Samsung Galaxy S23 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 May 2023 07:41:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oneplus ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज; येत आहे नवीन Galaxy S23 FE 5G स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-launch-in-q3-2023-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-launch-in-q3-2023-specifications-leaked/#respond Thu, 25 May 2023 07:41:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21177 Samsung Galaxy S series च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा प्रीमियम फिल मिड-बजेटमध्ये देण्यासाठी कंपनीनं ‘फॅन एडिशन’ सादर केले होते. भारतात Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE लाँच झाले होते जे लोकांना आवडले. आता बातमी आली आहे की सॅमसंग Galaxy S23 FE आणण्याची तयारी करत आहे. हा फोन OnePlus 11 आणि OnePlus 11R सारख्या फोन्सना टक्कर देऊ […]

The post Oneplus ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज; येत आहे नवीन Galaxy S23 FE 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन तिसऱ्या तिमाहीत लाँच होऊ शकतो.
  • ह्यात Samsung Exynos 2200 मिळू शकतो.
  • हा Galaxy S23 सीरीजचा चौथा फोन असेल.

Samsung Galaxy S series च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा प्रीमियम फिल मिड-बजेटमध्ये देण्यासाठी कंपनीनं ‘फॅन एडिशन’ सादर केले होते. भारतात Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE लाँच झाले होते जे लोकांना आवडले. आता बातमी आली आहे की सॅमसंग Galaxy S23 FE आणण्याची तयारी करत आहे. हा फोन OnePlus 11 आणि OnePlus 11R सारख्या फोन्सना टक्कर देऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 एफई लाँच

सॅमसंग गॅलेक्सी ए23 फॅन एडिशनसंबंधित नवीन रिपोर्ट समोर आला आहे ज्यात दावा केला जात आहे की कंपनी हा मोबाइल फोन मार्केटमध्ये लवकरच सादर करू पाहत आहे. आधी हा फोन चौथ्या तिमाहीत म्हणजे अक्टूबर-नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान येणार होता. तर आता सॅमसंग तिसऱ्या तिमाहीत हा फोन बाजारात सादर करण्याची योजना बनवत आहे. म्हणजे Samsung Galaxy S23 FE जूननंतर लाँच केला जाऊ शकतो.

फोन लाँच करने की जल्दी

रिपोर्टनुसार सॅमसंग कंपनी आपला हा फोन लाँच करण्यास उशीर करू इच्छित नाही तसेच लवकरच हा बाजारात आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार कंपनीनं लाँच केलेल्या लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज ‘गॅलेक्सी एस23’ ला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंपनी हे पाऊल उचलत आहे. बातमीनुसार Galaxy S23 series चा सेल खूप मंद आहे आणि त्यामुळे कंपनी Galaxy S23 FE नं सेल बूस्ट करू इच्छित आहे.

Samsung Galaxy S23 FE स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 120Hz AMOLED display
  • Samsung Exynos 2200
  • 50MP Rear Camera
  • 25W 4,500mAh battery

सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई संबंधित लीक्सनुसार हा मोबाइल फोन कंपनीच्या एक्सीनॉस 2200 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. ह्यात 6जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज मिळू शकते.

लीकनुसार Samsung Galaxy S23 FE मध्ये अ‍ॅमोलेड पॅनलवर पंच होल डिस्प्ले दिली जाईल जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. लीकनुसार गॅलेक्सी एस23 एफई 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येईल.

The post Oneplus ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज; येत आहे नवीन Galaxy S23 FE 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-launch-in-q3-2023-specifications-leaked/feed/ 0
Samsung Galaxy S22 च्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या नवी किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-price-in-india-drop/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-price-in-india-drop/#respond Mon, 06 Feb 2023 09:30:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17521 गॅलेक्सी एस23 सीरीज भारतात लाँच झाली आहे. यात Samsung Galaxy S23 5G, S23 plus 5G आणि S23 Ultra 5G फोन आले आहेत जे प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Galaxy S23 series ची एंट्री होताच कंपनीनं आपल्या Samsung Galaxy S22 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. लाँच प्राइसच्या तुलनेत आता गॅलेक्सी एस22 5जी फोन 20,000 रुपये स्वस्त […]

The post Samsung Galaxy S22 च्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या नवी किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy S23 लाँच होताच Galaxy S22 च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.
  • हा फोन लाँच प्राइसपेक्षा 20 हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे.
  • प्राइस कट व्यतिरिक्त गॅलेक्सी एस22 वर ऑफर्स देखील मिळत आहेत.

