5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Apr 2023 07:42:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-will-roll-out-5g-in-india-soon-says-kumar-mangalam-birla/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-will-roll-out-5g-in-india-soon-says-kumar-mangalam-birla/#respond Thu, 13 Apr 2023 07:42:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20251 Vodafone idea 5G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आदित्य बिर्ला समूहचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे की वोडाफोन आयडिया लवकरच भारतात 5जी सेवा सुरु करेल. परंतु त्यांनी लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. बिर्ला यांनी AIMA अवार्ड्सच्या प्रसंगी सांगितलं की, “5G रोलआउट लवकरच सुरु होईल.” तर दुसरीकडे भारतात Airtel आणि Jio वेगानं […]

The post लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं की Vi लवकरच भारतात 5G लाँच करेल.
  • कंपनीनं सध्या 5जी रोलआउटसाठी कोणतीही टाइमलाइन दिली नाही.
  • दुसरीकडे जियो आणि एयरटेल देशात वेगानं 5जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

Vodafone idea 5G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आदित्य बिर्ला समूहचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे की वोडाफोन आयडिया लवकरच भारतात 5जी सेवा सुरु करेल. परंतु त्यांनी लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. बिर्ला यांनी AIMA अवार्ड्सच्या प्रसंगी सांगितलं की, “5G रोलआउट लवकरच सुरु होईल.” तर दुसरीकडे भारतात Airtel आणि Jio वेगानं 5जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

विआय 5G लाइव्ह करण्यासाठी सुरु आहे तयारी

काही महिन्यांपूर्वी विआय कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमनं ट्विटरवर सांगितलं होतं की, “Vi अनेक शहरांमध्ये 5G आणण्यासाठी सक्रिय पद्धतीनं भागीदारांसह काम करत आहे” आणि लवकरच आपल्या प्लॅनिंगचा खुलासा करेल.

Vi करत आहे संघर्ष

वोडाफोन-आयडिया 5जी सेवा लाइव्ह न केल्यामुळे आपले ग्राहक गमावू शकते. कारण अन्य दूरसंचार कंपन्यांनी खूप आधीपासून अनेक राज्यांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. वोडाफोन आयडियानं 31 डिसेंबर, 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 7,990 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे.

कंपनीनं सप्टेंबरच्या तिमाहीत 7,595.5 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. तसेच डिसेंबर तिमाहीत एकूण महसूल 10,620.6 कोटी रुपये होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत 10,614.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 0.1 टक्के जास्त आहे.

एयरटेल आणि जियोला होतोय फायदा

दुसरीकडे एका रिपोर्टनुसार एयरटेलनं डिसेंबर 2022 मध्ये हरियाणा आणि ओरिसा सर्कलमध्ये 0.1 मिलियन आणि 0.2 मिलियन सक्रिय युजर्सना जोडले आहेत. यामुळे एयरटेलच्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की डिसेंबर ध्ये रिलायन्स जियोच्या सक्रिय युजर बेसमध्ये 3 मिलियनची वाढ झाली आहे, तर याच कालावधीत एयरटेलला 6 मिलियन ग्राहक जोडण्यात यश मिळालं आहे. यावरून स्पष्ट होत आहे की वोडाफोन आयडियाची 5जी सर्व्हिस नसण्याचा थेट फायदा दुसऱ्या दोन टेलिकॉम कंपन्यांना होत आहे.

The post लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-will-roll-out-5g-in-india-soon-says-kumar-mangalam-birla/feed/ 0
अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क https://www.91mobiles.com/marathi/adani-group-roll-out-5g-this-year-catch/ https://www.91mobiles.com/marathi/adani-group-roll-out-5g-this-year-catch/#respond Mon, 09 Jan 2023 06:34:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16662 Adani Group टेलिकॉम इंडस्ट्रीमधील नवा खेळाडू आहे, जे यंदा इंटरप्राइज स्तरावर 5G सर्व्हिस देण्याची योजना बनवत आहेत. नवीन वर्षानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना ग्रुपचे संस्थापक आणि चेयरमन गौतम अदानी यांनी आपली योजना सांगितली, त्यानुसार ते डेटा सेंटर्स वाढवण्यासाठी, एआय-एमएल आणि इंडस्ट्री क्लाऊड क्षमता विकसित करण्यासाठी, बी2सी अ‍ॅप्स बाजारात आणण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करणार आहेत. […]

The post अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Adani Group टेलिकॉम इंडस्ट्रीमधील नवा खेळाडू आहे, जे यंदा इंटरप्राइज स्तरावर 5G सर्व्हिस देण्याची योजना बनवत आहेत. नवीन वर्षानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना ग्रुपचे संस्थापक आणि चेयरमन गौतम अदानी यांनी आपली योजना सांगितली, त्यानुसार ते डेटा सेंटर्स वाढवण्यासाठी, एआय-एमएल आणि इंडस्ट्री क्लाऊड क्षमता विकसित करण्यासाठी, बी2सी अ‍ॅप्स बाजारात आणण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करणार आहेत.

Adani 5G सर्व्हिस

कंपनीनं 2022 मध्ये झालेल्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात 212 कोटींची बोली लावली आहे, ज्यात त्यांनी फक्त 400 MHz स्पेक्ट्रमची खरेदी केली आहे. त्यामुळे अदानी सामान्य ग्राहकांना 5G देऊ शकणार नाही कारण कंपनीनं सर्व 5G बँड्समध्ये स्पेक्ट्रमची खरेदी केली नाही. आता अदानी स्वतःच्या आणि इतर व्यवसायांना खाजगी नेटवर्क देण्याची तयारी करत आहे, अशी माहितीतही द हिंदू बिजिनेसलाइननं दिली आहे. हे देखील वाचा: बंद होणार 630GB 5G डेटा असलेला प्लॅन! Jio युजर्स लवकर करा ‘हा’ रिचार्ज

परंतु भारतातील पहिली खाजगी 5जी प्रायव्हेट नेटवर्कची डील गेल्याच वर्षी भारती एयरटेल आणि महिंद्रा ग्रुपमध्ये झाली आहे. तसेच Reliance Jio नं देखील सांगितलं आहे की कंपनी देखील महसूल मिळवण्यासाठी खाजगी 5जी नेटवर्कचा वापर करेल. तसेच आयटीमधील मोठी कंपनी टीसीएस देखील या शर्यतीत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा आहे.

