Ankit Dixit - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 10:52:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/ https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/#respond Thu, 02 Mar 2023 12:34:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18342 जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये […]

The post Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honda Cub e, Dax e आणि Zoomer e झाली लाँच.
  • कंपनीनं बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत.
  • या ई-बाइक्सचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर आहे.

जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये या Electric Bikes कधी येतील याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

टॉप स्पीड आणि शानदार ब्रेकिंग सिस्टम

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं या तिन्ही नवीन होंडा ई-बाइक खास चीनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटसाठी बनवण्यात आल्या आहेत. यांचा टॉप स्पीड पाहता या तिन्ही बाइक्समध्ये 25km/h चा स्पीड मिळेल. तसेच नवीन ई-बाइक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्ससह आल्या आहेत. क्यूब ई आणि डॅक्स ई मध्ये रियर मोनो शॉक आहेत, तर झूमर ई मध्ये ट्विन रियर शॉक आहेत. द क्यूब ई मध्ये ड्रम ब्रेक आहेत तर डॅक्स आणि झूमर रियर डिस्क ब्रेकसह येतात. हे देखील वाचा: याच महिन्यात येतील Samsung चे दोन 5G Phone; Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G विषयी महत्वाची माहिती समजली

द क्यूब ई मध्ये 17 इंचाचे टायर्स, गोल हेडलाइट्स आणि 960Wh चा रिमूव्हेबल बॅटरी पॅक आहे. Honda Cub e मध्ये 400W मोटार आणि 65km ची राइडिंग रेंज मिळते. तसेच Honda Dax e मध्ये 1.1kWh ची बॅटरी आहे, ज्यामुळे यात 80km ची रेंज मिळते. ही बाइक 400W मोटारवर चालते आणि 25km/h चा टॉप स्पीड देते. तर झूमर ई एकदा फुल चार्ज केल्यास 90 किमीची रेंज देते. हिच्या बॅटरीची माहिती मात्र मिळाली नाही. विशेष म्हणजे तिन्ही मॉडेल्समध्ये एक चेन-ड्राईव्ह सिस्टम आणि पॅडल आहेत. हे देखील वाचा: Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड

ओरजिनल होंडा क्यूब बाइक 1958 मध्ये सादर करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ही आतापर्यंतची सर्वाधीक विकली जाणारी मोटार वाहन आहे. होंडानं क्यूबचे 100 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. आता होंडाची 2025 पर्यंत वेगवेगळ्या बाजारांमध्ये 10 इलेक्ट्रिक मोटरबाइक सादर करण्याची योजना आहे आणि त्यावर कंपनी काम करत आहे. होंडा नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा पर्याय निवडू शकते.

The post Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/feed/ 0
Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/#respond Tue, 28 Feb 2023 09:40:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18242 बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील. Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR […]

The post Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बजाज ऑटो आणि Yulu नं मिळून दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत.
  • इलेक्ट्रिक स्कूटरला Miracle GR आणि DeX GR अशी नावे देण्यात आली आहेत.
  • युलु देशात एक लाख वाहने उतरवण्याची तयारी करत आहे.

बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील.

Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR या इलेक्ट्रिक स्कूटर्स जगासाठी भारतात बनवण्यात आल्या आहेत आणि चेतक टेक्नॉलॉजी (बजाज ऑटोच्या मालकीची उपकंपनी) द्वारे बाजारात आणल्या जात आहेत.

Yulu Bajaj Electric Scooter

असं सांगण्यात आलं आहे की सादर करण्यात आलेल्या नवीन ई-स्कूटरची मॅन्युफॅक्चरिंग खासकरून बजाज ऑटो करेल. युलुनं म्हटलं आहे की बजाज ऑटोच्या मालकीच्या उपकंपनी बजाज चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडद्वारे सादर केल्या गेलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर युलुच्या टेक्नॉलॉजीवर चालतील.

विशेष म्हणजे बजाजची आधीपासून युलूमध्ये भागीदारी आहे, तसेच कंपनी स्वतःच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात विकते. आता बजाज ऑटोने युलूच्या दुसऱ्या पिढीतील ई-स्कूटर्स आणि काही घटकांचे लोकलायजेशन आणि अपग्रेड करण्यात मदत केली. हे देखील वाचा: 2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नवीन थर्ड-जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहेत आणि OTA सपोर्ट देतील. युलू कंपनीचा दावा आहे की, या नवीन ई-बाईक ट्रॅक करता येतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी उत्तम आहेत.

Miracle GR आणि DeX GR च्या किंमत आणि सेलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तुमच्या माहितीसाठी, युलु रेंटल सर्व्हिस ई-स्कूटर सादर करते. युलुचा ताफा स्वॅपेबल बॅटरीवर चालतो आणि युमा एनर्जीद्वारे संचालित आहे, ज्याचे बेंगळूर, मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास 100 स्टेशन आहेत. कंपनीची योजना 2024 पर्यंत या स्टेशन्सची संख्या 500 करण्याची आहे. हे देखील वाचा: डीएसएलआर सारखा कॅमेरा असलेल्या Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; आयफोनला टाकणार मागे?

