5G In India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Jun 2023 11:54:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/ https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/#respond Wed, 14 Jun 2023 11:30:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21612 भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता. 4G वरून 5G वर […]

The post 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता.

4G वरून 5G वर शिफ्ट कसं करायचं?

एयरटेल आणि जियोच्या 5G सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुमच्यकडे 5G कम्पॅटिबल स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. फोनच्या सेटिंग मध्ये मामूली बदल करून तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकाल. इथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये 5G इनेबल कसं करायचं हे सांगणार आहोत.

Google Pixel किंवा स्टॉक अँड्रॉइड असलेले स्मार्टफोन

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Settings मेन्यू ओपन करा. त्यानंतर Network & Internet वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. जर तुमच्या फोनमध्ये दोन सिम असतील तर 5G नेटवर्क असलेला सिम सिलेक्ट करा आणि Preferred network टाइपवर टॅप करून 5G ची निवड करा. अशाप्रकारे तुमच्या फोनमध्ये 5G स्पीड वापरता येईल.

Samsung

सॅमसंगच्या स्मार्टफोन युजर्सना देखील सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जावे लागेल. त्यानंतर Connections ऑप्शनमध्ये Mobile networks वर टॅप करा. सिम सिलेक्ट करून Network mode मध्ये 5G/LTE/3G/2G (autoconnect) असलेला ऑप्शन सिलेक्ट करा.

OnePlus

वनप्लस स्मार्टफोन युजर्स 4G वरून 5G वर शिफ्ट करण्यासाठी Settings मेन्यू ओपन करा. इथे Wi-Fi & networks वर क्लिक करा. त्यानंतर SIM सिलेक्ट करून Network ऑप्शनमध्ये तुम्हाला 2G/3G/4G/5G (automatic) वर क्लिक करा.

Oppo

ओप्पो युजर्स देखील फोनमध्ये 5G वापरू शकतील. ह्यासाठी Settings ओपन करा. तिथे Connection & Sharing ऑप्शनवर क्लिक करून सिम सिलेक्ट करा. त्यानंतर network type वर टॅप करून 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Realme

रियलमीच्या स्मार्टफोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जा. तिथे Connection & Sharing वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type मध्ये 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Vivo/iQoo

विवो आणि आयकूचे स्मार्टफोन भारतात Funtouch OS वर चालतात. त्यामुळे दोन्ही फोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings वर टॅप करा. तिथे SIM सिलेक्ट केल्यानंतर Mobile network वर टॅप करून Network Mode मध्ये 5G मोड सिलेक्ट करा.

Xiaomi/Poco

शाओमी आणि पोको स्मार्टफोन युजर्स 5G वर शिफ्ट करण्यासाठी फोनमध्ये सर्वप्रथम Settings मेन्यू उघडा. इथे SIM कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type ऑप्शन सिलेक्ट करून 5G नेटवर्कवर टॅप करा.

5G सुरु आहे की 4G कसं जाणून घ्यायचं

उपरोक्त सेटिंग फोनमध्ये इनेबल केल्यानंतर फोनमध्ये 4G सुरु आहे की 5G हे जाणून घेण्यासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये नेटवर्क बारवर लक्ष टाका. जिथे तुम्हाला सिम नेटवर्कसह 5G चा लोगो दिसेल. जर 4G दिसत असेल तर एकदा फोन रिस्टार्ट करा.

5G संबंधित प्रश्न

Q. 5G साठी नवीन सिम खरेदी करावं लागेल का?

A. नाही. एयरटेल आणि जियो दोन्ही कंपन्यांनी कन्फर्म केलं आहे की त्यांच्या ग्राहकांना 5G वापरण्यासाठी नवीन सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही. जुन्या 4G सिम वरच 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल.

Q. 4G फोनमध्ये 5G वापरता येईल का?

A. नाही. हे शक्य नाही. तुमच्या फोनमध्ये 4G नेटवर्कचा सपोर्ट असलेला मॉडेम आहे, जो 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करू शकत नाही. त्यामुळे 4G फोनमध्ये 5G चालू शकत नाही.

Q. 5G साठी जास्त पैसे खर्च करावे लागणार का?

A. एयरटेल आणि जियोनं सध्या 5G चे प्लॅन सादर केले नाहीत. दोन्ही कंपन्या सध्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री 5G नेटवर्क देत आहेत. 5G साठी जास्त खर्च करावा लागेल की नाही हे टेलीकॉम कंपन्यांनी प्लॅन रोलआउट नंतर स्पष्ट होईल.

The post 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/feed/ 0
15 हजारात देखील सर्वाधीक 5G बँड असलेले स्मार्टफोन, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/5g-smartphone-under-rs-15000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5g-smartphone-under-rs-15000-in-india/#respond Tue, 06 Dec 2022 11:45:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15724 भारतात 5G सुरु होऊन बराच काळ झाला आहे. जियो आणि एयरटेलनं देशातील अनेक भागांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तसे बाजारात स्मार्टफोन कंपन्यांमध्ये देखील अफोर्डेबल 5G स्मार्टफोन लाँच करण्याची स्पर्धा सुरु आहे. परंतु कमी किंमतीत 5G स्मार्टफोन लाँच करताना स्मार्टफोन कंपन्या पैसे जास्त नफा मिळवण्यासाठी अशा स्मार्टफोन्समध्ये 5G चे कमी बँड देतात. परंतु आज […]

The post 15 हजारात देखील सर्वाधीक 5G बँड असलेले स्मार्टफोन, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात 5G सुरु होऊन बराच काळ झाला आहे. जियो आणि एयरटेलनं देशातील अनेक भागांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तसे बाजारात स्मार्टफोन कंपन्यांमध्ये देखील अफोर्डेबल 5G स्मार्टफोन लाँच करण्याची स्पर्धा सुरु आहे. परंतु कमी किंमतीत 5G स्मार्टफोन लाँच करताना स्मार्टफोन कंपन्या पैसे जास्त नफा मिळवण्यासाठी अशा स्मार्टफोन्समध्ये 5G चे कमी बँड देतात. परंतु आज आम्ही तुम्हाला भारतीय स्मार्टफोन बाजारातील त्या सर्व स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत जे 15000 रुपयांच्या आत देखील सर्वाधिक 5G बँड देतात.

15 हजारांच्या आत येणारे 5जी स्मार्टफोन

POCO M4 Pro 5G

5G बँड – 13
किंमत – 11,999 रुपये

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. POCO M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

Infinix Hot 20 5G

5G बँड – 12
किंमत – 11,999 रुपये

Infinix HOT 20 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ HyperVision Gaming डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. Infinix HOT 20 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 5G चे 12 बँड आहेत, तसेच 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 50MP Super Nightscape कॅमेरा आणि ड्युअल LED फ्लॅश मिळतो. तसेच फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G51 5G

5G बँड – 12
किंमत – 12,999 रुपये

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8inch FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तर मागे 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 480+ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 5G बँडचा सपोर्ट मिळतो. पावर बॅकअपसाठी कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G SA/ NSA, 4G, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, GPS, GLONASS, NFC, आणि USB Type-C चे ऑप्शन मिळतात.

