Lenovo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,200mAh च्या राक्षसी बॅटरीसह Lenovo Tab P11 Pro (2nd gen) भारतात लाँच, फीचर्स आहेत पावरफुल https://www.91mobiles.com/marathi/lenovo-tab-p11-pro-2nd-gen-launched-in-india-check-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-tab-p11-pro-2nd-gen-launched-in-india-check-price-specifications-sale-details/#respond Fri, 14 Oct 2022 04:20:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13969 Lenovo नं आज भारतीय बाजारात आपला नवीन टॅबलेट डिवायस Lenovo Tab P11 Pro (2nd Gen) लाँच केला आहे. कंपनीनं यात 8,200mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. या टॅबलेट सीरिजमधील कंपनीचा हा तिसरा डिवाइस आहे. कंपनीनं याआधी बाजारात Lenovo Tab P11 आणि Lenovo Tab P11 Plus सादर केले आहेत. नवीन मॉडेल सर्वात पावरफुल टॅबलेट आहे जो […]

The post 8,200mAh च्या राक्षसी बॅटरीसह Lenovo Tab P11 Pro (2nd gen) भारतात लाँच, फीचर्स आहेत पावरफुल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo नं आज भारतीय बाजारात आपला नवीन टॅबलेट डिवायस Lenovo Tab P11 Pro (2nd Gen) लाँच केला आहे. कंपनीनं यात 8,200mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. या टॅबलेट सीरिजमधील कंपनीचा हा तिसरा डिवाइस आहे. कंपनीनं याआधी बाजारात Lenovo Tab P11 आणि Lenovo Tab P11 Plus सादर केले आहेत. नवीन मॉडेल सर्वात पावरफुल टॅबलेट आहे जो गेल्यावर्षी लाँच झालेल्या Lenovo Tab P11 Pro चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर करण्यात आला आहे. या नवीन लेनोवो टॅब पी11 प्रो ची किंमत 39,999 रुपये आहे ज्याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Lenovo Tab P11 Pro (2nd gen)

Lenovo Tab P11 Pro (2nd gen) टॅबलेट 2के पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.2 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते तसेच 600निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजन एचडीआर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. या टॅबलेट डिवायसचे डायमेंशन 263.66 x 166.67 x 6.8एमएम आणि वजन 480ग्राम आहे. हे देखील वाचा: 14 हजारांत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही; Infinix चा किफायतशीर Laptop देखील लाँच, पाहा फीचर्स आणि प्राइस

lenovo tab p11 pro 2nd gen launched in india Check price specifications sale details

लेनोवो टॅब पी11 प्रो (2 जेनरेशन) अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो MediaTek Kompanio 1300T चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या टॅबलेट डिवायसमध्ये एआरएम माली-जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. हा टॅबलेट डिवायस 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे ज्यात 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो.

lenovo tab p11 pro 2nd gen launched in india Check price specifications sale details

Lenovo Tab P11 Pro (2nd gen) च्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पवार बॅकअपसाठी या लेनोवो टॅबमध्ये 8,200एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 14 तासांचा बॅकअप देऊ शकते. हे देखील वाचा: ओप्पो मोबाइल्सवर बंदीचं सावट; Nokia नं चिनी कंपनीला खेचलं कोर्टात, जाणून घ्या प्रकरण

lenovo tab p11 pro 2nd gen launched in india Check price specifications sale details

हा लेनोवो टॅबलेट Pen 3 stylus सह येतो जो टॅबच्या रियर पॅनलवर ठेवून वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येईल. तसेच Lenovo Tab P11 Pro (2nd gen) मध्ये क्वॉड स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय6 आणि ब्लूटूथ 5.1 देण्यात आला आहे. येत्या 17 ऑक्टोबर पासून Lenovo Tab P11 Pro (2nd gen) को 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 8,200mAh च्या राक्षसी बॅटरीसह Lenovo Tab P11 Pro (2nd gen) भारतात लाँच, फीचर्स आहेत पावरफुल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-tab-p11-pro-2nd-gen-launched-in-india-check-price-specifications-sale-details/feed/ 0
या फोन समोर वनप्लस देखील टिकणार नाही; 5100mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Lenovo Legion Y70 लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5100mah-battery-68w-charging-lenovo-legion-y70-gaming-phone-launched/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5100mah-battery-68w-charging-lenovo-legion-y70-gaming-phone-launched/#respond Mon, 22 Aug 2022 03:12:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12343 Lenovo Legion Y70 गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. लेनोवोनं होम मार्केट चीनमध्ये या गेमिंग स्मार्टफोनसह अँड्रॉइड टॅबलेट Xiaoxin Pad Pro 2022 देखील लाँच केला आहे. लेनोवोचा गेमिंग स्मार्टफोन Legion Y70 क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 सह बाजारात सादर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या गेमिंग फोनमध्ये 10 लेयर कूलिंग सिस्टम […]

