Apple iPhone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/ https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/#respond Thu, 20 Apr 2023 12:42:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20406 काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple […]

The post लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यावर्षीच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुपनं बनवलेले iPhone मार्केटमध्ये येऊ शकतात.
  • लवकरच टाटा बेंगळुरू मधील मॅनुफॅक्चरींग प्लांट विकत घेऊ शकते.
  • प्लांट विकत घेण्यासाठी 5000 कोटी रुपयांचा सौदा केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple products चं प्रोडक्शन सुरु केलं जाऊ शकतं.

अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स बनवू शकते टाटा

समोर आलेल्या माहितीनुसार Tata Sons आणि Wistron दरम्यान होणार सौदा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि टाटा ग्रुप्स लवकरच या सौद्यावर शिक्कामोर्तब करू शकतो. रिपोर्टनुसार बेंगळुरूमधील विस्ट्रॉन प्लांट खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप्सकडून 5 हजार कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, जी तैवानची कंपनी स्वीकारू शकते. या प्लांटमध्ये सध्या Apple iPhone 14 आणि iPhone 12 मॉडेल्सची निर्मिती होत आहे.

बातमी आहे की टाटा आणि विस्ट्रॉनची ही डील येत्या महिन्यात पूर्ण होईल ज्यामुळे सप्टेंबर 2023 पासून या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा कारभार टाटा ग्रुप्सद्वारे सांभाळला जाईल. विशेष म्हणजे यामुळे पहिल्यांदाच एखादी भारतीय कंपनी अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स व आयफोन्सची निर्मिती करेल. याआधी भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट बनू लागले होते परंतु सर्व कारभार परदेशी कंपन्यांकडे होता.

टाटाचे आयफोन

जवळपास 44 एकरमध्ये पसरलेल्या विस्ट्रॉन प्लांटमध्ये 8 असेंबली लाइन्स आहेत ज्यावर सध्या आयफोन 12 सीरीज तसेच आयफोन 14 सीरीजचे मोबाइल फोन्स बनवले जात आहेत. जर हे फोन मॉडेल डिस्कंटिन्यू नाही झाले तर आपल्याला टाटा द्वारे निर्मित आयफोन 12 आणि आयफोन 14 मॉडेल्स बाजारात दिसू शकतात. फक्त इतकेच नव्हे तर आगामी Apple iPhone 15 चे मॉडेल्स देखील भारतात Tata द्वारे बनवले जाऊ शकतात.

Apple करेल 6,300 कोटींची गुंतवणूक

रिपोर्टनुसार Tata Sons Chairman N Chandrasekaran यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत Apple CEO Tim Cook यांची भेट घेतली होती आणि भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सच्या निर्मिती आणि विक्रीवर चर्चा केली होती. अ‍ॅप्पल कंपनी तमिळनाडुमधील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये 6,300 कोटी रुपयांचा गुंतवणूक करण्याची योजना बनवत असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रोजेक्ट अंतगर्त जून पासून टाटाच्या प्लांटवर देखील अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सची निर्मिती केली जाऊ शकते.

The post लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/feed/ 0
बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग https://www.91mobiles.com/marathi/old-apple-iphones-could-discountinues-before-iphone-15-series-launch/ https://www.91mobiles.com/marathi/old-apple-iphones-could-discountinues-before-iphone-15-series-launch/#respond Tue, 18 Apr 2023 07:20:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20316 Apple iPhone 15 series ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्यावर्षी आयफोन 14 सीरीजसह कंपनीनं आपल्या डिस्प्ले डिजाइनमध्ये मोठा बदल केला होता आणि आता आयफोन 15 मध्ये देखील मोबाइल युजर नवीन अपडेटची अपेक्षा ठेवून आहेत. सध्या नवीन सीरीजच्या लाँचची जास्त माहिती तर मिळाली नाही परंतु एका ताज्या रिपोर्टमधून समोर आलं आहे की आयफोन 15 सीरीज […]

The post बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Apple चे अनेक जुने आयफोन डिस्कंटीन्यू होऊ शकतात.
  • हे मॉडेल iPhone 15 सीरीज आल्यामुळे बंद होऊ शकतात.
  • यात iPhone 12 पासून 14 Pro Max पर्यंतचा समावेश आहे.