लवकरच येतील 1 लाख टू-व्हीलर

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी देशातील प्रमुख शहरांमध्ये 1,00,000 टू-व्हीलर सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीचं लक्ष्य वर्षअखेर महसुलात 10 पट वाढ करणं आहे. स्थानिक पार्ट्स आणि असेंबली व्यतिरिक्त चांगल्या प्रोडक्शन क्वॉलिटीच्या माध्यमातून कंपनी हे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

The post Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/feed/ 0
काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी https://www.91mobiles.com/marathi/niu-mavericks-nqi-electric-scooter-launched-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/niu-mavericks-nqi-electric-scooter-launched-in-china/#respond Mon, 30 Jan 2023 09:31:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17340 चिनी कंपनी NIU नं आपली नवीन Electric Scooter NIU Mavericks NQi होममार्केट चीनमध्ये लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर लहान मुलांचा विचार करून बनवण्यात आली आहे. म्हणजे ही लहान मुलांची ई-स्कूटर (electric scooter for kids) आहे, जी स्टाइलिश डिजाइन आणि कमी किंमतीत आली आहे. कंपनीच्या मते ही स्कूटर खूप मजबूत आहे. पुढे आम्ही तुम्हाला […]

The post काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • NIU Mavericks NQi EV चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे.
  • ही एक लहान मुलांसाठी लाँच करण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
  • ही सिंगल चार्जमध्ये 7.5 किलोमीटरपर्यंत चालवता येईल.

चिनी कंपनी NIU नं आपली नवीन Electric Scooter NIU Mavericks NQi होममार्केट चीनमध्ये लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर लहान मुलांचा विचार करून बनवण्यात आली आहे. म्हणजे ही लहान मुलांची ई-स्कूटर (electric scooter for kids) आहे, जी स्टाइलिश डिजाइन आणि कमी किंमतीत आली आहे. कंपनीच्या मते ही स्कूटर खूप मजबूत आहे. पुढे आम्ही तुम्हाला हिच्या किंमत आणि फीचर्सची सर्व माहिती दिली आहे.

NIU Mavericks NQi इलेक्ट्रिक स्कूटरची प्राइस

या इलेक्ट्रिक स्कूटरची प्राइस पाहता कंपनीनं Electric Scooter NIU Mavericks NQi चीनमध्ये फक्त 699 युआन (जवळपास 8,399 रुपये) मध्ये सादर केली आहे. कंपनीनं ही Jingdong (JD.com) वर लिस्ट केली आहे. त्यामुळे काही युजर्स ही इलेक्ट्रिक स्कूटर आयात करू शकतील. परंतु ही स्कूटर भारतात अधिकृतपणे येण्याची शक्यता फारच कमी आहे. हे देखील वाचा: …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर

NIU Mavericks NQi इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

बॅटरी: Mavericks NQi 12V4.5A मध्ये लेड- अ‍ॅसिड बॅटरी देण्यात आली आहे जी एकदा चार्ज केल्यावर अधिकतम 5km/h चा वेग आणि 90 मिनिट किंवा 7.5km चा रन टाइम देते. याचा अर्थ असा की लहानगे बॅटरी संपल्यावर देखील, स्कूटरवची बॅटरी संपण्याची चिंता करावी लागणार नाही.

वजनाने हलकी: NIU Mavericks NQi इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात मोठी खास बाब म्हणजे यातील लाइटवेट डिजाइन आहे. जी फक्त 11 किलोग्रामची आहे. तसेच कंपनीनं ही मेटलनं बनवण्यात आली आहे त्यामुळे वरच्या बाजूला कठीण बनवण्यात आलं आहे, ज्याच्या वरच्या बाजूला एक अन्य चांगली लेयर या स्कूटर वर 80 किलोग्राम पर्यंत वजन असलेली व्यक्ती देखील बसू शकते.

फीचर्स: यात यूएसबी आणि एसडी कार्डचा सपोर्ट आहे. तसेच स्कूटरमध्ये म्यूजिक प्ले देखील करता येतं. त्याचबरोबर यात अ‍ॅम्बियंट लाइटिंग देण्यात आली आहे जी लहान मुलाना आकर्षीत करेल. हे देखील वाचा: एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर

तीन गियर: ई-स्कूटरमध्ये पुढे जाण्यासाठी, रीवर्स चालवणे आणि पार्किंग इत्यादी तीन गियर आहेत. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ऑग्जिलरी व्हील्स देखील देण्यात आले आहेत.