भारतातील 5जी नेटवर्क

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी अधिकृतपणे देशातील 5G services ला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर लगेचच एयरटेलनं देशात आपल्या 5जी सर्व्हिस लाइव्ह केल्याची घोषणा केली. काही दिवसांनी जियोनं देखील नव्या जेनरेशनचं नेटवर्क देशात सादर केलं परंतु वोडाफोन-आयडियाची 5जी सर्व्हिस मात्र अद्याप सुरु झालेली नाही. एयरटेलनं नॉन स्टॅन्ड अलोन (NSA) टेक्नॉलॉजीचा सर्वप्रथम व्यावसायिक वापर केला आहे. तर दुसरीकडे जियो ही एकमेव कंपनी आहे जी 700 MHz बँड आणि 5जी स्टॅन्ड अलोन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

BSNL 5G Service

BSNL 5G Service च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो युजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 5जी सर्विस (5G Service) 2024 मध्ये सुरु केली जाईल. ही माहिती खुद्द केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Union Telecom Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात 5G सुरु करण्याची माहिती देण्यासह त्यांनी सांगितलं की BSNL 4G Network सुरु करण्यासाठी टीसीएस (TCS) आणि सी-डॉट (C-DOT) यांच्या संघाची निवड करण्यात आली आहे, यातील करारानुसार आदेश दिल्यानंतर वर्षभरात सरकारी टेल्कोचा नेटवर्क 5जीवर अपग्रेड करण्यात येईल.

The post अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/adani-group-roll-out-5g-this-year-catch/feed/ 0
सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/ https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/#respond Sun, 20 Nov 2022 10:03:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14572 तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु […]

The post सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु केलं आहे आणि दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या 5जी बँड आणि 5जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. एका कंपनीनं 5G SA सर्व्हिस सादर केली आहे तर दुसऱ्या कंपनीनं 5G NSA. तसेच बँड देखील वेगळे आहेत. त्यामुळे सर्वच 5G फोन या दोन्ही टेक्नॉलजीला किंवा 5G बँड्सना सपोर्ट करत नाहीत त्यामुळे कोणत्या हँडसेटची निवड करावी हे जाणून घेण्यासाठी आधी 5जी नेटवर्क समजून घेतलं पाहिजे.

5G फोनच्या खरेदीच्या आधी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. कारण भारतात आतापर्यंत जे 5G फोन उपलब्ध झाले आहेत ते सर्व नेटवर्कच्या बाबतीत एक सारखे नाहीत आणि काहींमध्ये फक्त Airtel आणि VI साठी नेटवर्क सपोर्ट आहे तर काहींमध्ये फक्त Jio 5G नेटवर्कचा सपोर्ट आहे. परंतु काही फोन आहेत ज्यात दोन्ही नेटवर्कचा सपोर्ट आहे त्यामुळे खरेदीच्या आधी तुम्हाला 5जी बँडची माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज या लेखातून आपण 5G बँडची माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही 5G फोन खरेदी करताना कोणतीही चूक करणार नाही.

5G बँड म्हणजे काय

5G बँड समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही 5G बँडसह NR ही अक्षरे पहिली असतील, जसे की 5G NR बँड-1 बँड-2 इत्यादी. इथे NR चा अर्थ न्यू रेडियो. एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु एनआर असेल तर त्याचा अर्थ असा की याचा 5जी फ्रीक्वेंसी बँडसाठी उपयोग होत आहे.

5G NR दोन फ्रीक्वेंसी बँडची डेवलपमेंट करण्यात आली आहे ज्यात पहिली फ्रीक्वेंसी रेंज 1 जिला एफआर 1 देखील म्हणतात. या फ्रीक्वेंसी रेंजमध्ये आधी फक्त sub-6 GHz फ्रीक्वेंसी बँडचा वापर केला होता परंतु आता 410 MHz ते 7125 MHz बँडचा देखील वापर केला जात आहे.

दुसरी फ्रीक्वेंसी रेंज 2 आणि हिला एफआर 2 देखील म्हणतात. यात 5जी सर्व्हिससाठी 24.25 GHz to 71.0 GHz पर्यंतच्या बँडचा वापर केला जातो. ही न्यू फ्रीक्वेंसी रेंज आहे जी 5G सर्व्हिस अंतगर्त 1GBPs किंवा त्यावरील स्पीडसाठी वापरली जाते.

वर सांगितल्याप्रमाणे एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक सेवा दिल्या जाऊ शकतात. जर एखाद्याकडे 1800MHz बँड असेल तर त्यावर 2G, 3G, 4G आणि आता 5G सर्व्हिस देखील देता येईल. 3G आणि 2G सर्व्हिससाठी कंपन्या साधारण स्पेक्ट्रमची माहिती देतात जसे की 1800, 1900MHz आदि. परंतु 4G आणि 5G सर्व्हिससाठी स्पेक्ट्रम बँड 1 आणि 2 सारख्या नावांचा वापर केला जातो. जसे की एखाद्या फोनमध्ये 1800 मेगाहर्ट्ज बँडवर 4जी सपोर्ट असेल तर बँड 3 किंवा बी3 नं ओळखला जाईल. परंतु जर या बँडवर फोनमध्ये 5जी सर्व्हिसचा सपोर्ट मिळाला तर त्याला N3 बँड म्हणतात. 5जी बँडसाठी एन अक्षराचा वापर केला जातो.

भारतात 5G फ्रीक्वेंसी बँड

भारतात 5जी सर्व्हिससाठी 12 फ्रीक्वेंसी बँडचा लिलाव करण्यात आला होता ज्यात रिलायन्स जियो, एयरटेल, विआय आणि अदानी सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ज्यात 5जी सर्व्हिससाठी n71 (600MHz), n28 (700MHz), n20 (800MHz), n5 (850MHz), n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n78 (3300 – 3800MHz), n77 (3300 – 4200MHz), n79 (4400 – 5000MHz) आणि n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz)) बँड्सची वाटणी करण्यात आली आहे.

Airtel 5जी बँड

भारतात सध्या एयरटेल आणि जियोनं टेस्टिंग स्वरूपात आपली 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. एयरटेलकडे यासाठी एफआर 1 बँडमध्ये n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम आहे तर एफआर 2 बँडमध्ये कंपनीकडे n258 (26 GHz) स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. कंपनीनं 5जीसाठी सध्या एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सर्व्हिस सुरु केली आहे.

