Nothing - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 05:28:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/#respond Mon, 17 Jul 2023 05:28:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22406 Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील. Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात GSMArena च्या […]

The post Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix GT 10 Pro मध्ये नथिंग फोन सारखा पारदर्शक बॅक पॅनल दिसत आहे.
  • ह्या सीरिजमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेटसह दोन फोन येतील.
  • ह्या फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.

Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील.

Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात

GSMArena च्या रिपोर्टनुसार, सीरिजमधील वॅनिला मॉडेल Infinix GT 10 Pro पुढील महिन्यात सर्वप्रथम भारतात लाँच होईल. ह्यात वरच्या दर्जाचे गेमिंग फिचर परवडणाऱ्या किंमतीत दिले जातील असा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये अर्धपारदर्शक डिजाईन आणि दोन कलर ऑप्शन असलेले फोनचे फोटोज दाखवण्यात आले आहेत. परंतु इनफिनिक्स जीटी 10 प्रोमध्ये एलईडी स्ट्रिप्स दिसत नाहीत त्यामुळे बहुतेक हा नथिंग फोन प्रमाणे चमकणार नाही.

रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी सीरिजचा चिपसेट दिला जाईल. तसेच ह्यात 108 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सर आणि रिंग फ्लॅश लाइट डिजाईनसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. इनफिनिक्सनं हा फोन PUBG, MLBB आणि Free Fire सारख्या लोकप्रिय गेम्समध्ये चांगला अनुभव मिळावा ह्यासाठी ऑप्टिमाइज केला आहे. डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 13 वर चालेल ज्याला एक अँड्रॉइड अपग्रेड आणि दोन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील.

Infinix GT 10 Pro, GT 10 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : दोन्ही फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल.
  • चिपसेट : Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 चिपसेट दिला जाईल तर GT 10 Pro+ मध्ये डायमेन्सिटी 8050 चिपसेटचा समवेश केला जाईल.
  • कॅमेरा : दोन्ही फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : GT 10 Pro मध्ये 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल तर GT 10 Pro+ सोबत 8GB/256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

The post Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/feed/ 0
ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 11 Jul 2023 15:53:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22339 नथिंग कंपनीचा दुसरा ट्रान्सपरंट स्मार्टफोन Nothing Phone (2) भारतात लाँच झाला आहे. डिवाइसमध्ये आधीपेक्षा चांगली डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती. Nothing Phone (2) डिजाइन हा डिवाइस ट्रान्सपरंट बॅक पॅनलसह आला आहे. ह्यात जास्त एलईडी लाइट्स देण्यात आल्या […]

The post ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) भारतासह जागतिक बाजारात आला आहे.
  • आता बॅक पॅनलमध्ये 33 एलईडी लाइट जास्त आहेत.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळतो.

नथिंग कंपनीचा दुसरा ट्रान्सपरंट स्मार्टफोन Nothing Phone (2) भारतात लाँच झाला आहे. डिवाइसमध्ये आधीपेक्षा चांगली डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती.

Nothing Phone (2) डिजाइन

हा डिवाइस ट्रान्सपरंट बॅक पॅनलसह आला आहे. ह्यात जास्त एलईडी लाइट्स देण्यात आल्या आहेत. कॅमेरा मॉड्यूलमध्ये देण्यात आलेली फ्लॅश लाइट देखील मोठी आहे. डिवाइसच्या उजवीकडे पावर बटन मिळतो तर वॉल्यूम अप-डाउन बटन डावीकडे देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर आधीच्या तुलनेत 33 एलईडी लाइट जास्त आहेत.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा एफएचडी प्लस ओएलईडी LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन, HDR 10+, 10 बिट कलर, 240Hz टच सॅम्पलिंग रेट टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देखील आहे.
  • प्रोसेसर : नवीन नथिंग फोनमध्ये बेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळतो. हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी एड्रिनो 720 जीपीयू आहे.
  • स्टोरेज : डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ह्यात 50 मेगापिक्सलचा IMX890 प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. जोडीला 50 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • बॅटरी : कंपनीनं 4700एमएएचची बॅटरी दिली आहे. जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Nothing OS 2.0 वर चालतो.
  • सुरक्षा : फोनमध्ये सुरक्षेसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी रेटिंग सादर करण्यात आली आहे. तसेच युजर्सना फोनमध्ये 3 वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट्स मिळतील.