The post काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/niu-mavericks-nqi-electric-scooter-launched-in-china/feed/ 0
Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-launch-in-january-2024-company-ceo-confirms-report/ https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-launch-in-january-2024-company-ceo-confirms-report/#respond Wed, 25 Jan 2023 06:39:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17229 Honda Activa Electric Scooter ची वाट पाहत असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Honda Activa चे पेट्रोल व्हर्जन लाँच करताना अलीकडेच कंपनीच्या CEO नी Honda Activa EV Launch बद्दल मोठा खुलासा केला आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआई) चे एमडी आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपची माहिती दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक […]

The post Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honda Activa EV साल 2024 मार्चमध्ये लाँच केली जाईल.
  • कंपनीचे सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपचा खुलासा केला.
  • Honda Activa EV चा टॉप स्पीड ताशी 50 किमी असू शकतो.

Honda Activa Electric Scooter ची वाट पाहत असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Honda Activa चे पेट्रोल व्हर्जन लाँच करताना अलीकडेच कंपनीच्या CEO नी Honda Activa EV Launch बद्दल मोठा खुलासा केला आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआई) चे एमडी आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपची माहिती दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक पुढील वर्षी मार्च 2024 मध्ये लाँच होऊ शकते. अचूक लाँच डेटची माहिती समोर आली नाही. परंतु एवढ्या माहितीमुळे अ‍ॅक्टिव्हाच्या बॅटरी अवतारची वाट पाहत असलेले ग्राहक नक्कीच खुश होतील.

इतका असेल टॉप स्पीड

भारतात होंडाची पहिली EV कंपनीच्या बेस्टसेलिंग अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन असेल, असा अंदाज आधीपासून लावला जात आहे. आता यावर कंपनीच्या सीईओनी स्वतःहून शिकामोर्तब केला आहे. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आपल्या आयसीई-बेस्ड व्हर्जन प्रमाणेच लोकप्रिय होते की नाही ते येणारा काळच सांगेल. तसेच ओगाटा यांनी खुलासा केला आहे यात एक फिक्स्ड बॅटरी सेटअप असेल आणि मॅक्स ताशी 50 किमीचा स्पीड मिळेल. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

रिपोर्ट्स नुसार कंपनी अ‍ॅक्टिव्हा ईव्हीनंतर आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर सादर करेल जी पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हा दुसरा मॉडेल स्वॅपेबल बॅटरी सेटअपसह सादर केला जाईल आणि बाजारात उपलब्ध अन्य इलेक्ट्रिक स्कुटर्सपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स देईल. ओगाटा यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांपासून, कंपनीसाठी व्यावसायिक दृष्ट्या ईव्ही सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे नव्हते. परंतु बाजाराची अपेक्षा वाढल्यामुळे आम्ही पुढील वर्षी ईव्ही सेगमेंटमध्ये येत आहोत.”

इतकेच नव्हे तर ओगाटा यांनी म्हटलं की, “कमी अंतरावरील प्रवासासाठी ग्राहक भविष्यात अ‍ॅक्टिव्हा ईव्हीची निवड करतील. परंतु दूरवरच्या प्रवासासाठी आयसीई अ‍ॅक्टिव्हाच खरेदी करतील.” हे देखील वाचा: कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

तसेच ओगाटा यांनी सांगितलं की एचएमएसआय चीनमधून होंडाचं कोणतंही ईव्ही प्रोडक्ट आधी भारतीय बाजारात येऊ शकतं. गेल्या सहा महिन्यात, कंपनी ई-मोटरसह बॅटरी स्थानिक स्थरावर बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये यातील गुंतवणुकीचा मोठा भाग आपल्या निर्मितीच्या फ्रेमवर्क आयसीई दोनच्या उत्पादनसाठी राखीव असेल. तसेच अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक मध्ये फिक्स्ड बॅटरी सेटअप दिला जाऊ शकतो. अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिकची रेंज नॉर्मल असेल.

The post Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-launch-in-january-2024-company-ceo-confirms-report/feed/ 0
कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-front-suspension-breaks-lady-rider-admitted-in-icu/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-front-suspension-breaks-lady-rider-admitted-in-icu/#respond Tue, 24 Jan 2023 07:35:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17178 भारतात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक जुन्या नव्या ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये आपला हात अजमावत आहेत. परंतु राइड शेयरिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात करणारी OLA या सेगमेंटमध्ये भारतीय बाजारात आघाडीवर आहे. परंतु फक्त जास्त स्कूटर्स विकण्याच्या बाबतीत कंपनी पुढे नसून खराब इलेक्ट्रिक स्कूटर्समुळे होणाऱ्या अपघातांच्या बाबीतीत देखील ओलाचे नाव जास्त पुढे येत […]