Apple iPhone 15 series ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्यावर्षी आयफोन 14 सीरीजसह कंपनीनं आपल्या डिस्प्ले डिजाइनमध्ये मोठा बदल केला होता आणि आता आयफोन 15 मध्ये देखील मोबाइल युजर नवीन अपडेटची अपेक्षा ठेवून आहेत. सध्या नवीन सीरीजच्या लाँचची जास्त माहिती तर मिळाली नाही परंतु एका ताज्या रिपोर्टमधून समोर आलं आहे की आयफोन 15 सीरीज येण्यापूर्वी अनेक जुने iPhones डिस्कंटीन्यू म्हणजे बंद होणार आहेत.

जे आयफोन होऊ शकतात डिस्कंटीन्यू

परदेशी वेबसाइट टॉम्स गाइडनं रिपोर्ट पब्लिश करत सांगितलं आहे की अ‍ॅप्पल कंपनी आपल्या iPhone 15 series च्या लाँचपूर्वी अनेक जुने आयफोन मॉडेल्स डिस्कंटीन्यू करू शकते. थक्क करणारी बाब म्हणजे यात फक्त त्या आयफोन्सचा समावेश नाही जे काही वर्षांपूर्वी लाँच झाले आहेत. तर असे मॉडेल पण आहेत ज्यांनी गेल्यावर्षीच मार्केटमध्ये एंट्री घेतली होती. रिपोर्टनुसार डिस्कंटीन्यू होणारे आयफोन पुढील प्रमाणे आहेत :

  • Apple iPhone 12
  • Apple iPhone 13 mini
  • Apple iPhone 14 Pro
  • Apple iPhone 14 Pro Max

अ‍ॅप्पल आयफोन 15 सीरीज

Apple iPhone 15 series बद्दल कंपनीनं आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही परंतु लीक्स व रिपोर्ट्सनुसार या सीरीजमध्ये 4 मोबाइल फोन येऊ शकतात. यातील बेस मॉडेल iPhone 15 असू शकतो तसेच iPhone 15 Plus देखील येऊ शकतो. तसेच सीरीजमध्ये दोन प्रो मॉडेलचा समावेश केला जाऊ शकतो जे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max नावाने लाँच होऊ शकतात.

रिपोर्टनुसार आयफोन 15 सीरीजच्या या मॉडेल्समध्ये वेगवेगळे प्रोसेसर दिला जाऊ शकतो. iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये Bionic A16 चिपसेट मिळू शकतो असं लीकमध्ये समोर आलं आहे. तसेच iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये Bionic A17 चिपसेट दिला जाऊ शकतो. या चारही अ‍ॅप्पल फोन्समध्ये iOS 17 मिळू शकतो जो कंपनी येत्या काही दिवसांत सादर करू शकते.

The post बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/old-apple-iphones-could-discountinues-before-iphone-15-series-launch/feed/ 0
अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/ https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/#respond Fri, 09 Sep 2022 12:03:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12989 iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत […]

The post अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु डील फायनल झाल्यास TATA भारतात पहिली कंपनी बनेल जी iPhones ची निर्मिती करेल.

TATA बनवू शकते iPhone?

रिपोर्टनुसार मॅन्युफॅक्चरिंगच्या जॉईंट वेंचरसाठी कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अशाप्रकारे टाटा ग्रुप (Tata Group) भारतात आयफोन असेंबल करणारी पहिली कंपनी बनू पाहत आहे. टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन कॉर्प (Wistron Corp.) यांच्यातील ही चर्चा आता सुरु झाली आहे, परंतु सर्व गोष्टी फायनल होण्यास वेळ लागू शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

सध्या आयफोन प्रामुख्याने तैवान मधील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीद्वारे असेंबल केला जातो. या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन असेंबल करतात. अ‍ॅप्पलला या चर्चेविषयी माहिती आहे की नाही हे अजूनतरी समजले नाही. दिग्गज अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅप्पलला चीनच्या बाहेर आपली मॅन्युफॅक्चरिंग आणायची आहे. तसेच अ‍ॅप्पलला भारतात आपल्या सप्लाई चेनचा देखील विस्तार करायचा आहे.

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

बातम्यांनुसार, Apple चीनच्या बाहेर आपल्या iPhones च्या निर्मितीसाठी पर्याय शोधत आहे आणि जगभरात आपले iPhone मॉडेल बनवणे आणि शिप करण्यासाठी चीनवर अवलंबून राहणं हळूहळू कमी करायचं आहे. यामागे चीनी आणि अमेरिकन सरकारमधील मतभेद कारणीभूत आहेत. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

जर बोलणी यशस्वी झाली तर टाटा आयफोनची निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी बनेल, जे काम आतापर्यंत प्रामुख्याने चीन आणि भारतात तैवानमधील विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप करत होते. Apple चा मेक इन इंडियाचा कल पाहता याचा Apple आणि भारतीय iPhone ग्राहकांना दोघांनाही फायदा होईल.

iPhone 14 सीरिज लाँच

एका मोठ्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते तर iPhone 14 Pro Max चा 1TB स्टोरेज असलेला मॉडेल 1,89,900 रुपयांमध्ये भारतात विकला जाईल. आयफोन 14 प्लस वगळता अन्य मॉडेल्सची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु होईल.