The post या फोन समोर वनप्लस देखील टिकणार नाही; 5100mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Lenovo Legion Y70 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo Legion Y70 गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. लेनोवोनं होम मार्केट चीनमध्ये या गेमिंग स्मार्टफोनसह अँड्रॉइड टॅबलेट Xiaoxin Pad Pro 2022 देखील लाँच केला आहे. लेनोवोचा गेमिंग स्मार्टफोन Legion Y70 क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 सह बाजारात सादर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या गेमिंग फोनमध्ये 10 लेयर कूलिंग सिस्टम आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला लेनोवोच्या नव्याकोऱ्या गेमिंग स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.

Lenovo Legion Y70 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Lenovo Legion Y70 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाची फ्लॅट स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये पंच होल कॅमेरा कटआउट मिळते. फोनच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन FHD+ रिफ्रेश रेट, 144Hz आहे, जो HDR10+, Dolby Vision आणि 1000 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. लेनोवोच्या या गेमिंग स्मार्टफोनमध्ये बॉक्सी डिजाईन देण्यात आली आहे, जो एव्हीएशन ग्रेड अ‍ॅल्युमिनियम मटेरियल आणि CNC-कर्व मेटल मिडल फ्रेमसह तयार करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग

Lenovo Legion Y70 स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. ज्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप 50MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह मिळतो. सोबतीला 13MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा तिसरा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Lenovo Legion Y70 फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. लेनोवोच्या गेमिंग स्मार्टफोनमध्ये मोठा व्हेपर चेंबर आणि 10 लेयर हीट डिसपेशन मॅकॅनिज्म देण्यात आलं आहे. यात 5100mAh ची बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. Lenovo Legion Y70 फोन Android 12 वर आधारित ZUI 14 वर चालतो. हे देखील वाचा: Jio-Airtel ची डोकेदुखी वाढवणारी BSNL ची जबरदस्त ऑफर; या दोन रिचार्जवर मिळतोय अतिरिक्त 75GB डेटा

Lenovo Legion Y70 किंमत

Lenovo Legion Y70 स्मार्टफोन आइस व्हाइट, टाइटेनियम ग्रे आणि फ्लॅम रेड कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम व 128GB स्टोरेजसह 2,970 युआन (सुमारे 35,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,370 युआन (सुमारे 39,500 रुपये) आहे. तर स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम व 512GB स्टोरेजसह 4,270 युआन (सुमारे 50,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री चीनमध्ये 22 ऑगस्टपासून सुरु होईल, परंतु भारतीय लाँच बाबत कोणतीही माहिती कंपनीनं दिली नाही.

The post या फोन समोर वनप्लस देखील टिकणार नाही; 5100mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Lenovo Legion Y70 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5100mah-battery-68w-charging-lenovo-legion-y70-gaming-phone-launched/feed/ 0
18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-2-pro-gaming-smartphone-launched-with-up-to-18gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-2-pro-gaming-smartphone-launched-with-up-to-18gb-ram/#respond Fri, 09 Apr 2021 11:40:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10550 या गेमिंग स्मार्टफोनची डिजाइन पाहता फोनच्या बॅक पॅनलवर समितीय डिजाइन देण्यात आली आहे.