The post कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इलेक्ट्रिक स्कूटरचं फ्रंट सस्पेंशन तुटल्यामुळे मोठा अपघात घडला.
  • Ola S1 Pro चालवणारी महिला ICU मध्ये दाखल.
  • पतीने ट्विटरवर दिली दुर्घटनेची माहिती

भारतात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक जुन्या नव्या ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये आपला हात अजमावत आहेत. परंतु राइड शेयरिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात करणारी OLA या सेगमेंटमध्ये भारतीय बाजारात आघाडीवर आहे. परंतु फक्त जास्त स्कूटर्स विकण्याच्या बाबतीत कंपनी पुढे नसून खराब इलेक्ट्रिक स्कूटर्समुळे होणाऱ्या अपघातांच्या बाबीतीत देखील ओलाचे नाव जास्त पुढे येत आहे.

OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या समस्या संपता संपत नाहीत. गेल्यावर्षी अनेक रिपोर्ट्समधून कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोष असल्यामुळे ग्राहकांना समस्या येत असल्याचे समोर आले होते. तर आता एका नवीन रिपोर्टमधून समोर आले आहे की Ola S1 Pro स्कूटरचे फ्रंट सस्पेंशन अचानक तुटून इतका मोठा अपघात झाला की महिला चालकाला गंभीर दुखापत झाली आणि तिला ICU मध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती महिलेच्या नवऱ्याने ट्विटरवर दिली आहे.

35 च्या स्पीडवर होती ई-स्कूटर

समकित परमार यांनी सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्टच्या माध्यमातून आपल्या पत्नीसोबत घडलेल्या अपघाताची माहिती दिली आहे. समकितच्या पोस्ट नुसार, रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यांची बायको 35 किमी/तास स्पिडनं ई-स्कूटर चालवत होती. परंतु अचानक पुढील चाक स्कूटरपासून वेगळं झालं. यामुळे महिलेची स्कूटी जोरात रस्त्यावर पडली ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्या ICU मध्ये आहेत.

समकित परमार यांनी Ola आणि Ola Electric चे संस्थापक व सीईओ भाविश अग्रवाल यांना देखील आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. तसेच समकितनं एका ट्विटला उत्तर देताना सांगितलं आहे की ओला टीम अपघाताची पाहणी करण्यासाठी आली होती आणि बाइक घेऊन गेली. टीमने बाइक वापस देणार असल्याचं सांगितलं परंतु आम्हाला बाइक नको तिची किंमत द्या अशी मागणी परमार यांनी केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे दुर्घटना घटण्याची ही काही पहिली वेळ नाही. अशा दुर्घटनांच्या वेळी Ola वाहनाचा स्पीड आणि अन्य डेटा अपडेट करते.

इतर लोकांनी देखील केली ओलाची तक्रार

The post कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-front-suspension-breaks-lady-rider-admitted-in-icu/feed/ 0
OTT वर या दिवशी येणार शाहरुख खानचा Pathaan, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही फिल्म https://www.91mobiles.com/marathi/pathaan-ott-release-date-revealed-amazon-prime-video/ https://www.91mobiles.com/marathi/pathaan-ott-release-date-revealed-amazon-prime-video/#respond Thu, 19 Jan 2023 03:30:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17021 बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असलेल्या शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ पुढील आठवड्यात रिलीज होण्यासाठी तयार आहे. संपूर्ण चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणार शाहरुखच्या पहिल्या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात Pathaan OTT Release Date आणि ओटीटी डील बाबत माहिती देण्यात आली आहे. bollywoodlife च्या बातमी नुसार पठाण 25 एप्रिलला ओटीटी […]

The post OTT वर या दिवशी येणार शाहरुख खानचा Pathaan, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही फिल्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Pathaan मोठ्या पडद्यावर January 25th, 2023 ला रिलीज केला जाईल.
  • चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासह जॉन अब्राहम देखील आहे.
  • Pathaan अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज केला जाईल.

बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असलेल्या शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ पुढील आठवड्यात रिलीज होण्यासाठी तयार आहे. संपूर्ण चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणार शाहरुखच्या पहिल्या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात Pathaan OTT Release Date आणि ओटीटी डील बाबत माहिती देण्यात आली आहे. bollywoodlife च्या बातमी नुसार पठाण 25 एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होईल.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अलीकडेच हाय कोर्टानं यशराज फिल्म्सला पठाणच्या ओटीटी रिलीजमध्ये काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्टिफिकेशनसाठी पुन्हा हा चित्रपट सीबीएफसीला सबमिट करावा लागेल. दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ ला आधीच सेंट्रल फिल्म सर्टिफिकेशन बोर्डकडून अप्रूवल मिळालं आहे.