Samsung Galaxy F23 5G

5G बँड – 12
किंमत – 14,649 रुपये

Samsung Galaxy F23 5G
Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर आणि Adreno 619 GPU आहे. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच हा फोन Dolby Atmos आणि Samsung Pay ला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्टचा ऑप्शन आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर फ्रंटला 13MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi 11 Prime 5G

5G बँड – 11
किंमत – 13,999 रुपये

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC आणि 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

Lava Blaze 5G

5G बँड – 11
किंमत – 10,999 रुपये

Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जोडीला डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स मिळते. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M13 5G

5G बँड – 11
किंमत – 13,999 रुपये

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि Mali G57, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

POCO M4 5G

5G बँड – 11
किंमत – 10,999 रुपये

POCO M4 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. POCO M4 5G स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची पोर्टेट लेन्स आहे. फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

realme 9i 5G

5G बँड – 9
किंमत – 14,999 रुपये

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 950MHz. जीपीयू मिळतो. हा फोन 4GB + 64GB आणि 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Bluetooth 5.2, ड्युअल-बँड Wi-Fi, ड्युअल सिम आणि GPS असे ऑप्शन मिळतात. तर सिक्योरिटी साइड माउंटेंड फिंगरप्रिंट सेन्सरवर अवलंबुन आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगसह मिळते. Realme 9i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा 2MP ची पोर्टेट लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi Note 10T

5G बँड – 6
किंमत – 14,999 रुपये

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ Dot डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळतो. शाओमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर सुरक्षेसाठी करता येतो.

OPPO A74 5G

5G बँड – 5
किंमत – 14,990 रुपये

OPPO A74 5G स्मार्टफोनमध्ये 6.48-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या ओप्पो फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर आहे. तसेच Android 11 ऑपरेटिंग सिस्टम, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते. OPPO A74 स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, जोडीला 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

POCO M3 Pro 5G

5G बँड – 5
किंमत – 14,499

POCO M3 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तर मागे 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC मिळते. पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी आणि 18W चार्जिंग मिळते.

vivo T1

5G बँड – 4
किंमत : 15,990 रुपये

Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुल-HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. विवोच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. यातील ट्रिपल रियर कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहेत. Vivo T1 5G मध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

iQOO Z6 Lite 5G

5G बँड – 2
किंमत – 13,999 रुपये

iqoo z6 lite 5g specs

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन Qualcomm च्या लेटेस्ट एंट्री लेव्हल 5G चिपसेट Snapdragon 4 Gen 1 सह मार्केटमध्ये आला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. यात 6.58-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनच्या मागे 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, तसेच 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते.

iQOO Z6 5G

5G बँड – 2
किंमत – 15,499 रुपये

5g-phone-under-15000

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि टच 240Hz सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा Android 12 आधारित Funtouch 12 वर चालतो, जोडीला 8GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. iQOO Z6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो आणि 2MP ची पोर्टेट लेन्स मिळते. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 15 हजारात देखील सर्वाधीक 5G बँड असलेले स्मार्टफोन, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-smartphone-under-rs-15000-in-india/feed/ 0
Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/#respond Tue, 08 Nov 2022 06:32:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14693 Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. […]

The post Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. मुकेश अंबानींची टेलीकॉम कंपनी भारतातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल पेक्षा चांगला स्पीड ऑफर करत आहे. Ookla च्या SpeetTest रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आलं आहे की जियोचा 5G स्पीड डाउनलोड 606.53Mbps ते 875.26Mbps पर्यंत आहे ज्यात C-बँड का वापर करण्यात आला आहे. तर एयरटेल 5G चा स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps पर्यंत आहे.

Ookla नं चार प्रमुख शहरांमध्ये रिलायन्स जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्क मध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडचा डेटा शेयर केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Airtel 5G आणि Jio 5G च्या वेगवेगळ्या शहरांच्या सरासरी स्पीडची माहिती दिली आहे.

Jio 5G and Airtel 5G download speed

जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्कच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G स्पीडची सरासरी पाहता स्पीडच्या बाबतीत जियोनं एयरटेल खूप मागे टाकलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

5G download speed Delhi

दिल्ली मधील स्पीड पाहता ओकलानुसार दिल्लीमध्ये जियोचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 600Mbps आहे. तर एयरटेलच्या 5G नेटवर्कवर सरासरी डाउनलोडिंग स्पीड 197.98 Mbps आहे.

5G download speed Mumbai

मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या टेलीकॉम सर्व्हिस Jio च्या 5G नेटवर्कवर 514.38Mbps सरासरी डाउनलोडिंग स्पीड मिळतो. तर एयरटेल 5G नेटवर्क इथे देखील डाउनलोडिंगमध्ये मागे आहे. Airtel 5G चा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 271.01Mbps आहे.

5G download speed Kolkata

कोलकातामध्ये रिलायन्स जियोच्या 5G नेटवर्कचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 482.02Mbps आहे. तसेच एयरटेल 5G सर्व्हिसनं कोलकात्यात युजर्सना खूप त्रास दिला आहे. कोलकात्यात एयरटेलचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड फक्त 33.83Mbps आहे.

5G download speed Varanasi

चार पैकी तीन शहरांमध्ये रिलायन्स जियोचा 5G डाउनलोडिंग स्पीड जास्त असला तरी वाराणसीमध्ये एयरटेलनं बाजी मारली आहे. वाराणसीमध्ये एयरटेलचा सरासरी स्पीड 516.57Mbps आहे. तर जियोचा स्पीड 485.22Mbps आहे. हे देखील वाचा: OPPO A98 वेबसाइटवर लिस्ट! 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येईल बाजारात

जियोच्या स्पीडचं कारण

रिलायन्स जियोचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड चांगला असण्यामागे कारण म्हणजे स्पेक्ट्रम लिलावात कंपनीनं सर्वात जास्त स्पेक्ट्रम मिळवले आहेत. खासकरून जियोकडे जास्त मागणी असलेला C-बँड स्पेक्ट्रम आहे. भारतात 700 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँड फक्त अंबानींच्या टेलीकॉम कंपनीकडे आहे. त्यामुळेच रिलायन्स जियो अन्य कंपन्या जसे की वोडाफोन आयडिया (विआय) आणि एयरटेलपेक्षा चांगला स्पीड देत आहे. 700 मेगाहर्ट्ज लो-बँड स्पेक्ट्रम आहे, जो शहरी आणि ग्रामीण भागात चांगली इंडोर कव्हरेज ऑफर करतो.

