वीवो ने लॉन्च केला स्वस्त नॉच डिस्प्ले असलेला फोन वाय81आई, फेस अनलॉक सपोर्ट पण आहे

सर्वात आधी 91मोबाईल्स ने बातमी दिली होती की वीवो लवकरच कमी रेंज मध्ये वाय81आई लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर आम्ही सांगितले होते की हा फोन नॉच स्क्रीन सह येईल आणि आज वीवोचा हा फोन भारतात लॉन्च झाला आहे. भारतीय बाजारात वीवो वाय81आई ची किंमत 8,490 रुपये आहे आणि हा आॅफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला आहे. हा फोन कंपनी द्वारा आधी लॉन्च केल्या गेलेल्या वीवो वाय81 मॉडेलचा छोटा वर्जन आहे. कंपनी ने या फोन मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेला नॉच डिस्प्ले दिला आहे जो आज मोबाईल फोन मध्ये ट्रेंड आहे.

वीवो वाय81आई चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय81आई मध्ये 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.22-इंच की एचडी+ प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने ​फुलव्यू डिस्प्ले 2.0 चा उपयोग वापर केला आहे अर्थात तुम्हाला कमी बेजल मिळतील. फोनच्या वरच्या भागात नॉच आहे जिथे सेल्फी कॅमेरा आणि काही सेंसर्स देण्यात आले आहेत. पण स्क्रीन प्रोटेक्शनचा कोणताही उल्लेख नाही. फोनची बॉडी पॉली कार्बोनेट ने बनलेली आहे आणि फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण नाही.

वीवो वाय81आई एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात फनटच ओएस 4.0 ची लेयरिंग आहे जो कंपनीचा यूआई आहे. हा फोन मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो आणि यात 12 नॅनो​मीटर फॅब्रिकेशन असलेला 2.0गीगाहट्र्ज चा क्वाडकोर प्रोसेसर मिळेल. सोबतच कंपनी ने 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल मेमरी दिली आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा सोबत कंपनी ने ब्यूटीमोड सारखे फीचर्स दिले आहेत. वीवो 81आई मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही पण कंपनी ने फेसअनलॉक चा वापर केला आहे. ड्युअल सिम आधारित हा फोन 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअप साठी 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन शाओमी रेडमी 6 आणि 6ए साठी पर्याय म्हणून बघता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here