The post अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/feed/ 0
Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2023-with-punch-hole-display-third-generation-will-support-5g/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2023-with-punch-hole-display-third-generation-will-support-5g/#respond Mon, 05 Apr 2021 15:32:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10504 Apple iPhone आता रुंद नॉच डिजाईनच्या पुढे जात पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर शिफ्ट होणार आहेत. हि बातमी अनेक आयफोन लवर्सना खुश करणार आहे.

The post Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोव्हेंबर 2017 मध्ये Apple ने मोबाईल जगात एक नवीन ट्रेंड सुरु केला होता. यादिवशी iPhone X लॉन्च केला गेला होता जो रुंद ‘नॉच’ डिस्प्लेसह मार्केटमध्ये आला होता. या अ‍ॅप्पल आयफोनची स्टाईल जवळपास सर्व अँड्रॉइड स्मार्टफोस ब्रँड्सने कॉपी केली आणि आपले मोबाईल फोन्स नॉच डिस्प्लेवर लॉन्च केले. गेल्या 4 वर्षांत अँड्रॉइड फोन्स नॉचवरून वॉटरड्रॉप नॉच आणि पंच-होल डिजाईनपर्यंत पोहोचले पण अ‍ॅप्पलचे आयफोन अजूनही रुंद नॉचसह येतात, जे अनेक अ‍ॅप्पल युजर्सना खटकते. आता Apple पण हा ट्रेंड तोडून पुढे जाणार आहे. बातमी मिळाली आहे कि आता अ‍ॅप्पल पण पंच-होल डिस्प्ले असलेले iPhone मार्केटमध्ये लॉन्च करेल. (apple iphone se 2023 with punch hole display third generation will support 5g)

Apple iPhone आता रुंद नॉच डिजाईनच्या पुढे जात पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर शिफ्ट होणार आहेत. हि बातमी अनेक आयफोन लवर्सना खुश करणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा iPhone 12 सीरीजची घोषणा केली जाणार होती, तेव्हा लोकांना अपेक्षा होती कि यावेळी आयफोन्सच्या डिस्प्ले आणि डिजाईनमध्ये बदल झालेला दिसेल, पण असे नाही झाले. परंतु आता Apple iPhone ची स्टाईल बदलणार आहे. कंपनी आपले नवीन आयफोन्स पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या फोन्सचे डिटेल समोर आले आहेत.

Apple iphone 12 mini

iPhone SE पासून होईल पंच-होलची सुरुवात

पंच-होल डिस्प्ले असलेल्या आयफोनची माहिती सध्या लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅप्पलने प्लानिंग केली आहे कि कंपनी आपले नवीन आयफोन्स पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च करेल. असे सांगण्यात आले आहे कि पंच-होल डिस्प्ले असलेल्या आयफोनची सुरुवात कंपनी ‘एसई’ सीरीजपासून करेल आणि iPhone SE 2023 मॉडेलमध्ये पंच-होल स्टाईल मिळेल. लीकनुसार आयफोन एसई 2023 6.1 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लॉन्च केला जाईल. सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल स्क्रीनवर कुठे दिला जाईल हि माहिती अजूनही स्पष्ट झाली नाही.

हे देखील वाचा : LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण

5Gला सपोर्टसह येईल नवीन iPhone

iPhone 12 सीरीजसह अ‍ॅप्पलने आपल्या मोबाईल फोन्समध्ये 5जी सपोर्ट देण्याची सुरुवात केली आहे. समोर आलेल्या बातमीनुसार कंपनी आपल्या कमी किंमतचा ‘एसई’ मॉडेल पण 5जी कनेक्टिविटी सपोर्टसह बाजारात घेऊन येईल. लीकनुसार कंपनीचा पुढील iPhone SE Sub-6 GHz स्पीडवर काम करणाऱ्या 5G मॉडेमसह येईल. तसेच या फोनमध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल जो एलसीडी पॅनलवर बनलेला असेल. लीकनुसार हा फोन iPhone SE 2022 मॉडेल असेल.