रिलायन्स जियोच्या सी-बँडमध्ये 5G चा सरासरी डाउनलोड स्पीड 606.53Mbps आणि 875.26 Mbps दरम्यान होता. तर दुसरीकडे जियोच्या 700 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी बँड दरम्यान सरासरी 5G स्पीड 78.69 Mbps ते 95.13 Mbps दरम्यान असतो. एयरटेलच्या C-बँड स्पेक्ट्रमचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps दरम्यान राहील आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/feed/ 0
या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/#respond Mon, 31 Oct 2022 11:34:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14480 Airtel आणि Jio भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नऊ शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलं आहे. एयरटेलची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, सिलिगुरी, नागपुर आणि वाराणसीमध्ये सुरु आहे. तर जियोची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये लाइव्ह आहे. लवकरच दोन्ही कंपन्या पुढील टप्प्यात 13 नवीन शहरांमध्ये […]

The post या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel आणि Jio भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नऊ शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलं आहे. एयरटेलची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, सिलिगुरी, नागपुर आणि वाराणसीमध्ये सुरु आहे. तर जियोची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये लाइव्ह आहे. लवकरच दोन्ही कंपन्या पुढील टप्प्यात 13 नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरु करणार आहेत. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे ज्यांना 5G सपोर्ट मिळाला आहे. रिलायन्स जियो आणि एयरटेलचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी 5G इनेबल स्मार्टफोनवर अपडेट मिळणं आवश्यक आहे. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनची माहिती देत आहोत, ज्यांना 5G साठी अपडेट मिळाला आहे.

जियो 5जी सपोर्टेड स्मार्टफोन

रिलायन्स जियोचं 5G नेटवर्क चार शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, परंतु आतापर्यंत फक्त काही निवडक स्मार्टफोन्सना 5G सपोर्ट सॉफ्टेवयर अपग्रेड मिळाला आहे. Nothing Phone 1 आणि OnePlus 10T, Oneplus 10R, OnePlus 10 pro युजर्स सध्या जियोचं 5G नेटवर्क वापरू शकतात. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; सोबत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

Airtel 5G Supported Smartphones

Airtel चं 5G नेटवर्क सर्वात जास्त 9 शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे. या शहरांमध्ये ते युजर्स 5G नेटवर्क वापरू शकतील ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्टचा सॉफ्टवेयर अपडेट मिळाला आहे. इथे आम्ही तुम्हाला त्या 5G स्मार्टफोन बाबत माहिती देत आहोत जे Airtel 5G ला सपोर्ट करतात.

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Realme 5G Smartphone

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

Realme 9i 5G
Realme 8s 5G
Realme X7 Max 5G
Realme Narzo 30pro 5G
Realme X7 5G
Realme X7 pro 5G
Realme 8 5G
Realme X50 Pro
Realme GT 5G
Realme GT ME
Realme GT NEO2
Realme 9 5G
Realme 9 Pro
Realme 9 Pro Plus
Realme Narzo 30 5G
Realme 9 SE
Realme GT2
Realme GT 2 pro
Realme GT NEO3
Realme Narzo 50 5G
Realme Narzo 50 pro
Realme GT Neo 3T
Realme GT Neo 3 150W

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Xiaomi, Redmi आणि Poco चे 5G Smartphone

Xiaomi Mi 10
Xiaomi Mi 10i
Xiaomi Mi 10T
Xiaomi Mi 10Tpro
Xiaomi Mi 11 Ultra
Xiaomi Mi 11X Pro
Xiaomi Mi 11X
Poco M3 Pro 5G
Poco F3 GT
Xiaomi Mi 11 Lite NE
Xiaomi Redmi Note 11T 5G
Xiaomi 11T Pro
Xiaomi 11i HyperCharge
Xiaomi Redmi Note 10T
Xiaomi Redmi Note 11 pro plus
Poco M4 5G
Poco M4 Pro 5G
Xiaomi 12 pro
Xiaomi 11i
Xiaomi Redmi 11 prime + 5G
Poco F4 5G
Poco X4 pro
Xiaomi Redmi K50i

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Oppo 5G Smartphone

Oppo Reno5G Pro
Oppo Reno 6
Oppo Reno 6 pro
Oppo F19 pro plus
Oppo A53s
Oppo A74
Oppo Reno 7 Pro 5G
Oppo F21 Pro 5G
Oppo Reno7
Oppo Reno 8
Oppo Reno 8 pro
Oppo K10 5G
Oppo F21s Pro 5G

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Vivo 5G Smartphone

vivo X50 Pro
vivo V20 Pro
vivo X60 Pro+
vivo X60
vivo X60 Pro
vivo V21 5G
vivo V21e
vivo X70 Pro
vivo X70 Pro+
vivo Y72 5G
vivo V23 5G
vivo V23 Pro 5G
vivo V23e 5G
vivo T1 5G
vivo Y75 5G
vivo T1 PRO
vivo X80
vivo X80 pro
vivo V25
vivo V25 Pro

Airtel 5G चा सपोर्ट असलेले iQOO 5G Smartphone

iQOO Z6 Pro
iQOO Neo 6
iQOO Z6 Lite 5G
iQOO 3 5G
iQOO 7
iQOO 7 Legend
iQOO Z3
iQOO Z5 5G
iQOO 9 Pro
iQOO 9
iQOO 9 SE
iQOO Z6
iQOO 9T

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Apple iPhone

Apple नं अजूनतरी आपल्या कोणत्याही iPhone मॉडेलसाठी 5G सपोर्ट सॉफ्टवेयर अपडेट दिला नाही. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येतोय OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर

Airtel 5G चा सपोर्ट असलेले OnePlus 5G Smartphone

OnePlus Nord
OnePlus 9
OnePlus 9pro
OnePlus Nord CE
OnePlus Nord CE 2
OnePlus 10 PRO 5G
OnePlus Nord CE Lite 2
OnePlus 10R
OnePlus Nord 2T
OnePlus 10T
OnePlus 9RT

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Samsung 5G Smartphone

Samsung S20FE 5G
Samsung M53
Samsung Galaxy A53 5G
Samsung A33 5G
Samsung A22 5G
Samsung A528B (A52s)
Samsung F23
Samsung A73
Samsung Galaxy S21 FE
Samsung Galaxy S22 Ultra
Samsung Galaxy M33
Samsung M13
Samsung Flip4
Samsung Galaxy S22
Samsung Galaxy S22+
Samsung Fold4

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Motorola 5G Smartphone

Motorola edge 30 ultra
Motorola edge 30 ultra
Motorola edge 30 fusion

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Nothing, Lava, Tecno व Infinix आणि अन्य 5G Smartphone

Lava Agni
Tecno Camon 19 Pro 5G
Tecno Pova 5G
Tecno Pova Neo 5G
Nothing Phone (1)
Infinix Zero 5G
Infinix Note 12 5G
Infinix Note 12 pro 5G

नोट: अजून स्मार्टफोन्सना 5G सॉफ्टवेयर अपडेट मिळाल्यास आम्ही ही लिस्ट अपडेट करत राहू.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/feed/ 0
5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल https://www.91mobiles.com/marathi/5g-service-issues-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5g-service-issues-in-india/#respond Mon, 17 Oct 2022 10:40:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14058 Disadvantages of 5G Technology: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केली आहे. सध्या निवडक मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे आणि लवकरच हिचा प्रसार भारतभर होईल. 5G अल्ट्रा-हाय इंटरनेट स्पीडच्या मदतीनं युजर्स सीमलेस 4K व्हिडीओ स्ट्रीमिंग, लो-लेटेंसी क्लाउड गेमिंग, आणि अनेक गोष्टी करू शकतील. परंतु तुम्हाला माहित आहे का 5G वापरण्याचे […]

The post 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Disadvantages of 5G Technology: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केली आहे. सध्या निवडक मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे आणि लवकरच हिचा प्रसार भारतभर होईल. 5G अल्ट्रा-हाय इंटरनेट स्पीडच्या मदतीनं युजर्स सीमलेस 4K व्हिडीओ स्ट्रीमिंग, लो-लेटेंसी क्लाउड गेमिंग, आणि अनेक गोष्टी करू शकतील. परंतु तुम्हाला माहित आहे का 5G वापरण्याचे पण अनेक तोटे (cons of 5G technology) देखील आहेत. या तोट्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. हे वाचून तुम्हाला देखील 5G फोनवर फक्त 4G वापरण्याची इच्छा होईल.