इथे पाहा पठाणचा ट्रेलर

या दिवशी मोठ्या पडद्यावर रिलीज होईल पठाण

कोर्टानं पठाणच्या निर्मात्यांना 20 फेब्रुवारी पर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी चर्चा आहे. सेन्सर बोर्डला सांगण्यात आलं आहे की त्यांनी 10 मार्च पर्यंत निर्णय द्यावा. परंतु चित्रपटगृहतील रिलीजवर कोर्टानं कोणतेही निर्देश दिले नाहीत, कारण चित्रपट रिलीजसाठी फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. चित्रपट मोठ्या पडद्यावर 25 जानेवारीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जाईल.

बॉलिवुडच्या बादशाह Shah Rukh Khan आणि Deepika Padukone व्यतिरिक्त John Abraham महत्वाच्या भूमिकेत दिसेल. पठाण को हिंदी व्यतिरिक्त तेलुगु आणि तामिळमध्ये देखील रिलीज केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे तर आदित्य चोपडानं निर्मिती केली आहे.

याआधी बातमी आली होती की हा चित्रपट थिएटर रिलीज नंतर काही महिन्यांनी Amazon Prime Video ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. अ‍ॅमेझॉननं कोट्यवधी रुपयांमध्ये या चित्रपटाचे डिजिटल अधिकार खरेदी केल्याची बातमी आली आहे, परंतु निर्मात्यांकडून किंवा प्राइम व्हिडीओकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वादग्रस्त चित्रपट

4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर किंग खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, काही महिन्यांपूर्वी शाहरुख रॉकेटरी चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करत असलेल्या किंग खानचा चित्रपट पठाणमधील गाणं ‘बेशर्म रंग’ वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीबद्दल खूप मोठा वादंग निर्माण झाला होता.

The post OTT वर या दिवशी येणार शाहरुख खानचा Pathaan, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही फिल्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pathaan-ott-release-date-revealed-amazon-prime-video/feed/ 0
मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज https://www.91mobiles.com/marathi/maruti-first-electric-car-evx-launch/ https://www.91mobiles.com/marathi/maruti-first-electric-car-evx-launch/#respond Wed, 11 Jan 2023 08:22:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16769 Maruti eVX Electric SUV अखेरीस ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली आहे. ही ई-कार मारुती सुजुकीनं कॉन्सेप्ट मॉडेल अंतगर्त सादर केली आहे. ईवीएक्स सुजुकी बद्दल बोलायचं तर ही मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. त्याचबरोबर कंपनीनं या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक दिला आहे जो फक्त एकदा चार्ज केल्यावर 550 किमी पर्यंतची […]

The post मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Maruti eVX Electric SUV अखेरीस ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली आहे. ही ई-कार मारुती सुजुकीनं कॉन्सेप्ट मॉडेल अंतगर्त सादर केली आहे. ईवीएक्स सुजुकी बद्दल बोलायचं तर ही मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. त्याचबरोबर कंपनीनं या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक दिला आहे जो फक्त एकदा चार्ज केल्यावर 550 किमी पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देईल. चला जाणून घेऊया ई-कारची किंमत आणि इतर फीचर्स.

Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रिक कार

महत्वाची बाब म्हणजे Maruti Suzuki ची पहिलीच इलेक्ट्रिक कार आहे. इतर ऑटो कंपन्या या नव्या सेगमेंटमध्ये आपले विविध मॉडेल्स सादर करत असताना मारुती सुझुकीनं मात्र या सेगमेंटमध्ये हजेरी लावली नव्हती. कंपनीच्या कार्सच्या मोठ्या पोर्टफोलियोमध्ये आतापर्यंत एकही इलेक्ट्रिक कार नव्हती. आज ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीनं जगासमोर ठेवलेली कार एक कॉन्सेप्ट कार आहे. परंतु कंपनीनं सांगितलं आहे की EVX 2025 मध्ये बाजारात लाँच केली जाईल.

कारचा लुक

मारुती सुझुकीच्या नव्या इलेक्ट्रिक कारचा लूक पाहता ही कार Maruti Baleno वर आधारित असल्याचं दिसतं. तसेच हीच बाह्य लूक देखील कर्वी आहे. तसेच यात एसयूव्ही डिजाइन मिळते. यात एरोडायनॅमिक सिल्हूट, मोठा व्हीलबेस, छोटे ओव्हरहँग्स आणि हाय ग्राउंड क्लियरन्स मिळतो. कंपनीनुसार हिची लांबी 4.3 मीटर आहे. हे देखील वाचा: ‘या’ दिवशी येतंय सरकारी कंपनीचं 4G नेटवर्क; BSNL नं सांगितली लाँच डेट

जर तुम्ही पाहिलं तर या ई-कारमध्ये पुढील बाजूला कोणतीही ग्रिल नाही. तसेच हेडलाइट्स आणि डीआरएलचा सेटअप पूर्णपणे एलईडी आहे. बाजूला ओआरवीएमच्या ऐवजी कॅमेरा आहे. दरवाजे उघडण्यासाठी फ्लश डोर हँडल्स मिळतील. सध्या हा एक कॉन्सेप्ट मॉडेल आहे, त्यामुळे निर्मिती सुरु झाल्यानंतर यात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे.