iPhone 11

इथे आम्ही पुन्हा स्पष्ट करू इच्छितो कि iPhone SE मॉडेल Apple च्या स्वस्त आयफोन कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे जर आयफोन एसईमध्ये एलसीडी पॅनल, पंच-होल डिस्प्ले आणि 5Gला सपोर्ट मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे कंपनीची आगामी आयफोन सीरीज म्हणजे iPhone 13 किंवा iPhone 14 आधीपेक्षा जास्त पावरफुल व स्टाईलिश असू शकते. वरील सर्व माहिती सध्या एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे त्यामुळे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

अ‍ॅप्पल आयफोन 12 व्हिडीओ

The post Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2023-with-punch-hole-display-third-generation-will-support-5g/feed/ 0
ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा… https://www.91mobiles.com/marathi/youth-orders-a-cheap-iphone-online-receives-a-phone-shaped-coffee-table/ https://www.91mobiles.com/marathi/youth-orders-a-cheap-iphone-online-receives-a-phone-shaped-coffee-table/#respond Fri, 26 Mar 2021 15:39:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10412 ओरिएंटल डेली मलेशियाच्यानुसार, थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने जेव्हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किंमत असलेला iPhone 8 बघितला तेव्हा तो उत्साहित झाला आणि तपासणी न करता त्याने ऑर्डर दिली.

The post ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
घर बसल्या ऑनलाइन शॉपिंग करून वेळ वाचवणे हा सध्याचा एक ट्रेंड आहे. कमी किंमत आणि शानदार ऑफर्स मुळे लोक आपोआप ऑनलाइन शॉपिंग साइट्सकडे आकर्षित होतात. पण, ऑनलाइन शॉपिंगमध्ये होणाऱ्या फसवणुकीककडे दुर्लक्ष करता येत नाही. नेहमीच ऐकायला मिळते कि ऑनलाइन जे सामान मागवले जाते तेचे मिळत नाही. डीलिवर बॉयची चुकी किंवा शॉपिंग साइटच्या चुकीमुळे अनेकदा आपल्या ऑर्डरच्या जागी दुसरे सामान येते. असेच काहीसे थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झाले आहे. पण इथे चूक ऑर्डर करणाऱ्या तरुणाची होती. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. (youth orders a cheap iphone online receives a phone shaped coffee table)

ऑर्डर केला होता iPhone 8

ओरिएंटल डेली मलेशियाच्यानुसार, थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने जेव्हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किंमत असलेला iPhone 8 बघितला तेव्हा तो उत्साहित झाला आणि तपासणी न करता त्याने ऑर्डर दिली. त्यानंतर तो iPhone ची आतुरतेने वाट बघू लागला. पण जेव्हा त्याला पॅकेज मिळाले तेव्हा तो iPhone 8 च्या ऐवजी iPhone सारखा दिसणारा मोठा कॉफी टेबल निघाला. मोबाईलच्या जागी टेबल बघून तरुण हैराण झाला.

हे देखील वाचा : 5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च

कुठे झाली चूक

रिपोर्टनुसार यात ई-कॉर्मस साइटची चूक नाही. कारण तरुणाने ऑर्डर करण्याआधी प्रोडक्टबाबत संपूर्ण माहिती बघितली नाही. ई-कॉमर्स वेबसाइटवर कथितरित्या लिहिण्यात आले होते कि हा एक iPhone च्या आकाराचा कॉफी टेबल आहे.

हे देखील वाचा : Moto G100 5G फोन लॉन्च, डुअल पंच-होलसह आहे 64MP रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स

सोशल मीडियावर वायरल होत आहे फोटो

iPhone सह युवकाचे फोटोज आता सोशल मीडियावर वायरल होत आहेत. पण असे वाटते आहे कि तो आपल्या खरेदीमुळे खुश आहे. विशेष म्हणजे कॉफी टेबल अगदी iPhone 6s सारखा दिसतो आणि आकाराने मोठा आहे. यात एक स्क्रीन आहे जी काळ्या रंगाची आहे, एक टच-आयडी आणि एक नकली माइक आहे. खाली सफेद रंगात चार स्टॅन्ड आहेत.

ऍप्पल आयफोन 8 व्हिडीओ

The post ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/youth-orders-a-cheap-iphone-online-receives-a-phone-shaped-coffee-table/feed/ 0
मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात https://www.91mobiles.com/marathi/apple-foldable-iphone-punch-hole-iphone-launch-on-2023-ming-chi-kuo/ https://www.91mobiles.com/marathi/apple-foldable-iphone-punch-hole-iphone-launch-on-2023-ming-chi-kuo/#respond Wed, 03 Mar 2021 14:49:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10253 Kuo नुसार कंपनी ऑल-स्क्रीन नो-नॉच आयफोन पण सादर करू शकते. त्यांच्या मते हा डिवाइस 2023 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, फक्त याचे काम वेळेवर सुरु झाले पाहिजे.