5G वापरण्याचे तोटे

5g service issues in india

  • 5G ची मर्यादित उपलब्धता
  • 5G स्पीड स्थिर नाही
  • 5G मुळे बॅटरी संपते फोनही गरम होतो
  • 5G मुळे क्षणात संपतो डेटा
  • 5G जास्त वेळ असणार नाही मोफत

1. 5G ची मर्यादित उपलब्धता

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्यांनी आपली 5G सेवा भारतातील काही शहरांमध्ये सुरु केली आहे. परंतु वास्तवात 5G खूप कमी शहरांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे जरी तुमच्याकडे 5G फोन आणि सिम असलं तरी 5G तुम्ही भारतात सर्वच ठिकाणी वापरू शकत नाही. देशातील बहुतांश भागात 5G चे टॉवर उभे करण्यात आले नाहीत. हे देखील वाचा: BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा

2. 5G चा स्पीड स्थिर नाही

5G नेक्स्ट-जेन हाय-स्पीड इंटरनेट बद्दल बोलायचं झालं तर ते अजूनही स्वप्नच आहे. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात इंटरनेट युजर्स सांभाळू शकत नाही त्यामुळे डाउनलोड आणि अपलोड स्पीड घसरतो. काही ठिकाणी तुम्हाला सुपर-फास्ट स्पीड मिळू शकतो, तर अन्य ठिकाणी इंटरनेट 4G पेक्षा देखील वाइट स्पीड मिळतो.

3. 5G मुळे बॅटरी संपते

5g service issues in india

बराच वेळ 5G चा वापर केल्यास तुमच्या फोनची बॅटरी लवकरच संपते. याला 5जी मध्ये मिळणारा फास्ट स्पीड कारणीभूत आहे. 5G वापरत असताना मोबाइलची बॅटरी पाहता पाहता कमी होऊ लागते. 5G चा वापर करण्यासाठी अनेक युजर आपल्या मोबाइलमध्ये एआर/व्हिआर सारखेच हेव्ही सॉफ्टवेयर, गेम आणि अन्य अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करतात त्यामुळे बॅटरी जास्त संपते. तसेच फोन गरम होण्याचे प्रमाण देखील वाढते.

4. क्षणात संपतो डेटा

सध्याचे 4जी प्लॅन कमीत कमी 1GB किंवा 2GB डेली इंटरनेट डेटासह येतात, जे लिमिटेड व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्या युजर्ससाठी पुरेसे आहेत. परंतु 5Gच्या इंटरनेट स्पीड टेस्ट मधेच 1GB डेटा काही क्षणात संपत आहे. त्यामुळे 5जीवर 4K व्हिडीओ आणि चित्रपट डाउनलोड करण्याचा किंवा स्ट्रीमिंगचा प्रश्नच उरत नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

5. 5G जास्त वेळ असणार नाही मोफत

Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्या नवीन नेटवर्क वापरता यावं म्हणून अनलिमिटेड 5G डेटा देत आहेत. परंतु हे जास्त दिवस चालणार नाही, लवकरच 5G प्लॅनची घोषणा केली जाईल. तसेच 5G इंटरनेटचा वापर फक्त मेन प्लॅनमध्ये करता येतो. त्यामुळे जर मेन प्लॅनचा डेटा संपला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची वाट बघावी लागेल कारण यात 5G डेटा व्हाउचर मिळणार नाहीत. तसेच लिलावात खर्च केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी कंपन्या महागडे 5G प्लॅन्स आणू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-service-issues-in-india/feed/ 0
Jio-Airtel च्या आधी येतंय Vodafone idea चं 5जी! कंपनीनं थेट ग्राहकांना पाठवला मेसेज https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-5g-launch-soon-before-airtel-jio-5g-service-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-5g-launch-soon-before-airtel-jio-5g-service-in-india/#respond Wed, 24 Aug 2022 08:12:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12427 5G सर्व्हिसची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. 5G Spectrum च्या लिलावांनंतर Jio, Airtel आणि Vodafone Idea चे युजर्स अधिकृतपणे 5G Service कधी सुरु होईल, याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत कोणत्याही कंपनीनं 5G Launch ची अचूक तारीख मात्र सांगितली नाही. दरम्यान Vodafone Idea नं आपल्या जुन्या ग्राहकांना 5G Launch लाँचबद्दल एसएमएसच्या माध्यमातून माहिती […]

The post Jio-Airtel च्या आधी येतंय Vodafone idea चं 5जी! कंपनीनं थेट ग्राहकांना पाठवला मेसेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G सर्व्हिसची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. 5G Spectrum च्या लिलावांनंतर Jio, Airtel आणि Vodafone Idea चे युजर्स अधिकृतपणे 5G Service कधी सुरु होईल, याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत कोणत्याही कंपनीनं 5G Launch ची अचूक तारीख मात्र सांगितली नाही. दरम्यान Vodafone Idea नं आपल्या जुन्या ग्राहकांना 5G Launch लाँचबद्दल एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ही बातमी महत्वाची असण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत Reliance Jio आणि Airtel कडून ग्राहकांना 5G लाँचबद्दल कोणताही मेसेज मिळाला नाही. चला जाणून घेऊया की Vi ग्राहकांना 5जी लाँचबद्दल कंपनीकडून कोणता SMS मिळाला आहे.