रिलायन्स Jio 5G बँड

रिलायन्स कंपनीकडे 5जीसाठी एफआर 1 मध्ये n28 (700 MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम बँड आहे. एफआर 2 मध्ये n258 (26 GHz) स्पेक्ट्रम बँड आहे. जियोनं 5जीसाठी एन78 बँडवर आपली एसए म्हणजे स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सेवा सुरु केली आहे. म्हणजे सध्या एयरटेलपेक्षा जियोची 5जी टेक्नॉलॉजी वेगळी आहे.

Jio च्या 5G SA आणि Airtel च्या NSA 5G मधील फरक

5जी एनएसए: एयरटेलनं 5जी एनएसए सर्व्हिसमधील एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. या 5जी टेक्नॉलॉजीला तुम्ही 4जीचं अ‍ॅडव्हान्स व्हर्जन देखील म्हणू शकता. यात 5जी रेडियो सिग्नल 4जी कोरवर ट्रांसफर केलं जातं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या टेक्नॉलॉजीमध्ये नेटवर्क ऑपरेटर 5जीसाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत नाहीत परंतु 4जी नेटवर्कमध्ये थोडा बदल करून 5जी सर्व्हिस देण्यालायक बदल करण्यात येतात.

5जी एसए: भारतात 5जी एसए नेटवर्कची सुरुवात जियोनं केली आहे. 5जी मध्ये एसएचा अर्थ स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. म्हणजे एक असं आर्किटेक्चर जे खास 5जी नेटवर्कसाठी तयार करण्यात आलं आहे. यात 4जी कोरचा कुठेधी वापर केला जात नाही. त्यामुळेच जियो 5जी सर्व्हिसला ट्रू 5जी असं नाव देण्यात आलं आहे.

5G फ्रीक्वेंसी बँड

रेंज आणि स्पीडनुसार 5जी स्पेक्ट्रम बँडचे 3 भाग करण्यात आले आहेत.

  • लो फ्रीक्वेंसी बँड
  • मिड फ्रीक्वेंसी बँड
  • हाय फ्रीक्वेंसी बँड

लो बँड फ्रीक्वेंसी: सब 1 गीगा हर्ट्ज फ्रीक्वेंसी बँड लो बँड फ्रीक्वेंसी रेंज म्हटलं जातं. यांची फ्रीक्वेंसी कमी असते परंतु वेवलेंथ लांब असते. त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच इंडोर कव्हरेज आणि एन्ड टू एन्ड कव्हरेजमध्ये लो बँड फ्रीक्वेंसी रेंज खूप फायदेशीर ठरते. परंतु यातील एक दोष म्हणजे यात तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकत नाही. 5जी सर्व्हिसमध्ये देखील याची क्षमता कमी असते, तरीही 4जी पेक्षा खूप फास्ट असते. भारतात n5 (850MHz), n8 (900MHz), n20 (800MHz) आणि n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड लो फ्रीक्वेंसी बँडमध्ये येतात. जियो कडे n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड उपलब्ध आहे. या बँडचा वापर कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणांसाठी केला जातो.

मिड फ्रीक्वेंसी बँड: 1 पासून 6 गीगाहर्ट्जचे फ्रीक्वेंसी बँडना मिड बँड म्हटलं जातं. या फ्रीक्वेंसी बँड मध्ये कव्हरेज एरिया खूप मोठा असतो. परंतु यात वेवलेंथ थोडी छोटी असते परंतु तुलनेनं स्पीड चांगला मिळतो. यात तुम्हाला 4जी सर्व्हिस पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळतो. शहरी भागांमध्ये लोकवस्ती जास्त असते आणि इंटरनेटचा वापर जास्त असेलेल्या ठिकाणी या सर्व्हिसचा वापर केला जातो. भारतात n1 (2100MHz), n3 (1800MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n77 (3300 – 4200MHz) आणि n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड यासाठी वापरले जातात. जियो आणि एयरटेल दोन्ही कडे n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड उपलब्ध आहे. तसेच एयरटेल कडे एन3 बँड देखील आहे.

हाय फ्रीक्वेंसी बँड: हाय फ्रीक्वेंसी बँडला मिलीमीटर वेव देखील म्हटलं जातं. या बँडमध्ये तुम्हाला 5जी मध्ये अल्ट्रा स्पीड मिळतो. परंतु याची वेवलेंथ खूप छोटी असते त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी खर्च जास्त येतो. 4जीच्या तुलनेत या या बँडमध्ये 5जी वर 50 ते 100 पट जास्त स्पीड मिळवता येईल. या अंतर्गत 24 ते 52 गीगाहर्ट्जचे स्पेक्ट्रम बँड येतात. भारतात n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz) बँड्सचं वाटप करण्यात आलं आहे. हा बँड सध्या जियो आणि अदानी ग्रुपकडे आहे. परंतु कंपन्या या बँडचा वापर सामान्य लोकांसाठी न करता व्यावसायिक कामांसाठी करतील.

भारतात 5G सपोर्टेड फोन

आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की भारतात 5जी नेटवर्क बँडची परिस्थिती कशी आहे. कोणती कंपनी कशी सेवा देत आहे आणि कोणाकडे कोणता 5जी बँड उपलब्ध आहे. परंतु आता 5जी स्मार्टफोनची बारी आहे. भारतात 5जी स्मार्टफोनच्या नावावर अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत. परंतु शेवटी प्रश्न पडतात की त्या स्मार्टफोनवर 5G चालेल का आणि जर चालली कोणत्या बँड्सवर चालेल तसेच कोणत्या ऑपरेटरचं वापरता येईल?