The post मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple च्या फोल्डेबल iPhone बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी यावर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी Samsung Galazy Z Flip सारख्या clamshell डिजाइनवर नवीन iPhone सादर करेल आणि फोल्डेबल iPhone stylus सपोर्टसह येईल. आता पॉपुलर अनॅलिस्ट मिंग-ची कुओ (Ming-Chi Kuo) ने दावा केला आहे कि कंपनी साल 2023 मध्ये 7.5-8 इंचाच्या डिस्प्ले असलेला फोन लॉन्च केला जाईल. तसेच कंपनी 2023 मध्ये एक हाई-एन्ड iPhone मॉडेल notch-less, ऑल-स्क्रीन डिस्प्लेसह सादर करेल. बोलले जात आहे कि हा iPhone 11 चा उत्तराधिकारी पण असू शकतो, ज्याचा कंपनीला येणार खर्च $ 600 पेक्षा कमी असेल आणि यात 5G नेटवर्क सपोर्ट मिळेल. (apple foldable iphone punch hole iphone launch on 2023 ming chi kuo)

Apple Foldable iPhone

Kuo नुसार, जर ऍप्पल फोल्डेबल स्क्रीनचे मोठ्याप्रमाणात उत्पादन आणि टेक्नोलॉजीचे काही प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे, त्यामुळे ऍप्पल वर्ष 2023 पर्यंत 8 इंचाच्या फोल्डेबल iPhone ची घोषणा करू शकते. फोल्डेबल स्क्रीनच्या आयफोनची हि काही पहिले बातमी नाही. अश्या अफवा यावर्षीच्या सुरुवातीला पण समोर आल्या होत्या. फोल्डेबल iPhone कोणत्या डिजाइनसह येईल हे मात्र अजून समजले नाही.

हे देखील वाचा : 8GB रॅम असलेला Xiaomi Mi 11 Lite वेबसाइटवर लिस्ट, 5G च्या ताकदीसह लवकरच होईल लॉन्च

Samsung ला देईल टक्कर

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार ऍप्पलचा फोल्डेबल स्मार्टफोन इतर ब्रँड्सच्या तुलनेत कमी किंमतीत येईल याचा लॉन्च थोडा लेट होईल. तसेच बोलले जात आहे कि जेव्हा Apple चा नवीन फोल्डेबल फोन मार्केट मध्ये येईल, तेव्हा सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्ड 2 सह याची टक्कर होईल.

पंच-होल असलेला iPhone

Kuo नुसार कंपनी ऑल-स्क्रीन नो-नॉच आयफोन पण सादर करू शकते. त्यांच्या मते हा डिवाइस 2023 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, फक्त याचे काम वेळेवर सुरु झाले पाहिजे. 2023 लाइन-अप मध्ये हा हाई-एन्ड iPhone एका अंडर-डिस्प्ले टच आयडी आणि एका पेरिस्कोप कॅमेऱ्यासह येईल. ऍप्पल 2022 मध्ये iPhone 13 प्रो मध्ये पंच-होल डिस्प्लेचा वापर करण्याची पण शक्यता आहे.

हे देखील वाचा : OPPO F19 सीरीज 8 मार्चला होईल भारतात लॉन्च, प्री-ऑर्डर झाली सुरु

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांच्या डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

ऍप्पल आयफोन 12 मिनी व्हिडीओ

The post मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-foldable-iphone-punch-hole-iphone-launch-on-2023-ming-chi-kuo/feed/ 0
मागवला होता Apple iPhone पण मिळाला Apple ज्यूस! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/woman-orders-iphone-12-online-receives-apple-drink/ https://www.91mobiles.com/marathi/woman-orders-iphone-12-online-receives-apple-drink/#respond Tue, 02 Mar 2021 11:47:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10230 bewildered Liu ने बॉक्स ओपन करून त्याचा व्हिडीओ चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर अपलोड केला.