Vodafone Idea लवकरच लाँच करणार 5G

वोडाफोन आयडियाच्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “खुशखबर!! विआय नेटवर्क 5जीवर अपग्रेड केलं जात आहे! तुमचा अनुभव आता चांगला होईल, लवकरच तुम्ही आमच्या विआय नेटवर्कसह दिल्ली-एनसीआरमध्ये चांगली कव्हरेज आणि सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेऊ शकाल.” हे देखील वाचा: त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

हा मेसेज 91मोबाइल्सच्या एका टीम मेंबरला मिळाला आहे, ज्याचा स्क्रीनशॉट आम्ही वर दाखवला आहे. परंतु, कंपनीद्वारे पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये लाँच डेटची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर वोडाफोन आयडियाची 5G सर्व्हिस येईल, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

5G लाँच डेट

विआयनं भारतात मिळालेल्या ट्रायल स्पेक्ट्रमचा वापर करून आपल्या 5जी नेटवर्कच्या टेस्टिंगसाठी नोकिया आणि एरिक्सनसह भागेदारी केली आहे. तसेच, काही जुन्या रिपोर्ट्सनुसार 5G सेवा 29 सप्टेंबर, 2022 ला लाँच केली जाईल. 29 सप्टेंबरला इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2022 चं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यानिमित्ताने भारतात 5G सेवा देखील जारी केली जाईल. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की Vi 5G देखील वर्षाच्या अखेरपर्यंत अनेक शहरांमध्ये लाइव्ह केलं जाईल. हे देखील वाचा: Airtel आणि Vi पैकी कोणाचा 60 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे सर्वात बेस्ट, जाणून घ्या

Vi 5G Plan असू शकतात महाग

काही दिवसांपूर्वी विआयएलचे व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्कर यांनी गुंतवणूकदारांच्या कॉलमध्ये म्हटलं की कंपनीनं अलीकडेच झालेल्या 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे 5जी सेवेसाठी डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क ठेवलं पाहिजे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवांसाठी यावर्षीच्या अखेरपर्यंत वाढ केली जाईल.

The post Jio-Airtel च्या आधी येतंय Vodafone idea चं 5जी! कंपनीनं थेट ग्राहकांना पाठवला मेसेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-5g-launch-soon-before-airtel-jio-5g-service-in-india/feed/ 0
ग्राहकांकडून पैसे काढण्यासाठी नवीन सिमचं सोंग? की 4G SIM वरच मिळणार 5G सर्व्हिस? https://www.91mobiles.com/marathi/5g-service-can-provide-on-4g-sim-know-the-reality/ https://www.91mobiles.com/marathi/5g-service-can-provide-on-4g-sim-know-the-reality/#respond Mon, 08 Aug 2022 07:25:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12050 भारतात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची सांगता झाली आहे आणि आता देश 5G सर्व्हिससाठी तयार आहे. 15 ऑगस्टला या सर्व्हिस बाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते आणि त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत 5G सर्व्हिस देशात येऊ शकते. परंतु युजर्स पुढे मोठा प्रश्न असा आहे की 4G SIM वरच 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते की नवीन SIM ची आवश्यकत असेल? त्यामुळे […]

The post ग्राहकांकडून पैसे काढण्यासाठी नवीन सिमचं सोंग? की 4G SIM वरच मिळणार 5G सर्व्हिस? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची सांगता झाली आहे आणि आता देश 5G सर्व्हिससाठी तयार आहे. 15 ऑगस्टला या सर्व्हिस बाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते आणि त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत 5G सर्व्हिस देशात येऊ शकते. परंतु युजर्स पुढे मोठा प्रश्न असा आहे की 4G SIM वरच 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते की नवीन SIM ची आवश्यकत असेल? त्यामुळे 91मोबाईल्सच्या टीमनं यावर देशातील मोठ्या इंजिनियर्सकडून माहिती घेतली आणि जे समोर आलं तर धक्कादायक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा सर्व्हिस बदलली आहे तेव्हा तेव्हा नेटवर्क ऑपरेटर्स युजर्सना नवीन SIM घ्यायला भाग पडतात. परंतु वास्तव वेगळंच आहे.

2G नंतर 3G साठी देखील आलं होतं नवीन SIM

4G सिमवर 5G सर्व्हिस मिळेल की नाही हे जाणून घेण्याआधी टेलिकॉम विश्वाचा इतिहास पाहूया. भारतात मोबाईल सर्व्हिस 2G सह सुरु झाली होती. परंतु 2008 मध्ये MTNL नं 3G ची सुरुवात केली होती. त्यानंतर BSNL ची 3G सर्व्हिस आली आणि 2011 मध्ये Airtel, Vodafone आणि IDEA ची एंट्री झाली. यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा सर्व्हिस सुरु झाली तेव्हा नेटवर्क ऑपरेटर्सनी युजर्सना 3G सेवेसाठी नवीन SIM घेण्यास सांगितलं आणि जुन्या SIM वरील सर्व्हिस बंद केली.

4G सोबत देखील तेच झालं

3G नंतर जेव्हा 4G सर्व्हिस आली आणि Airtel, Vodafone आणि Idea सारख्या कंपन्यांनी जेव्हा आपली सेवा सुरु केली तेव्हा देखील युजर्सना नवीन सिम घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जुन्या सिमवर ही सर्व्हिस मिळणार नाही असं सांगण्यात आलं. Jio नं सुरुवातच 4G पासून केल्यामुळे त्यासाठी नवीन सिमची आवश्यकता होतीच. आता वेळ आहे 5जी सर्व्हिसची आणि पुन्हा प्रश्न येतो की 4G सिमवर 5G सर्व्हिस दिली जाईल की नवीन SIM घ्यावं लागेल?

4G सिमवरचं मिळेल का 4G सर्व्हिस

या प्रश्नाचं धक्कादायक उत्तर आम्हाला मिळालं आहे. स्पष्ट सांगायचं तर 5G सर्व्हिससाठी नवीन सिमची आवश्यकता नाही. 4G सिमवर देखील 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते. परंतु हे ऑपरेटरवर अवलंबून असेल की युजर्सना या सिमवर नवीन सर्व्हिस द्यावी की नवीन सिम घेण्यासाठी दबाव टाकावा.

याबाबत भारतातील प्रसिद्ध इंजीनियर अर्शदीप सिंह निप्पी यांनी आम्हाला सांगितलं की “4G सिमवर 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते जर सिम फ्युचर रेडी असेल. यासाठी नवीन सिमची गरज नसेल. जर सिम फ्यूचर रेडी नसेल तर ऑपरेटर्स ओटीए अपडेट देऊन 4G सिम 5G साठी अपग्रेड करू शकतात.”

त्यांनी पुढे सांगितलं की “सिम कोणतंही असलं तर ते फक्त आयडेंटिटी नंबर म्हणजे ऑपरेटरसाठी तुमची ओळख पटवून देणारा नंबर नंबर आहे. सिममध्ये कोणतीही मोठी टेक्नॉलॉजी नसते. जर सिममध्ये 3G, 4G किंवा 5G ची टेक्नॉलॉजी असती तर सिम नसणारे फोन कसं काम करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की भारतात अनेक फोनमध्ये e-SIM ची सर्व्हिस आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. ई-सिम असलेले फोन 2G, 3G, 4G आणि 5G प्रत्येक नेटवर्कवर काम करत आहेत. तुम्ही सांगू शकाल का कसं? वास्तवात सिम फक्त आयडेंटिटी नंबर आहे आणि नेटवर्क सपोर्ट फोनमध्ये असतो. त्यामुळे 4G काय तर 3G सिमवर देखील 5G सर्व्हिस वापरता येऊ शकते.’’

त्यांनी सांगितलं की, “आधी सिम सोबत टूलकिट येत असे ज्यामुळे ते कोणत्याही नेटवर्कवर सहज अपग्रेड करता येत होतं. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते आता हटवण्यात आलं आहे. तरीही ऑपरेटर्सना 2G, 3G किंवा 4G सिमवर 5G सर्व्हिस देताना जास्त त्रास होणार नाही फोनमध्ये फक्त नेटवर्क बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.”