या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर तुम्ही 5जी स्मार्टफोन विकत घेणार असाल तर सर्वप्रथम त्या फोनमध्ये असलेले बँड चेक करा. कोणत्या फोनमध्ये किती बँड्सचा सपोर्ट आहे ते जाणून घ्या. फोनमध्ये n71, n28, n20, n5, n8, n3, n1, n40, n41, n78, n77 आणि n79 5जी बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/feed/ 0
5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल https://www.91mobiles.com/marathi/5g-service-issues-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5g-service-issues-in-india/#respond Mon, 17 Oct 2022 10:40:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14058 Disadvantages of 5G Technology: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केली आहे. सध्या निवडक मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे आणि लवकरच हिचा प्रसार भारतभर होईल. 5G अल्ट्रा-हाय इंटरनेट स्पीडच्या मदतीनं युजर्स सीमलेस 4K व्हिडीओ स्ट्रीमिंग, लो-लेटेंसी क्लाउड गेमिंग, आणि अनेक गोष्टी करू शकतील. परंतु तुम्हाला माहित आहे का 5G वापरण्याचे […]

The post 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Disadvantages of 5G Technology: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केली आहे. सध्या निवडक मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे आणि लवकरच हिचा प्रसार भारतभर होईल. 5G अल्ट्रा-हाय इंटरनेट स्पीडच्या मदतीनं युजर्स सीमलेस 4K व्हिडीओ स्ट्रीमिंग, लो-लेटेंसी क्लाउड गेमिंग, आणि अनेक गोष्टी करू शकतील. परंतु तुम्हाला माहित आहे का 5G वापरण्याचे पण अनेक तोटे (cons of 5G technology) देखील आहेत. या तोट्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. हे वाचून तुम्हाला देखील 5G फोनवर फक्त 4G वापरण्याची इच्छा होईल.

5G वापरण्याचे तोटे

5g service issues in india

  • 5G ची मर्यादित उपलब्धता
  • 5G स्पीड स्थिर नाही
  • 5G मुळे बॅटरी संपते फोनही गरम होतो
  • 5G मुळे क्षणात संपतो डेटा
  • 5G जास्त वेळ असणार नाही मोफत

1. 5G ची मर्यादित उपलब्धता

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्यांनी आपली 5G सेवा भारतातील काही शहरांमध्ये सुरु केली आहे. परंतु वास्तवात 5G खूप कमी शहरांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे जरी तुमच्याकडे 5G फोन आणि सिम असलं तरी 5G तुम्ही भारतात सर्वच ठिकाणी वापरू शकत नाही. देशातील बहुतांश भागात 5G चे टॉवर उभे करण्यात आले नाहीत. हे देखील वाचा: BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा

2. 5G चा स्पीड स्थिर नाही

5G नेक्स्ट-जेन हाय-स्पीड इंटरनेट बद्दल बोलायचं झालं तर ते अजूनही स्वप्नच आहे. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात इंटरनेट युजर्स सांभाळू शकत नाही त्यामुळे डाउनलोड आणि अपलोड स्पीड घसरतो. काही ठिकाणी तुम्हाला सुपर-फास्ट स्पीड मिळू शकतो, तर अन्य ठिकाणी इंटरनेट 4G पेक्षा देखील वाइट स्पीड मिळतो.

3. 5G मुळे बॅटरी संपते

5g service issues in india

बराच वेळ 5G चा वापर केल्यास तुमच्या फोनची बॅटरी लवकरच संपते. याला 5जी मध्ये मिळणारा फास्ट स्पीड कारणीभूत आहे. 5G वापरत असताना मोबाइलची बॅटरी पाहता पाहता कमी होऊ लागते. 5G चा वापर करण्यासाठी अनेक युजर आपल्या मोबाइलमध्ये एआर/व्हिआर सारखेच हेव्ही सॉफ्टवेयर, गेम आणि अन्य अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करतात त्यामुळे बॅटरी जास्त संपते. तसेच फोन गरम होण्याचे प्रमाण देखील वाढते.

4. क्षणात संपतो डेटा

सध्याचे 4जी प्लॅन कमीत कमी 1GB किंवा 2GB डेली इंटरनेट डेटासह येतात, जे लिमिटेड व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्या युजर्ससाठी पुरेसे आहेत. परंतु 5Gच्या इंटरनेट स्पीड टेस्ट मधेच 1GB डेटा काही क्षणात संपत आहे. त्यामुळे 5जीवर 4K व्हिडीओ आणि चित्रपट डाउनलोड करण्याचा किंवा स्ट्रीमिंगचा प्रश्नच उरत नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

5. 5G जास्त वेळ असणार नाही मोफत

Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्या नवीन नेटवर्क वापरता यावं म्हणून अनलिमिटेड 5G डेटा देत आहेत. परंतु हे जास्त दिवस चालणार नाही, लवकरच 5G प्लॅनची घोषणा केली जाईल. तसेच 5G इंटरनेटचा वापर फक्त मेन प्लॅनमध्ये करता येतो. त्यामुळे जर मेन प्लॅनचा डेटा संपला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची वाट बघावी लागेल कारण यात 5G डेटा व्हाउचर मिळणार नाहीत. तसेच लिलावात खर्च केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी कंपन्या महागडे 5G प्लॅन्स आणू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-service-issues-in-india/feed/ 0
एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-5g-service-on-4g-sim/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-5g-service-on-4g-sim/#respond Mon, 10 Oct 2022 10:13:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13840 5G Service On 4G SIM: भारतात अधिकृतपणे 5G Service चा शुभारंभ झाला आहे आणि अलीकडेच एयरटेलची Airtel 5G Plus व रिलायन्स जियोची Jio True 5G Beta सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे. अनेक युजर्स त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर या सेवांचा आनंद घेत आहेत तर अजून अनेकजण विचार करत आहेत की 4G SIM card चं काय करायचं? आणि […]

The post एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Service On 4G SIM: भारतात अधिकृतपणे 5G Service चा शुभारंभ झाला आहे आणि अलीकडेच एयरटेलची Airtel 5G Plus व रिलायन्स जियोची Jio True 5G Beta सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे. अनेक युजर्स त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर या सेवांचा आनंद घेत आहेत तर अजून अनेकजण विचार करत आहेत की 4G SIM card चं काय करायचं? आणि 4G SIM वर 5G सर्व्हिस कशी वापरता येईल? त्यांना 5G वापरण्यासाठी 5G SIM ची गरज आहे का? जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही आमच्या या लेखातून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला जाणून घेऊया…

नवीन 5G सिम आवश्यक आहे का?