The post ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-price-and-specifications-leaked-before-11-july-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-price-and-specifications-leaked-before-11-july-india-launch/#respond Thu, 06 Jul 2023 12:23:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22266 नथिंग कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2, 11 जुलैला सादर होण्यासाठी तयार आहे. ज्याची टीजर इमेज कंपनीनं शेयर केली आहे. आता डिवाइसच्या लाँचपूर्वीच टिपस्टरनं फोनच्या फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जी तुम्ही पुढे वाचू शकता. Nothing Phone (2) किंमत (लीक) टिप्स्टरनुसार हा फोन 42,000 किंवा 43,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. विशेष […]

The post Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) 11 जुलैला सादर होणार आहे.
  • ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट असू शकतो.
  • 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी लेन्स मिळू शकतो.

नथिंग कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2, 11 जुलैला सादर होण्यासाठी तयार आहे. ज्याची टीजर इमेज कंपनीनं शेयर केली आहे. आता डिवाइसच्या लाँचपूर्वीच टिपस्टरनं फोनच्या फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जी तुम्ही पुढे वाचू शकता.

Nothing Phone (2) किंमत (लीक)

टिप्स्टरनुसार हा फोन 42,000 किंवा 43,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. विशेष म्हणजे ही किंमत फोनच्या टॉप मॉडेलची असू शकते. ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच बेस व्हेरिएंट सुमारे 38,000 रुपयांपर्यंत सादर केला जाऊ शकतो.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स (लीक)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर योगेश ब्रारनं Nothing Phone (2) चे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगितली आहे.

  • डिस्प्ले : फोनचा डिस्प्ले पाहता ह्यात 6.7 इंचाचा एफएचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • प्रोसेसर : नवीन फोनचा प्रोसेसर पाहता ह्यात इंडस्ट्रीचा बेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो.
  • सुरक्षा : फोनमध्ये सुरक्षेसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी रेटिंग दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ह्यात 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह दिली जाऊ शकते. तसेच 50 मेगापिक्सलचा (UW) (JN1) सेन्सर मिळू शकतो.
  • बॅटरी : डिवाइस 4700एमएएचची बॅटरी सपोर्टसह येऊ शकतो. ह्या बॅटरीसह 33W किंवा 15W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Nothing OS 2.0 वर चालू शकतो.
  • अन्य : फोनमध्ये युजर्सना 3+4 वर्षांचे सिक्योरिटी आणि ओएस अपडेट्स दिले जाऊ शकतात.
  • स्टोरेज : स्टोरेज ऑप्शन बाबत ह्या लीकमध्ये माहिती मिळाली नाही, परंतु हा डिवाइस 8GB पर्यंत रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.

The post Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-price-and-specifications-leaked-before-11-july-india-launch/feed/ 0
Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-image-leak-dual-camera-setup-reveal/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-image-leak-dual-camera-setup-reveal/#respond Mon, 03 Jul 2023 07:37:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21853 Nothing कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन Nothing Phone (2), 11 जुलैला लाँच होणार आहे. परंतु त्याआधीच स्मार्टफोनबद्दल अनेक लीक आणि रेंडर समोर आले आहेत. तसेच आजच्या लीकमध्ये टिपस्टरनं ह्या फोनची एक इमेज शेयर केली आहे ज्यात डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत साविसात. Nothing Phone (2) कॅमेरा लीक डीटेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर […]

The post Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • लीकमध्ये डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल पाहता येईल.
  • कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅश देखील दिसत आहे.
  • ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळू शकते.