गॅलेक्सी एस23 सीरीज भारतात लाँच झाली आहे. यात Samsung Galaxy S23 5G, S23 plus 5G आणि S23 Ultra 5G फोन आले आहेत जे प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Galaxy S23 series ची एंट्री होताच कंपनीनं आपल्या Samsung Galaxy S22 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. लाँच प्राइसच्या तुलनेत आता गॅलेक्सी एस22 5जी फोन 20,000 रुपये स्वस्त झाला आहे. हे देखील वाचा: Samsung ने लाँच केले दोन दणकट स्मार्टफोन; Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus उडवणार वनप्लसची झोप

Samsung Galaxy S22 Price

जुनी किंमत:

  • 8GB RAM + 128GB Storage = 72,999
  • 8GB RAM + 256GB Storage = 76,999

नवीन किंमत:

  • 8GB RAM + 128GB Storage = 52,999
  • 8GB RAM + 256GB Storage = 56,999
  • सॅमसंग गॅलेक्सी एस22 5जी फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 72,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता. तर फोनचा दुसरा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो जो 76,999 लाँच प्राइससह भारतीय बाजारात आला होता.

    Samsung Galaxy S23 5G आल्यानंतर आता गॅलेक्सी ए22 ची किंमत लाँच प्राइसपेक्षा 20,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट आता 72,999 रुपयांच्या ऐवजी फक्त 52,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 76,999 रुपयांवरून 56,999 रुपये करण्यात आली आहे. फोनची नवीन प्राइस ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या किंमतीव्यतिरिक्त प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ऑफर्स देखील मिळत आहेत.

    Samsung Galaxy S22 specifications

    सॅमसंग गॅलेक्सी S22 मध्ये 6.1-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 120Hz वेरिएबल रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 2,000,000:1 कंट्रास्ट रेश्यो, 1.300 निट्स पीक ब्राइटनेस आणि आय कम्फर्ट शील्ड आहे. फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो, तसेच गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते. Samsung Galaxy S22 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटवर चालतो. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

    फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी S22 मध्ये ट्रिपल रियरला सपोर्ट करतो ज्यात ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस, f/1.8 अपर्चर, OIS आणि 85-डिग्री FoV सह 50MP चा प्रायमरी सेन्सर, f/2.2 अपर्चर असलेला 12MP चा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर आहे आणि f/2.2 अपर्चर लेन्ससह 120-डिग्री FoV आणि 10MP 3x टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 10एमपीचा कॅमेरा मिळतो. 3,700एमएएच बॅटरीसह फोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पावरशेयरचा सपोर्ट आहे.

    The post Samsung Galaxy S22 च्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या नवी किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-price-in-india-drop/feed/ 0
    Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-plus-ultra-india-prices-offers-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-plus-ultra-india-prices-offers-revealed/#respond Thu, 02 Feb 2023 06:38:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17432 Samsung Galaxy S23 सीरिजच्या भारतीय किंमतीची अधिकृत माहिती अमेरिकन लाँच नंतर काही तासांनी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे जे Galaxy S22 series ची जागा घेतील. यातील Samsung Galaxy S23 Ultra सर्वात शक्तिशाली मॉडेल आहे जो 200MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला […]

    The post Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Samsung Galaxy S23 सीरिज Unpacked event च्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे.
    • फोन्समध्येे डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स डिस्प्ले, अँड्रॉइड 13 ओएस, 45वॉट पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळतो.
    • Samsung Galaxy S23 ची किंमत भारतात 74,999 रुपयांपासून सुरु होते.

    Samsung Galaxy S23 सीरिजच्या भारतीय किंमतीची अधिकृत माहिती अमेरिकन लाँच नंतर काही तासांनी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे जे Galaxy S22 series ची जागा घेतील. यातील Samsung Galaxy S23 Ultra सर्वात शक्तिशाली मॉडेल आहे जो 200MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरिज Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि Android 13 OS सह बाजारात आली आहे. पुढे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस23, गॅलेक्सी एस23 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या भारतातील किंमतीची आणि ऑफर्सची माहिती दिली आहे.

    Samsung Galaxy S23 Series prices in India

    Samsung Galaxy S23 ची किंमत भारतात 74,999 रुपयांपासून सुरु होते, जी स्मार्टफोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर स्मार्टफोनचा 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 79,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फँटम ब्लॅक, क्रिम, ग्रीन आणि लॅव्हेंडर कलर ऑप्शनसह उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Airtel ग्राहकांना मोठा धक्का! बंद झाले कंपनीचे सर्वच स्वस्त रिचार्ज प्लॅन

    Samsung Galaxy S23 Plus च्या बेस मॉडेलची किंमत 94,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळते. तर 104,999 रुपये देऊन तुम्ही या स्मार्टफोनचा 8GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल विकत घेऊ शकता. हा फोन फँटम ब्लॅक आणि क्रीम कलरमध्ये विकत घेता येईल.

    Samsung Galaxy S23 Ultra च्या 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 124,999 ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम व 512GB स्टोरेजसाठी 134,999 रुपये आणि 12GB रॅम व 1TB स्टोरेजसाठी 154,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन, रेड, ग्रॅफाइट, लाइम आणि स्काय ब्लू कलर ऑप्शनसह बाजारात आला आहे.

    सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरिज प्री बुकिंग आणि ऑफर्स

    आज म्हणजे 2 फेब्रुवारीपासून गॅलेक्सी एस23 सीरिज भारतात प्री-बुकिंगसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाली आहे. Galaxy S23 Ultra ची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Watch4 LTE classic आणि Galaxy Buds2 4,999 रुपयांच्या स्पेशल प्राइसमध्ये खरेदी करता येतील. तर Galaxy S23+ च्या प्री बुकिंगवर Galaxy Watch4 BT तुम्ही 4,999 मध्ये मिळवू शकता. Galaxy S23 प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांची स्टोरेज अपग्रेड ऑफर मिळेल.

    त्याचबरोबर ऑनलाइन चॅनेल्सवर 8000 रुपयांचा बँक कॅशबॅक देखील या स्मार्टफोन्सवर सॅमसंग देत आहे. तसेच सॅमसंग लाइव्हच्या माध्यमातून आज प्री बुकिंग केल्यास तुम्हाला वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टर मोफत मिळेल. हे देखील वाचा: कोल्ड्रिंक विकणारी कंपनी करणार स्मार्टफोन लाँच; Coca-Cola Phone बाबत मोठा खुलासा, तारीखही ठरली

    सॅमसंग गॅलेक्सी एस23 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस23 ची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

    सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

    The post Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-plus-ultra-india-prices-offers-revealed/feed/ 0
    Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-and-galaxy-s23-plus-launched-with-snapdragon-8-gen-2-know-specs-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-and-galaxy-s23-plus-launched-with-snapdragon-8-gen-2-know-specs-and-price/#respond Wed, 01 Feb 2023 18:16:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17405 Samsung चा Galaxy Unpacked 2023 इव्हेंट पार पडला आहे या इव्हेंटमधून Samsung Galaxy S23 ही कंपनीची फ्लॅगशिप सीरीज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 200MP चा कॅमेरा Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं Samsung Galaxy S23 5G आणि Galaxy S23 Plus 5G देखील सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा, 45W […]

    The post Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • 50MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus लाँच
    • दोन्ही फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची पावर
    • 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले

    Samsung चा Galaxy Unpacked 2023 इव्हेंट पार पडला आहे या इव्हेंटमधून Samsung Galaxy S23 ही कंपनीची फ्लॅगशिप सीरीज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 200MP चा कॅमेरा Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं Samsung Galaxy S23 5G आणि Galaxy S23 Plus 5G देखील सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा, 45W फास्ट चार्जिंग, 8GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोन्सचे बरेचशे स्पेक्स एकसारखे आहेत परंतु काही बदल आहेत ज्यांची माहिती पुढे दिली आहे.

    Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus चे स्पेसिफिकेशन्स

    • FHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
    • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
    • 45W फास्ट चार्जिंग
    • 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
    • IP68 सर्टिफिकेशन
    • 8GB RAM आणि 512GB स्टोरेज

    Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे तर Galaxy S23 Plus 6.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन एफएचडी+ एज अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचर सह देण्यात आला आहे. हे फोन्स अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आले आहेत. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

    प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे फोन्स अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतात. हेव्ही टास्क नंतर देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग मिळते.

    हे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहावे म्हणून IP68 सर्टिफाइड करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटी फिचरमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault चा समावेश आहे. छोट्या Samsung Galaxy S23 मध्ये 3900mAh ची छोटी बॅटरी मिळते तर प्लस मॉडेल 4700mAh च्या बॅटरीसह येतो. दोन्ही फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

    दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये काहीही फरक नाही. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर, एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

    Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

    Samsung Galaxy S23 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट बाजारात ज्यात 8GB रॅम मिळतो. याच्या 128GB स्टोरेजची किंमत 799 डॉलर्स (सुमारे 65,486 रुपये) ठेवण्यात आली आहे. 256GB स्टोरेज मॉडेल आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लवकरच समोर येईल. हे देखील वाचा: POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; तुमच्या बजेटमध्ये बसेल का? जाणून घ्या

    Samsung Galaxy S23 Plus मध्ये 8GB रॅमसह दोन स्टोरेज ऑप्शन मिळतात. यातील 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 999 डॉलर्स (सुमारे 81,878 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत गुलदस्त्यात आहे. हे दोन्ही फोन भारतीय बाजारात देखील येणार आहेत, ज्यांची किंमत कंपनी उद्या घोषित करेल.