The post 18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने आपला दमदार आणि लेटेस्ट गेमिंग स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Legion Phone Duel 2 नावाने लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला बाजारातील Nubia Red Magic 6 आणि Asus ROG Phone 5 कडून आव्हान मिळणार आहे. नवीन फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन Legion Phone Duel 2 सध्या फक्त चीनमधेच लॉन्च केला गेला आहे. भारत किंवा इतर बाजारांमध्ये या फोनच्या उपलब्धतेबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. चला पुढे जाणून घेऊया लेनोवो लीजन फोन डुअल 2 मध्ये काय आहे विशेष जे याला एक खास गेमिंग व फ्लॅगशिप डिवाइस बनवतात. (Lenovo Legion 2 Pro gaming smartphone launched with up to 18GB RAM)

डिजाइन आहे खास

या गेमिंग स्मार्टफोनची डिजाइन पाहता फोनच्या बॅक पॅनलवर समितीय डिजाइन देण्यात आली आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलच्या मध्यभागी वर येणारा भाग आहे. यात कॅमेऱ्याव्यतिरिक्त एक फॅन आणि RGB लाइटिंग तसेच लीजनचा लोगो देण्यात आला आहे. फोनच्या कडेवर कूलिंग वेंट देण्यात आले आहेत. तसेच, फ्रंट लुक पाहता यात कोणताही पंच होल व नॉच नाही. फोनच्या तिन्ही बाजूंना बेजल खूप कमी आहेत. तसेच फोनच्या बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. इतकेच नव्हे तर सेल्फी कॅमेऱ्यासाठी फोनमध्ये पॉप कॅमेरा आहे जो बाजूला देण्यात आला आहे. फोनची खासियत अशी आहे कि यात ट्विन-टर्बो फॅन अ‍ॅक्टिव्ह कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी तीव्र वापराच्या वेळी फोन थंड ठेवते.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा सेल, यात आहे 6GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

कमालीचा डिस्प्ले

Lenovo च्या Legion Phone Duel 2 मध्ये कंपनीने 6.92-इंचाची FHD+ E4 AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. फोनचा डिस्प्ले 144Hz के रिफ्रेश रेट आणि 720Hz च्या टच रिस्पॉन्स रेटसह येतो. तसेच डिस्प्ले DCI-P3 color gamut, HDR10+ आणि DC dimmingला सपोर्टसह काम करतो. लेनोवोने गेमर्सच्या वेगवेगळ्या कंट्रोलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र डिस्प्ले चिप पण जोडली आहे, स्क्रीनव्यतिरिक्त, फ्रेममध्ये एकूण सहा बटण आहेत जे मागे कवरच्या डाव्या कडेवर आणि डिवाइसच्या वर आणि खालच्या भागावर आहेत. कंट्रोल पॅनलवर एकसाथ आठ फिंगर सपोर्ट बटण आहेत.

प्रोसेसिंग पावर

फोनमध्ये प्रोसेसिंग पावरसाठी स्नॅपड्रॅगॉन 888 एसओसी Adreno 660 GPU सह देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के पर्यंत वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के जास्त जलद ग्राफिक्ससह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. तसेच फोनमध्ये 18जीबी पर्यंतचा रॅम आणि 512जीबी पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज आहे.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह एक 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंसचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा मोटराइज्ड साइड पॉप-अप कॅमेरा मिळेल. फोन ऑडियो झूम फीचर आहे. तसेच कॅमेऱ्यातून युजर 8K आणि 4K विडियो पण शूट करू शकतात.

पावरफुल बॅटरी

फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बॅक कवर, ऑल-मेटल मिडिल फ्रेम, डुअल एक्स-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर्स आहे, जी मागील फोन प्रमाणेच आहे. यात 0.7 एमएम डुअल स्पीकर, ज्यात एक 1.6 सीसी साउंड कॅविटी आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट आहे, पण यात 3.5 मिमी हेड फोन्स जॅक नाही. फोनच्या मागे आणि डाव्या भागावर चार्जिंगच्या वेळी लवचिकता मिळावी म्हणून यूएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. यात पावर बॅकअपसाठी 5,500mAh ची बॅटरी आहे जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करती आहे.

हे देखील वाचा : Xiaomi चा सर्वात दमदार स्मार्टफोन Mi 11 Ultra भारतात विक्रीसाठी इथे होईल उपलब्ध

किंमत

Lenovo Legion Phone Duel 2 कंपनीने दोन कलर Dawn आणि Gradient मध्ये सादर केला आहे. या डिवाइसच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 3,699 yuan (जवळपास 42,100 रुपये), 12GB + 128GB वेरिएंटची किंमत 4,099 yuan (जवळपास 46,660 रुपये), 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 4,399 yuan (जवळपास 50,100 रुपये), 16GB + 512GB वेरिएंटची किंमत 5,299 yuan (जवळपास 60,345 रुपये) आणि हाय एन्ड मॉडेल 18GB + 512GB ची किंमत 5,999 yuan (जवळपास 68,280 रुपये) आहे. फोन चीनमध्ये 9 एप्रिलपासून विकला जाईल.