या नव्या ईव्हीसाठी कंपनीनं नवीन डेडिकेटेड EV प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या कारमध्ये 60kWh क्षमता असलेला बॅटरी पॅक देण्यात येईल. या बॅटरी पॅकच्या मदतीनं ही कार सिंगल चार्जवर 550km पर्यंतचा प्रवास करू शकते. यात फास्ट चार्जिंग मिळेल का किंवा यात चार्जिंगचे कोणते पर्याय असतील याची माहिती अद्याप समोर आली नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणीत वाढ; सुंदर डिजाइन, दमदार फीचर्ससह OPPO A78 5G ची भारतात एंट्री

तसेच हा कारची किंमत किती असेल किंवा किती व्हेरिएंटमध्ये मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार उपलब्ध होईल, हे देखील अजून समजलं नाही. परंतु कंपनीनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की Maruti Suzuki EVX इलेक्ट्रिक कार दोन वर्षांनी म्हणजे 2025 मध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. तोपर्यंत या कारची अधिक माहिती हाती लागेल अशी अपेक्षा आहे.

The post मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/maruti-first-electric-car-evx-launch/feed/ 0
Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज https://www.91mobiles.com/marathi/shah-rukh-khan-pathaan-official-trailer-released-on-youtube/ https://www.91mobiles.com/marathi/shah-rukh-khan-pathaan-official-trailer-released-on-youtube/#respond Tue, 10 Jan 2023 12:45:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16736 Shah Rukh Khan चा बहुचर्चित आणि बहुप्रक्षित चित्रपट Pathaan चा ऑफिशियल ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. Yash Raj Films प्रोडक्शन अंतर्गत बनेलला हा चित्रपट 25 जानेवारीला देशात मोठ्या पडद्यावर रिलीज केला जाईल. विशेष म्हणजे हा चित्रपट रिलीज होणयापूर्वीच चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स 100 कोटींना विकले गेले आहेत. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video नं […]

The post Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Shah Rukh Khan चा बहुचर्चित आणि बहुप्रक्षित चित्रपट Pathaan चा ऑफिशियल ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. Yash Raj Films प्रोडक्शन अंतर्गत बनेलला हा चित्रपट 25 जानेवारीला देशात मोठ्या पडद्यावर रिलीज केला जाईल. विशेष म्हणजे हा चित्रपट रिलीज होणयापूर्वीच चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स 100 कोटींना विकले गेले आहेत. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video नं हे अधिकार खरेदी केले आहेत, त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी प्राइम व्हिडीओवर ऑनलाइन रिलीज केली जाईल.

इथे पाहा पठाणचा ट्रेलर

Pathaan official trailer रिलीज होताच काही तासांतच युट्युबवर या ट्रेलरला साडे तीन लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाल्या आहेत. या चित्रपटात बॉलिवुडचा बादशाह Shah Rukh Khan आणि Deepika Padukone सह John Abraham महत्वाच्या भूमिकेत दिसले. जॉननं यात व्हिलनची भूमिका साकारल्याचं ट्रेलरवरून समजते.

या ओटीटीवर रिलीज होईल Pathaan

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीपासूनच शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पठाण हिंदी व्यतिरिक्त तेलुगु आणि तामिळमध्ये देखील रिलीज केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे आणि चित्रपटाची निर्मिती आदित्य चोपडा यांनी केली आहे.

याआधी बातमी आली होती की हा चित्रपट थिएटर रिलीज नंतर काही महिन्यांनी Amazon Prime Video ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. अ‍ॅमेझॉननं कोट्यवधी रुपयांमध्ये या चित्रपटाचे डिजिटल अधिकार खरेदी केल्याची बातमी आली आहे, परंतु निर्मात्यांकडून किंवा प्राइम व्हिडीओकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे थिएटरमधील प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्यांनंतर कदाचित ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा केली जाईल, असा अंदाज लावला जात आहे.

वादग्रस्त चित्रपट

4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर किंग खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, काही महिन्यांपूर्वी शाहरुख रॉकेटरी चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करत असलेल्या किंग खानचा चित्रपट पठाणमधील गाणं ‘बेशर्म रंग’ वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीबद्दल खूप मोठा वादंग निर्माण झाला होता.

सोशल मीडियावर अशी प्रतिक्रिया

सोशल मीडियावर पठाण चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही युजर्स चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत. तर, काही युजर्स डायलॉग्सवर ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाचा लोकांच्या रिअ‍ॅक्शन…

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चाना उधाण आलं आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल की हा चित्रपट यशराज बॅनरच्या स्पाय स्पाई यूनिवर्सचा भाग आहे. तुम्ही पठाण चित्रपट पाहणार आहात का?