    The post Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-and-galaxy-s23-plus-launched-with-snapdragon-8-gen-2-know-specs-and-price/feed/ 0
    एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-launched-with-200mp-camera-know-specs-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-launched-with-200mp-camera-know-specs-and-price/#respond Wed, 01 Feb 2023 18:15:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17404 Samsung नं आपल्या एका जबरदस्त लाँच इव्हेंट Galaxy Unpacked 2023 मधून आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीनं तीन प्रिमीयम स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy S23 5G, Galaxy S23 Plus 5G आणि Galaxy S23 Ultra 5G बाजारात आणले आहेत. यातील अल्ट्रा मॉडेल 200MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, […]

    The post एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • 200MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S23 Ultra लाँच
    • फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे
    • 5000mAh च्या दमदार बॅटरीसह फोनची एंट्री

    Samsung नं आपल्या एका जबरदस्त लाँच इव्हेंट Galaxy Unpacked 2023 मधून आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीनं तीन प्रिमीयम स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy S23 5G, Galaxy S23 Plus 5G आणि Galaxy S23 Ultra 5G बाजारात आणले आहेत. यातील अल्ट्रा मॉडेल 200MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S23 Ultra चे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.

    Samsung Galaxy S23 Ultra Specifications

    • 6.8 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
    • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
    • एस पेन सपोर्ट
    • 5000mAh ची बॅटरी
    • 200MP क्वॉड कॅमेरा सेटअप
    • IP68 सर्टिफिकेशन
    • 12GB RAM आणि 1TB स्टोरेज

    Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.8-इंचाचा क्यूएचडी+ एज डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचरला सपोर्ट करतो. हा फोन एस पेनला सपोर्ट करतो. फोनचे डायमेन्शन 78.1 X 163.4 X 8.9एमएम आणि वजन 234 ग्राम आहे. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

    प्रोसेसिंगसाठी Galaxy S23 Ultra मध्ये क्वॉलकॉमच्या लेटेस्ट Snapdragon 8 Gen 2 चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दमदार फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतो. गेमिंग करताना फोनचं तापमान वाढू नये म्हणून यात व्हेपर चेंबर कुलिंग देण्यात आली आहे.

    हा फोन IP68 सर्टिफाइड असल्यामुळे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते जी 45W फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

    फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.7 अपर्चर असलेला 200MP चा प्रायमरी सेन्सर, जोडीला एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा, एफ 2.3 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आणि एफ 4.9. अपर्चर असलेली 10MP ची 10X झूमसह टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; तुमच्या बजेटमध्ये बसेल का? जाणून घ्या

    Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

    Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनचे चार व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. तसेच 12GB RAM व 256GB स्टोरेज, 12GB RAM व 512GB स्टोरेज आणि 12GB RAM व 1TB स्टोरेज मॉडेल देखील बाजारात आले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 1,199 डॉलर्स (सुमारे 98,271 रुपये) ठेवण्यात आली आहे. इतर मॉडेल्सची किंमत अद्याप समोर आली नाही. तसेच या स्मार्टफोनची भारतीय किंमत उद्या शेयर केली जाईल.

    The post एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-launched-with-200mp-camera-know-specs-and-price/feed/ 0
    1 फेब्रुवारीला येणाऱ्या Samsung Galaxy S23 सीरीज उपलब्ध असलेली ‘ए टू झेड’ माहिती जाणून घ्या इथे https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-series-launching-on-1-february-know-price-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-series-launching-on-1-february-know-price-specifications-details-in-marathi/#respond Sat, 28 Jan 2023 03:36:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17317 1 फेब्रुवारीला Galaxy Unpacked 2023 event आहे ज्याच्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीज बाजारात सादर केली जाईल. हा सॅमसंगचा सर्वात इव्हेंट असेल ज्याच्या माध्यमातून Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. पुढे आम्ही गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून येणाऱ्या गॅलेक्सी एस23 सीरीजची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि सेलची संपूर्ण माहिती […]

    The post 1 फेब्रुवारीला येणाऱ्या Samsung Galaxy S23 सीरीज उपलब्ध असलेली ‘ए टू झेड’ माहिती जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला लाँच होणार आहे.
    • या दिवशी Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra स्मार्टफोन लाँच केले जातील.
    • भारतात गॅलेक्सी एस23 सीरीजची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

    1 फेब्रुवारीला Galaxy Unpacked 2023 event आहे ज्याच्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीज बाजारात सादर केली जाईल. हा सॅमसंगचा सर्वात इव्हेंट असेल ज्याच्या माध्यमातून Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. पुढे आम्ही गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून येणाऱ्या गॅलेक्सी एस23 सीरीजची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि सेलची संपूर्ण माहिती दिली आहे.

    Samsung Galaxy S23 series कधी होणार लाँच

    Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून ही नवीन फ्लॅगशिप फोन सीरीज 1 फेब्रुवारीला मार्केटमध्ये एंट्री करेल. हा लाँच इव्हेंट अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित केला जाईल. स्थानिक वेळेनुसार गॅलेक्सी अनपॅक्ड 1 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरु होईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येईल.