The post मागवला होता Apple iPhone पण मिळाला Apple ज्यूस! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग हळहळू वाढतच आहे. ग्राहक कुठेही न जाता कमी किंमत आणि शानदार ऑफरसह ऑनलाइन जे हवे ते मागवू शकतात. पण अजूनही असे लाखो लोक आहेत जे ऑनलाइन शॉपिंगपासून दूर राहतात. अनेकदा असे झाले आहे कि ऑनलाइन आर्डर करून एखादी गोष्ट मागवली जाते पण जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा वेगळीच वस्तू बाहेत निघते, ज्यामुळे ऑर्डर करणारा व्यक्ती हैराण होतो. अशीच धक्कादायक गोष्ट Online Shopping मध्ये समोर आली आहे. एका महिलेने ऍप्पल आयफोन ऑनलाइन ऑर्डर केला पण डिलिव्हरीमध्ये त्या Apple iPhone च्या जागी ज्यूस मिळाला. (woman orders iphone 12 online receives apple drink)

ऍप्पलच्या साइटवरून दिली होती ऑर्डर

अश्या घटना अमेझॉन, ईबे आणि अनेक ई-कॉमर्स साइटवर नेहमीच होत असतात. पण महिलेने दावा केला आहे कि तिने ऑर्डर थेट Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून केली होती. त्यामुळे हे फसवणुकीचे अनोखे प्रकरण होते. हि घटना चीन मधील आहे, जिथे bewildered Liu नावाच्या महिलेने ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स ऑनलाइन बुक केला होता पण तिची ऑनलाइन फसवणूक झाली.

दिले होते एक लाख

ग्लोबल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार महिलेने आयफोन 12 प्रो मॅक्स विकत घेण्यासाठी कंपनीच्या साइटवर 1500 डॉलर (जवळपास एक लाख रुपये) पेक्षा जास्त पैसे दिले होते. ऑफिशियल वेबसाइटवरून खरेदी केल्यावर आपल्याबाबत असे का झाले हे त्या महिलेला समजत नाही. सध्या याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून तपास सुरु आहे.

हे देखील वाचा : 4 मार्चला एंट्री घेईल Xiaomi ची Redmi Note 10 सीरीज, लॉन्चच्याआधीच जाणून घ्या यातील वैशिष्ट्ये

सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ

bewildered Liu ने बॉक्स ओपन करून त्याचा व्हिडीओ चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर अपलोड केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर ऍप्पल आणि स्थानिक कुरियर कंपनी तपास करत आहे. मेल सर्विसने सांगितले कि महिलेने जे लोकेशन दिले होते, फोन तिथे डिलिव्हर केला आहे.

फर्जी वेबसाइट

ग्लोबल टाइम्सने सांगितले आहे कि काही वीबो युजर्सने सांगितले आहे कि डिलिव्हर करणाऱ्या व्यक्तीने बॉक्स मध्ये iPhone च्या जागी तो ज्यूस ठेवला असेल. तसेच सायबर सुरक्षा एक्स्पर्टसह इतर लोकांच्या मते लियूने एका खोट्या वेबसाइटवरून फोन ऑर्डर केला असेल.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स व्हिडीओ

The post मागवला होता Apple iPhone पण मिळाला Apple ज्यूस! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/woman-orders-iphone-12-online-receives-apple-drink/feed/ 0
जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/apple-foldable-iphone-support-apple-pencil-launch-2023/ https://www.91mobiles.com/marathi/apple-foldable-iphone-support-apple-pencil-launch-2023/#respond Wed, 17 Feb 2021 13:21:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10071 Cupertino च्या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि ब्रँड एका Ceramic Sheild ग्लासचा वापर करेल, जी फोल्ड किंवा अन-फोल्ड झाल्यावर स्क्रीनला केमिकली ठीक करेल.

The post जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि Apple आपल्या फोल्डेबल iPhone वर काम करत आहे. अलीकडेच रिपोर्ट्स आले होते कि कंपनी Samsung Galazy Z Flip सारख्या clamshell डिजाइन असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. ऍप्पलने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. लेटेस्ट रिपोर्टनुसार ऍप्पलचा फोल्डेबल iPhone stylus सपोर्टसह येऊ शकतो. परंतु अजून समजले नाही कि कंपनी stylus म्हणून Apple Pencil देईल कि एक नवीन stylus सादर करेल.