Nothing कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन Nothing Phone (2), 11 जुलैला लाँच होणार आहे. परंतु त्याआधीच स्मार्टफोनबद्दल अनेक लीक आणि रेंडर समोर आले आहेत. तसेच आजच्या लीकमध्ये टिपस्टरनं ह्या फोनची एक इमेज शेयर केली आहे ज्यात डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत साविसात.

Nothing Phone (2) कॅमेरा लीक डीटेल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर पारस गुगलानीनं नथिंग फोन 2 ची इमेज शेयर केली आहे. इमेजमध्ये पाहता येईल की स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. तसेच कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅश देखील स्पष्टपणे दिसत आहे. तसेच वरच्या बाजूला एक सेन्सर आहे जो कदाचित मायक्रोफोन असू शकतो.

फोनची डिजाइन पाहता डिवाइस जुन्या नथिंग फोन 1 सारखाच दिसत आहे. फोटोमध्ये पाहू शकता की ह्यात फ्लॅट एज देण्यात आले आहेत. तसेच पूर्वीप्रमाणे ट्रान्सपरंट डिजाइन आणि बॅक पॅनलवर एलईडी लाइट फीचर असल्यामुळे जुन्या फोनचा भास होत आहे.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: नथिंग फोन (2) मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या खास डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश आणि हाय रिजॉल्यूशन दिला जाऊ शकतं. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळू शकतो.
  • प्रोसेसर: चांगल्या परफॉर्मन्ससाठी ह्या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जो गेमिंग आणि इतर कामांसाठी चांगला ठरू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत नवीन नथिंग फोन 2 दोन किंवा तीन स्टोरेज ऑप्शनसह येण्याची शक्यता आहे. ज्यात 8जीबी रॅम + 256जीबी इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच 8GB + 256GB व्हेरिएंट देखील येऊ शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोन 4,700एमएएचची दीर्घकाळ चालणारी बॅटरी मिळू शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता हा फोन ड्युअल कॅमेरा सह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळू शकते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

The post Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-image-leak-dual-camera-setup-reveal/feed/ 0
Nothing घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, ऑफिशियल रेंडर आले समोर https://www.91mobiles.com/marathi/nothing-fold-1-official-render-teased-could-be-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-fold-1-official-render-teased-could-be-launch-soon/#respond Tue, 02 May 2023 05:33:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20617 Nothing नं आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनचा रेंडर टीज केला आहे. नथिंगनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचा रेंडर शेयर केला आहे, या रेंडरमधून फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे ही डिजाईन Samsung च्या फोल्डेबल फोन सारखीच दिसत आहे. त्यामुळे आता सॅमसंग, शाओमी, ओप्पो, विवो आणि गुगलनंतर नथिंग देखील फोल्डेबल सेगमेंटमध्ये उतरणार असं दिसतंय. […]

The post Nothing घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, ऑफिशियल रेंडर आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing नं आपला पहिला फोल्डेबल फोन टीज केला आहे.
  • कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून फोल्डेबल फोन कंफर्म केला आहे.
  • या फोल्डेबल फोनमध्ये ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो.

Nothing नं आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनचा रेंडर टीज केला आहे. नथिंगनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचा रेंडर शेयर केला आहे, या रेंडरमधून फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे ही डिजाईन Samsung च्या फोल्डेबल फोन सारखीच दिसत आहे. त्यामुळे आता सॅमसंग, शाओमी, ओप्पो, विवो आणि गुगलनंतर नथिंग देखील फोल्डेबल सेगमेंटमध्ये उतरणार असं दिसतंय. परंतु आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये नथिंग आपला सिग्नेचर ट्रान्सपरंट लूक देखील देऊ शकते.

