकण्याची संधी

साल 2023 च्या आयपीएलला सुरुवात होऊन अनेक दिवस झाले आहेत. यंदा आयपीएलजी मजा वाढली आहे कारण कारण टाटा आयपीएल 2023 जियो सिनेमावर मोफत टेलीकास्ट केली जात आहे. जिथे युजर्स मोफत आयपीएलचा लाभ घेऊ शकतात. तसेच रिलायन्स जियोनं एक नवीन ‘जितो धन धना धन’ कॉन्टेस्ट देखील सुरु केलं आहे. या कॉन्टेस्ट अंतगर्त युजर्स कारसह इतर अनेक भेटवस्तू जिंकू शकतात. विशेष म्हणजे जीतो धन धना धन कॉन्टेस्टची सुरुवात 8 एप्रिलपासून करण्यात आली होती ज्यात आतापर्यंत अनेक विजेत्यांना कार मिळाली आहे, कंपनी वेळावेळी विजेत्यांची घोषणा देखील करत आहे. जर तुम्हाला देखील कार जिंकायची असेल तर पुढे आम्ही पोस्टमध्ये तुम्हाला ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्याची पद्धत सांगितली आहे.

कधी पर्यंत चालेल ‘जीतो धन धना धन कॉन्टेस्ट’

की रिलायन्स जियोच्या जियो सिनेमा अ‍ॅप्लीकेशनवर सुरु असलेली ‘जीतो धन धना धन’ स्पर्धा 8 एप्रिलपासून 29 मे च्या अंतिम सामान्यांपर्यंत चालेल. या कॉन्टेस्टमध्ये कारसह स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पिकर, वायरलेस इयरफोन, ब्लूटूथ नेकबँड सारख्या अनेक भेटवस्तू जिंकता येतील.

स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धत

जर तुम्ही ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आयपीएलच्या मॅच दरम्यान तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर पोट्रेट मोडमध्ये प्रत्येक मॅच बघावी लागेल. जिथे प्रत्येक ओव्हर नंतर एक प्रश्न विचारला जाईल. सर्व प्रश्नांसाठी चार ऑप्शन दिले जातील. ज्यात सर्वात जास्त वर्षांची उत्तरे देणरीत्या युजरला विजेता घोषित केलं जाईल. तुम्ही संपूर्ण प्रोसेस पुढे जाणून घेऊ शकता.

  • सर्वप्रथम प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल स्टोरवरून जियो सिनेमा अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करा.
  • अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर जियो सिनेमावर रजिस्टर करा.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर टाटा आयपीएलच्या मॅच दरम्यान प्रत्येक ओव्हर दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
  • उत्तरासाठी चार ऑप्शन मिळतील, ज्यातील योग्य उत्तराची निवड करावी लागेल.
  • विजेत्यांची घोषणा प्रत्येक मॅच नंतर केली जाईल.
  • जर तुम्ही भाग्यवान ठरलात तर तुम्हाला एक चांगली कार मिळू शकते.

जीतो धन धना धन कॉन्टेस्टचे खास फीचर्स

  • जियो सिनेमावर होणारी ही स्पर्धा एक ऑनलाइन स्पर्धा आहे.
  • कॉन्टेस्टमध्ये युजर्स मोफत सहभागी होऊ शकतात.
  • मॅच दरम्यान प्रत्येक ओव्हरमध्ये एक प्रश्न विचारला जाईल म्हणजे एकूण 40 ओव्हरमध्ये 40 प्रश्न विचारले जातील.
  • आयपीएलमध्ये आतापर्यंत जेवढ्या मॅचेस उरल्यात आहेत त्या सर्वांसाठी एक कार गिफ्ट केली जाईल.

जियो सिनेमावर सर्व सामने देशातील 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये दाखवले जात आहेत. ज्यात मराठी, तामिळ, तेलुगू, हिंदी, इंग्लिश, बंगाली सारख्या भाषांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here