The post 18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-2-pro-gaming-smartphone-launched-with-up-to-18gb-ram/feed/ 0
Lenovo Legion 2 Pro होईल 16GB रॅम आणि अनोख्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-2-pro-launch-date-april-8-know-specification/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-2-pro-launch-date-april-8-know-specification/#respond Mon, 05 Apr 2021 16:28:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10510 Lenovo Legion Gaming Phone मध्ये 5000mAh ची बॅटरी होती. तुम्हाला अजूनही फोनसह 90W फास्ट वायर्ड चार्जिंग मिळेल.

The post Lenovo Legion 2 Pro होईल 16GB रॅम आणि अनोख्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल गेमिंगचा वाढता बाजार पाहता आता लेनोवो पण आपला नवीन गेमिंग स्मार्टफोन Lenovo Legion 2 Pro च्या लॉन्चबद्दल तयारी दाखवत आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि 8 एप्रिलला हा हँडसेट लॉन्च करणार आहे. तसेच, लॉन्चपूर्वी कंपनीने या फोनचे अनेक खास फीचर्स समोर ठेवले आहेत, ज्यात सेल्फी कॅमेरा, रॅम आणि इतर स्पेसिफिकेशनचा समावेश आहे. लेनोवो लीजन 2 प्रो गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सतत या अपकमिंग फोनच्या फीचर आणि स्पेसिफिकेशन बाबत नवीन माहिती येत आहे. लॉन्चपूर्वी जाणून घेऊया या फोनमध्ये काय असेल खास. (lenovo legion 2 pro launch date april 8 know specification)

फुल एचडी+ रेजॉलूशन असलेला डिस्प्ले

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि फोनचा डिस्प्ले पूर्णपणे सिमेट्रिकल असेल जेणेकरून युजर्सना वेगवान रिफ्रेश रेट आणि खूप कमी लेटेंसी मिळेल. फास्ट रिफ्रेश रेट आणि लो-लेटेंसीमुळे फोनमध्ये गेमिंग अनुभव खूप शानदार असेल. काही दिवसांपूर्वी कंपनीने कन्फर्म केले होते कि या फोनमध्ये 144 Hz चा रिफ्रेश रेट आणि 720Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह 6.92 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनचा डिस्प्ले मागील मॉडेलप्रमाणे फ्लॅट असेल.

हे देखील वाचा : Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन

44MP सेल्फी कॅमेरा

वीबोवर कंपनीने एक पोस्टर शेयर केला होता, ज्यात फोनचा फ्रंट कॅमेरा एक मोटराइज्ड पॉप-अप कॅमेरा असल्याची माहिती समोर आली होती. हा पॉप-अप कॅमेरा गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या मॉडेलप्रमाणेच बाजूने बाहेर पडेल. तसेच फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. तसेच फोनमध्ये 64MP OV64A 1 / 1.32-इंचाचा प्राइमरी रियर कॅमेरा असेल, ज्यात 4K रेकॉर्डिंगसाठी 120 एफपीएस आणि 30 एफपीएसवर 8 के व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर आणि 16जीबी रॅम

फोन 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह येईल. प्रोसेसर पाहता या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये कंपनी 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळणार आहे जो 4K आणि 8K रेकॉर्डिंग पण करू शकेल.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74

पावरफुल बॅटरी

बॅटरी पाहता कंपनीचा हा फोन 5500mAh च्या बॅटरीसह येईल. तसेच , Lenovo Legion Gaming Phone मध्ये 5000mAh ची बॅटरी होती. तुम्हाला अजूनही फोनसह 90W फास्ट वायर्ड चार्जिंग मिळेल. पण एक अपडेटेड चार्जिंग एल्गोरिदमसह. लेनोवोचा असा पण दावा आहे कि 1200 चार्ज साइकलनंतर पण बॅटरी आपल्या मूळ क्षमतेचा 85% हिस्सा कायम ठेवेल. फोनमध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम प्री-इंस्टॉल्ड मिळेल.