नथिंग फोल्ड (1) ची डिजाईन

Nothing Fold (1) नावानं येणाऱ्या या फोल्डेबल फोनचा रेंडर समोर आला आहे. कंपनीनं आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की ब्रँड आपल्या कम्युनिटी मेंबर्स आणि फॅन्ससाठी सतत नवीन इनोवेशन घेऊन येत आहे. हे रेंडर देखील नथिंगच्या कम्युनिटी मेंबरकडून आले आहेत. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच

शेयर करण्यात आलेल्या रेंडरमध्ये या फोल्डेबल फोनची डिजाईन Samsung Galaxy Z Fold सारखी दिसत आहे, ज्यात हिंजवर नथिंगची ब्रँडिग दिसत आहे. फोनची फोल्डेबल स्क्रीन ब्राइट आहे आणि याच्या हिंज दरम्यान गॅप फोल्डेबल स्क्रीनवर दिसत नाही. परंतु वास्तविक फोनची डिजाइन थोडी वेगळी असू शकते.

मिळू शकतात खास फीचर्स

Nothing Phone (1) प्रमाणेच या फोल्डेबल फोनमध्ये देखील ट्रान्सपरंट बॉडीचा वापर केला जाऊ शकतो. नथिंगनं आतापर्यंत लाँच झालेल्या सर्व डिवाइसेजमध्ये ट्रान्सपरंट बॉडी एलिमेंटचा वापर केला आहे. तसेच फोल्डेबल फोनमध्ये देखील Glyph लाइटिंगचा वापर केला जाऊ शकतो, जी नोटिफिकेशनच्या वेळी ब्लिंक करेल. तसेच यात वायर्डसह वायरलेस चार्जिंग, AMOLED फोल्डेबल स्क्रीन, ड्युअल कॅमेरा सारखे फीचर्स मिळू शकतात. हे देखील वाचा: PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

कधी येतोय नथिंग फोल्ड (1) बाजारात?

नथिंग ब्रँडनं आपल्या ट्विटर हँडलवरून कंपनीच्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनची जास्त माहिती दिली नाही. कंपनीनं हा स्मार्टफोन Nothing Fold (1) नावानं बाजारात येईल हे सांगितलं आहे. परंतु अंदाज लावला जात आहे की हा फोन यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी बाजारात येऊ शकतो. सध्या कंपनी Nothing Phone (2) वर काम करत आहे.

The post Nothing घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, ऑफिशियल रेंडर आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-fold-1-official-render-teased-could-be-launch-soon/feed/ 0
Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-spotted-on-bis-certification-website-india-launch-imminent/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-spotted-on-bis-certification-website-india-launch-imminent/#respond Mon, 27 Mar 2023 09:26:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19786 नथिंगनं अलीकडेच आपला नथिंग फोन (2) स्मार्टफोन येणार असल्याची माहिती दिली होती. असं बोललं जात आहे की हा एक अपर मिड-रेंज स्मार्टफोन असेल आणि स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. तसेच डिवाइस Q2/Q3 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. आता ऑफिशियल रिलीजपूर्वी हा मोबाइल फोन भारतीय BIS सर्टिफिकेशन ऑथोरिटी वेबसाइटवर दिसला आहे, ज्यामुळे हा […]

The post Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) भारतीय BIS सर्टफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे.
  • BIS च्या लिस्टिंगमुळे फोनच्या भारतीय लाँचची शक्यता वाढली.
  • हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.

नथिंगनं अलीकडेच आपला नथिंग फोन (2) स्मार्टफोन येणार असल्याची माहिती दिली होती. असं बोललं जात आहे की हा एक अपर मिड-रेंज स्मार्टफोन असेल आणि स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. तसेच डिवाइस Q2/Q3 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. आता ऑफिशियल रिलीजपूर्वी हा मोबाइल फोन भारतीय BIS सर्टिफिकेशन ऑथोरिटी वेबसाइटवर दिसला आहे, ज्यामुळे हा भारतात लाँच होणार असल्याचा इशारा मिळाला आहे.