ऑपरेटरचा हेतू काय आहे

अर्शदीप सिंह यांच्या बोलण्यावरून समजलं की 4G सिमवर आरामात 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते. परंतु यह ऑपरेटर्सच्या हेतूवर अवलंबुन असेल. आतापर्यंत त्यांनी युजर्सना फक्त अंधारात ठेवलं आहे. कारण तुम्ही देखील पाहिलं असेल की, Apple iPhone आणि Samsung सह अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये e-SIM ची सर्व्हिस आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. सिमविना देखील ते फोन 2G, 3G, 4G आणि 5G प्रत्येक प्रकारच्या नेटवर्कला सपोर्ट करतात परंतु दुसरीकडे दरवेळी नेटवर्क अपग्रेडनंतर युजर्सना नवीन सिम घेण्यास सांगितलं जातं.

त्यामागे कारण स्पष्ट आहे, पैसे मिळवणं. जर एक युजरकडून सिमच्या नावावर 25 रुपये देखील मिळाले तर 30 कोटी आणि 40 कोटी युजर्सकडून एकाचवेळी किती पैसे येतील. यात वेळ आणि पैसे युजरचे जातील तर ऑपरेटर्सना फायदाच होईल.

The post ग्राहकांकडून पैसे काढण्यासाठी नवीन सिमचं सोंग? की 4G SIM वरच मिळणार 5G सर्व्हिस? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-service-can-provide-on-4g-sim-know-the-reality/feed/ 0
कोणती टेलीकॉम कंपनी देणार किती 5G Internet Speed? जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi चा 5जी प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/5g-internet-speed-jio-airtel-vi-5g-plans-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5g-internet-speed-jio-airtel-vi-5g-plans-in-india/#respond Wed, 03 Aug 2022 07:29:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11937 5G Internet वापरण्यासाठी भारतीय मोबाईल युजर्स उत्सुक आहेत. जेव्हापासून समजले आहे की 5जी इंटरनेट स्पीड सध्याच्या 4G Speed पेक्षा 10 पट जास्त असेल आणि संपूर्ण चित्रपट काही मिनिटांत डाउनलोड करता येईल, तेव्हपासूनच सुपर फास्ट 5जी इंटरनेटची मजा घेण्यासाठी लोक 5G फोन्स घेऊन तयार बसले आहेत. 5G Spectrum Auction मध्ये Jio, Airtel आणि Vi ला 5जी […]

The post कोणती टेलीकॉम कंपनी देणार किती 5G Internet Speed? जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi चा 5जी प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Internet वापरण्यासाठी भारतीय मोबाईल युजर्स उत्सुक आहेत. जेव्हापासून समजले आहे की 5जी इंटरनेट स्पीड सध्याच्या 4G Speed पेक्षा 10 पट जास्त असेल आणि संपूर्ण चित्रपट काही मिनिटांत डाउनलोड करता येईल, तेव्हपासूनच सुपर फास्ट 5जी इंटरनेटची मजा घेण्यासाठी लोक 5G फोन्स घेऊन तयार बसले आहेत. 5G Spectrum Auction मध्ये Jio, Airtel आणि Vi ला 5जी स्पेक्ट्रमचं वाटप करण्यात आलं आहे यात 700 MHz 5G Bands व 26GHz 5जी बँडचा देखील समावेश आहे. आता सर्वाना प्रश्न पडला आहे की रिलायन्स जियो, एयरटेल किंवा विआय पैकी कोणती कंपनी किती फास्ट 5जी इंटरनेट स्पीड देणार आहे. पुढे आम्ही याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

5G in India

Jio नं 4G च्या बाबत स्वतःला नंबर वन सिद्ध केल्यानंतर आता 5G Service मध्ये देखील आपली पावर दाखवू शकते. कंपनीचे चेयरमन Aakash Mukesh Ambani यांनी सांगितलं आहे की ते देशात सर्वप्रथम 5जी सर्व्हिस उपलब्ध करतील. 5जी रोलआउटची कोणतीही तारीख ठरली नाही परंतु 15 ऑगस्टला 5G in India संबंधित मोठी घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.

Jio 5G Plan

रिलायन्स जियोनं 5G Spectrum Auction मध्ये सर्वात जास्त 24,740 MHz स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत ज्यांची किंमत 88,078 कोटी रुपये आहे. भारतातील सर्व 22 टेलीकॉम सर्कल्ससाठी कंपनीनं 5जी स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. जियोनं सर्वात शक्तिशाली व लांबवर रेंज 700 MHz 5G Band पासून सर्वात फास्ट इंटरनेट देणाऱ्या 26 GHz High frequency band विकत घेतला आहे.

यावरून स्पष्ट झालं आहे की रिलायन्स जियो 5जी नेटवर्कचं सिग्नल व कव्हरेज मजबूत असणार नाही तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देखील सुपर फास्ट असेल. 5G ट्रायल्समध्ये देखील Jio नं 1 Gbps Speed मिळवला आहे.

Airtel 5G Plan

जियोनं देशातील सर्व 22 सर्कल्समध्ये स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत तर दुसऱ्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनी Airtel नं कमी लोकसंख्या असलेल्या शहर आणि लोकवस्त्यांना लक्ष्य केलं आहे. एयरटेलनेनं मिडबँड स्पेक्ट्रममध्ये जास्त रुची दाखवली आहे. या बँड्सवर 900 Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळवता येऊ शकतो तसेच यांचा नेटवर्क कव्हरेज एरिया देखील हाय फ्रीक्वेंसी बँड्सपेक्षा जास्त आहे.

एयरटेलकडे असलेले मिड फ्रीक्वेंसी बँड्स हाय बँडच्या तुलनेत स्वस्त देखील आहेत ज्यामुळे येत्या काळात कंपनी Low Cost 5G Service तसेच स्वस्त 5G Plans चे फायदे ग्राहकांना देऊ शकते. Airtel नं Nokia सह मिळून 700MHz band वर 5G ट्रायल्स केले आहेत ज्यात दोन टेस्टिंग साईट्स दरम्यान 40 किलोमीटरचं अंतर होतं.

Vi 5G Plan

Vi नं 5जी स्पेक्ट्रम लिलावात दाखवून दिलं की कंपनीचं लक्ष्य नवीन 5जी सर्व्हिसच्या विस्तारासह वर्तमान 4जी सर्व्हिसला मजबूत करणं देखील आहे. विआयनं 18,784 कोटी रुपयांच्या 2,668 MHz स्पेक्ट्रमचं संपादन केलं आहे. कंपनीनं 17 सर्कल्समध्ये mid-band 5G spectrum (3300 MHz band) घेतले आहेत तसेच 16 सर्कल्समध्ये 26 GHz band mmWave 5G spectrum मिळवलेले आहेत.