The post Lenovo Legion 2 Pro होईल 16GB रॅम आणि अनोख्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-2-pro-launch-date-april-8-know-specification/feed/ 0
लेनोवो पण घेऊन येत आहे चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Lenovo K13, असे असतील स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k13-india-launch-specs-feature-photo-exclusive-technology-news/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k13-india-launch-specs-feature-photo-exclusive-technology-news/#respond Wed, 10 Feb 2021 12:52:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9981 91मोबाईल्सला Lenovo K13 च्या बॅक पॅनलचा फोटो मिळाला आहे. फोटो बघून समजले आहे कि लेनोवोचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यावर लाॅन्च होईल जो बॅक पॅनलवर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल.

The post लेनोवो पण घेऊन येत आहे चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Lenovo K13, असे असतील स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्याची योजना बनवत आहे. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनीने आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनचे काम सुरु केले आहे जो Lenovo K13 नावाने बाजारात येईल. कंपनीने आतापर्यंत फोनच्या लाॅन्च संबंधित कोणतीही माहिती दिली नाही पण लेनोवो के13 मार्केट मध्ये येण्याआधी आम्हाला याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Lenovo K13 लो बजेट मध्ये लाॅन्च केला जाईल.

असा असेल लुक

91मोबाईल्सला Lenovo K13 च्या बॅक पॅनलचा फोटो मिळाला आहे. फोटो बघून समजले आहे कि लेनोवोचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यावर लाॅन्च होईल जो बॅक पॅनलवर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. रियर पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Lenovo ब्रँडिंग आहे, बाजूला स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे. लेनोवो के13 स्मार्टफोन Red आणि Blue कलर मध्ये समोर आला आहे.

Lenovo K10 Plus

असे असतील स्पेसिफिकेशन

मिळालेल्या माहितीनुसार Lenovo K13 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. फोनचे वजन 200 ग्राम सांगण्यात आले आहे. लेनोवो के13 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित असेल ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लाॅक असलेला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. 91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार लेनोवो आपला फोन 2 जीबी रॅमवर लाॅन्च करेल त्यासोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता पण येईल.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lenovo K13 डुअल रियर कॅमेऱ्यावर लाॅन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. लेनोवो के13 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करेल. फोन मध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाईल.

The post लेनोवो पण घेऊन येत आहे चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Lenovo K13, असे असतील स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k13-india-launch-specs-feature-photo-exclusive-technology-news/feed/ 0
स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k12-global-variant-render-leak-as-re-branded-motorola-moto-e7/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k12-global-variant-render-leak-as-re-branded-motorola-moto-e7/#respond Fri, 18 Dec 2020 17:19:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9378 Motorola संबंधित हि बातमी टिपस्टर सुधांशूने शेयर केली आहे. या टिपस्टरने Lenovo K12 स्मार्टफोनच्या रेंडर इंटरनेट वर अपलोड केले आहेत जे लुक आणि डिजाईन मध्ये पूर्णपणे मोटो ई7 स्मार्टफोन सारखे आहेत.

The post स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने काही दिवसांपूर्वी चीनी बाजारात आपला कमी किंमत असलेला स्मार्टफोन Lenovo K12 लाॅन्च केला होता. तसेच दुसरीकडे लेनोवो द्वारे अधिकृत Motorola ने पण यूरोप मध्ये लो बजेट स्मार्टफोन Moto E7 आणला होता. या दोन्ही ब्रँड्सने आपल्या फोनच्या इंडिया लाॅन्च बद्दल सध्या कोणतीही माहिती दिली नाही. पण एका ताजा रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि मोटोरोला कंपनी लवकरच भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये मोटो ई7 स्मार्टफोन लाॅन्च करू शकते आणि लीकनुसार मोटोरोलाचा हा फोन लेनोवो के12 नावाने बाजारात उपलब्ध होईल.

Motorola संबंधित हि बातमी टिपस्टर सुधांशूने शेयर केली आहे. या टिपस्टरने Lenovo K12 स्मार्टफोनच्या रेंडर इंटरनेट वर अपलोड केले आहेत जे लुक आणि डिजाईन मध्ये पूर्णपणे मोटो ई7 स्मार्टफोन सारखे आहेत. रेंडर ईमेज शेयर करण्यासोबतच लीक मध्ये दावा केला गेला आहे कि लेनोवो के12 चा जो मॉडेल चीनच्या बाहेर ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल तसेच यूरोप मध्ये लाॅन्च झाले Moto E7 स्मार्टफोनचा रिब्रँडिड वर्जन असेल. हा फोन भारतीय बाजारात कधी एंट्री घेईल हे समजले नाही.