5G सर्व्हिस वापरण्यासाठी तुम्हाला 5G SIM ची गरज आहे का? सर्वप्रथम तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. एयरटेल आणि जियोनं घोषणा केली आहे की 5G चा वापर करण्यासाठी युजर्सना 5G सिमची गरज नाही, ज्या ग्राहकांकडे लेटेस्ट 4जी सिम आहे, त्यांचे सिम 5जीला देखील सपोर्ट करतात. ह्याचा अर्थ असा की 4G SIM वरच 5G सर्व्हिसचा वापर करता येईल. परंतु युजर्सना 5G सर्व्हिसचा आनंद घेण्यासाठी 5G स्मार्टफोन (5G Mobile) मात्र आवश्यक असेल, तिथे कोणतीही तडजोड करता येणार नाही. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

How to get 5g service on 4g sim

थोडक्यात सांगायचं तर Airtel आणि Reliance Jio ची 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही, किंवा पोर्ट करावं लागणार नाही. जुन्या 4जी सिमवर 5जी देखील चालेल. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे एक अपडेटेड नवीन सिम असावं. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

4G SIM वर कशी मिळेल 5G सर्व्हिस?

How to get 5g service on 4g sim

  • एकदा तुमच्या एरिया मध्ये 5G रोल आउट झालं की तुम्हाला तुमच्या 4G SIM असलेल्या 5G स्मार्टफोनच्या काही सेटिंग्समध्ये बदल करावा लागेल.
  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर ‘सेटिंग’ अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर, ‘मोबाइल नेटवर्क’ ची सेटिंग निवडा.
  • सिम सिलेक्ट करा ज्यात तुम्हाला 4G च्या ऐवजी 5G ऑन करायचं आहे.
  • तिथे ‘Preferred network type’ ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर फक्त टॅप करा आणि 5G नेटवर्क टाइपची निवड करा.
  • जर तुमच्या परिसरात 5G सुरु झालं असेल तर, या प्रोसेस नंतर काही मिनिटांतच स्टेटस बार वर 5G साइन दिसू लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-5g-service-on-4g-sim/feed/ 0
प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launched-in-india/#respond Sat, 01 Oct 2022 05:54:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13630 5G Launch in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IMC 2022 म्हणजे इंडिया मोबाइल कांग्रेसच्या मंचावरून भारतात 5जी सर्व्हिस लाँच केली आहे. 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांना 5G Spectrum चं वाटप करण्यात आलं होतं, आजच्या लाँच नंतर या कंपन्या देशात आपली सेवा सुरु करू शकतील. […]

The post प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Launch in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IMC 2022 म्हणजे इंडिया मोबाइल कांग्रेसच्या मंचावरून भारतात 5जी सर्व्हिस लाँच केली आहे. 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांना 5G Spectrum चं वाटप करण्यात आलं होतं, आजच्या लाँच नंतर या कंपन्या देशात आपली सेवा सुरु करू शकतील. 5G Services मध्ये मजबूत 5G Network सोबतच cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये आमूलाग्र बदल दिसेल परंतु सर्वसामान्य जनतेला ज्या गोष्टीची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे सुपर फास्ट 5G Internet! 5जी लाँचनंतर भारतात इंटरनेट आता रॉकेट स्पीडनं चालेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

5G Services Launched in India by PM Modi

नवी दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित आयएमसी 2022 इव्हेंटच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशातील तिन्ही प्रमुख टेलीकॉम कंपन्या एयरटेल, जियो आणि वीआयच्या 5जी सर्विसचा डेमो देखील घेतला आहे. या दरम्यान मोदींनी 5जी अँब्युलन्स आणि 5जी एज्युकेशन सारख्या सर्विसेसची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर ऑग्मेंटेड रियलिटी वर्चुअल रियलिटीचा अनुभव देखील घेतला. इतकेच नव्हे तर 5जी टेक्नोलॉजीच्या मदतीनं पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये बसून स्वीडनमध्ये ठेवण्यात आलेली कार देखील चालवून दाखवली.

5जीचा फायदा

5जी एक नेक्स्ट जेनरेशन मोबाइल कम्यूनिकेशन नेटवर्क आहे जो सध्याच्या 4जी च्या तुलनेत मोठा आणि वेगवान असेल. 5जी नेटवर्क फक्त मोबाइल स्मार्टफोंस पर्यंत मर्यादित राहणार नाही तर सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासह याचा फायदा क्लाउड गेमिंग (cloud gaming), एआर/वीआर टेक्नॉलजी (AR/VR technology), आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) इत्यादीमध्ये होईल.

किती फास्ट असेल 5G

5G बद्दल लोकांच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता हिच्या स्पीडमुळे आहे. सध्याच्या 4G चा टाॅप स्पीड 100mbps म्हणजे 100 मेगाबिट्स प्रति सेकंड आहे. तर 5G मध्ये हा स्पीड थेट 10GBPS (10 जीबी प्रति सेकंड) होईल. अर्थात 4जी पेक्षा 100 पट जास्त. तुम्हाला आठवत असेल की 3G नेटवर्कवर हा स्पीड 7.2mbps होता. आणि तरी सुद्धा जेव्हा 3जीची सुरुवात झाली होती तेव्हा मोबाइल युजर्स किती उत्साही होते. मग आता 5जी स्पीड जेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालेल तेव्हा काय होईल.

The post प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launched-in-india/feed/ 0
5G In India: फक्त काही तास शिल्लक! भारतात ‘5जी’ची प्रतीक्षा संपणार https://www.91mobiles.com/marathi/5g-launch-india-1st-october-pm-narendra-modi-airtel-jio-vi-5g-sim-5g-recharge-plan-price/ https://www.91mobiles.com/marathi/5g-launch-india-1st-october-pm-narendra-modi-airtel-jio-vi-5g-sim-5g-recharge-plan-price/#respond Fri, 30 Sep 2022 12:49:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13621 5G Launch In India: भारतात 5जी लाँच (5G Service Live) ची प्रतीक्षा संपण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर म्हणजे उद्या शनिवारी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5जी सेवेचे उदघाटन करतील. 1 October पासून 4 दिवस चालणाऱ्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातून देशातील नेक्स्ट जनरेशन […]

The post 5G In India: फक्त काही तास शिल्लक! भारतात ‘5जी’ची प्रतीक्षा संपणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Launch In India: भारतात 5जी लाँच (5G Service Live) ची प्रतीक्षा संपण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर म्हणजे उद्या शनिवारी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5जी सेवेचे उदघाटन करतील. 1 October पासून 4 दिवस चालणाऱ्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातून देशातील नेक्स्ट जनरेशन (5th Generation Mobile Network) नेटवर्क म्हणजे 5G सुरु करण्यात येईल.