यावरून अंदाज लावला जात आहे की कंपनी ग्रामीण भागांपेक्षा शहरांमध्ये आपल्या 5जी सर्व्हिसवर जास्त काम करेल तसेच यात दूरवरच्या कव्हरेजपेक्षा जास्त लक्ष फास्ट इंटरनेट स्पीडवर दिलं जाऊ शकतं.

The post कोणती टेलीकॉम कंपनी देणार किती 5G Internet Speed? जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi चा 5जी प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-internet-speed-jio-airtel-vi-5g-plans-in-india/feed/ 0
5G वापरण्याआधी जाणून घ्या महत्वाची बाब; कोणता फ्रीक्वेंसी बँड असेल तुमच्यासाठी बेस्ट https://www.91mobiles.com/marathi/5g-frequency-bands-in-india-700-mhz-low-band-mid-5g-band-mm-waves/ https://www.91mobiles.com/marathi/5g-frequency-bands-in-india-700-mhz-low-band-mid-5g-band-mm-waves/#respond Tue, 02 Aug 2022 12:27:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11925 5G Spectrum Auction मध्ये एकूण 10 बँड्सचा समावेश करण्यात आला होता ज्यात 700 MHz 5G Band देखील होता.

The post 5G वापरण्याआधी जाणून घ्या महत्वाची बाब; कोणता फ्रीक्वेंसी बँड असेल तुमच्यासाठी बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Spectrum Auction चा पहिला टप्पा पूर्ण झालं आहे आणि भारतीय टेलीकॉम ऑपरेटर्सना त्यांच्या वाट्याचे 5जी स्पेक्ट्रम मिळाले आहेत. लिलावात एकूण 10 बँड्सचा समावेश करण्यात आला होता ज्यात 700 MHz 5G Band चा देखील समावेशो होता. रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपयांची बोली लावून सर्वाधिक 24,740 MHz स्पेक्ट्रमचं संपादन केलं आहे. लिलाव पूर्ण झाला आहे आणि आता फक्त 5G Service भारतात सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. परंतु याआधी हे जे 5जी स्पेक्ट्रम लिलावात ठेवण्यात आले होते, त्यांचा अर्थ काय आणि त्यांचं काम काय हे जाणून घेणं आवश्यक आहे.

5G frequency band in India

या स्पेक्ट्रममुळे ही मोबाईल युजर्सना मिळणाऱ्या 5G Service ची गुणवत्ता आणि 5G Network तसेच 5G Internet ची क्वॉलिटी अवलंबुन असेल. 5G Spectrum Auction मध्ये भारत सरकारनं एकूण 10 5G frequency bands सामील केले होते. वरवर यांची विभागणी लो फ्रीक्वेंसी बँड, मिड फ्रीक्वेंसी बँड आणि हाय फ्रीक्वेंसी बँड अशी करता येते. यातील 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz आणि 2500 MHz लो फ्रीक्वेंसी बँडमध्ये येतात. तर 3300 MHz मीडियम फ्रीक्वेंसी बँड आहे तसेच 26GHz हाय फ्रीक्वेंसी रेडियो वेव्स बँड आहे.

High Frequency 5G Bands

हाय बँडचा वापर प्रामुख्याने जास्त लोकसंख्या घनता असलेल्या ठिकाणी केला जातो. High Frequency 5G Bands वर 3 Gbps पर्यंतचा स्पीड मिळवता येऊ शकतो. यात कव्हरेज एरिया मात्र कमी असतो परंतु जिथे हा बँड उपलब्ध होतो तिथे हाय फ्रीक्वेंसी सिग्नल मिळतो. हाय फ्रीक्वेंसी बँडला mm waves स्पेक्ट्रमच्या नावानं देखील ओळखलं जातं, जे 25Ghz ते 39Ghz दरम्यान येतात. हाय बँड टॉवरची उंची देखील कमी असते कारण बिल्डिंग इत्यादी गोष्टींमुळे नेटवर्कमध्ये अडथळा येतो. चांगल्या कव्हरेजसाठी छोट्या भागात जास्त मॉडेम टॉवरची आवश्यकता असते त्यामुळे याला येणार खर्च वाढतो.

Mid Frequency 5G Bands

कमी लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये मिड बँड जास्त उपयुक्त ठरू शकतो. हा हाय फ्रीक्वेंसी बँडपेक्षा जास्त भागात नेटवर्क देतो तसेच एकाच टॉवर किंवा मॉडेमच्या माध्यमातून दूरपर्यंत कव्हरेज पोहोचवता येते. यात इंटरनेट स्पीड हायबँडच्या तुलनेत थोडा कमी मिळतो. मिड बँड 5जीसाठी चार्ज देखील हाय बँडच्या तुलनेत कमी असेल.

Low Frequency 5G Bands

लो फ्रीक्वेंसी बँड ग्रामीण भागासाठी योग्य आहे. लो बँडवर सर्वात जास्त कव्हरेज एरिया मिळतो. यात हाय व मिड बँडच्या तुलनेत इंटरनेट स्पीड थोडा कमी होतो परंतु सिग्नलच्या बाबतीत हा सर्वात बेस्ट मानला जातो. Low Frequency Bands असलेले मोबाईल टॉवर जास्त उंचीवर उभारले जातात जे 6 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आपली रेंज पोहचवू शकतात. लो बँड 5जी 600MHz ते 850 MHz फ्रिक्वेंसी दरम्यान ऑपरेट करतात तसेच 50 ते 250 Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड देण्यास सक्षम असतात. म्हणजे यावर सध्याच्या 4G Internet पेक्षा जास्त स्पीडच मिळेल.

The post 5G वापरण्याआधी जाणून घ्या महत्वाची बाब; कोणता फ्रीक्वेंसी बँड असेल तुमच्यासाठी बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-frequency-bands-in-india-700-mhz-low-band-mid-5g-band-mm-waves/feed/ 0
5G नंतर बंद होणार का 4G सर्व्हिस? 3G आणि 2G चं काय होणार? https://www.91mobiles.com/marathi/will-5g-launch-shutdown-4g-service-what-happened-to-3g-services-and-3g-phones/ https://www.91mobiles.com/marathi/will-5g-launch-shutdown-4g-service-what-happened-to-3g-services-and-3g-phones/#respond Fri, 29 Jul 2022 09:18:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11832 भारतात 5G सर्व्हिस येण्यासाठी आता फक्त काही महिने शिल्लक राहिले आहेत. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. एकदा का 5G सर्व्हिस सुरु झाली की हळूहळू संपूर्ण देशात या सेवेचा विस्तार होईल. सध्या या नव्या आणि वेगवान सर्व्हिसबाबत अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. जसे की, प्लॅन्सची किंमत किती […]

The post 5G नंतर बंद होणार का 4G सर्व्हिस? 3G आणि 2G चं काय होणार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात 5G सर्व्हिस येण्यासाठी आता फक्त काही महिने शिल्लक राहिले आहेत. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. एकदा का 5G सर्व्हिस सुरु झाली की हळूहळू संपूर्ण देशात या सेवेचा विस्तार होईल. सध्या या नव्या आणि वेगवान सर्व्हिसबाबत अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. जसे की, प्लॅन्सची किंमत किती असेल, सिम कसं मिळेल आणि कधी आणि कुठे सुरुवात होईल. परंतु यापेक्षा वेगळा अजून एक मोठा मजेशीर प्रश्न निर्माण होतो की जेव्हा भारतात 5G सर्व्हिस येईल तेव्हा 4G चं काय होईल? 4G सर्व्हिस बंद होणार की सुरु राहणार? 3G सर्व्हिसचं काय झालं? चला याचं उत्तर जाणून घेऊया.