Moto E7

मोटो ई7 पाहता हा फोन को वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर सादर केला गेला आहे, ज्यात रुंद चिन असलेला नॅरो बेजल्स डिस्प्ले देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मध्यभागी चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली Motorola लोगो असलेला रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. मोटो ई7 स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे.

हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन

कंपनीने फोटोग्राफीसाठी Moto E7 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात पहला 48MP चा प्राइमरी सेंसर आणि दुसरी 2MP ची मॅक्रो लेंस आहे. सोबतच या हँडसेट मध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फीचर पाहता मोटो ई7 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सह येते. तसेच फोन कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.0, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारख्या फीचरला सपोर्ट मिळाला आहे.

Moto E7 स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. तसेच मोटो ई7 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसर, 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो एसडी कार्डची जागा देण्यात आली आहे. Moto E7 स्मार्टफोन यूरोप मध्ये 119.99 यूरो (जवळपास 10,550 रुपये) आहे. हा डिवाइस ग्राहकांसाठी Aqua Blue, Mineral Gray आणि Satin Coral कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

The post स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k12-global-variant-render-leak-as-re-branded-motorola-moto-e7/feed/ 0
सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 16GB रॅम असलेला स्मार्टफोन झाला लॉन्च, बदलेल का मोबाईल गेमिंगचे विश्व https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-phone-duel-with-side-pop-up-selfie-camera-snapdragon-865-16gb-ram-know-price-and-full-specification/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-phone-duel-with-side-pop-up-selfie-camera-snapdragon-865-16gb-ram-know-price-and-full-specification/#respond Thu, 23 Jul 2020 11:24:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7688 लेनोवो ने आपला गेमिंग स्मार्टफोन Lenovo Legion Phone Duel सादर केला आहे.

The post सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 16GB रॅम असलेला स्मार्टफोन झाला लॉन्च, बदलेल का मोबाईल गेमिंगचे विश्व first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ने आपला गेमिंग स्मार्टफोन Lenovo Legion Phone Duel सादर केला आहे. फोनच्या बाजूला पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि डुअल बॅटरी सह सर्वात ताकदवान प्रोससेर देण्यात आला आहे. लेनोवोच्या या नवीन गेमिंग फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या डिवाइसची टक्कर Asus ROG Phone 3 शी होईल जो लॉन्च झाला आहे. तसेच 28 जुलैला गेमिंग सेंट्रिक फोन नूबिया रेड मैजिक 5S पण लॉन्च केला जाईल. चला जाणून घेऊया लेनोवोच्या या गेमिंग फोन बाबत सर्वकाही.

गेमिंगसाठी खास टेक्नोलॉजी

गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून फोन मध्ये कॉपर ट्यूब्स सह डुअल लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये रियलिस्टिक गेमिंगसाठी 3D मोशन सेंसर, ड्यूल x-ऍक्सिस लीनियर मोटर्स सह ड्यूल अल्ट्रा-सॉनिक शोल्डर कीज देण्यात आल्या आहेत.

स्पेसिफिकेशन्स

चांगल्या गेमिंगसाठी फोन मध्ये 2340×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह 6.65 इंचाचा फुल एचडी+ AMOLED पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेट आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेट सह येतो. डिवाइसचा स्क्रीन आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ Soc प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 12GB/16GB रॅम सह 256GB/512GB की स्टोरेज देण्यात आली आहे.

फोन एंडरॉयड 10 वर बेस्ड ZUI (Legion OS) वर चालतो. फोटोग्राफीसाठी हँडसेट मध्ये 64 मेगापिक्सल+16 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये तुम्हाला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो साइड पॉप-अप मेकनिजम सह येतो. याची खास बाबा अशी कि तुम्ही याद्वारे गेमिंग करताना पण लँडस्केप मोड मध्ये सेल्फी घेण्यासोबतच विडियो पण शूट करू शकता.

फोनला पावर देण्यसाठी यात डुअल बॅटरी सपोर्ट आहे. फोन मध्ये 2500mAh च्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत ज्या 90 वॉट फास्ट चार्जिंगला सपॉर्ट करतात. कंपनीचा दावा आहे कि 10 मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज करता येतो. फोन फुल चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.