The post Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/shah-rukh-khan-pathaan-official-trailer-released-on-youtube/feed/ 0
420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/electric-car-byd-2023-dolphin-launched-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/electric-car-byd-2023-dolphin-launched-in-china/#respond Fri, 30 Dec 2022 09:09:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16532 2023 च्या सुरुवातीलाच इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करत BYD नं नवीन ई-कार लाँच केली आहे. कंपनीनं चीनमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार 2023 Dolphin नावानं सादर करण्यात आली आहे. लुकच्या बाबतीत या कारमध्ये आकर्षक डिजाईन देण्यात आली आहे. तसेच या कारची खासियत पाहता कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जवर ही E-Car 420 किलोमीटर पर्यंत धावू शकते. […]

The post 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2023 च्या सुरुवातीलाच इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करत BYD नं नवीन ई-कार लाँच केली आहे. कंपनीनं चीनमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार 2023 Dolphin नावानं सादर करण्यात आली आहे. लुकच्या बाबतीत या कारमध्ये आकर्षक डिजाईन देण्यात आली आहे. तसेच या कारची खासियत पाहता कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जवर ही E-Car 420 किलोमीटर पर्यंत धावू शकते. ही कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर बनवण्यात आली आहे. तसेच यात LPF ब्लेड बॅटरी वापरण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या कारची किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची किंमत

BYD ने 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची किंमत 16,700 अमेरिकन डॉलर ठेवली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत प्राइस 13 लाख 83 हजार रुपये होते. सध्या ही कार फक्त चीनमध्ये विकली जाईल. तसेच दुसऱ्या बाजारात ही ई-कार सादर करण्याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: वनप्लसची गादी धोक्यात? 16GB RAM आणि 120W चार्जिंगसह धमाकेदार iQOO Neo 7 Racing Edition लाँच

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची डिजाइन

ही ई-कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर बनली आहे. तसेच मरीन एस्थेटिक्स डिजाइन कॉन्सेप्टवर बनवण्यात आली आहे. डॉल्फिन ईव्हीचा शेप खूप सिंपल आणि स्टाइलिश दिसतो. यात फ्लॅट बॉटम मल्टी फंक्शन असलेलं स्टीयरिंग व्हील देण्यात आलं आहे. त्याचबरोबर 5 इंचाचा फुल एलसीडी इंस्ट्रूमेंट पॅनल आहे आणि कारमध्ये 12.8 इंचाची सेंट्रल कंट्रोल स्क्रीन देण्यात आली आहे. कारचे डाइमेंशन पाहता 4070/1770/1570mm असे आहेत.

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Dongchedi.com नुसार या ई-कारमध्ये 44.9kW ची बॅटरी कपॅसिटी असलेली BYD ब्लेड बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 420 किमी पर्यंतच्या एनईडीसी प्योर इलेक्ट्रिक क्रूजिंग रेंज देते. कंपनीनुसार, डॉल्फिन BYD मध्ये प्योर इलेक्ट्रिक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी न्यू जनरेशन युजर्ससाठी बनवण्यात आली आहे. तसेच कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन आउटपुट ऑप्शन असलेली मोटर दिली आहे. हे देखील वाचा: 6GB RAM सह समोर आला Samsung Galaxy A34 5G; लवकरच येणार बाजारात

यात एक ऑप्शन 70 kW/180Nm चा आहे आणि दुसरा आउटपुट ऑप्शन 130 kW/290 Nm चा मिळतो. दोन आउटपुट ऑप्शनसह येणारी ही कार 420 किलोमीटरची अफलातून रेंज देते. तर, दुसऱ्या आउटपुट ऑप्शनच्या मदतीनं ही सिंगल चार्जमध्ये 401 किलोमीटर पर्यंत चालवता येते. 70 kW/180Nm आउटपुटसह कार 0 ते 100 किलोमीटर ताशी वेग 10.9 सेकंदात गाठू शकते. तर 130 kW/290 Nm आउटपुट मध्ये हा वेळ 7.5 सेकंड होतो.