    भारतात कशी करता येईल गॅलेक्सी एस23 सीरीजची प्री-बुकिंग

    Samsung Galaxy S23 series खरेदी करण्याचा विचार करणारे मोबाइल युजर्स 1,999 रुपये देऊन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर फोन प्री-रिजर्व करू शकतात. खरेदीच्या वेळी हे पैसे फोनच्या किंमतीत अ‍ॅडजस्ट केले जातील. रिजर्वेशन केल्यावर 6,999 रुपयांचे samsung.com कुपन आणि 5,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट ग्राहकांना मिळतील. Samsung Shop App वर 2000 रुपयांचे वेलकम व्हाउचर आणि 2% लॉयल्टी पॉईंट देखील मिळतील. अशाप्रकारे 5,000 रुपयांचा Amazon Pay cashback देखील दिला जाईल.

    Samsung Galaxy S23 Price

    लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस23 स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळेल ज्याची किंमत $799 डॉलर असू शकते. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो आणि ज्याची प्राइस $849 डॉलर असू शकते. भारतीय करंसीनुसार ही किंमत अनुक्रमे 64,900 रुपये आणि 69,000 रुपयांच्या आसपास आहे. हे देखील वाचा: शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहताना दिसली POCO X5 Pro लाँच डेट; पुढील आठवड्यात येणार दणकट फोन

    Samsung Galaxy S23+ Price

    गॅलेक्सी ए23+ पाहता लीकनुसार, या फोनचे मेमरी व्हेरिएंट्स देखील वनीला मॉडेल सारखे असू शकतात. फोनचा 8GB RAM + 128 GB storage व्हेरिएंट $999 डॉलर मध्ये तर 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंट $1049 डॉलर मध्ये लाँच होऊ शकतो. ही प्राइस जवळपास 81,000 रुपये आणि 85,000 रुपये आहे.

    Samsung Galaxy S23 Ultra Price

    सीरीजचा सर्वात मोठा अल्ट्रा मॉडेल तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. किंमत पाहता 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1,249 डॉलर (जवळपास 1,01,499 रुपये), 12जीबी रॅम+ 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1349 (जवळपास 1,09,499 रुपये) आणि 12जीबी रॅम + 1टीबी स्टोेरेज व्हेरिएंट $1499 (जवळपास 1,21,800 रुपये) मध्ये लाँच होऊ शकतो.

    Samsung Galaxy S23 Specifications

    सॅमसंग गॅलेक्सी एस23 हा मोबाइल फोन 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं रिपोर्ट्स व लीक्समधून समोर आलं आहे. Samsung Galaxy S23 चा 8जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 128जीबी व 256जीबी स्टोरेज दिली जाईल.

    Samsung Galaxy S23 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर आणि 10 मेगापिक्सलचा थर्ड लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3,900एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

    Samsung Galaxy S23 Ultra Specifications

    हा मोबाइल फोन 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या स्क्रीनसह लाँच होईल जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 3.36गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजसह लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर धावणारी भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर; सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा

    Samsung Galaxy S23 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 108 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सलचे सेन्सर असू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा सॅमसंग फोन 4,885एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.

    The post 1 फेब्रुवारीला येणाऱ्या Samsung Galaxy S23 सीरीज उपलब्ध असलेली ‘ए टू झेड’ माहिती जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-series-launching-on-1-february-know-price-specifications-details-in-marathi/feed/ 0
    लाँच पूर्वीच Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची संभाव्य किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/upcoming-samsung-galaxy-s23-galaxy-s23-plus-and-galaxy-s23-ultra-price-leak-before-1-february-launching-flagship-phone-in-2023/ https://www.91mobiles.com/marathi/upcoming-samsung-galaxy-s23-galaxy-s23-plus-and-galaxy-s23-ultra-price-leak-before-1-february-launching-flagship-phone-in-2023/#respond Mon, 16 Jan 2023 05:25:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16895 Samsung Galaxy S23 सीरीज 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. सीरीजमध्ये बेस मॉडेल Galaxy S23 सह S23 Plus आणि S23 Ultra स्मार्टफोन येऊ शकतात. कंपनीनं एस23 सीरीज भारतात प्री-रिजर्वसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. आता मार्केटमध्ये येण्यापूर्वी या पावरफुल सॅमसंग फोनची संभाव्य किंमत देखील लीक झाली आहे. एक नवीन रिपोर्टमध्ये तिन्ही गॅलेक्सी स्मार्टफोन्सच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची […]

    The post लाँच पूर्वीच Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Samsung Galaxy S23, S23 Plus आणि S23 Ultra ची संभाव्य प्राइस लीक झाली आहे.
    • या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजची आंतरराष्ट्रीय किंमत जवळपास 64,900 रुपयांपासून सुरु होऊ शकते.
    • इंडिया प्राइस स्मार्टफोन्सच्या ग्लोबल प्राइसच्या तुलनेत कमी मिळू शकते.
    • Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.