याआधी समोर आलेल्या Cupertino च्या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि ब्रँड एका Ceramic Sheild ग्लासचा वापर करेल, जी फोल्ड किंवा अन-फोल्ड झाल्यावर स्क्रीनला केमिकली ठीक करेल. तसेच, नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन साल 2023 पर्यंत लॉन्च होईल. लेट लॉन्च झाल्यामुळे फोल्डेबल फोनमधील पार्ट्सची किंमत कमी होईल आणि डिवाइस कमी किंमतीत लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा

खासियत काय असेल

ऍप्पलचा हा स्मार्टफोन 7.3-inch पासून 7.6-inch दरम्यान स्क्रीन साइजसह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये OLED पॅनल असेल. रिपोर्ट्सनुसार ऍप्पलचा फोल्डेबल स्मार्टफोन इतर ब्रँड्सच्या तुलनेत स्वस्त असेल, पण या डिवाइसचा लॉन्च उशिरा होऊ शकतो.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांच्या डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

हे देखील वाचा : जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री

EverythingApplePro आणि टिप्सटर Max Weinbach यांनी अलीकडेच सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये अशी माहिती समोर आली होती कि iPhone मॉडेल्स मध्ये iPad Pro प्रमाणे 120 हर्ट्ज प्रोमोशन डिस्प्ले असू शकतो. तर, EverythingApplePro यूट्यूब चॅनेलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात आगामी iPhone 13 सीरीजची हि नवीन माहिती टिप्सटर Max Weinbach च्या हवाल्याने शेयर केली गेली आहे.

डिजाइनबाबत व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple यावर्षी कमी बदल करेल. व्हिडीओ मध्ये सर्वात मोठी खासियत ज्याचा उल्लेख केला गेला आहे, हा ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे. डिटेल्सनुसार, ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर स्क्रीनवर टाइम आणि बॅटरी आयकॉन दाखवतो.

The post जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-foldable-iphone-support-apple-pencil-launch-2023/feed/ 0
DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-with-dslr-like-camera-laucnh-soon/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-with-dslr-like-camera-laucnh-soon/#respond Fri, 29 Jan 2021 13:55:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9817 iPhone 13 सीरीजसाठी कंपनीने Cupertino च्या एका टेक एक्सपर्टशी हात मिळवणी केली आहे

The post DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी ऍप्पलने सादर केलेल्या iPhone 12 सीरीजचे स्मार्टफोन्स जगभरात चमक दाखवत आहेत आणि त्यामुळे कंपनी नवीन रेकॉर्ड बनवत आहे. तर दुसरीकडे दरवर्षी प्रमाणेच Apple यावर्षी आपले नवीन आणि ऍडव्हान्स iPhone लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यावर्षी ऍप्पलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या iPhone 13 Series च्या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सबाबत आतापासून चर्चा सुरु होऊ लागली आहे. बातमी येत आहे कि आयफोन 13 सीरीजच्या मोबाईल्स मध्ये काही मोठे बदल दिसू शकतात. सध्या iPhone 13 संबंधित जास्त माहिती समोर आली नाही, पण काही लीक्सनुसार हा फोन सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि आयफोन 13 सीरीजच्या फोन्सचा कॅमेरा डीएसएलआर कॅमेऱ्याप्रमाणे असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि iPhone 13 सीरीजसाठी कंपनीने Cupertino च्या एका टेक एक्सपर्टशी हात मिळवणी केली आहे आणि त्याच्याकडे आयफोन 13 साठी कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : कमी किंमतीत येत आहे नवीन iPhone!, येईल अनेक नवीन फीचर्ससह

बोलले जात आहे कि यात सेंसर-शिफ्ट आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे फीचर्स असतील. तसेच कंपनीची योजना आहे कि आयफोन 13 सीरीज मध्ये डायरेक्ट टाइम-ऑफ-फ्लाइट (D-ToF) टेक्नॉलॉजी पण दिली जाईल. हे सेंसर US-आधारित कंपनीद्वारे दिले जातील.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांची डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

हे देखील वाचा : Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार नवीन आयफोन्स मध्ये OLED पॅनलचा वापर केला जाईल. फोन्सच्या टॉप दोन मॉडेल मध्ये LTOP OLED चा वापर केला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सह येईल. या लाइनअपच्या iPhone 13 Mini मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले, iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले, iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आणि iPhone 13 Pro मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असू शकतो.

फोल्डेबल आयफोन

सॅमसंग, मोटोरोला आणि हुवावे प्रमाणेच ऍप्पल पण आपल्या फोल्डेबल आयफोनची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी आयफोनसाठी फोल्डेबल आणि फ्लेक्सिबल स्क्रीनचा शोध घेत आहे. Bloomberg नुसार, सध्या कंपनीचा हा प्लान आपल्या सुरवातीच्या टप्प्यात आहे आणि हा 2021 मध्ये येणाऱ्या आयफोनसाठी नसेल.