भारतात अधिकृतपणे 5G सुरु होण्यासाठी फक्त काही तास उरले असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. 5G लाइव्ह झाल्यानंतर 5G सिम (5G SIM) कसं मिळेल, 5G प्लॅन (5G Recharge) कसे असतील आणि कोणती कंपनी (Reliance Jio, Vodafone Idea, Airtel) सर्वप्रथम भारतात आपलं 5G नेटवर्क लाँच करेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे देखील वाचा: सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

5G नेटवर्क म्हणजे काय?

जगभरात 5जीची सुरुवात झाली आहे आणि भारतात देखील लवकरच हे लाँच केलं जाईल. 5G मुळे मोबाइल मध्ये इंटरनेट स्पीड मेगाबाइटवरून गीगाबाइटवर जाईल आणि यात 1gbps म्हणजे 4जी पेक्षा 100 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल. 5जी टेक्नॉलॉजी फक्त मोबाइल फोनपर्यंत मर्यादित रहाणार नाही तर बल्ब, पंखे, फ्रिज आणि कार देखील 5जीशी कनेक्ट होतील. 5G मध्ये IOT वर मोठं काम होईल आणि या टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्व अप्लायंस व डिवाइसना एकमेकांशी जोडले जातील. दुसऱ्या शहरात जाऊन देखील तुम्ही तुमच्या घरातील डिवाइसना तुमच्या स्मार्टफोनवरून कमांड देऊ शकाल. म्हणजे मुंबईत बसून तुम्ही तुमच्या पुण्यातील घराचा बल्ब ऑन करू शकाल. 5जीच्या माध्यमातून हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, कारखाने, मॉल, एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉटेल सारख्या ठिकाणी सर्व सिस्टम एकमेकांशी कनेक्टड राहतील. मोबाईल इंटरनेट स्पीड पाहता, काही मिनिटांत 1जीबी पर्यंतची मुव्ही डाउनलोड होईल.

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

या 13 शहरांमध्ये 2022 मध्ये सर्वप्रथम मिळेल 5G सर्व्हिस

तुम्हाला आठवत असेल की यंदा डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशंस (DoT) नं माहिती दिली होती की भारतात 5G रोलआउट नंतर 13 शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. 2022 मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगढ, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. परंतु डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशननं कोणती टेलिकॉम कंपनी सर्वप्रथम 5G सर्व्हीस व्यवसायिकरित्या रोल आउट करेल, हे अधिकृतपणे सांगितलं नाही. परंतु असं वाटत आहे की जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या 5G लाँचिंगमध्ये काही दिवस किंवा तासांचा फरक असू शकतो.

5G SIM

आगामी 5G Network साठी सर्व टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना नवीन सिम कार्ड घेण्यास सांगतील की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही. परंतु अलीकडेच एयरटेलनं स्पष्ट केलं होतं की Airtel 5G नेटवर्कसाठी ग्राहकांकडे एक 5G सपोर्टेड फोन असणं आवश्यक आहे. म्हणजे 5जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करण्यासाठी नवीन सिम कार्ड गरज नाही असाच अर्थ यातून काढता येईल. परंतु रिलायन्स जियो आणि वोडाफोन आयडियाकडून 5G सिम बाबत असं कोणतंही विधान करण्यात आलं नाही.

5G Plans Price

लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार टेलीकॉम कंपन्या सुरुवातीला 5जी सेवेसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेणार नाहीत. कारण त्यानं 4 जी युजर्सना नवीन मोबाइल नेटवर्कची सवय लावावी लागेल. एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांचा हवाला देत संकेत देण्यात आला आहे की 5G लाँचनंतर किंमत वाढवली जाईल. परंतु हे लवकर होणार नाही कारण 5G हँडसेट अजूनही थोडे महाग आहेत.

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Analysys Mason चे भारतीय प्रमुख रोहन धमीजा यांनी म्हटलं आहे, “5जी ऑपरेटर सुरुवातीला 4जी पेक्षा प्रीमियम चार्ज करण्याची शक्यता नाही कारण सुरुवातीला त्यांचं लक्ष 5जी वापर वाढवणे, जास्त युजर्सना वेगाचा अनुभव देणं, जास्त डेटा वापरणं आणि त्यामुळे एआरपीयू वाढवण्यावर असेल.” हे देखील वाचा: लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये आणखी एका दणकट स्मार्टफोन एंट्री; स्वस्तात Redmi Note 11R लाँच

4जी फोनमध्ये चालेल 5जी सिम?

5G सर्व्हिस अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 4G स्मरफोनवर 5G नेटवर्क उपलब्ध होणार नाही. उलट 5जी मोबाइल फोनमध्ये 5जी सह 4जी, 3जी आणि 2जी नेटवर्कचा देखील वापर करता येईल. परंतु 4जी फोनमध्ये 5जी नेटवर्क चालणार नाही.

The post 5G In India: फक्त काही तास शिल्लक! भारतात ‘5जी’ची प्रतीक्षा संपणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-launch-india-1st-october-pm-narendra-modi-airtel-jio-vi-5g-sim-5g-recharge-plan-price/feed/ 0
नॅशनल ब्रॉडबँड मिशननं 5G संबंधित केलेलं ट्विट केलं डिलीट; 5जी लाँचची दिली होती माहिती https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launch-in-india-on-october-1st-india-mobile-congress-pm-modi-know-everything/ https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launch-in-india-on-october-1st-india-mobile-congress-pm-modi-know-everything/#respond Mon, 26 Sep 2022 06:40:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13432 भारतात 5G service ची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेरीस संपणार आहे. भारताचे Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते 4 दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबरला 5G लाँच केलं जाईल. 23 सप्टेंबरला National Broadband Mission च्या अधितकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली की 5G network 1 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या Indian Mobile Congress (IMC 2022) मध्ये लाइव्ह (5G live) केलं […]