BIS वर लिस्ट झाला नथिंग फोन (2)

नथिंग फोन (2) (नथिंग AIN065 मॉडेल नंबरसह अलीकडेच इंडियन BIS सर्टिफिकेशनवरून सर्टिफाइड करण्यात आला आहे. बीआयएस सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून आम्हाला डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे की डिवाइस लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवर हे आहेत बेस्ट सेलिंग अफोर्डेबल आणि मिड रेंज स्मार्टफोन, पाहा लिस्ट

एखाद्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर मॉडेल नंबरसह हा फोन समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच लिस्टिंगमधील ब्रँडचा कल पाहता मॉडेल नंबरवरून नथिंग फोन (2) हे नाव स्पष्ट होत नाही. त्यामुळे ठामपणे सांगता येणार नाही. परंतु कंपनीचा जुना ट्रेंड पाहता असं वाटत आहे की ही लिस्टिंग नथिंग फोन (2) ची आहे.

कंपनीनं कन्फर्म केला Nothing Phone (2) चा लाँच

काही दिवसांपूर्वी बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस दरम्यान कंपनीचे को-फाउंडर कार्ल पेई यांनी Nothing Phone (2) बद्दल मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं आहे की ”नथिंग फोन 2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीजसह लाँच केला जाईल आणि हा जुन्या मॉडेलच्या तुलनेत प्रीमियम असेल.” परंतु त्यांनी लाँच डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन (लीक)

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन्सबद्दल आतापर्यंत कोणतीही मोठी माहिती समोर आली नाही. परंतु इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार पाहता, या फोनमध्ये तुम्हाला 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळू शकते. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर फोनमध्ये तुम्हाला अ‍ॅमोलेड पॅनल मिळू शकतो. स्क्रीन साइजची माहिती अद्याप समोर आली नाही परंतु लीक रिपोर्टनुसार हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो.

The post Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-spotted-on-bis-certification-website-india-launch-imminent/feed/ 0
Nothing Phone (2) मध्ये मिळणार Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट; क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी चुकून दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-chipset-acidentally-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-chipset-acidentally-confirmed/#respond Tue, 07 Mar 2023 06:15:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18443 टेक्नॉलॉजीच्या विश्वात लिक्स आणि रुमर्स सतत येत असतात. परंतु जेव्हा एखादी मोठी कंपनी चुकून आगामी प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन शेयर करते तेव्हा त्या कंपनीची डोकेदुखी वाढू शकते. असाच एक MWC 2023 दरम्यान क्वॉलकॉमच्या मोबाइल, कॉम्प्युट आणि एक्सआर बिजनेसचे एसव्हीपी आणि जीएम Alex Katouzian यांच्याकडून आहे. त्यांनी एका लिंक्डइन पोस्टमधून नथिंग टीमचे अभिनंदन करताना Nothing Phone (2) स्मार्टफोनमध्ये […]

The post Nothing Phone (2) मध्ये मिळणार Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट; क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी चुकून दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • क्वॉलकॉमच्या एका अधिकाऱ्याने चुकून Nothing Phone (2) मधील प्रोसेसरची माहिती पोस्ट केली आहे.
  • Nothing Phone (2) याच वर्षी बाजारात येणार आहे.
  • Nothing Phone (2) मध्ये फ्लॅगशिप अनुभव दिला जाईल.

टेक्नॉलॉजीच्या विश्वात लिक्स आणि रुमर्स सतत येत असतात. परंतु जेव्हा एखादी मोठी कंपनी चुकून आगामी प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन शेयर करते तेव्हा त्या कंपनीची डोकेदुखी वाढू शकते. असाच एक MWC 2023 दरम्यान क्वॉलकॉमच्या मोबाइल, कॉम्प्युट आणि एक्सआर बिजनेसचे एसव्हीपी आणि जीएम Alex Katouzian यांच्याकडून आहे. त्यांनी एका लिंक्डइन पोस्टमधून नथिंग टीमचे अभिनंदन करताना Nothing Phone (2) स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 मिळणार असल्याचं सांगितलं आणि संपूर्ण टेक विश्वाच्या नजरेतून ही चूक सुटली नाही.