4G आल्यानंतर 3G कुठे गेलं?

आज ज्याप्रकारे 5G ची चर्च आहे तसेची एकेकाळी 4G सर्व्हिसची देखील चर्चा केली जात होती आणि त्याआधी 3G साठी देखील लोक वेडे झाले होते. परंतु 4G सर्व्हिस आल्यावर 3G चं काय झालं? कुठे गेले 3G फोन? भारतात सध्या कुठे 3G सर्व्हिस आहे आणि हिचा वापर कोण करत आहे? असे अनेक प्रश्न समोर येतात. थोडक्यात सांगायचं तर खाजगी क्षेत्रात 3G सर्व्हिसचा शेवट झाला आहे. Airtel, Vodafone-Idea सारख्या प्रायव्हेट कंपन्यांनी आपली 3G सर्व्हिस बंद केली आहे. जियोकडे तर 3G सर्व्हिस कधीच नव्हती, कंपनीनं 4G द्वारे भारतात पाऊल टाकले होते.

भारतात 3G सर्व्हिस सध्या सरकारी कंपनी BSNL कडेच आहे. टेलीकॉम सेवेसाठी देशात एकूण 22 सर्कल आहेत यातील दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त इतर सर्व सर्कल्समध्ये BSNL ची सेवा मिळते यात कंपनी 3G सर्व्हिस देते. त्यामुळे जर तुम्ही 3G सर्व्हिसवर शिफ्ट होऊ इच्छित असाल तर तुम्ही BSNL चं सिम घेऊ शकता आणि तुमच्या 4G मोबाईलमध्ये ही सर्व्हिस वापरता देखील येईल.

प्रायव्हेट कंपन्यांबाबत बोलायचं झालं तर Airtel नं 2019 मध्ये 3G सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली होती. तर 2021 पर्यंत Vodafone-Idea ची 3G सर्व्हिस पूर्णपणे बंद झाली. कंपन्यांनी एकाच वेळी ही सर्व्हिस पूर्णपणे बंद केली नाही तर हळूहळू बंद करण्यात आली. 4G वर शिफ्ट होण्याची सूचना आधी ग्राहकांना देण्यात आली होती. त्यानंतर कंपन्यांनी ही सर्व्हिस पूर्णपणे बंद केली, कारण 2G आणि 4G सह त्यांना नेटवर्कवर अतिरिक्त भार द्यायचा नव्हता आणि 3G चे सब्सक्रायबर देखील जास्त नव्हते. आज भारतात कोणत्याही खाजगी मोबाईल सेवा प्रदाता कंपनीकडे 3G सर्व्हिस नाही आणि सर्व्हिस नसल्यामुळे 3G फोन देखील बाजारात येणं बंद झालं.

5G नंतर 4G चं काय होणार?

3G ची परिस्थती आपण जाणून घेतली आणि आता 4G बद्दल जाणून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर 4G सर्व्हिस सध्या तरी कुठेच जाणार नाही. सध्यातरी ही सेवा बंद केली जाणार नाही, कारण 5G सर्व्हिस येण्यास व तिचा विस्तार होण्यास खूप वेळ जाईल. 5G चा लिलाव अजूनही सुरु आहे, तसेच लाँचला देखील वेळ आहे. लाँच झाल्यावर देखील 4G प्रमाणे संपूर्ण देशात नवीन सेवा उपलब्ध होणार नाही. ही हळूहळू सादर केली जाईल, छोट्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये तर 5G येण्यास 2-3 वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. किंवा कदाचित तिथे 5G पोहोचणार देखील नाही.

4G सर्व्हिसचा वेगानं प्रसार होण्यामागे Jio चा हात आहे. अन्यथा ही सर्व्हिस देखील हळूहळू भारतात पसरली असती. Airtel नं आपली 4G सर्व्हिस 2014 मध्ये लाँच केली होती. त्यानंतर Vodafone ची एंट्री झाली होती. परंतु 2016 पर्यंत देखील यांची सर्व्हिस काही निवडक शहरांपर्यंत मर्यादित होती आणि त्यातही अनेकांना याची माहिती नव्हती. परंतु 2016 मध्ये जियोनं संपूर्ण भारतात फ्री सर्व्हिस देत आपलं 4G नेटवर्क रोलआउट केलं आणि युजर्सना 4G च्या शक्तीची जाणीव झाली. स्टोर्सवर लांबच्या लांब रांगा लागल्या आणि Jio सिमसाठी वेटिंग सुरु झालं. त्यामुळे Airtel आणि Vodafone-Idea सारख्या कंपन्यांना देखील कमी किंमतीत आपली 4G सर्व्हिस संपूर्ण भारतात सुरु करावी लागली.

परंतु यावेळी Jio सह इतर कोणतीही कंपनी एवढी मोठी जोखिम उचलणार नाही. कोणतीही कंपनी संपूर्ण देशात एकाचवेळी 5G सर्व्हिस लाँच करणार नाही. तसेच 5G सर्व्हिस महाग देखील असेल आणि सुरुवातीला सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल. त्यामुळे सध्या तरी 4G सर्व्हिस बंद होणार नाही. दोन-तीन वर्षांच्या कालावधीत 5G चे युजर्स आले आणि लोकांच्या हातात 5G फोन्स येऊ लागले की जुनी सर्व्हिस बंद करण्याचा विचार केला जाऊ शकतो जसं 3G सर्व्हिस सोबत झालं आहे. त्यामुळे 4G सर्व्हिस अजून काही काळ नक्कीच भारतात उपलब्ध असेल.

2G सर्व्हिस होणार नाही बंद

विशेष म्हणजे 3G बंद झालं, 4G सर्व्हिस बंद करण्याबाबत आपण आतापासून चर्चा करत आहोत आणि 5G बाबत देखील काही वर्षांनी हा प्रश्न निर्माण होईल परंतु भारतात 2G सर्व्हिस लाॅन्च होऊन 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे आणि आगामी काळात देखील ही सर्व्हिस सुरु राहील. ही सर्व्हिस बंद होणार नाही कारण भारतात आजही फीचर फोन युजर्सची संख्या खूप जास्त आहे. या युजर्समुळे कंपन्यांना महसूल जरी कमी मिळत असला तरी आकडे दाखवण्यासाठी यांचा वापर करता येतो म्हणून कोणतीही टेलिकॉम कंपनी या युजर्सना सोडणार नाही.

The post 5G नंतर बंद होणार का 4G सर्व्हिस? 3G आणि 2G चं काय होणार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/will-5g-launch-shutdown-4g-service-what-happened-to-3g-services-and-3g-phones/feed/ 0