The post 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/electric-car-byd-2023-dolphin-launched-in-china/feed/ 0
7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर https://www.91mobiles.com/marathi/kia-ev9-7-seater-electric-suv-range-with-483km-confirmed-for-auto-expo-2023/ https://www.91mobiles.com/marathi/kia-ev9-7-seater-electric-suv-range-with-483km-confirmed-for-auto-expo-2023/#respond Thu, 29 Dec 2022 10:22:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16493 भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी कोरियन ऑटोमेकर किआ (Kia) 2023 ऑटो एक्सपो मध्ये 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर करू शकते. कंपनीनं Kia EV9 कॉन्सेप्टचा अधिकृत टीजर जारी केला आहे. Kia EV9 7-सीटर इलेक्ट्रिक SUV चं प्रोडक्शन व्हर्जन 2023 किंवा 2024 मध्ये लाँच केलं जाऊ शकतं. ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार पहिल्यांदा नोव्हेंबर 2021 […]

The post 7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी कोरियन ऑटोमेकर किआ (Kia) 2023 ऑटो एक्सपो मध्ये 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर करू शकते. कंपनीनं Kia EV9 कॉन्सेप्टचा अधिकृत टीजर जारी केला आहे. Kia EV9 7-सीटर इलेक्ट्रिक SUV चं प्रोडक्शन व्हर्जन 2023 किंवा 2024 मध्ये लाँच केलं जाऊ शकतं. ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार पहिल्यांदा नोव्हेंबर 2021 मध्ये LA मोटर शो दरम्यान सादर करण्यात आली होती. इलेक्ट्रिक कार रेंजमध्ये हा ब्रँडचा फ्लॅगशिप मॉडेल असू शकतो.

Kia EV9 concept ची डिजाइन आणि फीचर्स

  • सोलर पॅनलची सुविधा
  • पॅनारॉमिक सनरूफ
  • 483km रेंज
  • 77.4kWh बॅटरी पॅक

किआ ईवी9 कॉन्सेप्ट डिजिटल ‘टाइगर फेस’ फ्रंट ग्रिलसह येतो. याच्या फ्रंटला एक नवीन एयर वेंट डिजाइन आहे. जे व्हेईकलच्या समोरील वजन कमी करतं आणि एयरोडायनॅमिक्स सुधारतं. हुड वेंट डक्ट एरियाचा वापर सोलर पॅनल म्हणून करता येतो. ही BEV ऑनरला एनर्जीचा एक पर्यायी स्रोत देते, जेव्हा ते चार्जिंग स्टेशन जवळ नसतात. किआ ईवी9 कॉन्सेप्ट फुल साइज एसयूव्ही असू शकते. हिची लांबी 5 मीटरच्या आसपास असू शकते. कॉन्सेप्टची लांबी 4,929mm, रुंदी 2,055mm आणि उंची 1,790mm आहे आणि हिचा व्हीलबेस 3,099mm आहे. जी रेंज रोव्हरपेक्षा थोडीशी छोटी आहे. हे देखील वाचा: दोन-दोन 5G सिमसह येतोय Redmi Note 12 5G; पाहा भारतातील लाँच डेट आणि किंमतही

किआ ईवी9 (Kia EV9) रिट्राक्टेबल रूफ रेल्स सह येते, जे गरज नसल्यास रूफच्या आत जातात. तसेच गरज असल्यास एक बटन प्रेस करून बाहेर काढता येऊ शकतात. इतकेच नव्हे तर यात पारंपरिक विंग मिररच्या ऐवजी कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टम दिली जाऊ शकते. एसयूव्ही मध्ये ट्रायंगुलर डी-पिलर ट्रीटमेंट आहे, जी यूनिक डेलाइट ओपनिंग (DLO) सिग्नेचर बनवते. EV9 कॉन्सेप्ट मध्ये 22-इंचाचे टायर्स होते. Kia EV9 कॉन्सेप्टमध्ये मोठ्या पॅनोरमिक रूफसह 27-इंचाचा अल्ट्रा-वाइड डिस्प्ले मिळतो, ज्यात मीडिया, क्लायमेट कंट्रोल आणि कंफर्ट फंक्शनॅलिटी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. एसयूव्ही पॉप-अप स्टीयरिंग पॅडसह देखील येते. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

Kia EV9 कॉन्सेप्ट मॉड्यूलर E-GMP इलेक्ट्रिक कार आर्किटेक्चरवर आधारित आहे. या आर्किटेक्चरवर EV6, Hyundai Ioniq 5 आणि Ioniq 6 देखील येऊ शकतात. यातील EV6 मध्ये सर्वात मोठ्या लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी पॅक आहे, जो 77.4kWh चा आहे. कंपनी का दावा आहे की ही ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्जवर 483 km पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देऊ शकते. यात 350-किलोवॉट चार्जरसह पुढील जेनरेशनची अल्ट्रा-फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे, जी हिच्या अ‍ॅडव्हान्स बॅटरी इलेक्ट्रिक पावरट्रेनला 20-30 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज करू शकते. कॉन्सेप्ट EV9 मध्ये फोर- व्हील ड्राईव्ह सेटअपसाठी ड्युअल मोटर्स आहेत. कंपनीचा दावा आहे की ही 5 सेकंदांपेक्षा कमी काळात 0-100 km ताशी वेग गाठू शकते.

The post 7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kia-ev9-7-seater-electric-suv-range-with-483km-confirmed-for-auto-expo-2023/feed/ 0