Alex Katouzian यांनी आपल्या पोस्टमध्ये नथिंग फोन 2 मधील प्रोसेसरचा सहज उल्लेख केला होता. परंतु त्यामुळे नथिंगच्या चाहत्यांचा उत्साह वाढला. क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी काही वेळानं ही पोस्ट हटवली खरी परंतु तोपर्यंत या पोस्टचे स्क्रिनशॉट वायरल झाले होते. हे देखील वाचा: Moto G73 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; जाणून घ्या माहिती

Nothing Phone (2) हा कंपनीचा आगामी स्मार्टफोन आहे जो लवकरच बाजारात येईल. आणि कंपनीला मिळालेलं नथिंग फोन 1 च्या यशाची पुनरावृत्ती करेल. कंपनीनं सांगितलं आहे की नथिंग फोन 1 चे आतापर्यंत 6,50,000 युनिट्स विकले गेले आहेत, पहिलाच स्मार्टफोन लाँच करण्याऱ्या कंपनीसाठी हे खूप जबरदस्त आकडे आहेत.

या सुखद अपघाताव्यतिरिक्त सध्या नथिंग फोन 2 बद्दल इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी सांगितलं होतं की आगामी स्मार्टफोन अधिक प्रीमियम असेल. त्यामुळे नव्या स्मार्टफोनच्या बिल्ड क्वॉलिटी, ग्लिफ इंटरफेस आणि हार्डवेयरमध्ये सुधारणा अपेक्षित आहेत. यातील चिपसेट तर Snapdragon 778G+ वरून Snapdragon 8+ Gen 1 नक्कीच अपग्रेड होत आहे. या बदलांमुळे स्मार्टफोनची किंमत नक्कीच वाढेल, यात शंकाच नाही.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post Nothing Phone (2) मध्ये मिळणार Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट; क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी चुकून दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-chipset-acidentally-confirmed/feed/ 0
Nothing Phone 2 स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-india-launch-tipped-model-number-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-india-launch-tipped-model-number-specifications/#respond Tue, 07 Feb 2023 04:25:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17549 Nothing Phone (1) च्या यशस्वी लाँच नंतर लंडनमधील टेक कंपनी नथिंग यंदा या स्मार्टफोनचा उत्तराधिकारी Nothing Phone (2) सादर करण्याची तयारी करत आहे. MySmartPrice च्या एका रिपोर्टमधून या स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन प्रीमियम फ्लॅगशिप ग्रेड अनुभव देऊ शकतो. दरम्यान टिपस्टर मुकुल शर्मानं या स्मार्टफोनची बॅटरी […]

The post Nothing Phone 2 स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता.
  • टिपस्टरला स्मार्टफोनची कथित बॅटरी BIS वेबसाइटवर दिसली आहे.
  • Nothing Phone (2) मध्ये प्रीमियम फ्लॅगशिप ग्रेड अनुभव मिळू शकतो.

Nothing Phone (1) च्या यशस्वी लाँच नंतर लंडनमधील टेक कंपनी नथिंग यंदा या स्मार्टफोनचा उत्तराधिकारी Nothing Phone (2) सादर करण्याची तयारी करत आहे. MySmartPrice च्या एका रिपोर्टमधून या स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन प्रीमियम फ्लॅगशिप ग्रेड अनुभव देऊ शकतो.