किंमत आणि उपलब्धता

Lenovo Legion Phone Duel च्या किंमतीची देण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन चीन मध्ये या महिन्यांच्या शेवटी लीजन फोन प्रो म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. हा एशिया पॅसिफिक, यूरोप, मध्य पूर्व आणि अफ्रीका आणि लॅटिन अमेरिकेतील निवडक बाजारांत सादर केला जाईल. हा भारतात कधी आणि कोणत्या किंमतीत येईल याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. लेनोवोने सांगितले आहे कि लीजन फोन 12 जीबी आणि 16 जीबी रॅम वेरिएंट मध्ये येईल. तसेच फोन ब्लेजिंग ब्लू आणि लाल रंगात येईल.

The post सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 16GB रॅम असलेला स्मार्टफोन झाला लॉन्च, बदलेल का मोबाईल गेमिंगचे विश्व first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-legion-phone-duel-with-side-pop-up-selfie-camera-snapdragon-865-16gb-ram-know-price-and-full-specification/feed/ 0
4 जीबी रॅम, 4050एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lenovo K10 Plus https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k10-plus-launched-in-india-10999-price-specifications-features-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k10-plus-launched-in-india-10999-price-specifications-features-sale-offer/#respond Mon, 23 Sep 2019 10:53:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5380 हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 30 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4 जीबी रॅम, 4050एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lenovo K10 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने गेल्या आठवड्यात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट द्वारे सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘के सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Lenovo K10 Plus सांगितले होते जो फक्त आनलाईन प्लॅटफॉर्म वरच विकला जाईल. आता कंपनीने Lenovo K10 Plus अधिकृतपणे इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 30 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

Lenovo K10 Plus डिजाईन

फोनच्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर Lenovo K10 Plus बेजल लेस डिस्प्ले वर बनलेला आहे ज्यावर ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या दोन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. Lenovo K10 Plus ट्रिपल रियर कॅमेरा वर लॉन्च केला जाईल जो बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच पॅनलच्या मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर आहे.

Lenovo K10 Plus स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेना डॉट नॉच डिस्प्ले असे नाव दिले आहे. Lenovo K10 Plus एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू आहे.

Lenovo K10 Plus कंपनीने 4 जीबी रॅम सह लॉन्च केला तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lenovo K10 Plus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13 MP चा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 8 MP आणि 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 120डिग्री वाइड अँगल लेंस असेल. तसेच सेल्फी साठी हा फोन 16 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Lenovo K10 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Lenovo K10 Plus मध्ये 4,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजी सह येते. Lenovo K10 Plus येत्या 30 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4 जीबी रॅम, 4050एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lenovo K10 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k10-plus-launched-in-india-10999-price-specifications-features-sale-offer/feed/ 0
शानदार फीचर्स सह आले Lenovo K10 Note आणि A6 Note स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k10-note-a6-note-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k10-note-a6-note-launch-in-india/#respond Thu, 05 Sep 2019 12:11:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5232 Lenovo K10 Note चा 4जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे

The post शानदार फीचर्स सह आले Lenovo K10 Note आणि A6 Note स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने आज भारतीय बाजारात आपले Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note स्मार्टफोन सादर केले आहेत. लेनोवो झेड6 प्रो आधी चीनी मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. तर लेनोवो के10 नोट आणि लेनोवो ए6 नोट नवीन डिवाइस आहेत. चला पुढे जाणून घेऊया या दोन्ही फोन्स बद्दल सर्वकाही.

Lenovo K10 Note चे स्पेसिफिकेशन्स

लेनोवोच्या या स्मार्टफोन मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19:5:9 आस्पेक्ट रेशियो, 90 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो सह येतो. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी/6जीबी रॅम आणि 64जीबी/128जीबी स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत.

