14 मे ला येईल शाओमीचा पॉप-अप कॅमेरा असलेला फोन Redmi X, Realme X शी होईल थेट टक्कर

स्मार्टफोन बाजारात वाढती स्पर्धा यूजर्स साठी फायदेशीर ठरत आहे. टेक ब्रँड आपले स्मार्टफोन्सचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि कमी किंमतीत एकमेकांना टक्कर देतात. सध्या शाओमी आणि रियलमी ब्रँड मध्ये स्पर्धा दिसत आहे, जी वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी भारतात शाओमी ने Redmi Note 7 Pro लॉन्च केला होता ज्याला उत्तर देण्यासाठी रियलमीने Realme 3 Pro आणला. पण आता हि लढाई भारताबाहेर चीन मध्ये पण सुरु होणार आहे. बातमी येत आहे कि रियलमी द्वारा लॉन्च केला जाणारा Realme X ला टक्कर देण्यासाठी शा​ओमी पण Redmi X आणणार आहे.

रियलमी बद्दल समजले आहे कि कंपनी येत्या 15 मे ला चीन मध्ये एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी आपला नवीन फ्लॅगशिप डिवाईस Realme X लॉन्च करू शकते. दुसरीकडे शाओमी संबंधित बातमी पण लीक झाली आहे कि कंपनी रियलमीला टक्कर देण्यासाठी Realme X च्या लॉन्चच्या एक दिवस आधी 14 मे ला आपला ईवेंट आयोजित करेल आणि याच दिवशी रेडमीचा नवीन फ्लॅगशिप डिवाईस Redmi X येईल.

दोन्ही येतील पॉप-अप कॅमेरा सह
Realme आणि Xiaomi ने आपले स्मार्टफोन्स लपवून ठेवले आहेत. पण मिळालेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे कि या दोन्ही कंपन्या आपले नेक्स्ट स्मार्टफोन्स फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च करतील आणि यांचे दोन्ही फोन Realme X आणि Redmi X मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा मिळेल. समजले आहे कि Realme X चा पॉप अप कॅमेरा सेंटर मध्ये असेल तर Redmi X चा पॉप अप सेल्फी कॅमेरा डावीकडे असेल.

स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर होईल लॉन्च
आधी सांगितल्याप्रमाणे शाओमी आणि रियलमी दोन्ही कंपन्या आपल्या आगामी स्मार्टफोन्स बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही किंवा यांच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण केला नाही. पण लीक्स नुसार Redmi X शााओमी द्वारा क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि Redmi X शाओमीचा सर्वात स्वस्त स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वाला फोन असेल.

विशेष म्हणजे शाओमी क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीज चिपसेट वर पण फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 730 किंवा स्नॅपड्रॅगॉन 730जी प्रोसेसर वर सादर केला जाऊ शकतो. लक्षात असू दे कि क्वालकॉम ने आपला लेटेस्ट स्नॅपड्रॅगॉन 730 आणि स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर गेल्या महिन्यात टेक मंचावर सादर केले आहेत. अजूनतरी सॅमसंग गॅलेक्सी ए70 च स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

विशेष म्हणजे 730 चिपसेट 8nm फॅब्रिकेशन प्रोसेसर वर आधारित आहे आणि स्नॅपड्रॅगन 710 SoC पेक्षा चांगला चालतो. हा चिपसेट Kryo 470 ऑक्टा-कोर सीपीयू आणि गेमिंग साठी एड्रिनो 618 जीपीयू सह येईल. विशेष म्हणजे हा प्रोसेसर सिंगल 48-मेगापिक्सल सेंसर सह ट्रिपल कॅमेरा सेटअपला सपॉर्ट करू शकतो. मल्टी-फ्रेम नॉइस रिडक्शनच्या मदतीने हा स्नॅपशॉट मोड मध्ये 192-मेगापिक्सल रेजोल्यूशन पर्यंतचे फोटोज देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here