दरम्यान टिपस्टर मुकुल शर्मानं या स्मार्टफोनची बॅटरी Nothing NT02 मॉडेल नंबरसह भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर पहिली आहे. त्यामुळे हा फोन भारतात देखील येऊ शकतो याची पुष्टी झाली आहे. Nothing NT01 मॉडेल नंबर असलेली बॅटरी नथिंग फोन (1) मध्ये वापरण्यात आली होती, त्यामुळे Nothing NT02 बॅटरीचा समावेश नथिंग फोन (2) मध्ये केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.हे देखील वाचा: डीटेल्ड फोटोजसाठी 108MP Camera! POCO X5 Pro 5G देणार का Realme ला टक्कर?

Nothing Phone (2) कधी येणार भारतात

नथिंग फोन (1) भारतात जुलै 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु रिपोर्टनुसार नथिंग फोन (2) 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान जगभरात लाँच केला जाऊ शकतो, ज्यात भारताचा समावेश असण्याची देखील शक्यता आहे. परंतु स्मार्टफोनच्या लाँचची अचूक तारीख मात्र अद्याप समजली नाही.

नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी काही दिवसांपूर्वी सुचवलं होतं की नथिंग फोन (2) सर्वप्रथम युनायटेड स्टेट्समध्ये सादर केला जाईल. यावेळी कंपनी अमेरिकेला प्राधान्य देणार आहे. तसेच त्यांनी सांगितलं होतं की हा स्मार्टफोन आधीपेक्षा जास्त प्रीमियम असेल आणि यातील सॉफ्टवेयरवर जास्त भर दिला जाईल.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

रिपोर्टनुसार आगामी Nothing Phone (2) चा मॉडेल नंबर ‘A065’ आहे. तसेच या फोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. Nothing Phone (2) मध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 सीरिजचा चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच आगामी नथिंग फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देखील मिळू शकते. हे देखील वाचा: स्वस्त 5G Phone हवा? मग Realme 10T 5G साठी काही दिवस थांबा; असे असतील स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये मिडरेंज चिपसेट आणि छोटी बॅटरी देण्यात आली होती. परंतु आगामी फोनमध्ये फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर आणि मोठी बॅटरी मिळू शकते. त्यामुळे नवीन फोन नक्कीच पावरफुल असेल असं दिसतंय. नथिंग फोन (1) कडे जगाचं लक्ष वेधलं गेलं ते स्मार्टफोनच्या हटके डिजाइनमुळे ज्यात कंपनीनं बॅक पॅनलवर एलईडी लाइट्सचा वापर केला होता. आता हीच डिजाइन नव्या फोनमध्ये मिळते की नाही ते पाहावं लागेल.

The post Nothing Phone 2 स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-india-launch-tipped-model-number-specifications/feed/ 0
Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी? https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-timeline-report/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-timeline-report/#respond Tue, 31 Jan 2023 07:37:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17360 Nothing Phone (2) ची तयारी कंपनीनं सुरु केली आहे आणि हा फोन 2023 च्या उत्तरार्धात लाँच केला जाईल, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी म्हटलं होतं की नथिंग फोन (1) चा उत्तराधिकारी सादर करण्याची कंपनीला कोणतीही घाई नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की नथिंग फोन (2) […]

The post Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) 2023 च्या उत्तरार्धात लाँच होईल.
  • कार्ल पेई अमेरिकन बाजारला प्राधान्य देणार.
  • Nothing Phone (2) पहिल्या फोनपेक्षा जास्त प्रीमियम असेल.

Nothing Phone (2) ची तयारी कंपनीनं सुरु केली आहे आणि हा फोन 2023 च्या उत्तरार्धात लाँच केला जाईल, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी म्हटलं होतं की नथिंग फोन (1) चा उत्तराधिकारी सादर करण्याची कंपनीला कोणतीही घाई नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की नथिंग फोन (2) कधीच येणार नाही असं नाही, असं देखील पेई म्हणाले. ब्रँडला नवा स्मार्टफोन लाँच करण्यासाठी वेळ घ्यायचा आहे म्हणून कंपनी पुढील फोन यावर्षीच्या अखेरीस सादर करू शकते. तसेच यावेळी कंपनी भारतीय बाजाराला प्राधान्य देणार नाही असं दिसतंय.