    Samsung Galaxy S23 सीरीज 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. सीरीजमध्ये बेस मॉडेल Galaxy S23 सह S23 Plus आणि S23 Ultra स्मार्टफोन येऊ शकतात. कंपनीनं एस23 सीरीज भारतात प्री-रिजर्वसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. आता मार्केटमध्ये येण्यापूर्वी या पावरफुल सॅमसंग फोनची संभाव्य किंमत देखील लीक झाली आहे. एक नवीन रिपोर्टमध्ये तिन्ही गॅलेक्सी स्मार्टफोन्सच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची संभाव्य प्राइस शेयर करण्यात आला आहे.

    सॅमसंग गॅलॅक्सी एस23 ची संभाव्य किंमत

    लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस23 स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळेल ज्याची किंमत $799 डॉलर असू शकते. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो आणि याची किंमत $849 डॉलर असू शकते. भारतीय करंसीनुसार यांची किंमत अनुक्रमे 64,900 रुपये आणि 69,000 रुपयांच्या आसपास आहे. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

    सॅमसंग गॅलॅक्सी एस23प्लस ची संभाव्य किंमत

    गॅलेक्सी ए23+ पाहता लीकनुसार, या फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स देखील वॅनिला मॉडेल सारखे असू शकतात. फोनचा 8GB RAM + 128 GB storage व्हेरिएंट $999 डॉलर मध्ये तर 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंट $1049 डॉलरमध्ये लाँच होऊ शकतो. या किंमती जवळपास 81,000 रुपये आणि 85,000 रुपयांमध्ये रूपांतरित होतात.

    सॅमसंग गॅलॅक्सी एस23 अल्ट्राची संभाव्य किंमत

    सीरीजचा सर्वात मोठा अल्ट्रा मॉडेल तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. किंमत पाहता 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1,249 डॉलर (जवळपास 1,01,499 रुपये), 12जीबी रॅम+ 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1349 (जवळपास 1,09,499 रुपये) आणि 12जीबी रॅम + 1टीबी स्टोेरेज व्हेरिएंट $1499 (जवळपास 1,21,800 रुपये) मध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: Amazon Great Republic Day Sale: या आहेत बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स, घरच्या घरी थिएटरची मजा

    सॅमसंग गॅलॅक्सी एस23 कधी होणार लाँच

    गॅलेक्सी ए23 सीरीज लाँच डिटेल्स पाहता, Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून ही नवीन फ्लॅगशिप फोन सीरीज 1 फेब्रुवारीला मार्केटमध्ये एंट्री घेईल. हा लाँच इव्हेंट सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित करण्यात येईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. भारतात कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर ही सीरीज आतापासून रिजर्व करता येईल तसेच प्री-रिजर्वेशनवर सॅमंसग अनेक ऑफर्स देखील देत आहे.

    The post लाँच पूर्वीच Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/upcoming-samsung-galaxy-s23-galaxy-s23-plus-and-galaxy-s23-ultra-price-leak-before-1-february-launching-flagship-phone-in-2023/feed/ 0
    Samsung Galaxy S23 सीरीज प्री-बुकिंग भारतात सुरु! 1 फेब्रुवारीला होणार जागतिक लाँच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-pre-reserve-started-in-india-know-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-pre-reserve-started-in-india-know-offer-details/#respond Thu, 12 Jan 2023 05:34:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16802 सॅमसंगनं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 1 फेब्रुवारीला आपली नवीन ‘एस23’ सीरीज सादर करणार आहे. कंपनीनं जरी सांगितलं नसलं तरी सीरीजमध्ये Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोनचा समावेश केला जाऊ शकतो. भारतात ही सॅमसंग सीरीज खूप लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच कंपनीनं Galaxy S23 series भारतात देखील प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केली आहे. […]

    The post Samsung Galaxy S23 सीरीज प्री-बुकिंग भारतात सुरु! 1 फेब्रुवारीला होणार जागतिक लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होऊ शकते.
    • ही सीरीज आजपासून प्री-रिजर्व केली जाऊ शकते.
    • रिजर्वेशन केल्यावर कंपनीकडून कॅशबॅक ऑफर्स दिली जात आहे.
    • सॅमसंग इंडिया वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉनवर Galaxy S23 series प्री-रिजर्व करता येईल.

    सॅमसंगनं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 1 फेब्रुवारीला आपली नवीन ‘एस23’ सीरीज सादर करणार आहे. कंपनीनं जरी सांगितलं नसलं तरी सीरीजमध्ये Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोनचा समावेश केला जाऊ शकतो. भारतात ही सॅमसंग सीरीज खूप लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच कंपनीनं Galaxy S23 series भारतात देखील प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केली आहे.