The post नॅशनल ब्रॉडबँड मिशननं 5G संबंधित केलेलं ट्विट केलं डिलीट; 5जी लाँचची दिली होती माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात 5G service ची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेरीस संपणार आहे. भारताचे Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते 4 दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबरला 5G लाँच केलं जाईल. 23 सप्टेंबरला National Broadband Mission च्या अधितकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली की 5G network 1 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या Indian Mobile Congress (IMC 2022) मध्ये लाइव्ह (5G live) केलं जाईल. त्यानंतर दिवाळीपर्यंत Airtel 5G, Jio 5G आणि Vi 5G सर्व्हिस पण लाइव्ह होण्याची शक्यता आहे. दरम्यान NBM नं आपलं Tweet एक दिवसांनी हटवलं, त्यामुळे 1 ऑक्टोबरला 5G Launch होणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

1 ऑक्टोबरला लाँच होणार का 5G

23 सप्टेंबरला नॅशनल ब्रॉडबँड मिशन (NBM) नं एक ट्वीट केलं ज्यात लिहिण्यात आलं होतं की 1 ऑक्टोबरला इंडिया मोबाइल कांग्रेसमध्ये पीएम मोदी 5जी लाँच करतील. परंतु काही वेळानं NBM च्या ट्विटर हँडलवरून ट्वीट डिलीट करण्यात आलं. त्यानंतर मोबाइल इंडिया कांग्रेसनं देखील 5जी लाँच बद्दल काही सांगितलं नाही. त्यामुळे एक ऑक्टोबरला देशात 5जी लाँचची बातमी निराधार वाटते. हे देखील वाचा: 7,000mAh च्या दणकट बॅटरीसह नवीन Tecno Mobile ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera

5G Services Launch In India On October 1st India Mobile Congress Pm Modi Know Everything

12 ऑक्टोबरला लाइव्ह होणार 5G?

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितलं होतं की आम्ही 5जी सेवा वेगानं सुरु करण्याची योजना बनवत आहोत. दूरसंचार ऑपरेटर याबाबत काम करत आहेत आणि इंस्टॉलेशन केले जात आहेत. आशा आहे की 12 ऑक्टोबरपर्यंत 5जी सर्व्हिस सुरु होईल आणि त्यानंतर शहर आणि वस्त्यांमध्ये याचा विस्तार होईल. केंद्रीय मंत्र्यांनी विश्वास दर्शवला के पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशातील प्रत्येक भागात 5जी पोहोचेल.

5G Services Launch In India On October 1st India Mobile Congress Pm Modi Know Everything

आधी देखील आली होती 5G लाँचची तारीख

5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर बातम्या आली होत्या की भारतात 5G सेवा 15 August 2022 लाँच केली जाऊ शकते, परंतु तसं झालं नाही. तसेच जियो आणि एयरटेलद्वारे दिवाळीपर्यंत 5G सर्व्हिस लाइव्ह केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार दोन्ही कंपन्या सुरुवातीला 4G इतक्या किंमतीतच 5G सर्व्हिस लाँच करतील, त्यामुळे ग्राहकांना 5G चा अनुभव घेता येईल. ग्राहक संख्या वाढल्यानंतर ही किंमत वाढवली जाऊ शकते. हे देखील वाचा: 70 हजारांपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये मिळेल 120 km ची रेंज, पाहा यादी

या 13 शहरांमध्ये 2022 मध्ये सर्वप्रथम मिळू शकते 5G सर्व्हिस

DoT म्हणजे Department of Telecommunications नुसार देशात 13 अशी शहरं आहेत जिथे सर्वप्रथम 5जी नेटवर्क सादर करण्यात येईल. या शहरांच्या यादीत Mumbai, Pune Ahmedabad, Bengaluru, Chandigarh, Chennai, Delhi, Gandhinagar, Gurugram, Hyderabad, Jamnagar, Kolkata आणि Lucknow चा समावेश आहे. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.

The post नॅशनल ब्रॉडबँड मिशननं 5G संबंधित केलेलं ट्विट केलं डिलीट; 5जी लाँचची दिली होती माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-services-launch-in-india-on-october-1st-india-mobile-congress-pm-modi-know-everything/feed/ 0
5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/ https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/#respond Fri, 23 Sep 2022 07:41:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13392 5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे […]

The post 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. काहींच्या मते नवीन सेवा टेस्ट करण्यासाठी ग्राहकांना मोफत देण्यात येईल तर काही रिपोर्ट्सनुसार 5G महागडं प्रकरण असू शकतं. याबाबत कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरनं मौन सोडलं नाही. परंतु आता एका नवीन रिपोर्टमधून 5G सेवेच्या शुल्काची माहिती समोर आली आहे.

4G प्लॅन इतकी असेल 5G प्लॅनची किंमत

इकोनॉमिक टाइम्स (ईटी) च्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जियो आणि भारती एयरटेल आपल्या 5जी सेवेची किंमत 4जी सेवेच्या किंमती एवढीच ठेवतील. इंडस्ट्रीची माहिती असणाऱ्या अधिकारी आणि विश्लेषकांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 4G च्या किंमतीत 5G सेवा लाँच करून देशात मोठ्या प्रमाणवर लोकांना 5जी सर्व्हिसवर आणण्यात येईल. हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

टेलीकॉम कंपन्या सुरुवातीला 5जी सेवांसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेणार नाहीत कारण त्यांना 4 जी युजर्सना पुढील पिढीच्या मोबाइल नेटवर्कवर येण्यासाठी प्रेरित करायचं आहे. रिपोर्टमध्ये तज्ज्ञांचा हवाला देत संकेत देण्यात आला आहे की 5G लाँचनंतर किंमत वाढवली जाईल. परंतु हे लवकर होणार नाही कारण 5G हँडसेट अजूनही महाग आहेत.

5G price in India बद्दल तज्ज्ञांचं मत

Analysys Mason चे भारतीय प्रमुख रोहन धमीजा यांनी म्हटलं आहे, “5जी ऑपरेटर सुरुवातीला 4जी पेक्षा प्रीमियम चार्ज करण्याची शक्यता नाही कारण सुरुवातीला त्यांचं लक्ष 5जी वापर वाढवणे, जास्त युजर्सना वेगाचा अनुभव देणं, जास्त डेटा वापरणं आणि त्यामुळे एआरपीयू वाढवण्यावर असेल.” हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

धमीजा यांनी यूकेचं उदाहरण देत सांगितलं की तिथे 5जी सेवा 4जी सर्व्हिसपेक्षा जास्त किंमतीत लाँच करण्यात आली होती परंतु तिथे 5जीचा वापर वाढवण्यासाठी किंमती कमी कराव्या लागल्या.