फोटोग्राफी साठी Lenovo K10 Note मध्ये तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. सेटअप पाहता यात 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा 2x ऑप्टिकल झूम सह येतो. तसेच तिसरा सेंसर सुपर बोके इफेक्ट सह येतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये डॉल्बी ऑडियो, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोन मध्ये 4,040एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करते.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम आणि 48-एमपी क्वॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च झाला Lenovo Z6 Pro

Lenovo A6 Note चे स्पेसिफिकेशन्स

Lenovo A6 Note मध्ये 6.09-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 88 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो. डिस्प्ले K10 Note प्रमाणे वॉटर ड्रॉप नॉच सह येतो. यात कंपनीने मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर दिला आहे. डिवाइस मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

लेनोवो के6 नोट मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर आहे. त्याचबरोबर यात फेस अनलॉक सपोर्ट, डुअल सिम सपोर्ट आणि वेगळ्या माइक्रोएसडी कार्ड स्लॉट सह हा एक डुअल कॅमेरा फोन आहे. मागे दोन 13-मेगापिक्सलचे सेंसर आहेत. फ्रंट पॅनल फक्त एक 5-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत

Lenovo च्या नवीन नोट डिवाईसेजची किंमत पाहता Lenovo K10 Note चा 4जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन 16 सप्टेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा

त्याचप्रमाणे Lenovo A6 Note कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे हा स्मार्टफोन 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Lenovo A6 Note देशात 11 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post शानदार फीचर्स सह आले Lenovo K10 Note आणि A6 Note स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k10-note-a6-note-launch-in-india/feed/ 0
8जीबी रॅम आणि 48-एमपी क्वॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च झाला Lenovo Z6 Pro https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-pro-launched-in-india-8gb-ram-48mp-quad-rear-camera-33999-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-pro-launched-in-india-8gb-ram-48mp-quad-rear-camera-33999-price-specs/#respond Thu, 05 Sep 2019 11:44:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5230 Lenovo Z6 Pro भारतात 33,999 रुपयांमध्ये आणला आहे जो येत्या 11 सप्टेंबर पासून ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. 

The post 8जीबी रॅम आणि 48-एमपी क्वॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च झाला Lenovo Z6 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note स्मार्टफोन भारतात आणले आहेत. लेनोवो के10 नोट आणि लेनोवो ए6 नोट लो बजेट डिवाईस आहेत तर कंपनीने लेनोवो झेड6 प्रो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला आहे. Lenovo Z6 Pro भारतात 33,999 रुपयांमध्ये आणला आहे जो येत्या 11 सप्टेंबर पासून ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. 

Lenovo Z6 Pro लुक

Lenovo Z6 Pro कंपनीने ग्लास मेटल डिजाईन वर सादर केला आहे. हा फोन पूर्णपणे बेजल लेस आहे तसेच डिस्प्ले वर ‘यू’ शेप मध्ये छोटीशी नॉच देण्यात आली आहे. या स्क्रीनच्या खाली कंपनीने इन-डिस्प्ले फिंरगप्रिंट सेंसर पण दिला आहे जो डिस्प्लेला टच करताच फोन अनलॉक करतो. Lenovo Z6 Pro च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फोनच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजवीकडे आहेत तर डावीकडे सिम स्लॉट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा

पावरफुल कॅमेरा
Lenovo Z6 Pro ची सर्वात मोठी ताकद याचा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16-मेगापिक्सलची सुपर वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे जी 125डिग्री फिल्ड-आफ-व्यू देते. Lenovo Z6 Pro चा तीसरा कॅमेरा सेंसर एफ/2.4 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे तसेच चौथा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. 

Lenovo Z6 Pro स्पेसिफिकेशन्स

Lenovo Z6 Pro कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याची स्क्रीन साईज 6.39-इंच आहे. लेनोवोने झेड6 प्रो इन-डिस्प्ले फिंरगप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे जो डिस्प्लेच्या खालच्या भागात आहे. कंपनीने हा फोन 8जीबी रॅम मेमोरी सह लॉन्च केला गेला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Lenovo Z6 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित झेडयूआई 11 वर सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रोसेसिंग साठी हा फोन 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट वर चालतो. 

हे देखील वाचा: 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत

Lenovo Z6 Pro गेम टर्बो फीचर सह येतो जो हेवी गेम्स पण स्मूदली प्ले करतो. ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. Lenovo Z6 Pro मध्ये डुअल सिम व 4जी वोएलटीई सह पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

लेनोवो झेड6 प्रो वीडियो

The post 8जीबी रॅम आणि 48-एमपी क्वॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च झाला Lenovo Z6 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-pro-launched-in-india-8gb-ram-48mp-quad-rear-camera-33999-price-specs/feed/ 0