    कुठे करायची Galaxy S23 series ची प्री-बुकिंग

    Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल तसेच हा आजपासून देशात प्री-रिजर्व करता येईल. कंपनीनं ए23 सीरीज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर रिजर्वेशनसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे स्पष्ट झालं आहे की 1 फेब्रुवारीच्या लाँच नंतर ही फ्लॅगशिप सॅमसंग सीरीज शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी येईल. Galaxy S23 series Pre-Reserve सुरु करण्यासोबतच कंपनीनं ऑफर्सची देखील घोषणा केली आहे, ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे. हे देखील वाचा: नवीन वनप्लस येताच OnePlus 10 Pro वर बंपर डिस्काउंट; जाणून घ्या भन्नाट ऑफर

    Galaxy S23 वर मिळतील या ऑफर्स

    सॅमसंग गॅलेक्सी ए23 सीरीज प्री-रिजर्व केल्यावर कंपनीकडून 6,999 रुपयांचे samsung.com कुपन दिले जात आहेत. त्याचबरोबर 5,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट देखील ग्राहकांना मिळतील. Galaxy S23 series रिजर्व करताना युजरला 1,999 रुपयांचं पेमेंट करावं लागेल, ही रक्कम खरेदीच्या वेळी किंमतीत अडजस्ट केली जाईल.

    याव्यतिरिक्त Samsung Shop App च्या माध्यमातून सीरीज प्री रिजर्व करण्याची प्रकिया केल्यास युजरला 2000 रुपयांचे वेलकम व्हाउचर आणि 2% लॉयल्टी पॉईंट्स मिळतील. शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर देखील Samsung Galaxy S23 series प्री-रिजर्व करण्यासाठी 1,999 रुपये द्यावे लागतील. परंतु शॉपिंग साइटवर 5,000 रुपयांचा Amazon Pay cashback दिला जाईल. हे देखील वाचा: फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची एंट्री

    Samsung Galaxy S23 series लाँच डिटेल

    सॅमसंग आपली नवीन फ्लॅगशिप फोन सीरीज 1 फेब्रुवारीच्या दिवशी जगासमोर सादर करेल. कंपनीनं या इव्हेंटला Galaxy Unpacked 2023 असं नाव दिलं आहे. हा इव्हेंट सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित केला जाईल. स्थानिक वेळेनुसार गॅलेक्सी अनपॅक्ड 1 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरु होईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल.

    The post Samsung Galaxy S23 सीरीज प्री-बुकिंग भारतात सुरु! 1 फेब्रुवारीला होणार जागतिक लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-pre-reserve-started-in-india-know-offer-details/feed/ 0
    Galaxy Unpacked इव्हेंटची अधिकृत घोषणा; 1 फेब्रुवारीला येऊ शकतात नवीन फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-unpacked-event-date-officially-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-unpacked-event-date-officially-revealed/#respond Wed, 11 Jan 2023 05:37:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16753 Samsung Galaxy S23 च्या लाँच डेटची कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे. यंदाचा Unpacked event येत्या 1 फेब्रुवारीला आयोजित केला जाईल, अशी माहिती दक्षिण कोरियन टेक जायंटनं आपल्या अधिकृत वेबसाइटवरून दिली आहे. हा इव्हेंट अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये आयोजित केला जाईल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता सुरु होईल. या इव्हेंटमधून कंपनी नव्या Galaxy S23, Galaxy S23 Plus […]

    The post Galaxy Unpacked इव्हेंटची अधिकृत घोषणा; 1 फेब्रुवारीला येऊ शकतात नवीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Samsung Galaxy S23 च्या लाँच डेटची कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे. यंदाचा Unpacked event येत्या 1 फेब्रुवारीला आयोजित केला जाईल, अशी माहिती दक्षिण कोरियन टेक जायंटनं आपल्या अधिकृत वेबसाइटवरून दिली आहे. हा इव्हेंट अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये आयोजित केला जाईल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता सुरु होईल. या इव्हेंटमधून कंपनी नव्या Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra मॉडेल्ससह नव्या स्मार्टवॉच आणि टीडब्लूएस एअरबड्स देखील सादर करू शकते.

    Samsung Unpacked 2023 लाँच होणारे डिवाइस

    Unpacked 2023 इव्हेंटमधून 1 फेब्रुवारीला सॅमसंग आपली नवीन Galaxy S series सादर करू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये या सीरिजबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. लीक रेंडर्समधून आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच यात Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, तीन स्क्रीन साइज, 200MP पर्यंतचा कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग असे स्पेक्स मिळू शकतात. हे देखील वाचा: तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक

    भारतात येणार का Galaxy S23 series

    ग्लोबल लाँचनंतर आपली नवीन एस सीरिज भारतात सादर करण्यासाठी Samsung कधीच जास्त वेळ घेत नाही. गेल्यावर्षीही Galaxy S22 सीरिज ग्लोबल लाँचनंतर एका आठवड्याने भारतात आली होती. यंदाही कंपनीकडून हीच अपेक्षा आहे. 1 फेब्रुवारीला जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप सीरिज आल्यानंतर कंपनी पुढील आठवड्यात म्हणजे 8 फेब्रुवारीला भारतीय लाँच आयोजित केला जाऊ शकतो.