या देशांमध्ये लोक वापरात आहेत 5जी

भारतात जरी 5G आता येत असलं तर जगभरातील अनेक देश आधीपासून ही सेवा वापरत आहेत. सध्या अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशांमध्ये लोकांना 5जी सर्व्हिस मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये साल 2018 मध्ये सर्वप्रथम 5जी लाँच झालं होतं. तसेच मे 2019 मध्ये यूके, यूएस आणि स्वित्जरलँडमध्ये 5जी सुरु झालं आहे.

The post 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/feed/ 0
या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती https://www.91mobiles.com/marathi/5-points-to-know-about-reliance-jio-5g-network-jio-true-5g-plans-data-speed-sa-stand-alone-5g/ https://www.91mobiles.com/marathi/5-points-to-know-about-reliance-jio-5g-network-jio-true-5g-plans-data-speed-sa-stand-alone-5g/#respond Wed, 14 Sep 2022 13:36:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13108 Jio 5G ची घोषणा स्वतः मुकेश अंबानींनी केली आहे. कंपनी दिवाळीत आपली 5G Service सुरु करणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीयांना 5G Network तसेच सुपर फास्ट 5G Internet मिळेल. 5G in India ची सुरुवात Reliance Jio पासून होणार आहे तसेच रिलायन्स जियोची Jio True 5G अनेक बाबतीत खास ठरणार आहे. देशात 5जी सर्व्हिस सुरु होण्याचा क्षण […]

The post या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G ची घोषणा स्वतः मुकेश अंबानींनी केली आहे. कंपनी दिवाळीत आपली 5G Service सुरु करणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीयांना 5G Network तसेच सुपर फास्ट 5G Internet मिळेल. 5G in India ची सुरुवात Reliance Jio पासून होणार आहे तसेच रिलायन्स जियोची Jio True 5G अनेक बाबतीत खास ठरणार आहे. देशात 5जी सर्व्हिस सुरु होण्याचा क्षण नक्कीच ऐतिहासिक असेल. पुढे आम्ही Jio 5G ची 5 असे मुद्दे सांगितले आहेत, ज्यामुळे ही सर्व्हीस भारतीयांसाठी खास ठरू शकते.

Jio True 5G चे 5 पॉईंट्स

  • कधी लाँच होणार Jio 5G Network
  • किती फास्ट असेल Jio 5G Internet
  • किती स्वस्त असतील Jio 5G Plans
  • कशी असेल Jio 5G Coverage
  • कोणती टेक्नॉलॉजी वापरेल Jio 5G

कधी लाँच होणार Jio 5G

जियो 5जीची घोषणा करताना मुकेश अंबानींनी स्पष्ट सांगितलं होतं की यंदा दिवाळीत देशात Jio 5G Network सुरु होईल. जियो 5जी सर्व्हिस सर्वप्रथम भारतातील प्रमुख शहरं व महानगरांमध्ये दिली जाईल, ज्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश असेल. त्यानंतर 18 महिन्यांच्या आत Jio 5G संपूर्ण देशात पसरेल तसेच डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात जियो 5जी नेटवर्कचं जाळं पसरेल. जियोचं 5जी नेटवर्क देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका व गावापर्यंत पोहोचेल आणि जगातील सर्वात मोठं नेटवर्क असेल.

Jio 5G Internet Speed

जियो 5जीला मुकेश अंबानींनी Jio True 5G असं नाव दिलं आहे. 5जी लाँचच्या घोषणेदरम्यान कंपनीनं सांगितलं आहे की त्यांनी जियो 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत तसेच जियो 5जी नेटवर्कवर त्यांना 1 Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळाला आहे. जियोच्या मते त्यांच्या 5जी नेटवर्कवर हाय क्वॉलिटी ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग मिळेल तसेच मोबाइल युजर्सना 4G पेक्षा चांगला व्हिडीओ कॉलिंग एक्सपीरियंस मिळेल. Jio 5G Internet मध्ये अल्ट्रा-लो लेटेंसी सर्व्हिस दिली जाईल.

स्वस्त असेल Jio 5G

भारतात 5जी येण्याआधी अंदाज लावला जात आहे की टेलीकॉम कंपन्या आपल्या 5जी सर्व्हिससाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतील. इंटरनेटवर याबाबत चर्चाना उधाण आलं होतं की 5जी प्रीमियम सर्व्हिस असेल ज्यात 5G Recharge Plans महागडे असतील तसेच 5G Data Price देखील खूप जास्त असेल. परंतु मुकेश अंबानींनी जियो 5जी लाँच करताना दावा केला आहे की त्यांच्या कंपनीचं 5जी नेटवर्क महाग असणार नाही तसेच कंपनी आपल्या 5G Plans ची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्यात ठेवेल.

Jio 5G Coverage

रिलायन्स जियो आपली 5जी सर्व्हिस SA म्हणजे स्टॅन्ड अलोन टेक्नॉलॉजीवर सादर करेल. SA 5G मुळे जियोचं 5जी नेटवर्क उत्तम क्वॉलिटीसह शानदार कव्हरेज देईल. ड्युअल मोड 5जी म्हणजे SA/NSA 5G च्या तुलनेत फक्त SA 5G यूज केल्यावर नेटवर्क कपॅसिटी अनेक पटीनं वाढते. तसेच जियो Mid Band 5G Spectrum चा वापर करणार आहे, दोन्ही मिळून नेटवर्क व कव्हरेज जबरदस्त बूस्ट होईल.

Made in India असेल Jio 5G

रिलायन्स जियोची 5जी सर्व्हिस तसेच 5जी टेक्नॉलॉजी पूर्णपणे मेड इन इंडिया असेल. देशातील कानाकोपऱ्यात शानदार कव्हरेज व इंटरनेट पोहोचवण्यासाठी Reliance Jio नं Meta (Facebook), Google, Microsoft, Intel, Ericsson, Nokia, Samsung, Cisco आणि Qualcomm सारख्या दिग्गज कंपन्यांशी भागेदारी केली आहे.

The post या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-points-to-know-about-reliance-jio-5g-network-jio-true-5g-plans-data-speed-sa-stand-alone-5g/feed/ 0