इन्व्हर्स या टेक वेबसाईटशी बोलताना पेई यांनी कन्फर्म केलं आहे की, कंपनी नथिंग फोन (2) अमेरिकन बाजाराला प्राधान्य देण्याचा विचार करत आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की हा फोन भारतात येणार नाही तर हा फोन अमेरिकेत आधी लाँच केला जाईल. विशेष म्हणजे नथिंग फोन (1) अमेरिकेत अधिकृतपणे लाँच करण्यात आला नव्हता. हे देखील वाचा: 64MP Camera सह येतोय Vivo Y100 5G फोन; लाँच होण्याआधीच झाला किंमतीचा खुलासा

कार्ल पेई यांनी कंपनीचा आगामी फोन नथिंग फोन 2 नावानं येईल असं सांगितलं तसेच हा फोन अधिक प्रीमियम असेल, हे देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा फोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह ग्राहकांच्या भेटीला येईल, तसेच याची किंमत देखील वाढलेली दिसू शकते, असा अंदाज लावला जात आहे. आगामी काळात या फोनची अजून माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

  • 6.55 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 50MP ड्युअल कॅमेरा, OIS
  • 4500mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-timeline-report/feed/ 0
Nothing Phone (1) वर 8 हजारांचा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-price-in-india-discounted-during-flipkart-big-savings-day-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-price-in-india-discounted-during-flipkart-big-savings-day-sale-offer-details/#respond Tue, 17 Jan 2023 04:06:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16933 Nothing कंपनीनं भारतात आपल्या एकमेव Nothing Phone 1 वर डिस्काउंटची घोषणा केली आहे, ही सूट Flipkart Big Savings Days सेल अंतर्गत उपलब्ध असेल जो 20 जानेवारी 2023 पर्यंत चालेल. त्यामुळे Nothing Phone (1) च्या बेस मॉडेलची किंमत 25,999 रुपये झाली आहे जी एरव्ही 33,999 रुपये असते. हा 8000 रुपयांचा डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे […]

The post Nothing Phone (1) वर 8 हजारांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (1) भारतात फ्लिपकार्टवर 25,999 रुपयांमध्ये उपलब्ध
  • फ्लिपकार्टवरील बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट
  • कंपनी Nothing Ear (Stick) देखील देतेय डिस्काउंट

Nothing कंपनीनं भारतात आपल्या एकमेव Nothing Phone 1 वर डिस्काउंटची घोषणा केली आहे, ही सूट Flipkart Big Savings Days सेल अंतर्गत उपलब्ध असेल जो 20 जानेवारी 2023 पर्यंत चालेल. त्यामुळे Nothing Phone (1) च्या बेस मॉडेलची किंमत 25,999 रुपये झाली आहे जी एरव्ही 33,999 रुपये असते. हा 8000 रुपयांचा डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे सेल संपताच मूळ किंमत पुन्हा लागू होईल. फक्त फोन नव्हे तर कंपनी आपल्या नव्या Nothing Ear (Stick) वर देखील सूट देत आहे.

Nothing Phone (1) वरील डिस्काउंट

Nothing Phone (1) चा बेस मॉडेल सध्या फ्लिपकार्टवर 25,999 रुपयांना विकला जात आहे, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते. त्याचबरोबर ICICI आणि CITI बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच Nothing Ear (Stick) देखील डिस्काउंटनांतर 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल आणि यावर देखली अतिरिक्त बँक ऑफर्स आहेत. या ऑफर्स 20 जानेवारी पर्यंत वैध असतील.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

  • 6.55 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 50MP ड्युअल कॅमेरा, OIS
  • 4500mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post Nothing Phone (1) वर 8 हजारांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-price-in-india-discounted-during-flipkart-big-savings-day-sale-offer-details/feed/ 0