    Samsung Galaxy S23 Ultra चे लीक स्पेसिफिकेशन्स

    थेट सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स पाहायचे झाले तर लिस्टिंगनुसार हा मोबाइल फोन 19.3:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर केला जाऊ शकतो जो 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. यात 16.7एम कलरचा सपोर्ट देखील मिळू शकतो.

    Samsung Galaxy S23 Ultra च्या रॅम व स्टोरेजची माहिती देखील टेनावर मिळाली आहे. सर्टिफिकेशन्स साइटवर हा सॅमसंग फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. तर स्टोरेज पाहता टेनावर हा स्मार्टफोन 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजसह लिस्ट झाला आहे.

    सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचा खुलासा टेनावर झाला आहे. इथे स्मार्टफोनमध्ये 3.36GHz, 2.8GHz आणि 2.0GHz क्लॉक स्पीड असलेला कोर असल्याचं सांगण्यात आला आहे. जीपीयू डिटेल्स पाहता Galaxy S23 Ultra क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.

    फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200 मेगापिक्सल आणि 108 मेगापिक्सल लेन्स मिळू शकते. तसेच मागे 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन येतोय भारतात; X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी

    Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन 4,885एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. टेनावर या फोनचे डायमेंशन 163.4 x 78.1 x 8.9एमएम आणि वजन 233ग्राम दाखवण्यात आलं आहे. सर्टिफिकेशनमध्ये हा सॅमसंग स्मार्टफोन SM-S9180 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्याची माहिती आम्हाला जीएसएम एरिना वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे.

    The post Galaxy Unpacked इव्हेंटची अधिकृत घोषणा; 1 फेब्रुवारीला येऊ शकतात नवीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-unpacked-event-date-officially-revealed/feed/ 0
    Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट; मिळू शकतो 6.8 इंचाचा मोठा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-specifications-leaked-phone-listed-on-tenaa/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-specifications-leaked-phone-listed-on-tenaa/#respond Tue, 13 Dec 2022 10:31:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15958 Samsung Galaxy S23 Ultra फक्त सॅमसंगच नाही तर संपूर्ण मोबाइल इंडस्ट्रीचा सर्वात पावरफुल आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्स पैकी एक असेल. हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फ्लॅगशिप फोनची मोबाइल युजर्ससह टेक विश्वातील लोक देखील वाट पाहत आहे. हा स्मार्टफोन साल 2023 मध्ये बाजारात येईल, परंतु आज मोठी बातमी आली आहे की Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स […]

    The post Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट; मिळू शकतो 6.8 इंचाचा मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Samsung Galaxy S23 Ultra फक्त सॅमसंगच नाही तर संपूर्ण मोबाइल इंडस्ट्रीचा सर्वात पावरफुल आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्स पैकी एक असेल. हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फ्लॅगशिप फोनची मोबाइल युजर्ससह टेक विश्वातील लोक देखील वाट पाहत आहे. हा स्मार्टफोन साल 2023 मध्ये बाजारात येईल, परंतु आज मोठी बातमी आली आहे की Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे, जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

    Samsung Galaxy S23 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

    डिस्प्ले – थेट सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स पाहायचे झाले तर लिस्टिंगनुसार हा मोबाइल फोन 19.3:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर केला जाऊ शकतो 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. यात 16.7एम कलरचा सपोर्ट देखील मिळू शकतो. हे देखील वाचा: VI च्या ग्राहकांसाठी अच्छे दिन; कंपनी मोफत देतेय अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग

    रॅम/स्टोरेज – Samsung Galaxy S23 Ultra च्या रॅम व स्टोरेजची माहिती देखील टेनावर मिळाली आहे. सर्टिफिकेशन्स साइटवर हा सॅमसंग फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. तर स्टोरेज पाहता टेनावर हा स्मार्टफोन 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजसह लिस्ट झाला आहे.

    प्रोसेसर – सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचा खुलासा टेनावर झाला आहे. इथे स्मार्टफोनमध्ये 3.36GHz, 2.8GHz आणि 2.0GHz क्लॉक स्पीड असलेला कोर असल्याचं सांगण्यात आला आहे. जीपीयू डिटेल्स पाहता Galaxy S23 Ultra क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.

    कॅमेरा – फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200 मेगापिक्सल आणि 108 मेगापिक्सल लेन्स मिळू शकते. तसेच मागे 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: 425km रेंज येतेय MG 4 EV; Auto Expo 2023 मधून दिसेल पहिली झलक

    बॅटरी – Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन 4,885एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. टेनावर या फोनचे डायमेंशन 163.4 x 78.1 x 8.9एमएम आणि वजन 233ग्राम दाखवण्यात आलं आहे. सर्टिफिकेशनमध्ये हा सॅमसंग स्मार्टफोन SM-S9180 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्याची माहिती आम्हाला जीएसएम एरिना वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे.

    The post Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट; मिळू शकतो 6.8 इंचाचा मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-specifications-leaked-phone-listed-on-tenaa/feed/ 0