The post DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-with-dslr-like-camera-laucnh-soon/feed/ 0
20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/ https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/#respond Fri, 20 Nov 2020 13:24:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9024 एका डिलिव्हरी बॉयने फोन योग्य ठिकाणी पोहोचवण्याऐवजी, विकूनच टाकले. ते पण 1-2 नाही तर संपूर्ण 14 सर्वात लेटेस्ट आणि महाग iPhone 12 Pro Max.

The post 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हा डायलॉग तो अक्सर नेहमी ऐकायला मिळतो कि जे लोक Apple iPhone वापरतात ते लोक श्रीमंत असतात. कोणाकडे ऍप्पलचा लेटेस्ट आयफोन असेल तर त्याला स्टेट्स सिंबल म्हणून बघितले जाते. महाग आयफोन बाळगण्याचे अनेकांचे स्वप्न असते पण असा किस्सा पहिल्यांदा ऐकला असेल कि एका डिलिव्हरी बॉयने फोन योग्य ठिकाणी पोहोचवण्याऐवजी, विकूनच टाकले. ते पण 1-2 नाही तर संपूर्ण 14 सर्वात लेटेस्ट आणि महाग iPhone 12 Pro Max.

हा विचित्र हैराण करणारा किस्सा चीनचा आहे. सविस्तर सांगायचे झाले तर टँग नावाचा एक व्यक्ती ऍप्पलच्या डिलिव्हरी कंपनी मध्ये काम करत होता. टँगला Apple iPhone 12 Pro Max चे 14 यूनिट्स एका ऍप्पल स्टोर वरून दुसऱ्या ऍप्पल स्टोर वर डिलिव्हर करण्याचे काम मिळाले. टँग सांगितलेल्या वेळेवर ऍप्पल स्टोर वर पोहोचला आणि 14 आयफोन 12 प्रो मॅक्स फोन्स घेऊन दुसऱ्या स्टोरकडे निघाला. पण रस्त्यात टँगचा ईमान डगमगला आणि iPhone 12 Pro Max दुसऱ्या स्टोर वर डिलिव्हर कारण्याऐवजी तो फरार झाला.

मीडिया रिपोर्टनुसार त्या 14 आयफोन्सची किंमत 20 लाख 29 हजार रुपयांच्या आसपास होती. Apple iPhone 12 Pro Max चे यूनिट्स ऍप्पल स्टोर वर डिलिव्हर करण्याच्या ऐवजी टँगने ती ऑर्डर कॅन्सल केली त्यानंतर त्याला फक्त 113 रुपयांच्या आसपास दंड भरावा लागला. प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा टँगचा शोध सुरु झाला आणि काही दिवसानंतर चीनच्या पोलिसांनी त्याला पकडले.

उडवून टाकले पैसे

टँग जेव्हा पकडला गेला तेव्हा समजले कि त्याने 14 पैकी एक Apple iPhone 12 Pro Max स्वतःसाठी ठेवला आणि एक आयफोन 12 प्रो मॅक्स त्या मित्राला विकला ज्याच्याकडून त्याने काही पैसे उधार घेतले होते. एक आयफोन टँगने एका दुकानात गहाण ठेवला, ज्याच्या बदल्यात त्याला जवळपास 1,00,000 रुपये मिळाले. अश्याप्रकारे जवळपास 1,13,000 रुपयांच्या एक iPhone 12 Pro Max टँगने मोबाईल शॉप वर फक्त 79,999 रुपयांमध्ये विकला.

एकसाथ मिळालेले इतके पैसे सांभाळणे सर्वांना जमत नाही आणि हीच चूक टँगने केली. लाखो रुपये मिळवून टँगने शॉपिंग सुरु केली आणि महाग कपडे विकत घेतले. फक्त इतकेच नव्हे तर टँगने आपला शौक पूर्ण करण्यासाठी एक बीएमडब्ल्यू कार पण भाड्याने घेतली. अखेरीस जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा टँग कडून 10 iPhone 12 Pro Max रिकवर करण्यात आले आणि तपास केल्यानंतर डिलिव्हरी बॉयला जेल मध्ये टाकण्यात आले.

अशी आहे Apple iPhone 12 Pro Max ची किंमत

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स भारतीय बाजारात तीन स्टोरेज मॉडेल्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस मॉडेल 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1,29,900 रुपये आहे. तर आयफोन 12 प्रो मॅक्सचा 256GB स्टोरेज मॉडेल कंपनीने 1,39,900 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्सचा सर्वात मोठा मॉडेल 512GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1,59,900 रुपये आहे. आयफोन 12 प्रो मॅक्स Silver, Graphite, Gold आणि Pacific Blue कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स व्हिडीओ

The post 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/feed/ 0